Maharashtra

Jalna

CC/66/2013

Vanabai Harichandra Chavan - Complainant(s)

Versus

1.The Manager, Deccen Insurance & Reinsurance Brokers Pvt. Ltd. - Opp.Party(s)

P.M.Parihar

17 Dec 2013

ORDER

 
CC NO. 66 Of 2013
 
1. Vanabai Harichandra Chavan
R/O Bhatepuri, Tq. Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1.The Manager, Deccen Insurance & Reinsurance Brokers Pvt. Ltd.
N Square, Office No.13 III Floor, Sanghavi Nager, Near Parihar Chowk,Aundh,Pune-422007
Pune
Maharashtra
2. 2. The New India Insurance Co.Ltd.
Mahalaxmi Chember, II Floor, Near Prabhat Thetare,Pune-411030
Pune
Maharashtra
3. 2) The New India Assurance Co. Ltd.
Mahalaxmi Chembars, II Floor, Near Prabahat Thetare Pune 411030
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

(घोषित दि. 17.12.2013 व्‍दारा श्रीमती नीलिमा संत,अध्‍यक्ष)
तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत सेवेतील कमतरतेबद्दल गैरअर्जदार यांचे विरुध्‍द केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदारांचे पती हरिश्‍चंद्र लहानु चव्‍हाण यांचे रस्‍ता अपघातात निधन झाले. मयत हरिशचंद्र हे शेतकरी होते. त्‍यांचे नावे भोटेपुरी ता.जालना येथे गट नं. 173 अन्‍वये जमीन होती. प्रस्‍तुत घटनेची माहीती मौजे. पुरी पोलीस स्‍टेशनला देण्‍यात आली. तेथे गु.र.नं.127/2011 अन्‍वये गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. घटनास्‍थळ पंचनामा व साक्षीदारांचे जबाब घेण्‍यात आले. शवविच्‍छेदन करण्‍यात आले.
महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांसाठी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा ही कल्‍याणकारी योजना राबवली आहे व त्‍या अंतर्गत शासनाने विमा हप्‍ता गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे भरला आहे.
सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह विहीत नमुन्‍यात तक्रारदारांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा प्रस्‍ताव पाठवला. तो त्‍यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठवला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 10.02.2012 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून 6-ड च्‍या फेरफार उता-यावरील नाव 7/12 उता-यावरील नावाशी जुळत नाही असे कळवले व परत कागदपत्रांची मागणी केली. तक्रारदारांनी पुन्‍हा आवश्‍यक कागदपत्रे आर.पी.ए.डी ने गैरअर्जदार यांना पाठवली. परंतु अद्यापपर्यंत गैरअर्जदार यांनी विमा प्रस्‍ताव मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव प्रलंबित ठेवून तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत कमतरता केलेली आहे. म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारी सोबत गैरअर्जदार यांचे पत्र, क्‍लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, प्रथम खबर, घटनास्‍थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, 7/12 उतारा, फेरफार नोंदीचा उतारा, 6-क चा उतारा, प्रतिज्ञापत्र, मृत्‍यूचा दाखला, वारसा प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचा समोर हजर झाले. त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 1 नोटीस मिळूनही मंचा समोर हजर झाले नाहीत. त्‍यामुळे तक्रार त्‍यांचे विरुध्‍द ‘एकतर्फा’ चालवण्‍यात आली. गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्‍या लेखी जबाबानुसार मयत हरिश्‍चंद्र शेतकरी होते व त्‍यांचे नावे अपघाताच्‍या वेळी जमिन होती ही गोष्‍ट त्‍यांना मान्‍य नाही. 