जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 47/2010. तक्रार दाखल दिनांक : 04/01/2010. तक्रार आदेश दिनांक : 07/01/2011. 1. अशोक रघुनाथ कुलकर्णी, रा. सौरभ, 2-ए, मोरया को-ऑप. हौसिंग सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर. (दि.6/8/2010 रोजीच्या आदेशाप्रमाणे वगळण्यात आले.) 2. श्रीमती अर्चना अशोक कुलकर्णी, वय 52 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. वरीलप्रमाणे. तक्रारदार विरुध्द 1. डीडीएम (पीएलआय) एडीएम (पीएलआय) / डीडीएपीएस (पीएलआय), डिमार्टमेंट ऑफ पोस्टस्, ऑफीस ऑफ चीफ पोस्ट मास्टर जनरल, मुंबई. 2. सुपरिन्टेन्डेंट हेड पोस्ट ऑफीस, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : ए.व्ही. तळेगावकर विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : पी.व्ही. शेंडे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी दि.5/3/1997 रोजी पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नं.एम.एच.-119842-बी खरेदी केली असून दि.23/3/2009 रोजी पॉलिसी मॅच्युअर होऊन त्यांना रु.1,88,000/- देय होती. तक्रारदार यांनी दि.17/3/2009 रोजी विरुध्द पक्ष यांच्या सोलापूर कार्यालयाकडे क्लेम दाखल केला. त्यांनी वारंवार पाठपुरावा करुनही तीन महिने एक आठवडा कालावधी उलटल्यानंतर रु.1,88,000/- चा धनादेश त्यांना देण्यात आलेला आहे. तक्रारदार यांनी रकमेवरील व्याज मिळण्यासाठी अर्ज करुनही दखल घेण्यात आली नाही. तसेच वेळेत रक्कम न मिळाल्यामुळे जमीन खरेदीचा त्यांचा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.1,88,000/- वरील दि.23/3/2009 ते 30/6/2009 कालावधीचे द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याज मिळावे आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शेवटचा हप्ता देय तारीख असताना व मॅच्युरिटी तारखेपूर्वी सहा महिने अगोदर सर्व आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे पाठविण्याचे तक्रारदार यांच्यावर बंधन आहे. तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी व उचित कार्यपध्दती अवलंबलेली असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. तक्रारदार हे व्याजाची रक्कम मिळविण्यास पात्र नाहीत. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? 2. तक्रारदार रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार क्र.1 यांनी दि.5/3/1997 रोजी पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नं.एम.एच.-119842-बी खरेदी केली होती आणि पॉलिसी दि.23/3/2009 रोजी मॅच्युअर होऊन रु.1,88,000/- देय असल्याविषयी विवाद नाही. त्याप्रमाणे तक्रारदार यांना रु.1,88,000/- चा धनादेश दि.30/6/2009 रोजी प्राप्त झाल्याविषयी विवाद नाही. 5. तक्रारदार यांनी प्रामुख्याने त्यांना विलंबाने रक्कम मिळाल्यामुळे दि.23/3/2009 ते 30/6/2009 कालावधीचे द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याज न मिळाल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार शेवटचा हप्ता देय तारीख असताना व मॅच्युरिटी तारखेपूर्वी सहा महिने अगोदर सर्व आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे पाठविण्याचे तक्रारदार यांच्यावर बंधन आहे आणि तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी व उचित कार्यपध्दती अवलंबलेली असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. 6. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर पोस्टल लाईफ इन्शुरन्स अन्ड एन्डोमेंट अश्युरन्स संबंधीत पोस्ट ऑफीस लाईफ इन्शुरन्स फंड रुल्स दाखल केलेले आहेत. त्यातील रक्कम देण्याबाबतचे कलम 31 (2) मध्ये नोट क्र.3 खालीलप्रमाणे नमूद आहे. NOTE 3 : The Department accepts no responsibility whatsoever for delays which may occur in the settlement of the claims. Claimants are, therefore, strongly advised to submit their claims sufficiently in advance of the date of maturity of the policies together with proof of payment of premium for the last six month prior to the date of last installment of premium in the shape of DOC, viz. a certificate of recovery by the officer disbursing his pay & allowances so as to allow a reasonable time for the Principal Chief Postmaster General/Chief Postmaster General/Postmaster General to verify the credit position of premiums and also to satisfy himself as regards the title of the claimants. 7. वरील तरतुदीप्रमाणे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मॅच्युरिटी दि.23/3/2009 पूर्वी सहा महिने अगोदर क्लेम सादर करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांनी दि.17/3/2009 म्हणजेच मॅच्युरिटी तारखेपूर्वी केवळ 6 दिवस अगोदर क्लेम दाखल केलेला आहे. रुल्समधील तरतुदीचे अवलोकन करता, विमेदारांकडून क्लेम दाखल झाल्यानंतर कागदपत्रांची छाननी करणे आणि संबंधीत कार्यालयाकडून मंजुरी घेणे किंवा पाठपुरावा करणे, याकरिता 6 महिन्याचा कालावधी अपेक्षीत असल्याचे निदर्शनास येते. वरिष्ठ आयोगांनी अनेक निवाडयांमध्ये विमेदारांकडून प्राप्त झालेले क्लेम 3 महिन्यांमध्ये सेटल करावेत, असे न्यायिक तत्व विषद केलेले आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी मॅच्युरिटी तारखेपूर्वी केवळ 6 दिवस अगोदर क्लेम दाखल केल्यामुळे क्लेम सेटल करण्यास विलंब झालेला असून त्याकरिता विरुध्द पक्ष यांना जबाबदार धरता येणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही, या मतास आम्ही आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/1011)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT | |