जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 517/2010. तक्रार दाखल दिनांक : 27/08/2010. तक्रार आदेश दिनांक : 08/03/2011. श्री. जाधव कृष्णात पिराजी, रा.214-क, राजस्व नगर, विजापूर रोड, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. अपेक्स इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, व्यवस्थापक, वय 50 वर्षे, व्यवसाय : दुकानदार, रा. किल्ला वेस, रितेश हॉटेलसमोर, सोलापूर. 2. विक्रम गायकवाड, वय 30 वर्षे, व्यवसाय : सेल्समन, निरा बिल्डींग, अमृतनगर, हुडको सोसायटी, नवीन आर.टी.ओ. जवळ, जिल्हा मध्यवर्ती ग्राहक भांडारजवळ, सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एम.ए. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : पी.एस. जन्नू आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांच्या मुलांना संगणकाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून असेम्ब्ल्ड् संगणक तयार करुन घेतला असून त्याकरिता त्यांना रु.28,300/- खर्च आला. संगणकाचे पार्ट त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून खरेदी केले आहेत. विरुध्द पक्ष यांनी संगणक तयार करताना त्यांच्याकडून रु.3,500/- फसवणूक करुन जादा वसूल केले आहेत. त्याबाबत विचारणा केली असता त्यांना दमदाटी करण्यात आली. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, इतर खर्च रु.5,000/-, रजा भत्ता रु.10,000/-, संगणक पार्ट, रु.3,500/- तफावत इ. मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी त्यांच्याकडून संगणक पार्ट व साऊंड बॉक्स खरेदी केलेले नसल्यामुळे सेवा त्रुटी होण्याचा प्रश्न नाही. तसेच संगणकाची किंमत ही दर्जा, उत्पादीत कंपनी, स्पेअर पार्ट यावर अवलंबून असते. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते विरुध्द पक्ष क्र.1 यांचे एजंट किंवा विक्री प्रतिनिधी नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पावत्यांशी त्यांचा संबंध नाही. त्यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केलेली नसल्यामुळे शवेटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांची संपूर्ण तक्रार विरुध्द पक्ष यांनी अमान्य केलेली आहे. रेकॉर्डवर दाखल पावतीचे अवलोकन करता, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना संगणक पार्ट विक्री केल्याचे निदर्शनास येते. तसेच तक्रारदार यांना अंतीम दर म्हणून दि.12/5/2010 रोजी दिलेल्या कोटेशनमध्ये विक्री पावतीपेक्षा निश्चितच कमी दर नमूद असल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून तक्रारदार यांनी संगणक पार्ट व साऊंड बॉक्स खरेदी केले नसल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी त्यांच्या दुकानातून देण्यात येणारे कोटेशन व मूळ पावती पुस्तक मंचाच्या निदर्शनास आणून तसे सिध्द करण्याचा प्रयत्न केलेला नाही. केवळ त्यांनी पार्ट विक्री केले नसल्याचे त्यांचे कथन उचित पुराव्याअभावी गृहीत धरता येत नाही. तसेच त्यांनी संगणकाची किंमत ही दर्जा, उत्पादीत कंपनी, स्पेअर पार्ट यावर अवलंबून असल्याचे नमूद केले आहे. त्यापृष्ठयर्थही त्यांनी कोणताही उचित पुरावा किंवा दर पत्रक मंचासमोर दाखल केलेले नाही. वरील सर्व विवेचनावरुन विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांच्याकडून रु.3,500/- रक्कम जास्त वसूल केल्याचे निदर्शनास येते आणि सदर रक्कम परत मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या सेवा दोष सिध्द होण्यास कोणताही पुरावा मंचासमोर नाही. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना रु.3,500/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत परत करावेत. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विहीत मुदतीत आदेशाची अंमलबजावणी न केल्यास मुदतीनंतर संपूर्ण रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने देय राहील. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/7311)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |