द्वारा : सदस्या, श्रीमती. सुजाता पाटणकर
// निकालपत्र //
(1) तक्रारदारांनी तक्रार अर्जात कथन केल्याप्रमाणे तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांची लासुर्णे या गावी पाच एकर शेती आहे.
(2) जाबदार क्र. 1 ही कंपनी असून त्यांचा वेगवेगळया प्रकारचे बियाणे तयार करणे आणि सदर बियाण्यांची अधिकृत विक्रेत्याद्वारे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. जाबदार क्र. 2 यांना सदर अर्जाचे कामी आवश्यक पक्षकार म्हणून सामिल केलेले आहे. जाबदार क्र. 2 हे जाबदार क्र. 1 यांचे बियाणे विक्री करतात. तक्रारदार यांना जाबदार क्र. 2 यांनी बियाण्यांची विक्री केलेली आहे, जी कांदा बियाणे सदोष आहेत. तक्रारदार यांनी कांदा बियाणे जाबदार क्र. 2 अधिकृत विक्रेते यांचेकडून जाबदार क्र. 1 या कंपनीचे बियाणे खरेदी केलेले आहे. तक्रारदार यांनी दि. 12/6/2009 रोजी शेतीकरिता रिसीट नं. 26824 ने पाच किलो कांदा बियाणे रक्कम रु.3,350/- यास खरेदी केलेले आहे. तक्रारदार यांनी कांदा बियाणे पेरणीकरिता आवश्यक असणारी अशी जमिन पेरणीकरिता तयार केली व त्यानंतर हाताने बियाणांची पेरणी तक्रारदार यांच्या सर्व्हे नं. 723 मधील 20 आर या क्षेत्रामध्ये केली. कांदा पिकास आवश्यक असणारे खत तक्रारदार यांनी त्यांच्या शेतामध्ये टाकून वेळोवेळी शेतीची मशागत कांदा पीक येण्यासाठी केली होती. तक्रारदार यांनी केलेल्या कांदा बियाण्यांची वीस दिवसांनी फक्त 10 ते 20% एवढीच उगवण झाली होती, त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्रारदार यांना तीन महिन्यानंतर अपेक्षित असणारे उत्पन्न मिळालेले नाही. तक्रारदार यांना तीस टन एवढे कांदा पीक तीन महिन्यानंतर अपेक्षित होते. त्यावेळी कांदा पीकाचा दर प्रत्येकी किेलो रु.15/- असा होता, त्यामुळे तक्रारदार यांचे 30,000 किलो x रु.15/- = रु.4,15,000/- एवढे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच मजुरीसाठी रु.10,000/- मानसिक त्रासासाठी रु.10,000/- आणि कायदेशीर बाबींसाठी खर्च रु.10,000/- असा एकूण रक्कम रु.4,80,000/- नुकसानभरपाई जाबदार क्र. 1 यांचेकडून मागण्याचा तक्रारदार यांना कायदेशीर हक्क आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांनी उत्पादित केलेले कांदा बियाणे सदोष होते याबाबत कृषी विकास अधिकारी जिल्हास्तरीय समिती यांच्या अहवालानुसार 30 ते 40% कांदा बियाण्यांची उगवण क्षमता आहे याबाबतचा अहवाल दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांना दि.26/9/2009 रोजी नोटीस पाठविली त्यादिवशी तक्रारीस कारण घडलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांची विनंती की,
(3) तक्रारदार यांना जाबदार यांचेकडून रु.4,50,000/- नुकसानभरपाई, रक्कम रु.10,000/- मानसिक खर्च, रक्कम रु.10,000/- मजूरी खर्च, रक्कम रु.10,000/- कायदेशीर खर्चासाठी अशी एकूण रक्कम रु.4,80,000/- 12% व्याजासह जाबदार क्र. 1 यांचेकडून देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत तक्रारीपृष्टयर्थ शपथपत्र व कागदयादीअन्वये 7/12 चा उतारा, बारामती तालुका खरेदी-विक्री संघ लि. यांची दि.12/6/2009 रोजी कांदा बियाणे खरेदीची रु.3,350/- ची पावती, तक्रारदार यांनी गुण नियंत्रक अधिकारी, कृषी विभाग, पंचायत समिती, इंदापूर यांना दि.3/7/2009 रोजी पाठविलेले पत्र, जाबदार क्र. 1 यांना तक्रारदार यांना दि. 7/7/2009 रोजी दिलेली नोटीस, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांचे दि. 15/9/2009 रोजीचे पत्र, जिल्हास्तरीय बियाणे भेसळ / उगवण तक्रार निवारण समिती जिल्हास्तरीय समितीचा भेटीचा अहवाल, तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांना दि. 26/9/2009 रोजी रजिस्टर पोहोचपावती सह पाठविलेली नोटीस, तक्रारदार यांच्या शेताचे फोटोग्राफस इ. कागदपत्रे जोडलेली आहेत.
(4) जाबदार क्र.1 व 2 यांना मे. मंचाने नोटीस काढली असता जाबदार क्र. 1 हे मंचापुढे हजर राहून त्यांनी तक्रार अर्जास अनुसरुन जाबदार क्र. 1 यांनी श्री. देवीकर बी. एस्., मार्केटींग ऑफिसर यांचे दि. 4/10/2010 रोजी अॅथॉरिटी लेटर दाखल केलेले आहे. जाबदारांनी आपली लेखी कैफियत दाखल करुन तक्रार मान्य नसल्याचे म्हंटले आहे. तथापि आपण बियाणे उत्पादन करणारी कंपनी असून तक्रादारांना बियाणे विक्री केल्याचे म्हणणे मान्य असल्याचे नमुद केले आहे. जाबदारांनी बियाणे सदोष नव्हते व नाही. कांदा रोपांची वाढ उगवण फक्त दहा ते वीस टक्के झाली हे म्हणणे खरे नाही. बियाणांची उगवणशक्ती मुळीच कमी नव्हती असे नमुद केले आहे. जाबदार क्र. 1 यांचे पंचगंगा सीडस् प्रा. लि. या नावाची कंपनी औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे असून सदर कंपनीमधून ते दर्जेदार बियाण्यांचे उत्पादन करतात. सदरचे बियाणे शेतकी खात्यातील तज्ञ अधिका-यांच्या देखरेखीखाली तपासणी केल्यानंतर व प्रयोगशाळेत चाचणी घेतलेनंतरच सदरचे बियाणांची विक्री बाजारात डिलरमार्फत केली जाते. सदरचे बियाणे 2.5 किलो बियाणे 5 ते 6 गुंठे क्षेत्रापेक्षा शिफारस केलेली असताना तक्रारदारांनी 5 किलो बियाणे दहा गुंठे क्षेत्रात न टाकता वीस गुंठे क्षेत्रामध्ये टाकले आहे, त्यामुळे उगवण ही कमीच दिसणार आहे. समितीने महाराष्ट्र सरकारने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकाप्रमाणे पाहणी केली नाही. सदर पीक पाहणीबाबत या सामनेवाला यांना केव्हाही कळविलेले नव्हते व नाही. तक्रारदारांनी दि. 3/7/2009 रोजीचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांना दिलेले पत्र दि.3/7/2009 रोजीचे तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, दि.7/7/2009 रोजीचे बारामती खरेदी विक्री संघ यांना दिलेली नोटीस यामधील उल्लेख पाहता तक्रारदारांची मागणी रु.1,00,000/- अशी होती व तक्रार अर्जात रक्कम रु.4,80,000/- ची मागणी केली आहे म्हणजेच तक्रारदाराचे कुठलेही नुकसान झालेले नाही परंतु या सामनेवाल्याकडून फुकटात मिळवता येईल या गैरहेतूने मोघम स्वरुपाच्या मागण्या केलेल्या आहेत. तक्रारदारांनी सदर बियाण्यांचा उपयोग आवश्यक क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राकरिता केलेला आहे व बियाण्यांची उगवण कमी झाल्याचे दर्शविले आहे. सबब सदरचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. जाबदारांनी लेखी म्हणण्याचे पृष्टयर्थ शपथपत्र व कागदयादीने अनुक्रमे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. मा. कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांना जाबदार क्र. 1 यांनी दिलेले पत्र, शेतक-यांचे जबाब, बियाणे चाचणी अहवाल, बियाणे जबाब पावती, जाबदार क्र. 1 यांनी मा. संचालक (नि.व.गु्.नि.) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे – 1 यांना दिलेले पत्र, जाबदार क्र. 1 कंपनीचे स्टेटमेंट 1 व 2, कांदा बियाण्यांची पिशवी इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
(5) जाबदार क्र. 2 यांना नोटीस मे. मंचाची नोटीस मिळाल्यावर त्यांनी सदर कामी वकीलांच्यामार्फत हजर होऊन म्हणणे देण्यासाठी मुदत मागितली आहे परंतु त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही म्हणून त्यांचेविरुध्द दि. 18/11/2010 रोजी कैफियत दाखल नाही / (No w.s.) असे आदेश करण्यात आलेले आहेत.
(6) जाबदारांनी लेखी कैफियत दाखल केल्यानंतर तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 यांच्या कैफियतीस उत्तर दाखल केले असून कैफियतीमधील जो मजकूर जाबदारांनी मान्य केला आहे तो सोडून बाकी मजकूर अमान्य केला आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या शेतामध्ये दि.15/6/2009 रोजी कांद्दाचे बियाणे लावताना गादी वाफयावर रोपे तयार करण्यासाठी सदरचे बियाणे लावले. सदर बियाण्यांची पेरणी केल्यानंतर वीस दिवसांपर्यंत फक्त 10 ते 15 टक्के बियाण्यांची उगवण झालेली व रोपांची वाढ निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले. तक्रारदार यांनी पाच किलो बियाणे 0.20 या क्षेत्रावर लावलेबाबतची नोटीस सामनेवाला क्र. 1 व 2 यांना दि. 7/7/2009 रोजी दिलेली होती परंतु सदर नोटीस मिळूनही सामनेवाला क्र. 1 यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही अगर सदर कंपनीचे अधिकारी प्रत्यक्षात कांदा बियाणे उगवण कमी झालेबाबत पाहणीस आले नाहीत. त्यानंतरही तक्रारदारांतर्फे पाठविलेल्या दि. 26/9/2009 रोजीच्या रजिस्टर नोटीसलाही सामनेवाला यांनी उत्तर दिले नाही. सदर कंपनीचे बियाणे 2.5 किलो 5 ते 6 गुंठे क्षेत्राकरिता शिफारस केलेली असताना तक्रारदारांनी पाच किलो बियाणे दहा गुंठे क्षेत्रात न टाकता वीस गुंठयामध्ये टाकलेले आहे त्यामुळे उगवण कमी झाली ही बाब तक्रारदार यांना मान्य नाही. सामनेवाले क्र. 1 यांनी कैफियतीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तक्रारदारास मान्य व कबूल नाहीत असे नमुद केलेले आहे. दि.18/2/2011 रोजी तक्रारदार यांनी कागदयादीने कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर जिल्हा पुणे यांचे कांदा पिकाचे बाजारभाव दर्शविणारे पत्र दाखल केलेले आहे.
(7) दि.19/4/2011 रोजी सामनेवाले क्र. 1 तर्फे परिपत्रक दाखल करण्यात आलेले आहे. दि.7/6/2011 रोजी सामनेवाले यांचेतर्फे कागदयादीने परिपत्रक दाखल करण्यात आलेले आहे. दि. 7/7/2011 रोजी अर्जदार यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. दि. 2/2/2012 रोजी अर्जदार यांनी अकबरभाई अॅण्ड सन्स यांची दि.18/10/2011 रोजीची किती प्रमाणात कांदा विक्रीस दिला व त्यातून येणारे उत्पन्न हे दर्शविणारी पावती आणि 2004 (IV) CPJ page 181 K. Anjalah V/s. National Seeds Corporation Ltd. हे वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्र दाखल केलेले आहे.
(8) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारअर्ज, म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभयपक्षकारांचा लेखी व तोंडी युक्तिवाद व वरिष्ठ कोर्टाचे न्यायनिवाडे याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे( points for Consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात
मुद्दे उत्तरे
मुद्याक्र . 1:- जाबदार नं 1 यांनी अर्जदार यांना विक्री
केलेल्या बियाणाच्या केला आहे काय ? ... होय.
मुद्याक्र . 2:- जाबदार नं 1 व 2 यांनी अर्जदारास सेवा
देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? ...
मुद्याक्र. 3 :- काय आदेश ... अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन :-
(4) अर्जदार यांनी जाबदार क्र 2 यांचे कडून जाबदार क्र 1 यांनी उत्पादित केलेले कांदा बियाणे खरेदी केलेले होते. सदर कांदा बियाणांच्या खरेदीची पावती अर्जदारांनी अर्जा सोबत दाखल केलेली आहे. सदरची बाब जाबदार क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रात नाकारलेली नाही. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र 1 व 2 यांचे ग्राहक आहेत ही बाब निर्विवाद आहे असे या मे न्यायमंचाचे मत आहे.
(5) मुद्याक्र. 1 अर्जदार यांनी दिनांक 20/6/2009 रोजी जाबदार क्र 2 यांचे कडून रक्कम रु 1300/- चे कांदयाचे बी खरेदी केले होते. सदरचे बियाणे दिनांक 15/10/2009 रोजी परेणी करुन नंतर दिनांक 29/11/2009 रोजी सदर बियाणांची पुनर्र लागवड त्यांचे मालकीचे गट नं. 898 मधील 40 आर एवढया क्षेत्रामध्ये केलेली होती. सदरच्या अर्जदाराच्या कांद्याच्या पिकाला ढेंगळे आल्यामुळे अर्जदार यांनी कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक 10/3/2010 रोजी तक्रारअर्ज दिला. त्यानंतर अर्जदार यांच्या पिकाची पाहणी करुन दिनांक 31/3/2010 रोजी जिल्हा स्तरीय बियाणे भेसळ / उगवण तक्रार निवारण समिती यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे.
वर नमुद सर्व निष्कर्ष व विवेचनाच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
सबब मंचाचा आदेश की,
// आदेश //
1. तक्रारदारांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत
आहे.
2. यातील जाबदार क्र. 1 कंपनीने तक्रारदारांना
रक्कम रु. 1,23415/- अक्षरी मात्र दि.
11/4/2009 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत
15% व्याजासह अदा करावेत.
3. यातील बिल्डरने तक्रारदारांना शारीरिक
व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई
म्हणून रु.5,000/- व तक्रार अर्जाचा
खर्च म्हणून रु.2,000/- मात्र आत अदा करावेत.
4. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तीस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
5. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.