जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर
तक्रार अर्ज क्रमांक:-440/2011
दाखल तारीख:-31/12/2011
निकालपत्र तारीख:-26/03/2012
कालावधी0वर्षे02महिने26दिवस
श्रीमती.विजूबाई नवनाथ घोडके
वय50 वर्षे, धंदा-घरकाम
रा.एकलासपूर ता.पंढरपुर जि.सोलापूर तक्रारदार
विरुध्द
1) तालुका कृषी अधिकारी,
ता.पंढरपुर जि.सोलापूर
2)व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स & ब्रोकरेज प्रा.लि.,
मंगला टॉकिजजवळ,शिवाजीनगर, पुणे.
3) व्यवस्थापक,
ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
रा-ए.डी.कॉम्प्लेक्स, नागरपूर.
(सदर नोटीस ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे
व्यवस्थापक सोलापूर शाखा पश्चिम मंगळवारपेठ
यांच्यावर बजावणे) विरुध्दपक्ष 1 ते 3
गणपुर्ती:-सौ.शशिकला श.पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ.विदयुलता जे.दलभंजन, सदस्य
तक्रारदारतर्फे विधिज्ञ:-श्री.एस.बी.कुलकर्णी
सामनेवाला तर्फे विधिज्ञ:-सौ.व्ही.आर.राव
-:नि.1 वर आदेश:-
(आदेशपारीतदिनांक :-26/03/2012)
सौ.शशिकला श.पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचेव्दारा न्यायालयीन कक्षात
सदर तक्रार अर्जामध्ये तक्रारदार व विधिज्ञ हजर, विरुध्दपक्षकार नं.3 तर्फे व्ही.आर.राव विधिज्ञ हजर, तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आज रोजी बोर्डावर घेण्याबाबत विनंती अर्ज दिला. अर्ज मंजुर. सबब उभय पक्षकारामध्ये मंचाबाहेर तडजोड झालेली असल्याने व त्याप्रमाणे तक्रारदार यांना रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) चेक
-2- त.क्र.440/11
मिळालेले असल्याने तक्रारदार यांना रक्कम मिळाल्याने सदर तक्रार अर्ज काढून टाकण्याबाबत तक्रारदार यांनी पुरशिस दाखल केली आहे. म्हणून सदरचा तक्रार अर्ज तडजोड पुरशिसने निकाली काढण्यात येत आहे. 2)दाखल केलेली पुरसिस या आदेशाचा एक भाग समजण्यात यावा. 3)उभय पक्षकार यांना या निकालाची सही शिक्क्याची प्रत निशुल्क देण्यात यवी. अन्य कोणतेही आदेश नाहीत.
(सौ.विदयुलताजे.दलभंजन)(सौ.शशिकलाश.पाटील÷)
सदस्यअध्यक्ष(अतिरिक्तकार्यभार)
जिल्हाग्राहकतक्रारनिवारणमंच, सोलापूर.
दापांशिं260312