जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 538/2010. तक्रार दाखल दिनांक : 06/09/2010. तक्रार आदेश दिनांक : 21/04/2011. बाहुबली गुलाबचंद शिरसाड, वय 45 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. 19, भवानी पेठ, नॅशनल लॉंड्रीशेजारी, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 2. श्री. व्यंकटेश (नाना) शिवाजी पाटील, चेअरमन, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 3. श्री. पोपट डबरु गुंजाळ, व्हा. चेअरमन, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 4. श्री. दिनकर कृष्णा मोरे, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 5. श्री. यशवंत किसन शिंदे, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 6. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 7. श्री. श्रीरंग संभू मोरे, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 8. श्री. रामलिंग बाबू ठोंबरे, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 9. श्री. सौदागर श्रीपती चव्हाण, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 10. श्री. बाबू भवानजी गुंजाळ, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 11. श्री. आबासाहेब रावसाहेब मोरे, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 12. सौ. सुजाता व्यंकटेशन पाटील, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 13. सौ. अहिल्यादेवी सदाशिव हनवते, संचालक, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 14. श्री. मधुकर भाऊराव गपाटे, सचिव, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 15. श्री. गणेश भगवान नागणे, शाखाधिकारी, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. सध्या रा. हांडे गल्ली, बार्शी, जि. सोलापूर. 16. अध्यक्ष, प्रशासक मंडळ, सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : विनोद सुरवसे विरुध्द पक्ष क्र.12 यांचेतर्फे अभियोक्ता : एल.ए. गवई विरुध्द पक्ष क्र.14 यांचेतर्फे अभियोक्ता : डी.पी. बागल आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी सहकारी महर्षी शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., मुख्य शाखा बारलोणी, ता. माढा या पतसंस्थेच्या सोलापूर शाखेमध्ये दि.20/6/2008 रोजी रु.50,000/- मुदत ठेव पावती क्र.0025536 अन्वये गुंतवणूक केले आहेत. तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी ठेव रकमेची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ठेव रक्कम व्याजासह मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन ठेव रक्कम रु.50,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.12 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला असून तो दि.24/6/2008 रोजीच्या ठरावाद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांचा पतसंस्थेशी संबंध राहिला नसल्यामुळे त्यांना जबाबदार धरता येत नाही. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.14 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते पतसंस्थेचे सचिव आहेत आणि पगारी नोकरदार असल्यामुळे त्यांच्या विरुध्द तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 4. उर्वरीत विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन तक्रार सुनावणीसाठी घेण्यात आली. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या सोलापूर शाखेमध्ये मुदत ठेव पावतीद्वारे रु.50,000/- रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावतीवरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांच्या मुलीच्या शैक्षणिक खर्चासाठी ठेव रकमेची निकड भासल्यामुळे रकमेची मागणी केली असता, विरुध्द पक्ष यांच्याकडून रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 7. विरुध्द पक्ष क्र.12 यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला असून तो दि.24/6/2008 रोजीच्या ठरावाद्वारे मंजूर केल्यामुळे व पतसंस्थेशी संबंध न राहिल्याने त्यांना जबाबदार धरता येत नाही, असे नमूद केले आहे. 8. निर्विवादपणे, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या सोलापूर शाखेमध्ये मुदत ठेव पावतीद्वारे रु.50,000/- रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांना त्यांच्या मुलीच्या शैक्षणिक खर्चासाठी ठेव रकमेची आवश्यकता असल्यामुळे वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. विरुध्द पक्ष क्र.12 यांनी राजीनामा दिल्याचे नमूद केले असले तरी मुदत ठेवीमध्ये रक्कम गुंतवणूक करताना ते संस्थेचे संचालक होते. ठेवीदारांच्या मागणीनुसार ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे मुदत ठेव पावतीची रक्कम व्याजासह मिळविण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात. 9. मुदती ठेव पावतीचा कालावधी दि.20/6/2008 ते 17/12/2008 होता आणि त्यानंतर पावतीचे दि.18/12/2008 ते 18/6/2009 असे नुतनीकरण करण्यात आले आहे. तक्रारदार यांना दि.20/6/2008 ते 17/12/2008 कालावधीचे रु.2,975/- व्याज अदा करण्यात आले आहे. त्यामुळे तक्रारदार हे दि.18/12/2008 पासून द.सा.द.शे. 13 व्याज दराने ठेव रक्कम मिळविण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात. 10. विरुध्द पक्ष क्र.14 व 15 हे पतसंस्थेचे अनुक्रमे सचिव व शाखाधिकारी आहेत. ते पगारी नोकर असल्यामुळे ठेव रक्कम परत करण्याबाबत त्यांची वैयक्तिक जबाबदारी सिध्द झाल्याशिवाय त्यांनाही जबाबदार धरता येणार नाही. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 13 व 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार ठेव रक्कम रु.50,000/- दि.18/12/2008 पासून द.सा.द.शे.13 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 13 व 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/21411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |