Maharashtra

Ahmednagar

CC/18/49

Fransis Vasantrao Kakde - Complainant(s)

Versus

1. Manager, Shailesh Dnyaneshwar Supekar, Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Lt - Opp.Party(s)

Adv. Kale

30 Nov 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/18/49
( Date of Filing : 20 Feb 2018 )
 
1. Fransis Vasantrao Kakde
R/o 136, Omkar Colony Aadarsh Nagar, nagapur, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Manager, Shailesh Dnyaneshwar Supekar, Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd.
At Opp. Light DP, Near Pipeline Road, Vaiduwadi, Savedi Ahemdnagar
Ahmednagar
Maharashtra
2. 2. Chairman, Sou Hema Suresh Supekar Shree Mahalaxmi Multistate Co-Operative Credit Society Ltd.
R/o Plot No 2, S. No. 24/1b, Swami Samarth Colony, Pipeline Road, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv. Kale, Advocate
For the Opp. Party:
Dated : 30 Nov 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरची तक्रार सामनेवाला पतसंस्‍थेतील मुदत ठेव खात्‍यातील रक्‍कमेची मागणी करुनही परत दिली नाही व सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये मंचात दाखल केली आहे. 

2.   तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी की ः-

     तक्रारदार यांनी सामनेवाले नंबर 1 व 2 महालक्ष्‍मी मल्‍टी स्‍टेट क्रेडीट को.ऑप.सोसायटी लि. या संस्‍थेचे अनुक्रमे व्‍यवस्‍थापक व चेअरमन आहेत. तक्रारदार यांना ठेवीवर जास्‍त दराने व्‍याज देणारी वरील संस्‍था असल्‍याबाबत सामनेवाले यांनी सांगितलेवरुन त्‍यावर विश्‍वास ठेवून तक्रारदार यांनी खालील प्रमाणे रकमा मुदत ठेवीमध्‍ये ठेवलेल्‍या आहेत. त्‍याचा तपशिल पुढील प्रमाणे.

पावती नंबर

ठेव ठेवल्‍याची तारीख    

ठेवीची रक्‍कम

व्‍याज दर %

ठेवीची मुदत संपण्‍याची तारीख    

मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम

  1.  
  1.  
  1.  
  1.  
  1.  
  1.  

52117

13.12.16

54,016/-

12   %

20.05.17

57,224/-

52118

20.11.16

23,249/-

12   %

20.05.17

25,377/-

52119

07.12.16

46,249/-

10.5 %

20.05.17

48,831/-

52120

13.12.16

4,000/-

10.5 %

20.05.17

4,182/-

     तक्रारदार यांनी वरील प्रमाणे सामनेवाले संस्‍थेमध्‍ये एकुण रक्‍कम रुपये 1,27,514/- ठेवलेले असून मुदतीनंतर तक्रारदार यांना सामनेवाले यांनी एकुण रक्‍कम रुपये 1,35,214/- देऊ केलेले होते. सामनेवाले संस्‍थेने तक्रारदार यांना सदर चारही मुदत ठेवींच्‍या मुळ पावत्‍या दिलेल्‍या आहेत.

3.   सदर तिनही मुदत ठेवींची मुदत संपण्‍यापुर्वी तक्रारदार यांना माहिती मिळाली की, सामनेवाले यांनी अनेक ठेवीदारांच्‍या मुदत ठेवी मुदत संपल्‍यानंतर देखील अडकवून ठेवलेल्‍या आहेत. त्‍यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे कार्यालयात चौकशी केली असता, सामनेवाले यांनी सध्‍या संस्‍थेमध्‍ये पैसे शिल्‍लक नाहीत, त्‍यामुळे पैसे उपलब्‍ध झाल्‍यावर तुमचे पैसे परत देऊ असे सांगितलेले होते. त्‍यामुळे तक्रारदार यांनी ता.06.11.2017 रोजी सामनेवाले यांना नोटीस देऊन सदर चारही मुदत ठेवींची होणारी व्‍याजासह रक्‍कम 8 दिवसात अदा करण्‍याचे कळविलेले होते. परंतू आज पावेतो सामनेवाले संस्‍थेने तक्रारदार यांना नोटीस प्रमाणे कोणतीही रक्‍कम अदा केलेली नाही.

4.   सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्‍यांची असलेली मुदत ठेवी मधील रक्‍कम मुदत संपल्‍यानंतरही न देऊन तक्रारदार यांना मानसिक त्रास दिलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍या कार्यालयांमध्‍ये असंख्‍य वेळा चकरा मारल्‍या असून त्‍यामध्‍ये वेळेचा व पैशांचा भरपुर अपव्‍यय झालेला आहे. तक्रारदार यांचे अपरिमित नुकसान झालेले आहे. सबब सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 50,000/- मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल करणे भाग पडत आहे.  सबब मुदत ठेवींची व्‍याजासह होणारी रक्‍कम मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केलेली आहे. त्‍याच प्रमाणे रक्‍कम मिळेपावेतो सदर संपुर्ण रकमेवर दिनांक 20.05.2017 पासून द.सा.द.शे.12 टक्‍के दराने व्‍याज मिळणेसाठी देखील तक्रारदाराने तक्रार आणलेली आहे.

5.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदाराची सामनेवालाकडे ठेवलेल्‍या तीन मुदत ठेवींची एकुण रक्‍कम रुपये 1,35,214/- देणेबाबत सामनेवाले यांचे विरुध्‍द आदेश व्‍हावा. तक्रारदारास दिनांक 20.05.2017 पासून वरील संपुर्ण रक्‍कम वसूल होई पावेतो द.सा.द.शे. 12 टक्‍के प्रमाणे व्‍याज देणेबाबत सामनेवाले विरुध्‍द आदेश व्‍हावा. तक्रारदारास सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 50,000/- देणेबाबत सामनेवाले विरुध्‍द आदेश व्‍हावा.

6.   तक्रारदाराने सदरचे तक्रारीसोबत निशाणी 2 ला प्रतिज्ञापत्र  तसेच सामनेवालेना दिलेल्‍या ठेव पावत्‍या क्र.52117, 52118, 52119, 52120 या ठेव पावत्‍यांची झेरॉक्‍स प्रती दाखल केल्‍या आहेत.

7.   सामनेवाला नं.1 व 2 यांना मंचातर्फे नोटीसा काढण्‍यात आल्‍या, परंतु त्‍या नोटीसा “ Unclaimed” म्‍हणून परत आल्‍या. त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 28 (4) प्रमाणे दिलेली नोटीस सामनेवालांना मिळाल्‍याचे गृहीत धरण्‍यात आल्‍या. ते मे.मंचात हजर झाले नाही. त्‍यांचे विरुध्‍द दिनांक 24.08.2018 रेाजी निशाणी 1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला.

8.   तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे पाहता, तक्रारदारतर्फे तोंडी युक्‍तीवाद लक्षात घेतला. त्‍यावरुन न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्‍थेचे “ग्राहक” आहेत काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय.?

 

... होय.

3.

तक्रारदार हे अनुतोष मिळण्‍यास पात्र आहेत काय.?

 

... होय.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

9.   मुद्दा क्र.1  – तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेमध्‍ये मुदत ठेवीमध्‍ये रक्‍कमा गुंतविल्‍या आहेत. याबाबत तक्रारदाराने मुदत ठेव पावत्‍यांचे झेरॉक्‍स प्रति दाखल केलेल्‍या आहेत. सदर रकमा सामनेवाला यांनी नाकारलेल्‍या नाहीत. मुदत ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार हे सामनेवालाचे “ग्राहक” आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

10.   मुद्दा क्र.2 – सदरचे प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारदाराचे अनुषंगाने दाखल केलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत मुदत ठेव स्‍वरुपात रकमा गुंतविल्‍या आहेत. सदरचे मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर देखील तक्रारदाराचे मुदत ठेव रकमा सामनेवालानी अडकवून ठेवलेल्‍या आहेत हे कागदपत्रावरुन सिध्‍द होते. सामनेवालांनी सदर रक्‍कम नाकारली नाही असे तक्रारदाराचे म्‍हणणे असून तक्रारदाराने वर नमुद रकमांची सामनेवालाकडे वारंवार मागणी केली. तसेच तक्रारदार यांना दिनांक 06.11.2017 रोजी सामनेवाला यांना नोटीस देऊनही चार मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह 8 दिवसात अदा करण्‍याचे कळविलेले होते. परंतू सामनेवाला पतसंस्‍था तक्रारदाराची मुदत ठेव पावती संपुर्ण रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करत आहेत. तक्रारदाराचे तक्रारीस सतत कारण घडत आहे. मुदत ठेव पावती संपुर्ण रक्‍कम ठरलेल्‍या व्‍याजासह तक्रारदारास परत देणे हे सामनेवाला पतसंस्‍थेचे कर्तव्‍य व जबाबदारी आहे. परंतु  सामनेवाला यांनी तक्रारदारास मुदत ठेव खात्‍यातील संपुर्ण रकमा ठरलेल्‍या व्‍याजासह अदा केले नाही असे दिसून येते. सामनेवाला यांनी मुदत ठेव पावत्‍याच्‍या रकमा परत न देऊन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेली आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

11.  मुद्दा क्र.3 – तक्रारदार यांनी मुदत ठेव पात्‍याच्‍या रकमा व्‍याजासह सामनेवाला यांचेकडून मिळाव्‍यात अशी विनंती या मंचास केली आहे. तक्रारदाराने वेळोवेळी रकमांची मागणी केली असता, सामनेवाला पतसंस्‍था यांनी गुंतविलेली रक्‍कम अदा केली नाही असे दिसून येते. तसेच सामनेवाला यांना सदर प्रकरणाबाबतचे म्‍हणणे मांडण्‍यास संधी मिळूनही सामनेवाला क्र.1 व 2 हे मंचात गैरहजर आहेत. त्‍यामुळे त्‍यांना तक्रारदाराचे तक्रारीतील कथन मान्‍य  आहे असे समजण्‍यात येते. तक्रारदाराची तक्रार व दाखल कागदपत्रे पाहता, सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास या न्‍याय निर्णयातील परीच्‍छेद क्र.2  मध्‍ये नमुद असलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यावरील संपुर्ण रक्‍कम द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याज दराने रक्‍कम अदा करावी. तसेच मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्‍कम रुपये 10,000/- व या तक्रारीचे खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत असे मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

12.  मुद्दा क्र.4 -मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैय‍क्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.52117 वरील रक्‍कम रु.54,016/- (रक्‍कम रु.चोपन हजार सोळा फक्‍त) नमुद व्‍याज दराने या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत संपुर्ण रक्‍कम अदा करावी.

3.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैय‍क्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.52118 वरील रक्‍कम रु.23,249/- (रक्‍कम रु.तेवीस हजार दोनशे एकोणपन्‍नास फक्‍त) नमुद व्‍याज दराने या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत संपुर्ण रक्‍कम अदा करावी.

4.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैय‍क्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.52119 वरील रक्‍कम रु.46,249/- (रक्‍कम रु.सेहचाळीस हजार दोनशे एकोणपन्‍नास फक्‍त) नमुद व्‍याज दराने या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत संपुर्ण रक्‍कम अदा करावी.

5.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैय‍क्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.52120 वरील रक्‍कम रु.4,000/- (रक्‍कम रु.चार हजार फक्‍त) नमुद व्‍याज दराने या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत संपुर्ण रक्‍कम अदा करावी.

6.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैय‍क्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च 2,000/- (रक्‍कम रु.दोन हजार फक्‍त ) द्यावे.

7.   वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

8.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

9.   तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.