Maharashtra

Jalna

CC/71/2013

Shobhabai Balwanta Gavali - Complainant(s)

Versus

1.Taluka Aggriculter Officer - Opp.Party(s)

Vinod Gavali

19 Dec 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/71/2013
 
1. Shobhabai Balwanta Gavali
R/O Dhawada Tq.Bhokerdhan,
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1.Taluka Aggriculter Officer
Tq.Bhokerdhan,
Jalna
Maharashtra
2. 2. The manager, Deccan Insurance and Re-Insurance Brokers Pvt.Ltd.
N-Square Office no.13, 3rd Flor, Singhvi Chouk, Aundh-Pune-422007.
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 HON'BLE MR. Suhas M.Alshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(घोषित दि. 19.12.2014 व्‍दारा श्री सुहास एम आळशी, सदस्‍य)

 

       अर्जदार या धावडा ता.भोकरदन जि.जालना येथील रहिवासी असुन, मयत बळवंता गवळी यांच्‍या पत्‍नी आहेत. तसेच अर्जदार हिचे पती हे व्‍यवसायाने शेतकरी होते. त्‍यामुळे त्‍यांचा विमा गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे काढलेला होता. दिनांक 28.09.2011 रोजी अर्जदार हिचे पती बळवंता गवळी हे पाण्‍यात बुडून मरण पावले. त्‍याबाबतचा एफ.आय.आर नंबर 31/2011 पारध येथील पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंद आहे. तसेच शवविच्‍छेदन करणा-या डॉक्‍टरांनी सुध्‍दा अर्जदार हिच्‍या पतीचा मृत्‍यू पाण्‍यात बुडून मेल्‍याने झाला असल्‍याचे दर्शविले आहे. अर्जदार हिच्‍या पतीचा झालेला मृत्‍यू हा अपघाती असुन तो महाराष्‍ट्र शासनाने गरीब शेतक-या करिता काढलेल्‍या शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना या सदरात मोडतो.

      अर्जदार हिचे पती मयत झाल्‍यानंतर तिने सदर विमा दावा मिळण्‍याकरीता तालुका कृषी अधिकारी भोकरदन यांच्‍याकडे आवश्‍यक त्‍या कागदपत्राची पुर्तता करुन प्रस्‍ताव दाखल केला व रुपये 1,00,000/- ची मागणी केली. दिनांक 05.04.2012 रोजी विमा कंपनी (गैरअर्जदार क्रमांक 2) यांनी पोलीस फायनल रिपोर्ट व डॉक्‍टर बाहेकर यांची कागदपत्रे अप्राप्‍त असल्‍याने विमा दावा प्रलंबित ठेवला. तसेच सदर कागदपत्राची पुर्तता त्‍वरीत करण्‍याबाबत सांगितले. जी कागदपत्रे कंपनीने मागणी केली ती अर्जदाराने पुरविली आहेत असे अर्जदार हिने अर्जात म्‍हटले आहे. अर्जदार हि विमा कंपनी तिचा दावा मंजूर होईल याची वाट पाहत राहिली. परंतू विमा कंपनीने अर्जदार हिचा दावा मंजूर केला नाही. दिनांक 28.05.2012 रोजी कंपनीने अर्जदार हिला एक पत्र पाठवून पोलीस फायनल रिपोर्ट व डॉक्‍टर बाहेकर यांच्‍या पोस्‍ट मार्टमची मागणी केली. गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदार हिचा विमा दावा मंजूर न केल्‍यामुळे तिला सदरची तक्रार विद्यमान मंचात दाखल करावी लागली आहे असे तिने तिच्‍या अर्जात नमूद केले आहे व 1,00,000/- रुपयाची मागणी 18 टक्‍के व्‍याजासह केली आहे. याबाबत गैरअर्जदार यांना नोटीस काढण्‍यात आल्‍या.

      गैरअर्जदार क्रमांक 1 व  2  यांना सदर प्रकरणामधून वगळण्‍याबाबत अर्जदार हिने नि.20 नुसार अर्ज दाखल केल्‍याने व त्‍यांचा अर्ज मंजूर झाल्‍याने त्‍यांना या प्रकरणामधून वगळण्‍यात आले.

            सदर प्रकरणात गैरअर्जदार 3 विमा कंपनी यांनी त्‍यांचा जबाब दाखल केला. त्‍यांनी अर्जदार हिचे बहुतांश म्‍हणणे अमान्‍य केले. तसेच अर्जदार हिने तिच्‍या विमा दावा विलंबाने दाखल केला व तिने अर्जा सोबत आवश्‍यक ते कागदपत्र दाखल केलेले नाहीत असे म्‍हटले आहे. तसेच अर्जदार हिची तक्रार चुकीच्‍या मुद्दयांवर अधारीत असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍याच प्रमाणे अर्जदार हिला दिनांक 02.11.2012, 03.12.2012 आणि 06.06.2013 रोजी सुचनापत्र कृषी अधिकारी यांच्‍या मार्फत पाठविण्‍यात आलेले आहे. परंतू त्‍यानुसार अर्जदार हिने संबंधित विभागाला सुध्‍दा दस्‍तऐवजांची पुर्तता करुन दिली नाही. त्‍याच प्रमाणे अर्जदार हिला दिनांक 05.04.2012 व 28.05.2012 रोजी डॉक्‍टर बाहेकर यांचे प्रमाणपत्र व पोलीस फायनल रिपोर्ट दाखल करण्‍याबाबत सुचविले होते. त्‍याची सुध्‍दा पुर्तता अर्जदार हिने केली नाही. तसेच मयत हा मनोरुग्‍ण होता त्‍यामुळे त्‍याने आत्‍महत्‍या केली त्‍यामुळे अर्जदार हिची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.

      वरील संपूर्ण दस्‍तऐवजांचे अवलोकन करुन विद्यामान मंचाच्‍या खालील मुद्द‍े विचारार्थ येतात.  

कारणमिमांसा

  1. अर्जदार या धावडा ता.भोकरदन जि.जालना येथील रहिवासी असुन, मयत बळवंत गवळी यांच्‍य पत्‍नी आहेत. तसेच अर्जदार हिचे पती हे व्‍यवसायाने शेतकरी होते. त्‍यामुळे त्‍यांचा विमा गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे काढलेला होता. दिनांक 28.09.2011 रोजी अर्जदार हिचे पती बळवंता गवळी हे पाण्‍यात बुडून मरण पावले. त्‍याबाबतचा एफ.आय.आर नंबर 31/2011 पारध येथील पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंद आहे. तसेच शवविच्‍छेदन करणा-या डॉक्‍टरांनी सुध्‍दा अर्जदार हिच्‍या पतीचा मृत्‍यू पाण्‍यात बुडून मेल्‍याने झाला असल्‍याचे दर्शविले आहे. अर्जदार हिच्‍या पतीचा झालेला मृत्‍यू हा अपघाती असुन तो महाराष्‍ट्र शासनाने गरीब शेतक-या करिता काढलेल्‍या शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना या सदरात मोडतो. हि बाब अर्जदार हिने दाखल केलेल्‍या नि. 4 वर दाखल केलेल्‍या आकस्‍मात मृत्‍यूची खबर, घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सकाचा अहवाल, मृत्‍यूचा दाखला, वारसाचे प्रमाणपत्र, 7/12 यावरुन दिसुन येते.

  

  1. अर्जदार हिचे पती मयत झाल्‍यानंतर तिने सदर विमा दावा मिळण्‍याकरीता तालुका कृषी अधिकारी भोकरदन यांच्‍याकडे आवश्‍यक त्‍या कागदपत्राची पुर्तता करुन प्रस्‍ताव दाखल केला व सदर प्रस्‍ताव डेक्‍कन इन्‍शुरन्‍स यांचे मार्फत गैरअर्जदार न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लि., पुणे या कंपनीकडे पाठविण्‍यात आला. सदर प्रस्‍ताव हा अपूर्ण असल्‍याचे कारणाने तालुका कृषी अधिकारी यांनी व विमा कंपनी यांनी अर्जदार हिला पोलीस फायनल रिपोर्ट व डॉक्‍टर बाहेकर/ डॉ.वाडेकर यांच्‍या कागदपत्रांची पुर्तता करायला सांगितले. याबाबत विमा कंपनीने अर्जदार हिला पाठविलेल्‍या दोन वेगवेगळया पत्रामध्‍ये एका पत्रात डॉ.बाहेकर यांच्‍या प्रमाणपत्राची मागणी केली आहे तर दुस-या पत्रात डॉ.वाडेकर हॉस्‍पीटलच्‍या डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र मागणी केलेले आहे. त्‍यामुळे सदर प्रमाणपत्राबाबत अर्जदार हि गोंधळलेली दिसते. त्‍याच प्रमाणे दुसरा दस्‍त हा पोलीस फायनल रिपोर्ट हा मागविलेला दिसतो. अर्जदाराचे पती यांचा मृत्‍यू हा पाण्‍यात पडून बुडाल्‍यामुळे झाला असल्‍याचे दिसुन येते. त्‍याच प्रमाणे सदर बाब हि पोलीस पंचनामा व इतर पोलीसांचे दस्‍त तसेच जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सकाचा अहवाल यावरुन दिसुन येते. 

 

  1. गैरअर्जदार विमा कंपनी यांनी त्‍यांच्‍या लेखी जवाबात अर्जदाराचे पती बळवंता गवळी यांनी आत्‍महत्‍या केली असल्‍याचे तसेच ते मनोरुग्‍ण असल्‍याचे म्‍हटलेले आहे. तसेच गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदार हिला पाठविलेल्‍या दोन वेगवेगळया पत्रात कधी डॉक्‍टर बाहेकर तर कधी डॉ.वाडेकर यांच्‍या प्रमाणपत्राची पुर्तता करायला सांगितले. परंतु अर्जदाराचे पती हे मनोरुग्‍ण असल्‍याबाबतचा आक्षेप सिध्‍द करण्‍याची जबाबदारी हि विमा कंपनी (गैरअर्जदार) यांची होती. परंतु सदर प्रकरणात अर्जदार हिचे पती मनोरुग्‍ण असल्‍याबाबतचा कोणताही पुरावा अथवा दस्‍तऐवज गैरअर्जदार विमा कंपनी दाखल करु शकली नाही.

 

  1. सदर प्रकरणाची संपूर्ण अवलोकन करता अर्जदार हिने दाखल केलेला विमा दाव्‍याचा प्रस्‍ताव निकाली काढण्‍या करिता वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही. परंतू पोलीस फायनल रिपोर्ट दावा निकाली काढण्‍या करिता आवश्‍यक आहे असे या मंचाचे मत आहे. तसेच केवळ विलंब झाला व दस्‍तऐवजांची पुर्तता करण्‍यास अर्जदार हिला उशीर झाला. या कारणास्‍तव अर्जदार हिचा विमा दावा नामंजूर करता येणार नाही असे सुध्‍दा मंचाचे मत आहे. यावरुन हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.    

 

आदेश

 

  1. तक्रार अर्जदार हिने गैरअर्जदार न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लि., पुणे यांना पोलीस फायनल रिपोर्ट चा दस्‍त सदर आदेश झाल्‍या पासून 30 दिवसांच्‍या आत पाठवावा.
  2. तक्रार अर्जदार हिने पाठविलेला पोलीस फायनल रिपोर्टचा दस्‍त स्विकारुन अर्जदार हिचा विमा दावा उपरोक्‍त दस्‍त प्राप्‍त झाल्‍या पासून विलंबाचे कारण न दाखविता 60 दिवसाचे आत गैरअर्जदार न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लि., पुणे यांनी निकाली काढावा.  
  3. खर्चा बाबत आदेश नाहीत.
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER
 
[HON'BLE MR. Suhas M.Alshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.