जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक : 20/02/2009. तक्रार आदेश दिनांक : 27/04/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 94/2009. रामलिंग दगडूअप्पा गडकर, वय 65 वर्षे, व्यवसाय : निवृत्त, रा. 14 नंबर शाळेच्या पाठीमागे, गोदापुरे हॉस्पिटलजवळ, सुभाष नगर, बार्शी. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 95/2009. श्री. सुभाष महादेव जमदाडे, वय 61 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. मु.पो. धानुरे, पो. कुसळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. (नोटीस विरुध्द पक्ष क्र.2 यांचेवर बजावण्यात यावी.) 2. सौ. मनिषा रामेश्वर लोंढे, वय सज्ञान, रा. चौधरी प्लॉट, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 3. श्री. शिवाजी महादेव भोसले, वय सज्ञान, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 4. श्री. आदिनाथ रावसाहेब मोरे, वय सज्ञान, रा. चिंचगाव, ता. माढा, (आदिनाथ पोल्ट्री फार्म), जि. सोलापूर. 5. श्री. प्रल्हाद राघु मोरे, वय सज्ञान, रा. मु.पो. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर. 6. श्री. संदीपान लक्ष्मण बागल, वय सज्ञान, मु.पो. एस.टी. स्टॅन्डमागे, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 7. श्री. राजाराम तुकाराम उबाळे, वय सज्ञान, मु.पो. भोसरे, भांबुरे वस्ती, ता. माढा, जि. सोलापूर. 8. श्री. भानुदास मारुती निळ, वय सज्ञान, मु.पो. निमगांव, ता. करमाळा, जि. सोलापूर. 9. श्री. नागन्नाथ संदिपान नवले, वय सज्ञान, रा. मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 10. श्री. आदिनाथ बर्मा लाडे, वय सज्ञान, रा. मु.पो. भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 11. श्री. मच्छिंद्र भगवान शिंदे, वय सज्ञान, रा. मु.पो. कव्हे (रो.), ता. माढा, जि. सोलापूर. 12. श्री. अ.मजीद अ. कादर बागवान, वय सज्ञान, रा. मु.पो. पटेल चौक, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 13. श्री. श्रीमंत विश्वनाथ बेडकुते, वय सज्ञान, रा. मु.पो. वरकुटे, ता. करमाळा जि. सोलापूर. 14. श्री. लक्ष्मण दिगंबर करंडे, वय सज्ञान, रा. मु.पो. सासुरे, ता. बार्शी, जि. सोलापूर. 15. सौ. यमुना नागनाथ जाधव, वय सज्ञान, रा. भांबुरे वस्ती, मु.पो. भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर. 16. श्री. सचिन विठोबा परबत, सज्ञान, शाखाधिकारी, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर, शाखा बार्शी. 17. श्री. ए.डी. खंडागळे, प्रशासक, सहायक निबंधक, सहकारी पतसंस्था, शाखा माढा. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एस.जी. गायकवाड विरुध्द पक्ष क्र.4 यांचेतर्फे अभियोक्ता : एस.जी. उपाध्ये विरुध्द पक्ष क्र.16 यांचेतर्फे अभियोक्ता : एस.जी. बुगडे विरुध्द पक्ष क्र.7 व 15 यांचेतर्फे अभियोक्ता : एल.ए. गवई विरुध्द पक्ष क्र.1 ते 6, 8 ते 13 यांचेतर्फे अभियोक्ता : डी.पी. बागल विरुध्द पक्ष क्र.14 यांचेतर्फे अभियोक्ता : आय.बी. कस्तुरे आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर प्राप्त रक्कम विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या बार्शी शाखेमध्ये गुंतवणूक केली असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ग्राहक तक्रार क्र. 94/2009 मध्ये :- ठेवीचा प्रकार | ठेव रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | मुदत ठेव पावती | 30,000 | 008138 | 12/10/07 | 13/10/2010 | 12 टक्के | मुदत ठेव पावती | 30,000 | 008149 | 15/1/08 | 16/1/2013 | 12 टक्के |
ग्राहक तक्रार क्र. 95/2009 मध्ये :- ठेवीचा प्रकार | ठेव रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | मासिक व्याज प्राप्ती ठेव पावती | 50,000 | 71 | 13/6/06 | 14/7/2011 | 11 टक्के | मासिक व्याज प्राप्ती ठेव पावती | 50,000 | 72 | 13/6/06 | 14/7/2011 | 11 टक्के | मुदत ठेव पावती | 50,000 | 5672 | 25/3/08 | 10/5/2008 | 13 टक्के | मुदत ठेव पावती | 20,000 | 5697 | 14/5/08 | 15/6/2010 | 13 टक्के |
2. तक्रारदार हे दर महिन्याला मुदत ठेवीचे व्याज घेत होते. त्यांना विरुध्द पक्ष पतसंस्थेकडून नोव्हेंबर 2008 पर्यंतचे व्याज प्राप्त झाले आहे. त्यानंतर पतसंस्थेचे कार्यालय बंद झाल्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे वेळोवेळी मागणी करुनही ठेव रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.30,000/- व तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सन 2006 मध्ये त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. मागणी दोन वर्षापासून ते पतसंस्थेच्या सभेस गैरहजर आहेत. तसेच त्यांनी दि.3/11/2008 रोजी पोस्टाद्वारे पुन्हा राजीनामा पाठविला आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी त्यांचे संचालक पद संपुष्टात आल्याबाबत कळविले आहे. ते तक्रारदार यांची कोणतीही रक्कम देणे लागत नाहीत. त्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 4. विरुध्द पक्ष क्र.7 व 15 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते पतसंस्थेचे संचालक नाहीत आणि ठेव पावत्यांवर त्यांच्या स्वाक्ष-या नाहीत. त्यांनी अनुक्रमे दि.14/1/2007 व 10/12/2006 पासून संस्थेच्या कामकाजामध्ये सहभाग घेतलेला नसून ते संस्थेच्या सभांना गैरहजर आहेत. त्यांचा पतसंस्थेच्या कामकाजाशी व आर्थिक व्यवहाराशी संबंध नसल्यामुळे त्यांची जबाबदारी येत नाही. तसेच त्यांनी दि.16/9/2008 रोजी पतसंस्थेकडे राजीनामा दिलेला आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 5. विरुध्द पक्ष क्र.14 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली असून त्यांनी दि.21/9/2008 पूर्वीच संचालक पदाचा राजीनामा देऊन त्यानंतर संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेतला नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते निवडून आलेले संचालक नसून स्वीकृत संचालक आहेत आणि इतर संचालकांचे नियम, अटी व जबाबदा-या त्यांना लागू होत नाहीत. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 6. विरुध्द पक्ष क्र.16 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये दि.12/5/2006 पासून मॅनेजर पदावर कार्यरत होते. ठेव रक्कम देण्यास ते जबाबदार नाहीत आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 7. उर्वरीत विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे न दाखल केल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 8. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 9. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या बार्शी शाखेमध्ये मुदत ठेव पावती व मासिक व्याज प्राप्त योजनेद्वारे रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांना दरमहा व्याज देणे बंद केल्यामुळे ठेव रकमेची मागणी केली असता, विरुध्द पक्ष यांच्याकडून ठेव रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 10. विरुध्द पक्ष क्र.7 व 15 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन त्यांनी पतसंस्थेचा राजीनामा दिल्याचे व ते संस्थेच्या सभांना अनुपस्थित असल्यामुळे त्यांचा संस्थेशी व तक्रारदारांच्या ठेवीशी संबंध नसल्याचे नमूद केले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.4 यांनीही सन 2006 मध्ये व दि.3/11/2008 रोजी पोस्टाद्वारे पुन्हा राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष क्र.14 यांनी दि.21/9/2008 पूर्वीच संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे. 11. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली असून त्याप्रमाणे त्यांना तक्रारीत विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ठ करण्यात आलेले आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या बार्शी शाखेमध्ये ठेवीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम व त्यावरील व्याज देण्यात आलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.4, 7, 14 व 15 यांनी राजीनामा दिल्याचे नमूद केले असले तरी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांच्या नोटीसनुसार संस्थेच्या कामकाजामध्ये गंभीर त्रुटी होऊन संस्थेचे आर्थिक नुकसान झाल्याचे व सभासदांच्या हितास बाधा निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. आमच्या मते, तक्रारदार यांची ठेव रक्कम परत न करण्याकरिता पतसंस्थेचे संचालक मंडळ व त्यांचे निर्णय कारणीभूत आहेत. ठेवीदारांच्या मागणीनुसार ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्द पक्ष पतसंस्था व संचालक मंडळाची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य ठरते. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे ठेवीची रक्कम मिळविण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात. तक्रारदार यांना माहे नोव्हेंबर, 2008 पर्यंत व्याज मिळालेले आहे. त्यामुळे तेथून पुढील व्याज व ठेव रक्कम मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात. 12. विरुध्द पक्ष क्र.16 हे पतसंस्थेचे शाखाधिकारी आहेत. विरुध्द पक्ष क्र.17 हे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेकरिता प्रशासक म्हणून नियुक्त केलेले आहेत. मा.राष्ट्रीय आयोग व मा.राज्य आयोगांच्या निर्णयातील तत्वानुसार पतसंस्थेवरील नियुक्त प्रशासक हे त्याचे संवैधानिक कर्तव्य पार पाडत असल्यामुळे त्यांना ठेव रक्कम परत करण्याविषयी जबाबदार धरता येत नाही. तसेच ठेव रक्कम परत करण्याबाबत पतसंस्थेच्या शाखाधिका-यांवी वैयक्तिक जबाबदारी सिध्द झाल्याशिवाय त्यांनाही जबाबदार धरता येणार नाही. 13. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. ग्राहक तक्रार क्र. 94/2009 मध्ये :- ठेवीचा तपशील | पावती क्रमांक | देय ठेव रक्कम (रुपयामध्ये) | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | मुदत ठेव पावती | 008138 | 30,000 | 1/12/2008 | 12 टक्के | मुदत ठेव पावती | 008149 | 30,000 | 1/12/2008 | 12 टक्के |
ग्राहक तक्रार क्र. 95/2009 मध्ये :- ठेवीचा तपशील | पावती क्रमांक | देय ठेव रक्कम (रुपयामध्ये) | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | मासिक व्याज प्राप्ती ठेव पावती | 71 | 50,000 | 1/12/2008 | 11 टक्के | मासिक व्याज प्राप्ती ठेव पावती | 72 | 50,000 | 1/12/2008 | 11 टक्के | मुदत ठेव पावती | 5672 | 50,000 | 1/12/2008 | 13 टक्के | मुदत ठेव पावती | 5697 | 20,000 | 1/12/2008 | 13 टक्के |
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/27411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |