जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 185/2010. तक्रार दाखल दिनांक : 17/04/2010. तक्रार आदेश दिनांक : 16/03/2011. अंकूश रामभाऊ अमृळे, वय सज्ञान, व्यवसाय : नोकरी, रा. करमाळा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा. 2. अविनाश लक्ष्मण महागावकर, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक/चेअरमन, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा. रा. 4/28, विद्यानगर, सिव्हील हॉस्पिटलच्या मागे, पाथरुट चौक, सोलापूर. 3. सोमनाथ ज्ञानदेव आतकर, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, सचिव, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. बारलोणी, ता. माढा. 4. किशोर वामन बरडे, व्यवस्थापक, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. बिरटगाव, ता. माढा. 5. विशाल विलास लडगे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. वडशिंगे, ता. माढा. 6. नरेंद्र गोविंद काळे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. न्यू संतोष नगर, विजापूर रोड, सोलापूर. 7. राजेंद्र कांतीलाल कोठारी, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. टेंभुर्णी, ता. माढा. 8. सौ. मृदुला औदुंबर तळेकर, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. भोसे, ता. पंढरपूर. विरुध्द पक्ष 9. रामेश्वर ज्ञानदेव लोंढे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. चौधरी प्लॉट, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा. 10. नवनाथ काशिनाथ आतकर, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. जितामाता नगर, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी. 11. पोपट बनाजी हनवटे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. भांबुरे वस्ती, कुर्डुवाडी. 12. काकासाहेब अप्पासाहेब पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. बारलोणी, ता. माढा. 13. संजय सुबराव राऊत, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. मानेगाव, ता. माढा. 14. जावेद दस्तगीर आतार, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. भगवंत कॉम्प्लेक्स, राज मोबाईल शॉपी, बार्शी. 15. संजय संभाजी कुटे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. टेंभुर्णी. 16. सौ. स्मिता धनंजय शहाणे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. मंगळवार पेठ, क्लासिक ऑफसेट. 17. विष्णू नरसु अनंतकवळस, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, संचालक, महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, रा. कुर्डू, ता. माढा. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : डी.एन. मैंदरकर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेचे ठेवीदार असून सदर पतसंस्थेतील बचत खाते क्र.327, खाते पान क्र.3/73 मध्ये त्यांची रु.42,549/- इतकी रक्कम शिल्लक आहे. तक्रारदार हे दि.22/5/2009 रोजी सदर रक्कम काढण्यास गेले असता त्यांना रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली नाही आणि रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यांनी अभियोक्त्यामार्फत नोटीस पाठवूनही त्यांना रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी बचत खात्यावरील रक्कम रु.42,549/- व्याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही त्यांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कैफियतीशिवाय तक्रार चालविण्याचा आदेश करण्यात आला. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार बचत खात्यावरील रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेतील बचत खाते क्र.327 मध्ये रु.42,549/- जमा असल्याचे निदर्शनास येते. सदर रकमेची मागणी करुनही रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 5. तक्रारदार यांनी पतंसंस्थेच्या संचालकाची यादी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे आणि त्याप्रमाणे संचालकांना प्रस्तुत तक्रारीमध्ये विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ठ करण्यात आलेले आहे. विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत तक्रारीला उत्तर दिलेले नसल्यामुळे आणि मंचासमोर उपस्थित राहून वस्तुस्थिती स्पष्ट करत नसल्यामुळे त्यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य असल्याचे अनुमानास आम्ही येत आहोत. 6. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे बचत खात्यामध्ये रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी बचत खात्यावरील रकमेची वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. खातेदाराच्या मागणीनुसार बचत खात्यावरील रक्कम परत करणे, विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी बचत खात्यावरील रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे पतसंस्थेचे संचालक मंडळ तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्यास वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार ठरते. 7. विरुध्द पक्ष क्र.3 व 4 हे अनुक्रमे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेचे सचिव व व्यवस्थापक आहेत. त्यांची नांवे संचालक मंडळाच्या यादीमध्ये नाहीत. ते पगारी नोकर असल्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय तक्रारदार यांना देय रकमेसाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 आणि 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना बचत खाते क्र.327 वरील रक्कम रु.42,549/- दि.22/5/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 आणि 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/14211)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |