अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक :एपीडीएफ/13/2010
तक्रार अर्ज दाखल दिनांक : 21/01/2010
तक्रार निकाल दिनांक : 06/01/2012
1. श्री. गोपीनाथ विश्वनाथ नारायणे, ..)
2. सौ. शशिकला गोपीनाथ नारायणे, ..)
दोघे रा. बिल्डींग एकस रुम नं. ३९१, ..)
शास्त्रीनगर, येरवडा, ..)
पुणे – 411 006. ..)... तक्रारदार
विरुध्द
1. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हाडाचा ..)
घटक तर्फे सेक्रेटरी श्री. जगदाळे, ..)
गृहनिर्माण भवन आगरकर भवन, पुणे – 1. ..)
2. श्री. क्षिरसागर, ..)
702, कॅम्प, पुणे – 1. ..)
3. शांताबाई ज्ञानेश्वर जाधव, ..)
रा. बिल्डींग नं. 15, फलॅट नं. 292, ..)
तळमजला महाराष्ट्र हौ. बोर्ड कॉलनी, ..)
स्वामी विवेकानंद नगर, पुणे सोलापूर रोड, ..)
हडपसर,पुणे – २८. ..)... जाबदार
********************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
जाबदार क्र. 3 मयत असल्याने त्यांचे वारस रेकॉर्डवर घेण्यासाठी मुदत देण्यात यावी असा अर्ज तक्रारदारांनी दि.29/7/2011 रोजी दाखल केलेला होता. त्यांचा हा अर्ज शेवटची संधी म्हणून मंजूर करण्यात आला. तक्रारदारांतर्फे याच कारणासाठी पुन्हा एकदा मुदत मागण्यात आली. तक्रारदारांचा हा मुदतीचा अर्ज मंजूर केल्यानंतर जाबदार क्र. 3 चे वारस रेकॉर्डवर घेणेसाठी तक्रारदारांनी काहीही तजवीज केलेली नाही तसेच तक्रारदार सातत्याने मंचापुढे गैरहजर आहेत. सबब सदरहू प्रकरण योग्य तजवीजीअभावी काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –06/01/2012