निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 12/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19 /08/2013
कालावधी 01वर्षे. 06महिने. 16 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री.मनोज पिता पदमकुमार बिनायके. अर्जदार
वय वर्षे. धंदा.व्यवसाय. अड.एस.एन.वेलणकर.
रा.स्टेशन रोड,सेलू ता.सेलू.जि.परभणी.
विरुध्द
1 शाखाधिकारी. गैरअर्जदार.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडीया.
570,रिसीटी फायर हाऊस,इंडो ओरिजीन इलेक्ट्रीक लि.
नेक्सटु रॉयल इंडस्टि्रयल इस्टेट.
वडाळा (दक्षीण) मुंबई – 400031.
2 श्री.रविंद्र शेषराव चव्हाण,
प्रतिनिधी रिलायन्स इन्शुरन्स,
रा.बजाज शोरुमच्या मागे,जिंतूर रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या तवेरा गाडी अपघाता मध्ये झालेल्या नुकसान भरपाई देण्याचे टाळून सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा तवेरा गाडी जीचा क्रमांक MH.22.Q 108 चा मालक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनी कडून सदर तवेरा गाडीचा विमा उतरविला होता.सदर गाडीचा इंजिन क्रमांक 3 सी.के.105278 व चेसीस क्रमांक एम.ए. 6 ए बी 605 सी ए एच 104 738 असा असून सदर तवेरा गाडीचा विमा दिनांक 16/05/2010 ते 15/05/2011 पर्यंत वैध होता आणि विम्याचा कव्हरनोट क्रमांक 110000137172 असा आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 07/11/2010 रोजी सदर तवेरा गाडीचा अपघात झाला सदर गाडीचे अपघात स्कोडा कार क्रमांक एम.एच.22.एच.3085 च्या चुकीमुळे झाला, परंतु स्कोडा कार मधील एक व्यक्ति मरण पावल्यामुळे खोटेपणाने स्कोडाच्या मालकाने तवेरा गाडी क्रमांक MH.22.Q 108 च्या विरुध्द खोटा गुन्हा नोंदवला सदरच्या अपघाता मध्ये तवेरा गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर अपघात 07/11/2010 रोजी झाले. त्यामुळे सदरचा विमा कालावधीतच झालेला असल्यामुळे विमा वैध होता अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, तवेरा गाडी अपघात झाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीला अर्जदाराने अपघाता बद्दल माहिती कळविली, त्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने सर्व्हेअर नियुक्त केला सदर गाडीचा सर्व्हे केला त्यानंतर अर्जदाराने तवेरा गाडीच्या दुरुस्तीसाठी बाफना अटो मोबाईल्स,नांदेड येथे नेले सदर गाडीची दुरुस्ती करण्यासाठी अर्जदारास 6,00,000/- रु. खर्च लागला त्या बिलाचा तपशिल अनुक्रमे 15/02/2011 रोजी रु.54,076/-, दिनांक 15/02/2011 रोजीचे बिल रु.5,29,391/-, व 12/2/2011 रोजीचे रु. 11,534/- असे एकुण 5,95,001/- रुपये एवढा खर्च सदरच्या तवेरा गाडीच्या दुरुस्तीसाठी लागला.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदर तवेरा गाडी गैरअर्जदार इंशुरंस कंपनीने प्रमाणित केलेली किंमत रु. 8,41,652/- एवढी आहे.सदर गाडीचे विमा पॉलिसी नुसार कागदपत्रे दिल्यानंतर 3 महिन्याच्या आत नुकसान भरपाईचा दावा गैरअर्जदार विमा कंपनीने निकाली काढावे असे म्हणणे आहे.सदरची दुरुस्तीसाठी लागलेल्या खर्चाची बिले व योग्य त्या कागदपत्रांसह अर्जदाराने विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला, त्यानंतर अर्जदाराने वेळोवेळी सदर क्लेम बाबत गैरअर्जदार विमा कंपनीला मागणी केली विमा कंपनीने या ना त्या कारणाने टाळाटाळ केली.अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे फोनव्दारे संपर्क साधला त्यानंतर शेवटी 19/09/2011 कुरीयरव्दारे गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 09/08/2011 रोजी चेक क्रमांक 094671 रु. 3,98,000/- चा चेक पाठविला.अर्जदार यांने सदर गाढीच्या दुरुस्तीसाठी 5,95,001/- इतका खर्च केलेला आहे.सदर गाडीचे इंशुरन्स प्रमाणे रु. 8,41,652/- एवढी असून सुध्दा गैरअर्जदार यांनी केवळ 3,98,000/- चा चेक अर्जदारास पाठविला सदर चेक हा खुप कमी किमतीचा असल्यामुळे अर्जदाराने घेण्यास नकार दिला, म्हणून गैरअर्जदार यांनी सदरच्या कुरीयरव्दारे चेक पाठविला सदर चेक घेतांना अर्जदाराने कुरीयरच्या पावतीवर अर्जदाराने सदरचा चेक हा नाराजीने घेत आहे असे पावतीवर लिहिले.गैरअर्जदार याने नियमा प्रमाणे 3 महिन्यात सदरचा क्लेम निकाली काढावयाचा होता, परंतु 6 ते 7 महिने उशिरा सदरचा क्लेम तोही कमी किमतीचा गैरअर्जदार यांनी मंजूर केला, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराची सदरची गाडी ही नवी होती त्यामुळे गाडीची किमत कमी करता येत नाही, परंतु गैरअर्जदारांने गाडीची किंमत कमी करुन अतिशय अल्प प्रमाणात क्लेम मंजूर केला.वास्तविक गाडी दुरुस्तीसाठी रु. 5,95,001/- खर्च लागला व गैरअर्जदाराने
रु.3,98,000/- दिले उर्वरित रक्कम रु. 1,97,001/- अर्जदाराने गैरअर्जदाराकडे बाकी आहे, म्हणून सदरची तक्रार अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेली आहे. अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार विमा कंपनीने तवेरा गाडीचा क्रमांक MH.22.Q 108 च्या झालेल्या नुकसान भरपाई पोटी रु. 1,97,001/- व मानसिकत्रासापोटी रु. 20,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु. 10,000/- असे एकुण रु. 2,27,001/- गैरअर्जदारास अर्जदाराला देण्याचा आदेश व्हावा.अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपञ दाखल केलेले आहे, व नि.क्रमांक 5 वर 8 कागदपञांच्या यादीसह 8 कागदपञे दाखल केलेली आहेत. ज्या मध्ये 5/1 वर बाफना अटोमोबॉइल्स याचे दिनांक 15/02/2011 चे बील, 5/2 वर बाफना अटोमोबॉइल्स याचे दिनांक 15/02/2011 चे बील, 5/3 वर बाफना अटोमोबॉइल्स याचे दिनांक 12/02/2011 चे बील, 5/4 वर अर्जदाराने बाफना अटोमोबॉईल्स यांना दिनांक 24/11/2011 रोजी दिलेले बिल. 5/5 वर इन्शुरन्स कव्हरनोट, 5/6 वर आर.सी.बुक, 5/7 वर चेक, 5/8 वर कॉपी ऑफ कुरीयर. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना त्याचे लेखी जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व ग्राहक संरक्षण कायद्या प्रमाणे चालू शकत नाही, म्हणून ती खारीज करणे योग्य आहे,तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, सदर तवेरा गाडीचा अपघात झाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने शासन मान्य सर्व्हेअरची नियुक्ती करुन सर्व्हे करण्यात आला व सर्व्हेर रिपोर्ट प्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास 3,98,000/- रुपयेचा चेक ज्याचा क्रमांक 094671 दिनांक 09/08/2011 रोजीचा चेक अर्जदारास दिला व सदरचा चेक स्वीकारतांना अर्जदाराने डिस्चार्ज व्हाऊचरवर सही करुन दिली आहे व सदरचे पैसे स्वीकारतांना अर्जदाराने कोणतेही नाराजीने चेक स्वीकारत आहे असे लिहिले नसल्यामुळे व अर्जदाराने रुपये 3,98,000/- चा चेक स्वीकारल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्याचा प्रश्नच उदभवत नाही व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, एकदा डिस्चार्ज व्हाऊचरवर सही केल्यावर परत तक्रार दाखल करण्याचा अर्जदारास काही अधिकार नाही,म्हणून सदरची तक्रार ही बेकायदेशिर असल्या कारणाने गैरअर्जदार विमा कंपनीने मंचास अशी विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी,
नि.क्रमांक 12 वर गैरअर्जदार विमा कंपनीने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व तसेच नि.क्रमांक 13 वर 1 कागदपत्राच्या यादीसह ज्यामध्ये सर्व्हेअर रिपोर्ट दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यास मंचातर्फे नोटीस तामिल होवुनही गैरहजर त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियती वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा अपघात विमा
रु. 5,95,001/- देण्याचे टाळून सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा एम.एच. 22 क्यु.108 तवेरा गाडीचा मालक होता ही बाब नि.क्रमांक 5/6 वरील दाखल केलेल्या आर.सी.बुक वरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे सदरच्या तवेरा गाडीचा विमा काढला होता ही बाब नि.क्रमांक 5/5 वरील दाखल केलेल्या इन्शुरंस कव्हरनोट वरुन सिध्द होते व सदरच्या विम्याचा कालावधी 16/05/2010 ते 15/05/2011 पर्यंत वैध होती ही बाब देखील नि.क्रमांक 5/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते सदरच्या तवेरा गाडीचा अपघात हा दिनांक 07/11/2010 रोजी झाला होता ही अडमिटेड फॅक्ट आहे. व सदरच्या अपघातात अर्जदाराचे तवेरा गाडीचे रु. 3,98,000/- चे नुकसान झाले होते ही बाब नि.क्रमांक 13/1 वरील सर्व्हेअर रिपोर्टवरुन सिध्द होते व सदरचा सर्व्हेअर हा शासन मान्य होता व त्याने दाखल केलेल्या अहवाल प्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या तवेरा गाडीस अपघातामध्ये झालेल्या नुकसान भरपाईच्या पोटी रु. 3,98,000/- चे नुकसान झाले होते व ते गैरअर्जदार विमा कंपनीने चेक व्दारे अर्जदारास दिले होते ही बाब देखील नि.क्रमांक 5/7 वरील दाखल केलेल्या चेक वरुन सिध्द होते.वास्तविक गैरअर्जदार विमा कंपनीने सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे देय असलेली नुकसान भरपाई रक्कम अर्जदारास दिल्यामुळे अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या अपघाता मध्ये अर्जदाराचे
रु.5,95,001/- चे नुकसान झाले व रु. 3,98,000/- वजा जाता रु. 1,97,001/- गैरअर्जदार विमा कंपनीने द्यावे हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही.व गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास रु.3,98,000/- चा नुकसान भरपाईचा चेक देवुन अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिली नाही. अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष