Maharashtra

Solapur

CC/10/171

Aahilya Shamsunder Tavle - Complainant(s)

Versus

1)Shankarrao Mohite patil Pathasantha At.Barloni 2)Yashwant Kisan shinde,Sanchalak 3)Vayaktesh Shiva - Opp.Party(s)

Ankalgi

20 Apr 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/171
1. Aahilya Shamsunder Tavle739/10/9,Patil plot,Shivaji nagar,Barshi.Solapurmaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. 1)Shankarrao Mohite patil Pathasantha At.Barloni 2)Yashwant Kisan shinde,Sanchalak 3)Vayaktesh Shivaji Patil 4)Popat Dabru Gungal 5)Dinkar K.Patil 6)shrirang S.More 7)Babasaheb S.Autade 8)Ramling B.ThShankarrao Mohite patil Pathasantha At.Barloni tal Madha Br.BarshiSolapurmaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBERHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :Ankalgi, Advocate for Complainant

Dated : 20 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 171/2010.

 

                                                                तक्रार दाखल दिनांक: 07/04/2010.    

                                                                तक्रार आदेश दिनांक :20/04/2010.   

 

सौ. अहिल्‍या शामसुंदर तवले, वय 42 वर्षे,

व्‍यवसाय : घरकाम व शेती, रा. 739/10/9,

पाटील प्‍लॉट, शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर.                     तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. स.म. शंकरराव मोहिते-पाटील नागरी ग्रामीण सह. पतसंस्‍था

   मर्या., बारलोणी, ता. माढा, शाखा बार्शी, जि. सोलापूर.

   (नोटीस शाखा व्‍यवस्‍थापक, स.म. शंकरराव मोहिते-पाटील

   नागरी ग्रामीण सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी, शाखा बार्शी

   यांचेवर बजावण्‍यात यावी.)

2. श्री. यशवंत किसन शिंदे, वय सज्ञान, व्‍यवसाय : संस्‍थाचालक. 

3. श्री. व्‍यंकटेश शिवाजी पाटील, वय सज्ञान, व्‍यवसाय : संस्‍थाचालक. 

4. श्री. पोपट डबरु गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : संस्‍थाचालक. 

5. श्री. दिनकर कृष्‍णा मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : संस्‍थाचालक. 

6. श्री. श्रीरंग संभू मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : संस्‍थाचालक. 

7. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे,  वय सज्ञान, संचालक.

8. श्री. रामलिंग बाबू ठोबरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : संस्‍थाचालक. 

9. श्री. सौदागर श्रीपती चव्‍हाण, वय सज्ञान, संचालक.

10. श्री. बाबू भवानजी गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : संस्‍थाचालक. 

11. सौ. अहिल्‍यादेवी सदाशिव हनवते, वय सज्ञान, संचालक.

12. श्री. मधुकर भाऊराव गपाटे, वय सज्ञान, व्‍यवसाय : संस्‍थाचालक/

    सचिव, वरील क्र.2 ते 12 सर्वजन रा. मु.पो. बारलोणी,

    ता. माढा, जि. सोलापूर.

13. प्रशासक, स.म. शंकरराव मोहिते-पाटील नागरी ग्रामीण

   सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी, ता. माढा, शाखा बार्शी

   या पत्‍त्‍यावर बजावण्‍यात यावी.                           विरुध्‍द पक्ष

 

                        कोरम :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                     सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

                     सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

                        तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  एच.एम. अंकलगी

                        विरुध्‍द पक्ष क्र.12 तर्फे विधिज्ञ : डी.पी. बागल

 

आदेश

 

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव पावती व दामदुप्‍पट ठेव पावतीद्वारे खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे.

 

ठेव तपशील

रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

मुदत ठेव पावती

47,000

02144

29/10/07

3/3/09

12.5

मुदत ठेव पावती

90,000

027430

29/2/08

3/3/09

12.5

दामदुप्‍पट ठेव

25,000

007958

7/1/06

7/1/12

--

 

2.    मुदत पूर्ण झाल्‍यानंतर तक्रारदार यांना ठेव रक्‍कम परत करण्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी टाळाटाळ केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.12 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेचे सचिव असून पगारी नोकरदार आहेत. ठेव पावत्‍यांवर त्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या नाहीत आणि ठेव रक्‍कम परत करण्‍याची त्‍यांची जबाबदारी नाही. शेवटी त्‍यांनी तक्रार रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्‍यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र.12 यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.

 

            मुद्दे                                    उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                          होय. 

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?               होय. 

3. काय आदेश ?                                       शेवटी दिल्‍याप्रमाणे.

निष्‍कर्ष

 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या बार्शी शाखेमध्‍ये मुदत ठेव पावती व दामदुप्‍पट ठेव पावतीद्वारे रक्‍कम गुंतविल्‍याचे दिसून येते. प्रामुख्‍याने, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत आहे, अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.

 

 

7.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या संचालकांची यादी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे आणि त्‍याप्रमाणे संचालकांना प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. मंचाने विरुध्‍द पक्ष यांना मंचाची नोटीस बजावल्‍यानंतरही ते मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा म्‍हणणे दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी मंचासमोर हजर होऊन म्‍हणणे दाखल केले नसल्‍यामुळे एका अर्थाने तक्रारदार यांची तक्रार त्‍यांना मान्‍य आहे, यास पुष्‍ठी मिळते.

 

8.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मुदत ठेवीमध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. ठेव पावतीची मुदत संपल्‍यानंतर वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. ठेवीची मुदत संपल्‍यानंतर रक्‍कम परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. तक्रारदार यांना काही ठेवीचे व्‍याज अदा केल्‍याचे ठेव पावतीवरुन निदर्शनास येते. त्‍यामुळे ठेव रक्‍कम पुढील कालावधीकरिता व्‍याजासह मिळण्‍यास ते पात्र ठरतात.

 

9.    विरुध्‍द पक्ष क्र.12 व 13 हे पतसंस्‍थेचे अनुक्रमे सचिव व प्रशासक असल्‍यामुळे ठेव रक्‍कम परत करण्‍याची त्‍यांची जबाबदारी सिध्‍द झाल्‍याशिवाय त्‍यांना जबाबदार धरता येत नाही. शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

 

आदेश

 

 

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

     

ठेवीचा तपशील

पावती क्रमांक

ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

मुदत ठेव पावती

021444

47,000

4/3/2009

13.5

मुदत ठेव पावती

027430

90,000

4/3/2009

13.5

दामदुप्‍पट ठेव

007958

25,000

7/1/06

13.5

 

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

 

 (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

अध्‍यक्ष

(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार)                              (सौ. संजीवनी एस. शहा)

           सदस्‍य                                            सदस्‍य

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                    ----00----

(संविक/स्‍व/15410)

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER