जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर
तक्रार अर्ज क्रमांक:-289/2012
दाखल तारीख:-03/10/2012
निकाल तारीख:-16/04/2013
कालावधी0वर्षे06महिने13दिवस
डॉ.माणिक अंबाजी गुर्रम
वय50वर्षे, धंदा-डॉक्टर
रा.अंकुर गुर्रम नर्सिंग होम,
1895 न्यु पाच्छापेठ,सोलापूर तक्रारदार
विरुध्द
1)Omya Medical Solutions Ltd.,
2)T.Murlikrishna Reddy,
Chairman and Managing Director,
Omya Medical Solutions Ltd.,
3)Mr.Rajeev Joshi,DGM.
Omya Medical Solutions Ltd.,
4)Mr.Joseph Naduvathussery,C.E.O.
Omya Medical Solutions Ltd.,
All R/o%119,Envision Technology Centre,
EPIP Area, Phase 1, Whitefield,Bengaluru 560 066 &
C/o – Geneva Industries Limited.
No.140/1,ITPL Main Road,Near Hope Farm Whitefield,
Bengaluru 560 066 विरुध्दपक्ष नं.1ते4
गणपुर्ती:-सौ.शशिकला श.पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ.विदयुलता जे.दलभंजन, सदस्य
तक्रारदारतर्फे विधिज्ञ:-श्री.पी.एस.जन्नू
-: अॅडमिशन स्टेज नि.1 वर आदेश:-
(आदेशपारीतदिनांक:- 16/04/2013)
सौ.शशिकला श.पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचेव्दारा न्यायालयीन कक्षात
तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्ज दि.03/10/2012 रोजी विरुध्दपक्षकार Omya Medical Solutions Ltd., व इतर 3 यांचे विरुध्ददाखल केला असून, सदर तक्रारअर्ज अॅडमिशन स्टेजसाठी ठेवण्यात आला. अॅडमिशन स्टेजला मे. मंचाचे सदरील प्रकरणाला
निशाणी क्रमांक टाकले नाही, अर्जाचे मराठीत भाषांतर जोडणे, प्रतिज्ञापत्रावर तिकीट नाही व आयपीओ वर माहिती भरलेली नाही व आय.पी.ओ.वर माहिती भरलेली नाही तसेच
(2) 289/2012
वकीलपत्रावर तिकीट लावले नाही म्हणून आक्षेप लावणेत आले होते. तक्रारदारतर्फे दि.08/10/2012 रोजी आक्षेप काढलेले आहेत. परंतू प्रस्तुत प्रकरण अॅडमिशन स्टेजला ठेवले असता तक्रारदार गैरहजर त्यांचे विधिज्ञ गैरहजर असून मे.राज्य आयोगाचे सूचनेप्रमाणे अॅडमिशन स्टेजला युक्तीवाद केला नाही. म्हणून सदरचे प्रकरण मंचासमोर चालविण्यास तक्रारदारास स्वारस्य राहिलेले नाही म्हणून सदरचा तक्रार अर्ज प्रलंबीत ठेवण्यास काहीही कारण नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीत अॅडमिशन स्टेजला सदरचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(सौ.विद्युलताजे.दलभंजन) (सौ.शशिकलाश.पाटील÷)
सदस्य अध्यक्ष(अतिरिक्तकार्यभार)
जिल्हाग्राहकतक्रारनिवारणमंच, सोलापूर.दापांशिं003041300