Maharashtra

Solapur

CC/10/301

Surekha Ramkisan Gaikwad - Complainant(s)

Versus

1)Relincse Gen.insure co ltd.Mumbai 2)kabal Insurance Brokrej Services Pune 3)Tahasildar Barshi - Opp.Party(s)

Jamdare

17 Jan 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/301
1. Surekha Ramkisan GaikwadAt post Pathari Tal barshiSolapurmaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. 1)Relincse Gen.insure co ltd.Mumbai 2)kabal Insurance Brokrej Services Pune 3)Tahasildar Barshi1)210 Sai Infotech R.B.Mehata marg,patel chowk,Ghatkopar (E)Mumbai 77 2)Shivaji Marg,3rd Fl,Mangala Tokiej near,pune.5 3)Tahasil office barshi.Mumbai And Solapurmaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBER
PRESENT :

Dated : 17 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

ग्राहक तक्रार क्रमांक : 301/2010.

 

                                                                 तक्रार दाखल दिनांक : 19/05/2010.     

                                                                तक्रार आदेश दिनांक : 17/01/2011.   

 

 

सुरेखा रामकिसन गायकवाड, वय 40 वर्षे,

व्‍यवसाय : शेती, रा. पाथरी, ता. बार्शी, जि. सोलापूर.               तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड,

   210, साई इन्‍फोटेक, आर.बी. मेहता मार्ग, पटेल चौक,

   घाटकोपर (ईस्‍ट), मुंबई - 77.

2. कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस प्रा.लि., 101,

   शिवाजी मार्ग, तिसरा मजला, मंगला टॉकीजजवळ, पुणे-5.

3. तहसीलदार, तहसील कार्यालय, बार्शी, जि. सोलापूर.                विरुध्‍द पक्ष

 

       गणपुर्ती  :-   सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                      सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

 

 

          तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  बी.बी. जामदारे

          विरुध्‍द पक्ष क्र.2 स्‍वत:

     विरुध्‍द पक्ष क्र.1 व 3 गैरहजर

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, मौजे पाथरी, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे त्‍यांचे पती रामकिसन नामदेव गायकवाड (संक्षीप्‍त रुपामध्‍ये मयत रामकिसन) यांचे नांवे जमीन गट नं.393, क्षेत्र 0 हे. 28 आर, गट नं.435, क्षेत्र 1 हे 37 आर पैकी 1/6 हिस्‍सा, गट नं.50, क्षेत्र 64 आर पैकी 1/6 हिस्‍सा, गट नं.25, क्षेत्र 40 आर पैकी 1/6 हिस्‍सा याप्रमाणे 7/12 पत्रकात जमीन नोंदलेली आहे. महाराष्‍ट्र शासनाकडून राज्‍यातील शेतक-यांना विरुध्‍द पक्ष क्र.1 (संक्षीप्‍त रुपामध्‍ये विमा कंपनी) यांच्‍याकडे शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेखाली दि.15/7/2006 ते 14/8/2007 कालावधीकरिता रु.1,00,000/- चे विमा संरक्षण दिलेले आहे. दि.4/4/2007 रोजी मोटार अपघातामध्‍ये मयत रामकिसन यांचा मृत्‍यू झाला आहे. सदर घटनेची नोंद तुर्भे पोलीस स्‍टेशन येथे करण्‍यात येऊन पोलिसांनी घटनास्‍थळ पंचनामा व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा करुन मयत पांडुरंग यांचे पोस्‍टमार्टेम करण्‍यात आलेले आहे. त्‍यानंतर तक्रारदार यांनी तलाठी, पाथरी यांच्‍याकडे रीतसर अर्जाद्वारे कागदपत्रांची पूर्तता केली.  तसेच तहसीलदार, बार्शी यांच्‍याकडे विहीत नमुन्‍यामध्‍ये आवश्‍यक कागदपत्रांसह प्रस्‍ताव सादर केला आणि तो विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आला. त्‍यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन व वारंवार पाठपुरावा करुनही विमा रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विमा रक्‍कम रु.1,00,000/- व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

 

 

2.    विमा कंपनीस व विरुध्‍द पक्ष क्र.3 यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी झालेली आहे. त्‍यांना वेळोवेळी उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीचे आदेश करुन तक्रार सुनावणीसाठी घेण्‍यात आली.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार कागदपत्रांची छाननी करुन विमा कंपनीकडे पाठविण्‍याचे त्‍यांचे काम असून विनामोबदला ते शासनास मदत करीत आहेत. मयत रामकिसन यांचा विमा प्रस्‍ताव त्‍यांच्‍या कार्यालयास दि.23/6/2007 रोजी प्राप्‍त झाल्‍यानंतर तो विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आलेला आहे. वारंवार विचारणा करुनही सदरील दावा विमा कंपनीकडे प्रलंबीत असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे. तसेच त्‍यांनी तक्रारीतून त्‍यांना निर्दोष मुक्‍त करण्‍याची विनंती केली आहे.

 

4.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

 

 

            मुद्दे                              उत्‍तर

 

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                             होय.

2. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?               होय. 

3. काय आदेश ?                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

 

 

 

निष्‍कर्ष

 

5.    मुद्दा क्र. 1 ते 3 :- महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजना अंतर्गत विमा कंपनीकडे विमा उतरविलेला आहे. तसेच त्‍याद्वारे शासनाने राज्‍यातील सर्व शेतक-यांना व्‍यक्तिगत अपघातापासून संरक्षण देण्‍यासाठी विमा योजना राबविल्‍याचे स्‍पष्‍ट आहे.

 

6.    रेकॉर्डवर दाखल 7/12, 6-ड, 8-अ उता-याचे अवलोकन करता, मयत रामकिसन यांचे नांवे शेतजमीन नोंद असल्‍याचे दिसून येते. तसेच रेकॉर्डवर दाखल पोलीस पेपर्सचे अवलोकन करता, मयत रामकिसन यांचा मृत्‍यू रस्‍ता अपघातामध्‍ये झाल्‍याचे निदर्शनास येते. पोस्‍टमार्टेम रिपोर्टमध्‍ये मयत रामकिसन यांना गंभीर इजा होऊन रक्‍तस्‍त्रावामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे निदर्शनास येते. मयत रामकिसन यांना मृत्‍युसमयी विमा संरक्षण लागू असल्‍याचे व त्‍यांचा मृत्‍यू अपघाती असल्‍याचे सिध्‍द होते.

 

7.    तक्रारदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी विमा क्‍लेम दाखल करुनही विमा रक्‍कम देण्‍यास त्‍यांना टाळाटाळ करण्‍यात येत आहे. तक्रारदार यांनी तहसीलदार, बार्शी यांच्‍याकडे क्‍लेम दाखल केला आणि तो विरुध्‍द पक्ष क्र.2 कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस प्रा.लि. यांच्‍या मार्फत विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आल्‍याचे निदर्शनास येते. याचाच अर्थ, विमा कंपनीकडे तक्रारदार यांचा विमा क्‍लेम पाठविण्‍याची कार्यवाही पूर्ण करण्‍यात आलेली आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचे काम कागदपत्रांची छाननी करणे असून त्‍यांनी कागदपत्रांमध्‍ये काही त्रुटी असल्‍याचे कोठेही नमूद केलेले नाही. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस प्रा.लि. यांनी मयत रामकिसन यांचा विमा दावा वारंवार विचारणा करुनही विमा कंपनीकडे प्रलंबीत असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

 

8.    रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांवरुन मयत रामकिसन हे शेतकरी असल्‍याचे व त्‍यांचा मृत्‍यू अपघाती असल्‍याचे सिध्‍द झालेले आहे. विमा कंपनीने मंचासमोर म्‍हणणे दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांना तक्रारदार यांची तक्रार मान्‍य आहे, या अनुमानास आम्‍ही येत आहोत. आमच्‍या मते, विमा कंपनीस कोणतेही उचित कारण न देता क्‍लेम प्रलंबीत ठेवण्‍याचा अधिकार पोहोचत नाही. तक्रारदार हे विमा रक्‍कम मिळविण्‍यास हक्‍कदार असल्‍याचे सिध्‍द होत असताना विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदार विमा रक्‍कम रु.1,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास पात्र आहेत, या मतास आम्‍ही आलो आहोत. तसेच विमा कंपनीने कोणत्‍याही उचित कारणाशिवाय विमा दावा प्रलंबीत ठेवून तक्रारदार यांना देय रकमेपासून वंचित ठेवले आणि तक्रारदार यांना जो मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे, त्‍याकरिता तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र ठरतात. तसेच तक्रारदार हे तक्रार खर्च मिळविण्‍यास पात्र आहेत.

 

9.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कम रु.1,00,000/- (रु.एक लक्ष फक्‍त) दि.19/5/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

      3. वर नमूद रक्‍कम तीस दिवसाचे आत न दिल्‍यास विरुध्‍द पक्ष क्र.1 विमा कंपनीने त्‍यानंतर देय रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज दराने द्यावी.

 

 

 

(सौ. प्रतिभा प्र. ज‍हागिरदार)                               (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                    ----00----

 (संविक/स्‍व/17111)

 

 

 

 

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT