Maharashtra

Solapur

cc/09/569

1)Sandesh Laxman Ubale & other 1 - Complainant(s)

Versus

1)Chairman,Sant Rohidas gramin bigar sheti sah pathsansta At.Barloni & Other 13 - Opp.Party(s)

Kulkarni

27 Apr 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. cc/09/569
1. 1)Sandesh Laxman Ubale & other 1Kakade Galli, Karmala ...........Appellant(s)

Versus.
1. 1)Chairman,Sant Rohidas gramin bigar sheti sah pathsansta At.Barloni & Other 13Sant Rohidas gramin bigar sheti sah pathsansta At.Barloni ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :Kulkarni, Advocate for Complainant

Dated : 27 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

ग्राहक तक्रार क्रमांक : 569/2009.

 

                                                                 तक्रार दाखल दिनांक : 29/10/2009.     

                                                                तक्रार आदेश दिनांक : 27/04/2011.   

 

1. श्री.संदेश लक्ष्‍मण उबाळे, वय 38 वर्षे, व्‍यवसाय : नोकरी,

   रा. करमाळा, काकडे गल्‍ली, जि. सोलापूर.

2. श्री. लक्ष्‍मण दत्‍तात्रय उबाळे, वय 72 वर्षे, व्‍यवसाय : सेवानिवृत्‍त,

   रा. करमाळा, काकडे गल्‍ली, सोलापूर.                                 तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1-अ. प्रशासक, सहायक निबंधक संस्‍था, माढा, संत रोहिदास

     ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी,

     ता. माढा, जि. सोलापूर.

1. चेअरमन, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या.,

   बारलोणी, सौ. मनिषा रामेश्‍वर लोंढे, बारलोणी, वय 35 वर्षे,

   व्‍यवसाय : घरकाम, रा. चौधरी वस्‍ती, कुर्डुवाडी, टेंभुर्णी रोड,

   ता. माढा, जि. सोलापूर.

2. श्री. शिवाजी महादेव भोसले, संचालक, वय 46 वर्षे,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

3. श्री. अजिनाथ रावसाहेब मोरे, संचालक, वय 42 वर्षे,

   व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

4. श्री. प्रल्‍हाद रघू मोरे, संचालक, वय 52 वर्षे,

   व्‍यवसाय : शेती, रा. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर.

5. संदिपान लक्ष्‍मण बागल, संचालक, वय 45 वर्षे,

   व्‍यवसाय : शेती, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

6. श्री. राजकुमार तुकाराम उबाळे, संचालक, वय 32 वर्षे,

   व्‍यवसाय : शेती, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

7. श्री. भानुदास मारुती निळ, संचालक, वय 65 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

    रा. मु.निमगांव, पो. कोळेगांव, ता. करमाळा, जि. सोलापूर.

8. श्री. नागनाथ संदिपान नवले, संचालक, वय 45 वर्षे,

    व्‍यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.        

9.  श्री. आदिनाथ बर्मा लाडे, संचालक, वय 65 वर्षे,

    व्‍यवसाय : निवृत्‍त, रा. भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर.          विरुध्‍द पक्ष

10. श्री. मच्छिंद्र भगवान शिंदे, संचालक, वय 36 वर्षे,

    व्‍यवसाय : शेती, रा. कव्‍हे, ता. माढा, जि. सोलापूर.           

11. श्री. अ.मज्‍जीद बागवान, संचालक, वय 58 वर्षे,

    व्‍यवसाय : व्‍यापार, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

12. श्री. श्रीमंत विश्‍वनाथ बेडकुते, संचालक, 59 वर्षे,

    व्‍यवसाय : वरकुटे, रा. करमाळा, जि. सोलापूर.

13. लक्ष्‍मण दिगंबर करंडे, संचालक, वय 50 वर्षे,

    व्‍यवसाय : शेती, रा. सासुरे, ता. बार्शी, जि. सोलापूर.

14. संचालिका, सौ. यमुना नागनाथ जाधव, वय 36 वर्षे,

    व्‍यवसाय : घरकाम, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.                     विरुध्‍द पक्ष

 

       गणपुर्ती  :-   सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                  सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

          तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  एम.ए. कुलकर्णी

          विरुध्‍द पक्ष क्र.1, 2, 4, 5, 7 ते 12 यांचेतर्फे अभियोक्‍ता : डी.पी. बागल

          विरुध्‍द पक्ष क्र.13 यांचेतर्फे अभियोक्‍ता : ए.एम. कस्‍तुरे

       विरुध्‍द पक्ष क्र. 6 व 14 यांचेतर्फे अभियोक्‍ता : एल.ए. गवई

 

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी पतसंस्‍थेमध्‍ये खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे.

 

 

ठेविदाराचे नांव

ठेव रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

संदेश लक्ष्‍मण उबाळे

3,00,000

2/07

27/12/07

27/1/09

13 टक्‍के

लक्ष्‍मण दत्‍तात्रय उबाळे

34,202

--

22/11/08

--

7 टक्‍के

 

