Maharashtra

Solapur

CC/10/155

Gulab Mohiddin Bagwan - Complainant(s)

Versus

1)Sant Rohidas Patsnstha At.Barloni 2)Manisha Rameshwar Londe,Chairman 3)Shivaji Mahadeo Bhosale San - Opp.Party(s)

S.B.Shinde

22 Feb 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/155
1. Gulab Mohiddin BagwanAt post Pathari Tal.barshiSolapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. 1)Sant Rohidas Patsnstha At.Barloni 2)Manisha Rameshwar Londe,Chairman 3)Shivaji Mahadeo Bhosale Sanchalak 4)Adinath Raosaheb More 5)Pralhad Raghu More 6)Sandipan Laxman Bagal 7)Rajaram Tukaram Ubale All R/o At post Barloni Tal BarshiSolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :S.B.Shinde, Advocate for Complainant

Dated : 22 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

ग्राहक तक्रार क्रमांक : 155/2010.

 

                                                                तक्रार दाखल दिनांक :  30/03/2010.    

                                                                तक्रार आदेश दिनांक : 22/02/2011.   

 

श्री. गुलाब मोहिद्दीन बागवान, वय 66 वर्षे, व्‍यवसाय : निवृत्‍त

शिक्षक, रा. मु. पाथरी, पो. शिराळे, ता. बार्शी, जि. सोलापूर.           तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था मर्यादीत,

   बारलोणी, ता. माढा, शाखा बार्शी, जि. सोलापूर. (सदरची नोटीस

   शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा बार्शी यांचेवर बजावण्‍यात यावी.)   

2. सौ. मनिषा रामेश्‍वर लोंढे, चेअरमन, रा. चौधरी प्‍लॉट,

   कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

3. श्री. शिवाजी महादेव भोसले, संचालक,

   मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर,

4. श्री. अदिनाथ रावसाहेब मोरे, संचालक,

   रा. आदिनाथ पोल्‍ट्री फार्म, मु.पो. चिंचगाव, ता. माढा, जि. सोलापूर.

5. श्री. प्रल्‍हाद राघू मोरे, संचालक,

   रा. मु.पो. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर.

6. श्री. संदिपान लक्ष्‍मण बागल, संचालक,

   रा. मु.पो. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.       

7. श्री. राजकुमार तुकाराम उबाळे, संचालक,

   मु.पो. भोसरे, भांबुरे वस्‍ती, ता. माढा, जि. सोलापूर.        

8. श्री. भानुदास मारुती निळ, संचालक,

   मु.पो. निमगांव, ता. करमाळा, जि. सोलापूर.

9. श्री. नागनाथ संदिपान नवले, संचालक,

   रा. मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

10. श्री. आदिनाथ बमी लाडे, संचालक,

    रा. मु.पो. भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर.  

11. श्री. मच्छिंद्र भगवान शिंदे, संचालक,

    रा. मु.पो. कव्‍हे (रो.), ता. माढा, जि. सोलापूर.

12. श्री. अ.मजीद अ. कादर बागवान, संचालक,

    रा. पटेल चौक, मु.पो. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.         विरुध्‍द पक्ष

13. श्री. श्रीमंत विश्‍वनाथ बेडकुते, संचालक,

    रा. मु.पो. वरकुटे, ता. करमाळा, जि. सोलापूर.

14. श्री. लक्ष्‍मण दिगंबर करंडे, संचालक,

    रा. मु.पो. सासुरे, ता. बार्शी, जि. सोलापूर.

15. सौ. यमुना नागन्‍नाथ जाधव, संचालक,

    रा. मु.पो. भांबुरे वस्‍ती, मु.पो. भोसरे, ता. माढा,.        

16. अध्‍यक्ष - प्रशासक मंडळ, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी

    पतसंस्‍था मर्यादीत, शाखा बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर.

    (नोटीस/समन्‍स प्रशासक यांचेवर बजावण्‍यात यावे.)              विरुध्‍द पक्ष

 

               गणपुर्ती  :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                   सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

          तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता : पी.पी. कुलकर्णी

          विरुध्‍द पक्ष 7 व 15 यांचेतर्फे अभियोक्‍ता : लक्ष्‍मीकांत अ. गवई

      विरुध्‍द पक्ष 2, 3, 5, 6, 8 ते 14 यांचेतर्फे अभियोक्‍ता : डी.पी. बागल

 

आदेश

सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, त्‍यांनी घरखर्चामध्‍ये बचत करुन विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे.

 

 

 

ठेव तपशील

रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

मुदत ठेव पावती

1,00,000

715

11/6/08

12/7/2009

12 टक्‍के

मुदत ठेव पावती

10,000

717

11/6/08

12/7/2009

12 टक्‍के

मुदत ठेव पावती

50,000

716

11/6/08

12/7/2009

12 टक्‍के

आवर्तक ठेव

12,000

104

दरमहा

--

--

 

2.    वरीलप्रमाणे नमूद ठेवीची मुदत संपल्‍यानंतर तक्रारदार यांनी ठेव रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज मिळविण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे वेळोवेळी मागणी करुनही रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत आहे. तक्रारदार हे मधुमेह व उच्‍च रक्‍तदाबाचे रुग्‍ण असल्‍यामुळे वैद्यकीय औषधोपचार व त्‍यांचे मुलांचे शिक्षण व कौटुंबिक वापराकरिता मुदत ठेव रकमेची त्‍यांना नितांत आवश्‍यकता आहे. विरुध्‍द पक्ष त्‍यांची रक्‍कम बुडविण्‍याचा प्रयत्‍न करीत असल्‍यामुळे तक्रारदार यांनी ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी, तसेच आर्थिक खर्चापोटी रु.50,000/- मिळावेत, अशी विनंती त्‍यांनी केलेली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.2 ते 5 व 6, 8 ते 14 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सर्वच ठेवीदारांनी एकाचवेळी ठेव रक्‍कम परत मागणी केल्‍यामुळे संस्‍था आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. ठेवीदारांच्‍या ठेव रकमा परत करण्‍यास ते प्रयत्‍नशील आहेत आणि कर्जदारांकडून कर्ज वसूल झाल्‍यानंतर तक्रारदार यांची रक्‍कम परत करण्‍यात येईल. तसेच दि.6/10/2009 रोजी जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, सोलापूर यांच्‍या आदेशान्‍वये पतसंस्‍थेचे संचालक मंडळ बरखास्‍त झाले आहे. प्रशासकाची नियुक्‍ती केल्‍यामुळे त्‍यांना दैनंदीन कामकाजामध्‍ये भाग घेता आलेला नाही. प्रस्‍तुत तक्रार दाखल करताना ते संचालक नव्‍हते. शेवटी त्‍यांनी तक्रार रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र.7 व 15 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते पतसंस्‍थेचे संचालक नाहीत आणि ठेव पावत्‍यांवर त्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या नाहीत. त्‍यांनी अनुक्रमे दि.14/1/2007 व 10/12/2006 पासून संस्‍थेच्‍या कामकाजामध्‍ये सहभाग घेतलेला नसून ते संस्‍थेच्‍या सभांना गैरहजर आहेत. त्‍यांचा पतसंस्‍थेच्‍या कामकाजाशी व आर्थिक व्‍यवहाराशी संबंध नसल्‍यामुळे त्‍यांची जबाबदारी येत नाही. तसेच त्‍यांनी दि.16/9/2008 रोजी पतसंस्‍थेकडे राजीनामा दिलेला आहे. शेवटी त्‍यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

5.    उर्वरीत विरुध्‍द पक्ष यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीसाठी तक्रार घेण्‍याचा आदेश करण्‍यात आला.

 

6.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                              उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                            होय.

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?          होय.

3. काय आदेश ?                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

7.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव व आवर्तक ठेवीद्वारे रक्‍कम गुंतविल्‍याचे रेकॉर्डवर दाखल पावत्‍यांवरुन निदर्शनास येते आणि त्‍याविषयी विवाद नाही. मुदत संपल्‍यानंतर ठेव रकमेची मागणी केली असता विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत असल्‍याची त्‍यांची प्रमुख तक्रार आहे.

8.    विरुध्‍द पक्ष क्र.2 ते 5 व 6, 8 ते 14 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सर्वच ठेवीदारांनी एकाचवेळी ठेव रक्‍कम परत मागणी केल्‍यामुळे संस्‍था आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आणि कर्जदारांकडून कर्ज वसूल झाल्‍यानंतर तक्रारदार यांची रक्‍कम परत करण्‍यात येईल, असे त्‍यांनी नमूद केले आहे. विरुध्‍द पक्ष क्र.7 व 15 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी पतसंस्‍थेचा राजीनामा दिल्‍याचे व ते संस्‍थेच्‍या सभांना अनुपस्थित असल्‍यामुळे त्‍यांचा संस्‍थेशी व तक्रारदारांच्‍या ठेवीशी संबंध नसल्‍याचे नमूद केले आहे.

 

9.    तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली आहे आणि त्‍याप्रमाणे त्‍यांना तक्रारीत विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेव पावती व आवर्तक ठेवीद्वारे रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी मुदत संपल्‍यानंतर ठेव रक्‍कम मागणी करुनही त्‍यांना रक्‍कम परत देण्‍यात आलेली नाही. विरुध्‍द पक्ष यांनी राजीनामा दिल्‍याचे नमूद केले असले तरी मुदत ठेवीमध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करताना ते संस्‍थेचे संचालक होते. ठेव रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळविण्‍यास तक्रारदार पात्र व हक्‍कदार ठरतात. शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

ठेवीचा तपशील

पावती क्रमांक

ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

मुदत ठेव पावती

715

1,00,000

11/6/2008

12 टक्‍के

मुदत ठेव पावती

717

10,000

11/6/2008

12 टक्‍के

मुदत ठेव पावती

716

50,000

11/6/2008

12 टक्‍के

आवर्तक ठेव

104

12,000

10/11/2008

12 टक्‍के

 

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

(सौ. संजीवनी एस. शहा)                                  (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                       ----00----

 


[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT