Maharashtra

Solapur

CC/10/114

Dhanaji Haridas Kapase - Complainant(s)

Versus

1)jaika Insurance brokraj 2)Oriental Insurance co.Nagapur &3) Solapur - Opp.Party(s)

Kulkarni

30 Aug 2010

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/114
1. Dhanaji Haridas KapaseKarkab Tal Pandharpursolapurmaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. 1)jaika Insurance brokraj 2)Oriental Insurance co.Nagapur &3) Solapur1)Jaika Building Civil line,Nagapur 2)AD complex,Mounta RD,nagapur 3)442 P.Mangalwarpeth,SolapurNagapur & Solapurmaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBERHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :

Dated : 30 Aug 2010

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

JUDGEMENT
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 114/2010.

 

 

 

                                                                तक्रार दाखल दिनांक: 08/03/2010.      

                                                                आदेश दिनांक : 30/08/2010.   

 

श्री. धनाजी हरिदास कापसे, वय 27 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.                       तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. जैका इन्‍शोरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि., जैका बिल्‍डींग,

   सिव्‍हील लाईन, नागपूर - 440 001.

   (दि.29/6/2010 च्‍या पुरसीस अन्‍वये विरुध्‍द पक्ष क्र.1

   यांना वगळण्‍यात आले)

2. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1,

   ए.डी. कॉम्‍प्‍लेक्‍स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 1.

   (समन्‍स/नोटीस डिव्‍हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्‍यात यावे.)

3. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कं.लि., रा. 442, प. मंगळवार पेठ,

   चाटी गल्‍ली, सोलापूर. (समन्‍स/नोटीस डिव्‍हीजनल मॅनेजर

   यांचेवर बजावण्‍यात यावे.)                                    विरुध्‍द पक्ष

 

               गणपुर्ती  :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                                सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

                    सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  पी.पी. कुलकर्णी

                   विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्‍ही.आर. राव   

आदेश

 

 

 

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, ते व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांनी दुग्‍ध व्‍यवसायाकरिता घेतलेल्‍या होस्‍टर्न जातीच्‍या गाईचा  दि.24/12/2007 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.2 (संक्षिप्‍त रुपामध्‍ये 'विमा कंपनी') यांच्‍याकडे रु.30,000/- चा विमा उतरवला आहे. गाईचा विमा पॉलिसी क्रमांक एस.ओ.एल.पी.104236 असून गाईस दिलेल्‍या टॅगचा क्रमांक 104236 असा आहे. तक्रारदार यांची गाय अचानक आजारी पडली आणि उपचार करुनही दि.22/4/2008 रोजी मृत्‍यू पावली. त्‍यानंतर गाईचे पोस्‍टमार्टेम करण्‍यात आले. तसेच विहीत नमुन्‍यामध्‍ये सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आली. परंतु विमा कंपनीने त्‍यांना विमा क्‍लेम नाकारल्‍याचे कळविले आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रारीद्वारे विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून विमा रक्‍कम रु.30,000/- व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.

 

2.    विमा कंपनीने रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार पशुधन विम्‍याचा करार हा महाराष्‍ट्र पशुधन विकास मंडळ व विमा कंपनीमध्‍ये झालेला असून कराराविषयी निर्माण झालेला वाद लवादाकडून सोडविणे आवश्‍यक आहे आणि केवळ अकोला कोर्टास त्‍याचे अधिकारक्षेत्र आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार यांनी गाईच्‍या मृत्‍यूनंतर क्‍लेम दाखल केल्‍यानंतर त्‍यांना वेळोवेळी काही कागदपत्रे प्राप्‍त झालेली आहेत. तक्रारदार यांनी मूळ पॉलिसी, हेल्‍थ सर्टिफिकेट, मेडीकल बिले, डॉक्‍टराचे प्रिस्‍क्रीप्‍शन, फोटो, सरपंचाचे प्रमाणपत्र, पंचनामा, पी.एम. रिसिप्‍ट, दूध सोसायटीचे प्रमाणपत्र, खरेदी पावती इ. कागदपत्रे सादर केली नाहीत. कागदपत्राअभावी तक्रारदार यांचा विमा क्‍लेम नाकारला असून त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी नाही. शेवटी त्‍यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

3.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                              उत्‍तर

 

1. तक्रार चालविण्‍यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्‍त होते काय ?       होय.

2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                            होय.

3. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?               होय.

4. काय आदेश ?                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

 

 

 

निष्‍कर्ष

4.    मुद्दा क्र. 1 :- विमा कंपनीने पॉलिसी नं. एसओएलपी-104236 अन्‍वये तक्रारदार यांच्‍या गाईस रु.30,000/- चे विमा संरक्षण दिल्‍याविषयी विवाद नाही. विमा कालावधीमध्‍ये म्‍हणजेच दि.22/4/2008 रोजी तक्रारदार यांची गाय मृत्‍यू पावल्‍याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारण्‍यात आल्‍याविषयी विवाद नाही.

 

5.    सर्वप्रथम विमा कंपनीने सर्वप्रथम पॉलिसी अग्रीमेंटमधील क्‍लॉजचा आधार घेत कराराविषयी निर्माण झालेले वाद सामंजस्‍याने न सुटल्‍यास ते लवादाकडे पाठविण्‍यात यावेत आणि त्‍याचे अधिकारक्षेत्र केवळ अकोला कोर्टास असतील, असे नमूद केले आहे.

 

6.    विमा कंपनी व पशुधन विकास मंडळाच्‍या अग्रीमेंटनुसार तक्रारदार यांच्‍या गाईस विमा संरक्षण दिल्‍याचे नमूद केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'विमा' हा 'सेवा' या तरतुदीमध्‍ये अंतर्भुत आहे. तक्रारदार यांच्‍या गाईस विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले असल्‍यामुळे निश्चितच त्‍यांची तक्रार या मंचाच्‍या कार्यकक्षेत येते. मा.राष्‍ट्रीय आयोग व मा.राज्‍य आयोग यांनी अनेक निवाडयामध्‍ये लवादाचा क्‍लॉज असला तरी जिल्‍हा मंचाचे कार्यक्षेत्रास बाधा पोहोचत नाही, असे न्‍यायिक तत्‍व विषद केलेले आहे. त्‍यामुळे विमा कंपनीने उपस्थित केलेला सदर मुद्दा निरर्थक व तथ्‍यहीन ठरतो आणि या मंचाला तक्रारदार यांची तक्रार चालविण्‍यास अधिकारक्षेत्र प्राप्‍त होते, या मतास आम्‍ही आलो आहोत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

7.    मुद्दा क्र. 2 ते 4 :- रेकॉर्डवर दाखल विमा दावा प्रपत्र, पोस्‍टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्‍हॅल्‍युऐशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट, सरपंच दाखला इ. कागदपत्रांचे सुक्ष्‍मपणे अवलोकन करता, तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय (टॅग नं.104236) मृत्‍यू पावल्‍याचे स्‍पष्‍टपणे निदर्शनास येते. उपरोक्‍त कागदपत्रानुसार विमा क्‍लेम सेटल करण्‍यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्‍पष्‍टीकरण देण्‍यात आलेले नाही. आमच्‍या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्‍यू पावल्‍याचे सिध्‍द करण्‍यास पुरेशी आहेत. त्‍याशिवाय विमा कंपनीने मागणी केलेली कागदपत्रे का आवश्‍यक आहेत ? आणि त्‍याकरिता पॉलिसीची कोणती तरतूद उपयोगी पडते ? हे सिध्‍द करण्‍यात आलेले नाही. विमा कंपनीने अत्‍यंत तांत्रिक बाबीचा आधार घेतलेला आहे. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्‍लेम अयोग्‍य व अनुचित कारणास्‍तव नाकारुन सेवेत त्रुटी केल्‍यामुळे तक्रारदार हे गाईच्‍या विम्‍याची रक्‍कम क्‍लेम नाकारल्‍याच्‍या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दरासह मिळविण्‍यास पात्र ठरतात.

 

8.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कम रु.30,000/- दि.18/12/2008 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      2. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.   

      3. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 विमा कंपनीने उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्‍यास मुदतीनंतर एकूण देय रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज दराने अदा करावी. 

 

 

 (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

अध्‍यक्ष

(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार)                              (सौ. संजीवनी एस. शहा)

          सदस्‍य                                           सदस्‍य

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                    ----00----

(संविक/स्‍व/30810)


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER