तक्रारदारांतर्फे - अॅड. श्रीमती. जयश्री कुलकर्णी
जाबदारांतर्फे - अॅड. श्री. एन्.बी. ढोकले
// निकाल //
पारीत दिनांकः-26/03/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदारांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
तक्रारदारांनी जाबदारांसोबत सदनिका घेण्यासाठी करार केला होता. त्या करारानुसार जाबदारांनी सर्व तक्रारदारास सन 2008 मध्ये सदनिकेचे ताबे दिलेले आहेत. तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 (1) (सी) अन्वये सोसायटीचे नावे रिप्रेझेंटेटीव्ह सुट दाखल केला आहे.
सर्व तक्रारदारांनी ताबा घेतल्यानंतर आपापल्या सदनिकेची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या सदनिकेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या त्या खालीलप्रमाणे :-
अ) सर्व सदनिकांमध्ये स्लॅबवर लिकेज असल्यामुळे सर्व बिल्डींग गळते त्यामुळे सर्व बांधकाम नादुरुस्त झाले.
ब) बिल्डींगच्या बाहेरील आणि आतील भिंतींमध्ये क्रॅक्स / भेगा आहेत.
क) जाबदारांना अनेकवेळा तक्रारदारांनी सांगूनही कम्प्लीशन सर्टीफिकेट, पझेशन
लेटर आणि इतर महत्वाची कागदपत्रे दिली नाहीत.
ड) कनव्हेयनस डीड करुन दिले नाही.
ड)
इ) सोसायटी स्थापन केली नाही.
फ) तक्रारदारांनी जाबदारांना सदनिकेची संपूर्ण रक्कम देऊनही खरेदी खत करुन
दिले नाही.
ग) बिल्डींगची ड्रेनेज सिस्टीम नादुरुस्त आहे.
ह) जाबदारांनी बोअरींगच्या पाण्यासाठी आणि समाईक लाईटसाठी समाईक मीटर
दिले नाही.
या सर्व सेवेतील त्रुटी जाबदारांनी ठेवलेल्या आहेत. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदारांकडून या त्रुटी दूर कराव्यात, नोंदणीकृत सोसायटी, कनव्हेयन्स डीड, कंम्प्लीशन सर्टीफिकेट, इ. करुन मिळावे तसेच रक्कम रु.75,000/- नुकसानभरपाई म्हणून व रक्कम रु.15,000/- तक्रारीचा खर्च आणि इतर दिलासा मागतात.
तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे तसेच मे. एस्.पी. राऊत यांचा अहवाल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) जाबदारांनी तक्रारदाराच्या तक्रारीस विरोध दर्शविला. जाबदारांच्या म्हणण्यानुसार, वेदांत अपार्टमेंटमधील सर्व तक्रारदारांनी श्री. प्रमोद सुर्यवंशी यांना कायदेशीर अधिकारपत्र दिल्याचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. जाबदारांनी तक्रारदारांना ताबा दिला हे मान्य करतात. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये ज्या कामातील त्रुटी, कामाचा दर्जा इ. जे नमुद केले आहे ते सर्वस्वी चुकीचे आहे, त्यांना मान्य नाही. जाबदारांनी तक्रारदारांना जमीन गट नं. 214, प्लॉट नं. 4 या मिळकतीवर जे बांधकाम केले आहे हे योग्य त्या सिव्हील इंजिनीयर व आर्किटेक्ट यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि नियमात बांधकाम केले आहे. बांधकामाचा दर्जा चांगला आहे. जाबदारांनी सर्व तक्रारदारांना सदनिका दिलेल्या आहेत त्या राहण्यायोग्य स्थितीतील दिलेल्या आहेत. ताबा पावती देऊनही ताबा पत्रक दिले नाही हे म्हणणे खोटे आहे. सदर मिळकतीचे बांधकाम झाल्यानंतर छतामधून पाणी पाझरत नव्हते व आजही पाझरत नाही. बांधकामामध्ये तडे/भेगा नाहीत. जाबदारांनी सर्व गाळाधारकांना वेळोवेळी बोलावून प्रथमत: सहकारी संस्था स्थापनेबाबत प्रयत्न केलेले आहेत. सदर वेदांत अपार्टमेंटमध्ये 14 फलॅटधारक असून त्यातील फक्त 7-8 सभासद हे सोसायटी स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रांवर सही करण्यास हजर राहतात, बाकीचे सभासद हजर राहत नाहीत, त्यामुळे सोसायटी स्थापन करणे अडचणीचे झाले आहे. सोसायटी स्थापन झाल्याशिवाय मिळकतीचे कन्व्हेयन्स-डीड करुन देणे शक्य झाले नाही. सोसायटीतील सभासद या कामासाठी सहकार्य करत नाहीत यासाठी जाबदारांची कोणतीही चुक नाही. वेदांत अपार्टमेंटमधील बिल्डींगमध्ये जाबदारांनी प्रत्येक फलॅटधारकास स्वतंत्र लाईटमीटर बसवून दिलेले आहेत. बिल्डींगमध्ये अनेक ठिकाणी कॉमन जागांच्या वापराचे लाईट व बोअरवेलमधील मोटारीसाठी स्वतंत्रपणे कॉमन लाईट मिटर जाबदार यांचे नावे असून त्याचा वापर संपूर्ण बिल्डींग करत आहे, त्यामुळे कॉमन मिटर दिला नाही हे म्हणणे चुकीचे आहे. इमारतीच्या छतास काही प्रमाणात सुरुवातीच्या काळात पाझरण्याचे प्रमाण होते परंतु जाबदारांनी स्वतंत्र खर्च करुन सर्व उणीवा व त्रुटी दुर केलेल्या आहेत, त्यामुळे आता एकही त्रुटी राहिलेली नाही. पूर्वी सोसायटी स्थापन करण्यासाठी जाबदार तयार होते परंतु काही सभासद येत नव्हते. जाबदारांनी वेळोवेळी केलेल्या इमारतीच्या दुरुस्तीच्या खर्चाच्या पावत्या, वस्तुंची बिले, सहकारी सोसायटीचे सर्व कागद, बोअरवेल व कॉमन विज मीटर घेण्यासाठी विद्युत मिटरसाठी कोटेशन भरल्याची पावती जाबदारांनी दाखल केलेली आहेत. या सर्वांवरुन जाबदारांनी त्यांच्या सेवेमध्ये आणि बांधलेल्या बांधकामामध्ये कुठल्याही त्रुटी ठेवलेल्या नाहीत असे जाबदार म्हणतात.
जाबदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
3) दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. मंचाने मे. एस्.पी. राऊत, पी.एम्.सी. लायसन्स्ड इंजिनियर अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर या तज्ञाचा दि. 29/10/2011 रोजीचा अहवाल तक्रारदारांनी दाखल केला आहे. सन 2011 मध्ये तज्ञांनी टेरेसमध्ये लिकेज आहे, वॉटर प्रुफिंग योग्य त-हेने झाले नाही, क्रॅक्स आहेत, पावसाचे पाणी खाली येण्यासाठी व्यवस्थित लाईन केली नाही तसेच पॅरापेटवॉलबद्दल वरच्या भिंतींना कॉन्क्रीट केले नाही त्यामुळे सगळीकडे भेगा व लिकेजेस आहेत. अॅल्यूमिनीयम विंडो बसविलेल्या नाहीत, मेनडोअरमध्ये गॅप आहे, सेप्टीक टँकबद्दल पाईप आणि योग्य आऊटलेटस तसेच योग्य ते सोक पीट बसविले नाहीत, बिल्डींगच्या बाहेर प्लॅस्टरला तडे गेलेले आहेत, लिकेजेस आहेत. साईड मार्जिन स्पेसबद्दल फलोअरींग व्यवस्थित केलेले नाही, असे म्हंटलेले आहे.
4) तक्रारदारांनी ज्या ए टू एच् त्रुटींबाबत तक्रारअर्जात उल्लेख केला आहे म्हणजेच लिकेजेस, वॉटर प्रुफिंग योग्य नसणे बाहेरील प्लास्टरींग व्यवस्थित नसणे, भेगा असणे इ. हे तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेल्या तक्रारीप्रमाणेच तज्ञाच्या अहवालामध्ये लिहीलेले आहे. बाकीच्या ज्या गोष्टी तक्रारीत नाहीत अशा ज्या गोष्टी तज्ञांनी लिहीलेल्या आहेत त्या मंच विचारात घेणार नाही. मात्र तक्रार अर्जामध्ये तक्रारदारांनी ज्या त्रुटी लिहीलेल्या आहेत त्या तज्ञाच्या अहवालामध्ये निष्पन्न झालेल्या आहेत. कॉमन मिटरबाबत तज्ञाने त्यावर काही भाष्य केले नाही परंतु कॉमन मीटर अजूनही जाबदारांच्या नावावर आहे असे जाबदार म्हणतात त्यामुळे तक्रारदारांची कॉमन मीटरबाबत तक्रार आहे. जाबदारांनी सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी कागदपत्रे दाखल केली आहेत तसेच कन्व्हेयन्स डीड इ. बाबत कागदपत्रे दाखल केली आहेत परंतु आतापर्यंत सहकारी संस्था स्थापन केलेली नाही हे स्पष्ट होते. सर्व सभासदांनी मिळून ही तक्रार दाखल केली आहे त्यामुळे जाबदारांचे म्हणणे चुकीचे वाटते. म्हणून मंच जाबदारांना असा आदेश देते की, त्यांनी बिल्डींगच्या टेरेसचे व्यवस्थित वॉटर प्रुफिंग करुन दयावे, आत आणि बाहेर व्यवस्थित प्लास्टरींग करुन दयावे, ड्रेनेज सिस्टीम दुरुस्त करुन दयावी, नोंदणीकृत सोसायटी स्थापन करुन कम्प्लीशन सर्टीफिकेट आणि कन्व्हेयन्स डीड करुन दयावे, कॉमन मिटर हे वेगळे सोसायटीच्या नावाने करुन दयावे. महाराष्ट्र ओनरशिप फलॅट अॅक्ट (MOFA) प्रमाणे जाबदारांनी या सर्व गोष्टी ताबा दिल्यानंतर चार महिन्यांमध्ये कम्प्लीशन सर्टीफिकेट, सोसायटी फॉर्म करणे व त्यानुसार कनव्हेयन्स डीड करुन देणे ही त्यांची जबाबदारी असूनही हे जाबदारांनी करुन दिले नाही ही त्यांची सेवेतील त्रुटी दिसते त्यामुळे साहजिकच वेदांत अपार्टमेंट मधील सदनिकाधारकांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास झाला असेल म्हणून जाबदारांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई व खर्चाची रक्कमही दयावी, असा मंच आदेश देतो.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2 जाबदारांनी वेदांत अपार्टमेंटच्या टेरेसचे व्यवस्थित वॉटर प्रुफिंग करुन दयावे, बिल्डींगच्या आत आणि बाहेर व्यवस्थित प्लास्टरींग करुन दयावे. ड्रेनेज सिस्टीम दुरुस्त करुन दयावी, नोंदणीकृत सोसायटी स्थापन करुन कम्प्लीशन सर्टीफिकेट आणि कन्व्हेयन्स डीड करुन दयावे. कॉमन मिटर हे वेगळे सोसायटीच्या नावाने करुन दयावे,
3. जाबदारांनी तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.75,000/- (रक्कम रु.पंचाहत्तर हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.,2,000/- (रक्कम रु. दोन हजार मात्र) दयावेत.
4. वर कलम 1 ते 3 च्या आदेशाची पूर्तता जाबदारांनी हा आदेश प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांचे आत करावयाची आहे.
5. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.