6-ड च्‍या उता-यात मयताचे नाव हरिशचंद्र नानु चव्‍हाण असे लिहीले आहे. तर त्‍याचे मूळ नाव हरिश्‍चंद्र लहानु चव्‍हाण असे आहे. त्‍यामुळे त्‍यांनी दिनांक 10.02.2012 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांचा विमा दावा नाकारला आहे. मयताच्‍या शेतीबाबतच्‍या कागदपत्रांवरील नाव इतर कागदपत्रां वरील नाव जुळत नाही. त्‍यामुळे योग्‍य त्‍या कारणानेच तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नाकारला आहे. यात गैरअर्जदारांची सेवेतील कमतरता नाही तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार व गैरअर्जदार 2 यांचे विद्वान वकील श्री.आर.यु.बनछोड यांचा युक्‍तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला. त्‍यावरुन खालील मुद्दे स्‍पष्‍ट होतात.
1. तक्रारदारांचे पती हरिश्‍चंद्र चव्‍हाण यांचा रस्‍ता अपघातात दिनांक 25.10.2011 रोजी मृत्‍यू झाला. तक्रारदारांनी दाखल केलेली प्रथम खबर, शव-विच्‍छेदन अहवाल, मृत्‍यूचे प्रमाणपत्र यावरुन वरील गोष्‍टी सिध्‍द होतात. वरील सर्व कागदपत्रात मयताचे नाव हरिशचंद्र नानु चव्‍हाण असे लिहीलेले आहे.
2. तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्‍यांचे नावे मौजे भाटेपुरी ता.जालना येथे जमिन होती. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या 7/12 चा उतारा, फेरफार पत्रक यावरुन ही गोष्‍ट स्‍पष्‍ट होते. या सर्व कागदपत्रात मयताचे नाव हरिश्‍चंद्र लहानु चव्‍हाण असे नमूद केले आहे. तक्रारदारांच्‍या वकीलांनी मौजे भाटेपुरी ता.जालना येथील फेरफार उतारा (सत्‍यप्रत) दाखल केला. त्‍यावरुन देखील मयताचे नाव हरिश्‍चंद्र लहानु चव्‍हाण असे लिहीलेले आहे. तक्रारदारांनी दिलेल्‍या वारसा प्रमाणपत्रावर तक्रारदारांचे नाव हरिश्‍चंद्र न्‍हानु चव्‍हाण असे नमूद केले आहे. वारसा प्रमाणपत्रावरील वारसांची नावे व फेरफार उता-यातील वारसांची नावे व गाव नमुना 6-क मधील वारसांची नावे सारखी आहेत. तक्रारदारांनी मयताचे नाव हरिश्‍चंद्र लहानु असेच होते व पोलीसांनी चुकीने लहानू ऐवजी नानु केले असे शपथपत्रही दाखल केले आहे. त्‍यामुळे मयताच्‍या शेती विषयक कागदपत्रातील नावात व पोलीस रेकॉर्ड मधील कागदपत्रांतील नावात फरक झाला असला तरी ती एकच व्‍यक्‍ती आहे असा निष्‍कर्ष मंच काढत आहे.
3. तक्रारदारांचे पती हरिश्‍चंद्र लहानु चव्‍हाण हे शेतकरी होते. त्‍यांचा मृत्‍यू अपघाताने झाला. त्‍यांचे नावे मृत्‍यूसमयी शेतजमिन होती या सर्व गोष्‍टी तक्रारदारांनी सिध्‍द केलेल्‍या आहेत. तक्रारदारांनी विहीत मुदतीत गैरअर्जदार यांचेकडे विमा प्रस्‍ताव पाठवला होता. त्‍यामुळे तक्रारदार पतीच्‍या मृत्‍यूची नुकसान भरपाई म्‍हणून गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून रुपये 1,00,000/- ऐवढी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे असा निष्‍कर्ष मंच काढत आहे.
सबब मंच खालील आदेश देत आहे.
आदेश
1. गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी आदेश प्राप्‍ती पासून तीस दिवसांच्‍या आत तक्रारदारास शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. रक्‍कम विहीत मुदतीत अदा न केल्‍यास 9 टक्‍के व्‍याज दरासहित रक्‍कम द्यावी.
2. खर्चा बाबत आदेश नाही.
 

 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.