Maharashtra

Solapur

CC/10/91

Sou. Lata Nitin Sonkamble - Complainant(s)

Versus

1)Shnkarrao Mohite-Patil Nagari Patsanstha At.Barloni2)Yashvant Kisan Shinde3)Vyaktesh Shivaji Patil - Opp.Party(s)

24 Aug 2010

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/91
1. Sou. Lata Nitin SonkambleUbhi Kadadi Chal,Temburni Rd,Kurduwadi Tal MadhaSolapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. 1)Shnkarrao Mohite-Patil Nagari Patsanstha At.Barloni2)Yashvant Kisan Shinde3)Vyaktesh Shivaji Patil4)Popat Dambaru Gungal 5)Dinkar Krushna More 6)SHRIRANG Shambu More7)Babasahaeb Saudagar8)Ramling All R/o Shnkarrao Mohite-Patil Nagari Patsanstha At.BarloniSolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBERHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :

Dated : 24 Aug 2010

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

JUDGEMENT
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 91/2010.

                                                                तक्रार दाखल दिनांक: 02/03/2010.      

                                                                आदेश दिनांक : 24/08/2010.   

 

सौ. लता नितीन सोनकांबळे, वय 59 वर्षे,

व्‍यवसाय : घरकाम, रा. उभी काडादी चाळ,

टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.                            तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. स.म. शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.,

   बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

2. श्री. यशवंत किसन शिंदे, (चेअरमन), स.म. शंकरराव

   मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी,

   शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

3. श्री. व्‍यंकटेश शिवाजी पाटील, (अ.संचालक), स.म. शंकरराव

   मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी,

   शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

4. श्री. पोपट डबरु गुंजाळ, (व्‍हा. चेअरमन), स.म. शंकरराव

   मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी,

   शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

5. श्री. दिनकर कृष्‍णा मोरे, (संचालक).

6. श्री. श्रीरंग संभू मोरे, (संचालक).

7. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे, (संचालक).

8. श्री. रामलिंग बाबू ठोंबरे, (संचालक).

9. श्री. सौदागर श्रीपती चव्‍हाण, (संचालक).

10. श्री. बाबू भवानजी गुंजाळ, (संचालक).                         

11. सौ. अहिल्‍यादेवी सदाशिव हनवते, (संचालिका),

    विरुध्‍द पक्ष क्र.5 ते 11 सर्व संचालक, स.म. शंकरराव

    मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी,

    शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                        विरुध्‍द पक्ष

12. श्री. मधुकर भाऊराव गपाटे, (सचिव), स.म. शंकरराव

    मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी,

    शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

13. श्री. चंद्रकांत श्रीरंग मोरे, मॅनेजर, स.म. शंकरराव

    मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी,

    शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

14. श्री. खंडागळे, प्रशासक, प्रशासक, रा. करमाळा, ता. करमाळा,

    जि. सोलापूर, स.म. शंकरराव

    मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., बारलोणी,

    शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,                       विरुध्‍द पक्ष

 

               गणपुर्ती  :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                                सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

                    सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  प्रमोद मो. पलसे

                   विरुध्‍द पक्ष गैरहजर

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे यांचे द्वारा :-

 

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या कुर्डुवाडी शाखेमध्‍ये त्‍यांनी दि.27/10/2008 रोजी मासिक प्राप्‍ती योजनेमध्‍ये पावती क्र.008584 अन्‍वये रु.25,000/- गुंतवणूक केले आहेत. तसेच त्‍यांनी दि.5/2/2009 रोजी पावती क्र.025839 अन्‍वये मुदत ठेवीमध्‍ये रु.25,000/- गुंतवणूक केले आहेत. तक्रारदार यांना औषधोपचार व उदरनिर्वाहासाठी सदर ठेवीमध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या रकमेची नितांत आवश्‍यकता असल्‍यामुळे त्‍यांनी ठेव रकमेची व्‍याजासह मागणी केली असता टाळाटाळ करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी वरीलप्रमाणे नमूद ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी  रु.15,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

2.    सर्व विरुध्‍द पक्ष यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

3.    तक्रारदार यांची तक्रार व त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

 

 

            मुद्दे                                उत्‍तर

 

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                        होय. 

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?            होय. 

3. काय आदेश ?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

 

निष्‍कर्ष

 

 

 

4.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या कुर्डुवाडी शाखेमध्‍ये दि.27/10/2008 रोजी मासिक प्राप्‍ती योजनेमध्‍ये रु.25,000/- व दि.5/2/2009 रोजी मुदत ठेवीमध्‍ये रु.25,000/- गुंतवणूक केल्‍याचे निदर्शनास येते. तसेच ठेवीची मुदत अनुक्रमे दि.27/11/2009 व दि.5/3/2010 रोजी संपल्‍याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांना औषधोपचार व उदरनिर्वाहासाठी ठेव रकमेची आवश्‍यकता असल्‍यामुळे रकमेची मागणी केली असता टाळाटाळ करण्‍यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे.

 

5.    तक्रारदार यांनी पतंसंस्‍थेच्‍या संचालकाची यादी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे आणि त्‍याप्रमाणे संचालकांना प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. विरुध्‍द पक्ष यांनी प्रस्‍तुत तक्रारीला उत्‍तर दिलेले नसल्‍यामुळे आणि मंचासमोर उपस्थित राहून वस्‍तुस्थिती स्‍पष्‍ट करत नसल्‍यामुळे त्‍यांना तक्रारदार यांची तक्रार मान्‍य असल्‍याचे अनुमानास आम्‍ही येत आहोत.

 

6.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मुदत ठेव व मासिक व्‍याज प्राप्‍ती योजनेमध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. ठेव रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी मुदतीनंतर ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍था व पतसंस्‍थेचे संचालक मंडळ तक्रारदार यांची ठेव रक्‍कम परत करण्‍यास वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार ठरते.

 

 

7.    विरुध्‍द पक्ष क्र.14 हे प्रशासक असून मा. राष्‍ट्रीय आयोगाचा 'रजिस्‍ट्रार ऑफ को-ऑप. सोसायटीज् /विरुध्‍द/ तामीळनाडू कंझ्युमर प्रोटेक्‍शन कौन्‍सील, त्रिची', 2 (2007) सी.पी.जे. 175 (एन.सी.) या निवाडयातील तत्‍वानुसार ठेव रक्‍कम परत करण्‍यास केवळ पतसंस्‍था जबाबदार आहे आणि प्रशासक/निबंधकास वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरणे उचित ठरत नाही. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.12 व 13 हे पतसंस्‍थेचे कर्मचारी असून त्‍यांच्‍या विरुध्‍द दोष असल्‍याचे सिध्‍द झाल्‍याशिवाय त्‍यांनाही वैयक्तिक जबाबदार धरता येत नाही.

 

8.    सबब, शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

 

आदेश

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

ठेवीचा तपशील/प्रकार

पावती व खाते क्रमांक

द्यावयाची ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

या तारखेपासून द्यावयाचे व्‍याज

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

मासिक व्‍याज प्राप्‍ती योजना

008584 / 3050

रु.25,000/-

दि.27/20/2008

14 टक्‍के

मुदत ठेव पावती

025839 / 2301

रु.25,000/-

दि.5/2/2009

14 टक्‍के

 

 

 

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 

 

 

 

(सौ. संगिता एस. धायगुडे÷)

अध्‍यक्ष

(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार)                              (सौ. संजीवनी एस. शहा)

          सदस्‍य                                           सदस्‍य

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                    ----00----

(संविक/स्‍व/18810)


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER