Maharashtra

Jalna

CC/126/2012

Sangeeta Kakasaheb Shinde - Complainant(s)

Versus

1]Tahsildar;Jafrabad - Opp.Party(s)

R.V.Jadhav

09 Oct 2013

ORDER

 
CC NO. 126 Of 2012
 
1. Sangeeta Kakasaheb Shinde
R/o.gawhan;Sangameshwar;Tq.Jafrabad
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1]Tahsildar;Jafrabad
Jafrabad;Tq.Jafrabad
Jalna
Maharashtra
2. 2] ICICILombard General Insurance Co.Ltd.
2nd Floor;Alaknanda Complex;Near Baba PetrolPump;Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
अड.पी.एम.परिहार प्र.प.2 करीता
......for the Opp. Party
ORDER

 

(घोषित दि. 09.10.2013 व्‍दारा श्रीमती माधुरी विश्‍वरुपे, सदस्‍या)
 
      तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदारांचे पती श्री.काकासाहेब येडूबा शिंदे यांच्‍या मालकीची शेत जमिन मौ.गव्‍हाण संगमेश्‍वर ता.जाफ्राबाद जि.जालना येथे असुन दिनांक 14.01.2006 रोजी झालेल्‍या अपघातात मृत्‍यू पावले. सदर अपघाता नंतर पोलीसांनी बस ड्रायव्‍हर विरुध्‍द गुन्‍हा नोंदवला. मयताचे प्रेत संबंधित वैद्यकीय अधिका-यांकडे पोस्‍ट मार्टमसाठी पाठविले.
      तक्रारदारांनी पतीच्‍या मृत्‍यूनंतर शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव आवश्‍यक कागदपत्रांसहीत गैरअर्जदार 1 यांचेकडे विहीत मुदतीत दाखल केला. गैरअर्जदार 1 यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे मंजूरीसाठी पाठवला. गैरअर्जदार 1 यांनी दिनांक 03.08.2006 रोजी पाठवलेल्‍या पत्रानुसार 6 क, फेरफार, अंतीम रिपोर्ट, वयाचा दाखला, पासबुक वगैरे कागदपत्रांची पुर्तता करण्‍याबाबत कळवले. त्‍यानुसार तक्रारदारांनी वर नमूद केलेली कागदपत्रे गैरअर्जदार 1 यांचेकडे दाखल केली. परंतू अद्यापर्यंत नुकसान भरपाईची रक्‍कम तक्रारदारांना अदा केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
      गैरअर्जदार 1 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत दाखल केलेला प्रस्‍ताव पुढील कार्यवाहीस्‍तव गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आला.  
      गैरअर्जदार 2 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांच्‍या विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 10.04.2005 ते 09.04.2006 असून तक्रार सन 2012 मध्‍ये मुदतबाह्य दाखल केली आहे. तक्रारदारांनी अपूर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्‍ताव पाठवलेला असल्‍याबाबत, गैरअर्जदार 2 यांनी दिनांक 03.08.2005 रोजीच्‍या पत्रान्‍व्‍ये तक्रारदारांना माहिती दिली. तक्रारदारांनी सदर कागदपत्रांची पुर्तता केली नाही. त्‍यामुळे विमा प्रस्‍तावावर काहीच कार्यवाही केली नाही तसेच सदरची मुदतबाह्रय तक्रार दाखल केली.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्‍हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. आर.व्‍ही.जाधव व गैरअर्जदार 2 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्‍तीवाद ऐकला.
      तक्रारदारांचे पती श्री काकासाहेब येडूबा शिंदे हे शेतकरी असून त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झाल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रानुसार दिसून येते. तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत दाखल केलेल्‍या विमा प्रस्‍तावा सोबत 6 क चा उतारा, फेरफार, अंतीम रिपोर्ट, वयाचा दाखला, बँक पासबुक वगैरे कागदपत्रांची सदर प्रस्‍तावाची फाईल बंद केल्‍याचे गैरअर्जदार 2 यांच्‍या दिनांक 03.08.2006 रोजीच्‍या पत्रानुसार दिसून येते. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर कागदपत्रांची पुर्तता केल्‍याबाबत नमूद केले आहे. परंतू या संदर्भात कोणताही पुरावा न्‍याय मंचा समोर दाखल नाही. गैरअर्जदार 2 विमा कंपनीच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर कागदपत्रांची पुर्तता न झाल्‍यामुळे प्रस्‍तावाची फाईल बंद करण्‍यात आली.
      तक्रारीतील पुराव्‍यानुसार तक्रारदारांचा सदर योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव कागदपत्रांच्‍या त्रुटी अभावी गुणवत्‍तेवर निकाली होवू शकला नाही, हे दिसून येते. तक्रारदारांनी दिनांक 05.10.2013 रोजी दाखल केलेल्‍या अर्जानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव क्रमांक MUM/000/3627गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे प्रलंबित आहे. तक्रारदारांनी तक्रारी सोबत 7/12 ची प्रत, फेरफार क्रं.731, एफ.आय.आर, चार्जशिट, घटनास्‍थळ पंचनामा, इनक्‍वेस्‍ट पंचनामा, पोस्‍ट मार्टम अहवाल, वगैरे कागदपत्रांच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केल्‍या आहेत.
      तक्रारदारांचा प्रस्‍ताव कागदपत्रांच्‍या कारणास्‍तव गुणवत्‍तेवर निकाली होवू शकला नाही हे तक्रारीत आलेल्‍या पुराव्‍यावरुन स्‍पष्‍ट होते. सदरची योजना महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांकरीता कल्‍याणकारी योजना राबवलेली असल्‍यामुळे तांत्रिक कारणास्‍तव प्रस्‍ताव निकाली करणे उचित नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी गैरअर्जदार 2 यांच्‍या दिनांक 03.08.2006 रोजीच्‍या पत्रानुसार प्रस्‍तावातील कागदपत्रांची पुर्तता केल्‍यानंतर गैरअर्जदार 2 यांनी प्रस्‍ताव गुणवत्‍तेवर निकाली करणे न्‍यायोचित होईल.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे. 
 
आदेश  
  1. तक्रारदारांना आदेश देण्‍यात येतो की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे सदर योजने अंतर्गत प्रलंबित असलेल्‍या विमा प्रस्‍तावातील कागदपत्रांची म्‍हणजेच 6 क, फेरफार, अंतीम पोलीस रिपोर्ट, वयाचा दाखला व पासबुक वगैरे कागदपत्रांची आदेश मिळाल्‍या पासून 60 दिवसात पुर्तता करावी.
  2. गैरअर्जदार 2 विमा कंपनीला आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांनी वर आदेश क्रमांक 1 मध्‍ये नमूद केलेल्‍या कागदपत्रांची पुर्तता केल्‍या नंतर 60 दिवसात तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव गुणवत्‍तेवर निकाली करावा.
  3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच अर्जदाराला परत करावेत.
 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.