Maharashtra

Solapur

CC/10/115

Raosaheb Vaman Kamble - Complainant(s)

Versus

1)Santa Rohidas Gramin Bigar Sheti pathasansta.At Barloni 2)Manisha Rameshwar Londe Chairman 3)Shiva - Opp.Party(s)

Sonminde

20 Apr 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/115
1. Raosaheb Vaman KambleAt post Dahivadi Tal MadhaSolapurmaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. 1)Santa Rohidas Gramin Bigar Sheti pathasansta.At Barloni 2)Manisha Rameshwar Londe Chairman 3)Shivaji Mahadeo Bhosale 4)Adinath Raosaheb More 5)Pralhad Raosaheb More 6)Sandipan Laxman bagal 7)RajkumaSanta Rohidas Gramin Bigar Sheti pathasansta.At Barloni tal MadhaSolapurmaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBERHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :Sonminde, Advocate for Complainant

Dated : 20 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

          

ग्राहक तक्रार क्रमांक : 115/2010.

                                                                तक्रार दाखल दिनांक :  08/03/2010.    

                                                                तक्रार आदेश दिनांक : 20/04/2011.   

 

रावसाहेब वामन कांबळे, वय 49 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

रा. मु.पो. दहिवली, ता. माढा, जि. सोलापूर.                                तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर तर्फे प्रशासक.

2. सौ. मनिषा रामेश्‍वर लोंढे, वय सज्ञान, चेअरमन,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. चौधरी प्‍लॉट, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

3. श्री. शिवाजी महादेव भोसले, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

4. श्री. अदिनाथ रावसाहेब मोरे, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   मु.पो. चिंचगाव, ता. माढा, जि. सोलापूर.

5. श्री. प्रल्‍हाद राघु मोरे, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. मु.पो. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर.

6. श्री. संदिपान लक्ष्‍मण बागल, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. एस.टी. स्‍टॅन्‍डच्‍या मागे, मु.पो. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.        

7. श्री. राजाराम तुकाराम उबाळे, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   मु.पो. भोसरे, भांबुरे वस्‍ती, ता. माढा, जि. सोलापूर.

8. श्री. भानुदास मारुती निळ, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   मु.पो. निमगांव (के.), ता. करमाळा, जि. सोलापूर.

9. श्री. नागनाथ संदिपान नवले, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                     

10. श्री. आदिनाथ धर्मा लाडे, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. मु.पो. भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर.                         विरुध्‍द पक्ष

 

11. श्री. मच्छिंद्र भगवान शिंदे, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. मु.पो. कव्‍हे (रो), ता. माढा, जि. सोलापूर.

12. श्री. अ.मजीद अ. कादर बागवान, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. मु.पो. पटेल चौक, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

13. श्री. श्रीमंत विश्‍वनाथ बेडकुते, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. मु.पो. वरकुटे, ता. माढा, जि. सोलापूर.

14. श्री. लक्ष्‍मण दिगंबर करंडे, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. मु.पो. सासुरे, ता. माढा, जि. सोलापूर.

15. सौ. यमुना नागनाथ जाधव, वय सज्ञान, संचालक,

   संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   रा. मु.पो. भांबुरे वस्‍ती, भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर.     

16. व्‍यवस्‍थापक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था

   मर्यादीत, शाखा कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.           विरुध्‍द पक्ष

 

               गणपुर्ती  :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                                सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

                    सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  आर.एफ. सोनमिंडे

        विरुध्‍द पक्ष क्र.2 ते 6, 8 ते 10, 13 व 14 यांचेतर्फे अभियोक्‍ता :  डी.पी. बागल

      विरुध्‍द पक्ष क्र.7 व 15 यांचेतर्फे अभियोक्‍ता :  एल.ए. गवई

 

आदेश

 

सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांच्‍या तक्रारीमध्‍ये नमूद विवाद थोडक्‍यात असा आहे की, त्‍यांनी दि.2/8/2006 ते 2/9/2007 कालावधीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव पावती क्र.5549 द्वारे रु.1,00,000/- गुंतवणूक केले आहेत. मुदत पूर्ण झाल्‍यानंतर मागणी करुनही विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत केलेली नाही. विरुध्‍द पक्ष हे ठेव रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी ठेव रक्‍कम रु.1,00,000/- व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्च रु.2,000/- विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून वसूल होऊन मिळावा, अशी विनंती केली आहे.

 

2.    विरुध्‍द पक्ष क्र.7 व 15 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते पतसंस्‍थेचे संचालक नाहीत आणि ठेव पावत्‍यांवर त्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या नाहीत. त्‍यांनी अनुक्रमे दि.14/1/2007 व 10/12/2006 पासून संस्‍थेच्‍या कामकाजामध्‍ये सहभाग घेतलेला नसून ते संस्‍थेच्‍या सभांना गैरहजर आहेत. त्‍यांचा पतसंस्‍थेच्‍या कामकाजाशी व आर्थिक व्‍यवहाराशी संबंध नसल्‍यामुळे त्‍यांची जबाबदारी येत नाही. तसेच त्‍यांनी दि.16/9/2008 रोजी पतसंस्‍थेकडे राजीनामा दिलेला आहे. शेवटी त्‍यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.2 ते 6, 8 ते 10, 12 ते 14 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते सन 2004 ते 2009 पर्यंत पतसंस्‍थेचे संचालक होते आणि संस्‍थेचा कार्यभार व्‍यवस्थित चालत असताना सन 2008 पासून सर्वच ठेविदारांनी एकाचवेळी मुदतपूर्व ठेवींची मागणी केल्‍यामुळे पतसंस्‍थेचे परिस्थिती नाजूक बनली. त्‍यामुळे ठेवीचे पैसे परत करता आले नाहीत. त्‍यांनी कर्ज वसुली करुन ठेवी परत केल्‍या आहेत. तत्‍पुर्वी दि.6/10/2009 रोजी जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, सोलापूर यांनी संचालक मंडळ बरखास्‍त करुन प्रशासकांची नेमणूक केली आहे. तेव्‍हांपासून त्‍यांना संस्‍थेच्‍या कामकाजामध्‍ये भाग घेता आलेला नाही आणि ठेवीबाबत माहिती नाही. त्‍यांना ठेवीकरिता जबाबदार धरु नये आणि तक्रार रद्द करण्‍यात यावी, अशी त्‍यांनी विनंती केली आहे.

 

4.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                 उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                              होय.

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?             होय.

3. काय आदेश ?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

5.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या टेंभुर्णी शाखेमध्‍ये मासिक व्‍याज प्राप्‍ती योजनेद्वारे पावती क्र.5549 अन्‍वये रु.1,00,000/- गुंतविल्‍याचे रेकॉर्डवर दाखल पावतीवरुन निदर्शनास येते. ठेव पावतीची मुदत पूर्ण झाल्‍यानंतर रकमेची मागणी केली असता, विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत असल्‍याची त्‍यांची प्रमुख तक्रार आहे.

 

6.    विरुध्‍द पक्ष क्र.7 व 15 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल करुन त्‍यांनी पतसंस्‍थेचा राजीनामा दिल्‍याचे व ते संस्‍थेच्‍या सभांना अनुपस्थित असल्‍यामुळे त्‍यांचा संस्‍थेशी व तक्रारदारांच्‍या ठेवीशी संबंध नसल्‍याचे नमूद केले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 ते 6, 8 ते 10, 12 ते 14 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सन 2008 पासून सर्वच ठेविदारांनी एकाचवेळी मुदतपूर्व ठेवींची मागणी केल्‍यामुळे ठेवीचे पैसे परत करता आले नाहीत आणि पतसंस्‍थेचे संचालक मंडळ बरखास्‍त करुन प्रशासकांची नेमणूक केल्‍यापासून संस्‍थेच्‍या कामकाजामध्‍ये भाग घेता आला नसल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

 

7.    तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली असून त्‍याप्रमाणे त्‍यांना तक्रारीत विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या टेंभुर्णी शाखेमध्‍ये मासिक व्‍याज प्राप्‍ती योजनेद्वारे पावती क्र.5549 अन्‍वये रु.1,00,000/- रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीची मुदत पूर्ण झाल्‍यानंतर मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. विरुध्‍द पक्ष क्र.7 व 15 यांनी राजीनामा दिल्‍याचे नमूद केले असले तरी मुदत ठेवीमध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करताना ते संस्‍थेचे संचालक होते.  ठेविदारांच्‍या मागणीनुसार ठेव रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे मुदत ठेव पावतीची रक्‍कम त्‍यामध्‍ये व्‍याज दरासह मिळविण्‍यास तक्रारदार हक्‍कदार ठरतात.

 

8.    विरुध्‍द पक्ष क्र.16 हे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेचे व्‍यवस्‍थापक म्‍हणून नियुक्‍त केले आहेत. ठेव रक्‍कम परत करण्‍याबाबत त्‍यांची जबाबदारी सिध्‍द झाल्‍याशिवाय त्‍यांना जबाबदार धरता येणार नाही.

 

9.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव पावती क्र.5549 ची रक्‍कम रु.1,00,000/- दि.2/8/2006 पासून द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

 

(सौ. संगिता एस. धायगुडे÷)

अध्‍यक्ष

(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार)                                 (सौ. संजीवनी एस. शहा)

           सदस्‍य                                            सदस्‍य

      जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                         ----00----

(संविक/स्‍व/18411)

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER