Maharashtra

Additional DCF, Pune

CC/11/143

1.Sou. Sumati Sunil Jagtap - Complainant(s)

Versus

1.Shivner Nagari Sahakari Patha Sanstha Miryadith,Junner - Opp.Party(s)

D.N. Pote/Shrikant Gogawale

31 May 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/143
 
1. 1.Sou. Sumati Sunil Jagtap
R/at. Sada Bazar,Tal.Junner
Pune
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1.Shivner Nagari Sahakari Patha Sanstha Miryadith,Junner
At Post Tal.Junner
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Pranali Sawant PRESIDENT
  Smt. S.A. Malwade MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदार                       - अड. श्री.पोटे व अड. श्री. गोगावले 


 

जाबदार क्र. 1 ते 7, 9 ते 12,14, 15 - एकतर्फा


 

जाबदार क्र 3,4,6,9,13,14,15           - अड श्री. चंद्रचूड


 

जाबदार क्र. 8                   - अड श्रीमती सपकाळ


 

जाबदार क्र. 16                  - अड श्री. शेख/ अड श्री. दुबे.


 

*****************************************************************


 

द्वारा :-मा. अध्‍यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत


 

                          


 

    // निकालपत्र //


 

 


 

(1)         प्रस्‍तूत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने आपण गुंतविलेली रक्‍कम परत दिली नाही म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की,


 

 


 

(2)         प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदार श्रीमती. सुमती जगताप यांनी जाबदार शिवनेर नागरी सहकारी पतसंस्‍था (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे ठेवपावती अन्‍वये रक्‍कम गुंतविलेली होती तसेच बचतखात्‍या अन्‍वये रक्‍कम ठेवली होती. या ठेव पावतींची मुदत संपल्‍यानंतर तक्रारदारांनी ठेवपावती व बचतखात्‍याची रक्‍कम मिळणेसाठी पतसंस्‍थेशी संपर्क साधला असता त्‍यांनी तक्रारदारांची रक्‍कम परत केली नाही. अशाप्रकारे आपली रक्‍कम परत न देऊन जाबदारांनी आपल्‍याला सदोष सेवा दिली आहे याचा विचार करता आपल्‍या ठेवपावतीची रकम व बचत खात्‍याची रक्‍कम व्‍याज व इतर अनुषंगिक रकमांसह देवविण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्‍या पृष्‍ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 7 अन्‍वये एकूण 5 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.


 

 


 

(3)         प्रस्‍तूत प्रकरणातील जाबदार क्र. 1 ते 7, 9 ते 12,14, 15 यांचेवरती मंचाच्‍या नोटीशीची बजावणी होऊनसुध्‍दा त्‍यांनी आपले म्‍हणणे मंचापुढे दाखल केले नाही. सबब त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर पारित करण्‍यात आला.


 

 


 

(4)         प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र 3 4 6 9 13 14 व 15 यांनी अड चंद्रचूड यांचे मार्फत आपले विरुध्‍द झालेला एकतर्फा आदेश रद्य होऊन मिळावा असा अर्ज मंचापुढे दाखल केला. जाबदारांचा हा अर्ज खर्चासह मंजूर करण्‍यात आला असता जाबदारांनी तक्रारदारांना खर्चाची रक्‍कम अदा केली नाही.  एकतर्फा आदेश रद्य होण्‍यासाठी जी पूर्व अट होती त्‍याची पूर्तता जाबदारांन कडून न झाल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द पारित केलेला एकतर्फा आदेश रद्य करण्‍यात आला नाही. 


 

 


 

(5)         प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र 8 यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी झाले नंतर त्‍यांनी विधिज्ञांमार्फत आपले म्‍हणणे दाखल केले. आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये या जाबदारांनी तक्रारदारांच्‍या सर्व तक्रारी नाकारल्‍या असून तक्रारदारांची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी नाकारली आहे. पतसंस्‍थेने घेतलेल्‍या कोणत्‍याही निर्णयात आपण सहभाग घेतला नसल्‍यामुळे तसेच आपण बैठकीस हजर नसल्‍यामुळे तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या अर्जाशी आपला संबंध येत नाही असे या जाबदारांचे म्‍हणणे आहे. सदर संस्‍था ही प्रशासकाच्‍या ताब्‍यात असल्‍यामुळे तक्रारदारांनी आपल्‍या विरुध्‍द दाखल केलेला हा अर्ज बेकायदेशिर ठरतो असे या जाबदारांचे म्‍हणणे आहे. जाबदारांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.


 

 


 

(6)         प्रस्‍तूत प्रकरणातील जाबदार क्र. 16 यांचेवरती मंचाच्‍या नोटीशीची बजावणी झाल्‍यानंतर विधीज्ञांमार्फत त्‍यांनी आपले म्‍हणणे व या प्रकरणातून आपल्‍याला वगळण्‍यात यावे असा अर्ज त्‍यांनी मंचापुढे दाखल केला.   आपण जुन्‍नर येथील शाखेमध्‍ये कामाला नसल्‍यामुळे तक्रारदारांनी आपल्‍याला येथे अनावश्‍यकरित्‍या पक्षकार केलेले आहे असे या जाबदारांचे म्‍हणणे आहे. आपण कधीही या संस्‍थेच्‍या संचालक पदावर काम करत नव्‍हतो तर आपण शाखाधिकारी म्‍हणून काम करीत होतो असे या जाबदारांचे म्‍हणणे आहे. तक्रारदारांची ठेव रक्‍कम देणेसाठी शाखाधिका-यांना जबाबदार धरणे अयोग्‍य असल्‍याने तसेच आपल्‍याला विनाकारण या न्‍यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाणे भाग पाडल्‍यामुळे सदरहू तक्रार अर्ज आपल्‍याविरुध्‍द खर्चासह रद्य करण्‍यात यावा अशी या जाबदारांनी विनंती केली आहे. या जाबदारांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व व्‍यवस्‍थापक या पदाचा दिलेला राजीनामा सादर केलेला आहे.


 

 


 

(7)         यातील जाबदार क्र. 16 यांनी दाखल केलेल्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन केले असता ते या पतसंस्‍थेचे व्‍यव‍स्‍थापक म्‍हणून काम पाहत होते ही बाब लक्षात येते. तक्रारदारांची रककम परत करण्‍याची जबाबदारी पतसंस्‍था व त्‍यांचे संचालक मंडळाची असून यासाठी व्‍यवस्‍थापकाला जबाबदार धरणे अयोग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब अंतिम आदेशातून जाबदार क्र. 16 यांना वगळण्‍यात येत आहे. तक्रारदारांनी ज्‍या यादीच्‍या आधारे हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे त्‍यामध्‍ये जाबदार क्र.16 यांच्‍या नांवाचा उल्‍लेखच आढळून येत नसताना तक्रारदारांनी या जाबदारांना या कामी सामिल करुन विनाकारण एका न्‍यायालयिन प्रक्रियेस सामोरे जाणे भाग पाडले. अर्थातच अशा परिस्थितीत जाबदार क्र 16 यांना याकामी अयोग्‍य पध्‍दतीने सामील केल्‍याबद्यल तक्रारदारांनी जाबदार क्र. 16 यांना रककम रु.2,000/- मात्र द्यावेत असा आदेश करणे योग्‍य व न्‍याय्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्‍याप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेत.


 

 


 

(8)          प्रस्‍तूत प्रकरणातील तक्रारदारांच्‍या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता त्‍यांनी ठेव पावतीची रक्‍कम पतसंस्‍थेने परत केलेली नाही हे तक्रारदारांनी वस्‍तुस्थितीबाबत केलेले निवेदन जाबदारांनी हजर होऊन नाकारलेले नाही किंवा या ठेव पावतीची रक्‍कम तक्रारदारांना अदा केल्‍याचा पुरावा मंचापुढे दाखल केलेला नाही. अशाप्रकारे ठेवीची रक्‍कम परत न करण्‍याची पतसंस्‍थेची कृती त्‍यांच्‍या सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे. तक्रारदारांनी या कामी संपूर्ण संचालक मंडळाला जरी जाबदार म्‍हणून सामिल केले असले तरीही   सन्‍मा. उच्‍च न्‍यायालय,मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांच्‍या सौ. वर्षा रविंद्र ईसाई विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी व इतर, रिट पिटिशन क्रमांक 5223/2009, या प्रकरणातील दिनांक 22/12/2010 च्‍या न्‍यायिनर्णयाच्‍या आधारे अंतिम आदेश संचालकां विरुध्‍द न करता फक्‍त पतसंस्‍थे विरुध्‍द करण्‍यात येत आहेत.


 

 


 

(9)        प्रस्‍तूत प्रकरणातील पतसंस्‍थने आपल्‍याला आपल्‍या पावतीवर सरसकट व्‍याज अदा केलेले नाही अशा आशयाचे निवेदन तक्रारदारांनी मंचापुढे दाखल केले आहे.    ठेवपावतीची रक्‍कम व बचत खात्‍यावरील रक्‍कम परत न करणे ही सदोष सेवा ठरते असा मंचाचा निष्‍कर्ष असल्‍याने तसेच ठेव ठेवल्‍या पासून तक्रारदारांना व्‍याज मिळालेले नसल्‍याने ठेवपावतीची रक्‍कम ठेवपावतीच्‍या तारखे पासून पावतीत नमूद व्‍याजासह परत करण्‍याचे आदेश करण्‍यात येत आहेत. तसेच बचतखात्‍याची रक्‍कम शेवटची रक्‍कम भरले तारखे पासून 7 %  व्‍याजासह परत करण्‍याचे आदेश करण्‍यात येत आहे.प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदारांच्‍या बालकल्‍याण पंचवार्षीक कार्डाचे अवलोकन केले असता त्‍यांनी या खात्‍यामध्‍ये प्रतीवर्षी रु. 7,300/- मात्र एकुण तीन वर्षे कालावधी करिता भरलेले आढळतात. सबब या कार्डावर त्‍यांनी भरलेली एकुण रक्‍कम रु 21,900/- मात्र शेवटची रक्‍कम भरलेल्‍या तारखे पासून 7 % व्‍याजासह मंजूर करण्‍यात येत आहे. या प्रकरणामध्‍ये तक्रारदारांच्‍या ठेव पावतीचे अवलोकन केले असता त्‍यांना ही पावती तारण ठेवून कर्ज देण्‍यात आले होते ही वस्‍तुस्थिती लक्षात येते. तक्रारदारांनी पावतीच्‍या आधारे कर्ज घेतलेले असल्‍यामुळे कर्जाची रक्‍कम वर्ग करुन घेण्‍याची पतसंस्‍थेला मुभा देणे योग्‍य व न्‍याय्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्‍याप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे. तसेच या पावतीवर किती टक्‍के दराने व्‍याज अदा केले जाईल याचा उल्‍लेख संबंधीत पावतीवर नसल्‍यामुळे या पावतीवर 10 % व्‍याज तक्रारदारांना मंजूर करण्‍यात आले आहे. 


 

 


 

           वर नमूद सर्व निष्‍कर्ष व विवेंचनांच्‍या आधारे प्रस्‍तुत प्रकरणात पुढील


 

 


 

 


 

 


 

प्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात येत आहेत.


 

 


 

 


 

सबब मंचाचा आदेश की


 

// आदेश //


 

 


 

(1) तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

(2) यातील जाबदारांनी तक्रारदारांना पावती क्र. 15758 अन्‍वये देय होणारी रक्‍कम रु. 47,000/- (अक्षरी रक्‍कम रु.सत्‍तेचाळीस हजार मात्र) दि.01/06/2007 पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यत 10 %  व्‍याजासह अदा करावेत. या


 

रकमेतून पूर्वी अदा केलेले व्‍याज वजा करण्‍याची जाबदारांना मुभा राहील. 


 

 


 

(3) यातील जाबदारांनी तक्रारदारांना दैनंदिन ठेव पासबुक क्र. 97 अन्‍वये देय होणारी रक्‍कम रु.620/- (अक्षरी रक्‍कम रु. सहाशे वीस मात्र) दि.11/08/2009 पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत 7 % व्‍याजासह अदा करावेत.


 

 


 

(4) यातील जाबदारांनी तक्रारदारांना बालकल्‍याण पंच वार्षिक कार्ड क्र. 97 अन्‍वये देय होणारी रक्‍कम रु.21,900/- (अक्षरी रक्‍कम रु. एकवीस हजार नऊशे मात्र) दि.01/01/2009 पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत 7 % व्‍याजासह अदा करावेत.


 

 


 

 


 

(5)  कलम 2 मध्‍ये नमूद पावतीच्‍या देय रकमेतून कर्जाची रक्‍कम वजा करण्‍याची जाबदारांना मुभा राहील.


 

 


 

(6) यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.3,000/- तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी अदा करावेत.


 

 


 

(7) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी पतसंस्‍था अथवा त्‍यांचेतर्फे अधिकृत प्रतिनिधींनी करण्‍याची आहे.


 

 


 

(8) वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.


 

 


 

(9) यातील तक्रारदारांनी जाबदार क्र. 16 यांना रक्‍कम रु.2,000/- मात्र निकालपत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत अदा करावेत अन्‍यथा जाबदार तक्रारदारांविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.


 

 


 

(10) निकालपत्राच्‍या प्रती सर्व पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.


 

 


 

 
 
 
[ Smt. Pranali Sawant]
PRESIDENT
 
[ Smt. S.A. Malwade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.