2.    तक्रारदार यांनी मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव योजनेद्वारे व बचत खात्‍यावर वरीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे. ठेवीच्‍या तारखेपासून तक्रारदार यांना कोणतेही व्‍याज देण्‍यात आलेले नाही. त्‍यांनी मुदत पूर्ण झाल्‍यानंतर ठेव रकमेची मागणी केली असता, ठेव रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज देण्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी टाळाटाळ केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी अनुक्रमे रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.6 व 14 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते पतसंस्‍थेचे संचालक नाहीत आणि ठेव पावत्‍यांवर त्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या नाहीत. त्‍यांनी अनुक्रमे दि.14/1/2007 व 10/12/2006 पासून संस्‍थेच्‍या कामकाजामध्‍ये सहभाग घेतलेला नसून ते संस्‍थेच्‍या सभांना गैरहजर आहेत. त्‍यांचा पतसंस्‍थेच्‍या कामकाजाशी व आर्थिक व्‍यवहाराशी संबंध नसल्‍यामुळे त्‍यांची जबाबदारी येत नाही. तसेच त्‍यांनी दि.16/9/2008 रोजी पतसंस्‍थेकडे राजीनामा दिलेला आहे. शेवटी त्‍यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र. 1, ते 5, 7 ते 9, 11 व 12 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सन 2004 ते 2009 कालावधीकरिता ते पतसंस्‍थेचे संचालक होते आणि संस्‍थेचा कार्यभार व्‍यवस्थित चालत असताना सन 2008 पासून सर्वच ठेवीदारांनी एकाचवेळी मुदतपूर्व ठेवींची मागणी केल्‍यामुळे पतसंस्‍थेचे परिस्थिती नाजूक बनली. त्‍यामुळे ठेवीचे पैसे परत करता आले नाहीत. त्‍यांनी कर्ज वसुली करुन ठेवी परत केल्‍या आहेत. तत्‍पुर्वी दि.6/10/2009 रोजी जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, सोलापूर यांनी संचालक मंडळ बरखास्‍त करुन प्रशासकांची नेमणूक केली आहे. तेव्‍हांपासून त्‍यांना संस्‍थेच्‍या कामकाजामध्‍ये भाग घेता आलेला नाही आणि ठेवीबाबत माहिती नाही. त्‍यांना ठेवीकरिता जबाबदार धरु नये आणि तक्रार रद्द करण्‍यात यावी, अशी त्‍यांनी विनंती केली आहे.

 

5.    विरुध्‍द पक्ष क्र.1-अ व 10 यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्‍यात आले. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.13 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे न दाखल केल्‍यामुळे कैफियतीशिवाय त्‍यांनी तक्रार चालविण्‍याचा आदेश करण्‍यात आला.

 

6.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                              उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                            होय.

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?          होय.

3. काय आदेश ?                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

निष्‍कर्ष

 

7.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये मासिक व्‍याज प्राप्‍ती योजनेद्वारे व बचत खात्‍यामध्‍ये रक्‍कम गुंतविल्‍याचे रेकॉर्डवर दाखल पावती व पासबुकावरुन निदर्शनास येते. ठेवीच्‍या मुदतपुर्तीनंतर व बचत खात्‍यावरील रकमेची तक्रारदार यांनी व्‍याजासह मागणी केली असता, विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत असल्‍याची त्‍यांची प्रमुख तक्रार आहे.

 

8.    विरुध्‍द पक्ष क्र.6 व 14 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल करुन त्‍यांनी पतसंस्‍थेचा राजीनामा दिल्‍याचे व ते संस्‍थेच्‍या सभांना अनुपस्थित असल्‍यामुळे त्‍यांचा संस्‍थेशी व तक्रारदारांच्‍या ठेवीशी संबंध नसल्‍याचे नमूद केले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष विरुध्‍द पक्ष क्र. 1, ते 5, 7 ते 9, 11 व 12 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सन 2008 पासून सर्वच ठेविदारांनी एकाचवेळी मुदतपूर्व ठेवींची मागणी केल्‍यामुळे ठेवीचे पैसे परत करता आले नाहीत आणि पतसंस्‍थेचे संचालक मंडळ बरखास्‍त करुन प्रशासकांची नेमणूक केल्‍यापासून संस्‍थेच्‍या कामकाजामध्‍ये भाग घेता आला नसल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे.

 

9.    निर्विवादपणे, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये मासिक व्‍याज प्राप्‍ती योजनेद्वारे व बचत खात्‍यावर रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीच्‍या मुदतपुर्तीनंतर वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍यात आलेली नाही. विरुध्‍द पक्ष क्र.6 व 14 यांनी राजीनामा दिल्‍याचे नमूद केले असले तरी मुदत ठेवीमध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करताना ते संस्‍थेचे संचालक होते. ठेवीदारांच्‍या मागणीनुसार ठेव रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे ठेव पावतीची रक्‍कम व्‍याजासह मिळविण्‍यास तक्रारदार हक्‍कदार ठरतात.

 

10.   विरुध्‍द पक्ष क्र.1-अ हे पतसंस्‍थेकरिता प्रशासक म्‍हणून नियुक्‍त केलेले आहेत. मा.राष्‍ट्रीय आयोग व मा.राज्‍य आयोगांच्‍या निर्णयातील तत्‍वानुसार पतसंस्‍थेवरील नियुक्‍त प्रशासक हे त्‍याचे संवैधानिक कर्तव्‍य पार पाडत असल्‍यामुळे त्‍यांना ठेव रक्‍कम परत करण्‍याविषयी जबाबदार धरता येत नाही.

 

 

 

 

11.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

ठेवीदार/

तक्रारदारांचे नांव

पावती क्रमांक

देय ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

संदेश लक्ष्‍मण उबाळे

2107

1,00,000/-

20/12/2007

13 टक्‍के

लक्ष्‍मण दत्‍तात्रय उबाळे

खाते नं.414

34,202/-

22/11/2008

10 टक्‍के

     

2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

 

(सौ. संजीवनी एस. शहा)                                (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                          ----00----

 (संविक/स्‍व/26411)

 

 


[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT