Maharashtra

Ahmednagar

CC/17/339

Smt. Rekha Sureshrao Dikshit - Complainant(s)

Versus

1. Manager, Krantijyoti Savitribai Phule Nagari Sahkari Patsanstha Ltd. - Opp.Party(s)

Adv. Upasani

20 Sep 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/339
( Date of Filing : 08 Dec 2017 )
 
1. Smt. Rekha Sureshrao Dikshit
A/P Ganesh Nagar, near Dilip Pund, Sangamner, tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Manager, Krantijyoti Savitribai Phule Nagari Sahkari Patsanstha Ltd.
Maliwada, Sangamner, Tal. Sangmner
Ahmednagar
Maharashtra
2. 2. Chairman, Mangal Anil Unavane
A/P Saliwada, Chavhanpura, Behind School, Sangamner, Tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
3. 3. Vice. Chairman, Kanchan Dhore
A/P Behind Sanchayani Bhavan, Ganesh Nagar, Sangamner
Ahmednagar
Maharashtra
4. 4. Director, Aparna Rameshrao Deshmukh
A/P near Nehru Garden, Maliwada Sangamner, tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
5. 5. Director, Malati Dhananjay Dake
A/P near Kashiaai Temple, Malpani Health Club Road, Akole Road, sangamner, Tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
6. 6. Director, Ujwala Vishvajeet Deshmukh
A/P near Nehru Garden, Maliwada Sangamner, tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
7. 7. Director, Suvarna Rajendra Vede
A/P Maliwada, Sangamner, Tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
8. 8. Director, Sangeeta Gorakh Satpute
A/P Opp. Varpe Building, Nehru Chowk, Sangamner, tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
9. 9. Director, Jyoti Deepak Dhole
A/P opp. Mahatma Phule Complex, Maliwada, Sangamner, tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
10. 10. Director, Sushila Rajendra Aalkute
A/P near Dr. Kate, Maliwada Sangamner, tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
11. 11. Director, Jayashri Anil Shede
A/P near Dr. Kate, Maliwada Sangamner, tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
12. 12. Director, Parubai Baburao Suryavanshi
A/P Behind Bapte Kirana Store, Maliwada Sangamner, tal. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 20 Sep 2019
Final Order / Judgement

(द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.  तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हे संगमनेर जिल्‍हा  अहमदनगर येथील रहिवासी आहेत. सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ पतसंस्‍थेचे चेअरमन आहेत. सामनेवाले क्र.३ हे व्‍हाईस चेअरमन व उर्वरीत क्र.४ ते १२ हे पतसंस्‍थचे संचालक आहेत. सामनेवाले क्र.१ ही पतसंस्‍था महाराष्‍ट्र  सहकारी संस्‍था अधिनीय १९६० अन्‍वये स्‍थापन झालेली आहे व तीची नोंदणी केलेली आहे.  तक्रारदाराने सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये दिनांक ०५-०८-२०११ रोजी रूपये २,५०,०००/- च्‍या दोन मुदत ठेव पावत्‍या तसेच बचत खाते क्र.५७ मध्‍ये  १,००,१३८/- एवढी रक्‍कम ठेवलेली होती. त्‍याचा तपशील परिच्‍छेद क्र.२ मध्‍ये  तक्रारीत नमूद केलेला आहे. सदर मुदतठेव पावतींवर द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याज देण्‍याचे ठरविले होते. त्‍यामध्‍ये पतसंस्‍थेने दिनांक १९-१२-२०१३ पर्यंत व्‍याज दिले आहे. सदरच्‍या मुदत ठेव पावतीचा मुदतपुर्तीचा दिनांक १९-१२-२०१४ असा होता. त्‍यासाठी तक्रारदाराने समनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये सदरच्‍या रकमेची मागणी केली.  परंतु सामनेवाले यांनी आज देवू उद्या देवू असे म्‍हणून टाळाटाळ केली आहे. तक्रारदार यांनी रक्‍कम सामनेवाले देतील म्‍हणून वाट पाहिली. परंतु तक्रारदाराला रक्‍कम मिळाली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने दिनांक २०-०९-२०१६ रोजी मा.जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था संगमनेर यांच्‍याकडे तक्रार केली. त्‍याबाबत मा.जिल्‍हा  उपनिबंधक सहकारी संस्‍था संगमनेर यांनी दिनांक १३-१०-२०१६ रोजी उपनिबंधक, सहकारी संस्‍था, संगमनेर, अहमदनगर यांनी पतसंस्‍थेस         वि-४/क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले/ठेव परत/त.अर्ज/ सन २०१६ चे पत्रानुसार ठेवीची रक्‍कम देण्‍याबाबत दिरंगाई होऊ न देणेबाबत आदेश केलेले होते.  त्‍यानंतर दिनांक २७-१०-२०१६ रोजीसुध्‍दा रक्‍कम देण्‍याचे आदेश करण्‍यात आले. त्‍यानंतर सामनेवाले पतसंस्‍थेने मुदत ठेवीची रक्‍कम देण्‍याबाबत टाळाटाळ केलेली आहे. तसेच तक्रारदार हिने दि.०५-०५-२०१५ रोजी वकिलामार्फत  सामनेवाले यांना नोटीस पाठविली व सामनेवाले यांनी दिनांक १८-०५-२०१५ रोजी उत्‍तर दिलेले आहे व त्‍या नोटीसीच्‍या उत्‍तरामध्‍ये पतसंस्‍था रक्‍कम देण्‍यास तयार आहे, असे कथन केले. परंतु सामनेवाले यांनी रक्‍कम दिली नाही. त्‍यानंतर तक्रारदाराने पुन्‍हा वकिलामार्फत नोटीस पाठविली. या नोटीसीला उत्‍तर दिले मात्र ठेवीची रक्‍कम परत केली नाही. त्‍यानंतर दिनांक २२-०५-२०१७ रोजी पतसंस्‍थेच्‍या  संचालकांविरूध्‍द फिर्याद दाखल केली. मात्र सामनेवाले यांनी तक्रारदाराला रक्‍कम दिली नाही. म्‍हणून तक्रारदाराने परिच्‍छेद ९ प्रमाणे मागणी केली आहे.

२.    सामनेवाले क्र.१ ते ३, ५ ते ८ व १० ते १२ यांनी त्‍यांची लेखी कैफीयत नि.२२ वर दाखल केलेली आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये असे नमूद केले आहे की, सामनेवाले पतसंस्‍थेमध्‍ये तकारदाराने पावती क्र.९५ व ९७ मध्‍ये  प्रत्‍येकी रक्‍कम रूपये २,५०,०००/- ची मुदत ठेव म्‍हणून ठेवली होती. सदरच्‍या   रकमेचे होणारे व्‍याज सन २०१३ पर्यंत तक्रारदाराला दिलेले आहे. सन २०११ मध्‍ये अंजली मुळे या चेअरमन होत्‍या व त्‍यांनी मोठ्याप्रमाणात कर्ज वितरण केले व त्‍यानंतर त्‍यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे व त्‍यानंतर  सामनेवाले क्र.२ हे चेअरमन झाले आहे. तक्रारदाराने वकिलामार्फत रक्‍कम प्राप्‍त  व्‍हावी म्‍हणून सामनेवाले यांना नोटीस पाठवीली. सामनेवाले यांनी पुढे असे कथन केले की, सामनेवाले क्र.१ व सामनेवाले क्र.२ ते १२ हे नियमाप्रमाणे होणारी रक्‍कम देण्‍यास तयार आहे. परंतु पतसंस्‍था आर्थिक अडचणीत असून थकबाकीदारांकडून रक्‍कम वसूल झाल्‍याशिवाय तक्रारदाराला रक्‍कम देणे अवघड झाले व तक्रारदार ऐकण्‍याच्‍या मनस्थितीत नसुन विनाकारण तक्रार अर्ज दाखल केला आहे. सदरचा तक्रार अर्ज रद्द करण्‍यात यावा, अशी विनंती सामनेवाले क्र.१ ते ३, ५ ते ८ व १० ते १२ यांनी केली आहे.

३.   सामनेवाले क्र.४ व ९ यांना नोटीसीची बजावणी झाली मात्र ते प्रकरणात  हजर झाले नाही. म्‍हणून त्‍यांच्‍याविरूध्‍द सदरचा अर्ज एकतर्फा चालविण्‍याचा   आदेश पारीत करण्‍यात आला.

 

४.   तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्‍यांचे वकील के.सी. उपासनी यांनी केलेला युक्तिवाद, तसेच सामनेवाले क्र.१ ते ३, ५ ते ८ व १० ते १२ यांनी  दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाले यांचे वकील एन.पी. काळे यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

 

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हा सामनेवाले पतसंस्‍थेचा ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी  तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार हे नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र ठरतो काय ?

होय

(४)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

 

कारणमिमांसा

 

५.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार हीने सामनेवाला पतसंस्‍थेमध्‍ये दिनांक       ०५-०८-२०११ रोजी रूपये २,५०,०००/- पावती नं.९७ व पावती नं.९५ प्रमाणे मुदतठेव पावती केलेली होती. अशाप्रकारे एकूण रूपये ५,००,०००/- ही रक्‍कम  १३ महिन्‍यांच्‍या मुदतीकरीता ठेवलेली होती. सदरच्‍या मुदतठेव पावतींवर ११.५ टक्‍के प्रमाणे व्‍याज देण्‍याचे ठरले होते,  ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदाराने प्रकरणात मुदत ठेव पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत. यावरून तक्रारदार हि सामनेवाले पतसंस्‍थेची ग्राहक आहे, ही बाब स्‍पष्‍ट होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

६.  मुद्दा क्र. (२ व ३ ) :   तक्रारदार हिने सामनेवाले पतसंस्‍थेत रूपये २,५०,०००/- या रकमेच्‍या पावती क्र.९५ व ९७ अशी पावती मुदत ठेव सन २०११ मध्‍ये १३ महिन्‍याकरीता ठेवलेली होती. त्‍यावर व्‍याजाचा दर ११ टक्‍के ठरला आहे.  तक्रारदार हीने मुदत ठेव पावत्‍या दाखल केल्‍या आहेत. सदर पावतींचे अवलोकन केले असता त्‍यावर व्‍याजाचा दर व रक्‍कम परत करण्‍याची तारीख नमूद केली आहे. यावरून असे स्‍पष्‍ट होते की, सामनेवले यांनी मुदत ठेव पावती केली होती. यावरून सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये तक्रारदार यांनी मुदत ठेव पावती केली होती, ही बाब मान्‍य केली आहे. याविषयी कोणताही वाद नाही. मुदतपुर्तीनंतर तक्रारदार हिने सामनेवाले यांच्‍याकडे रकमेची मागणी केली. ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदार हिने सामनेवाले यांना दिलेले दि.१६-०४-२०१५ चे पत्र प्रकरणात दाखल केले आहे. सदरच्‍या पत्राला सामनेवाले यांनी दि.१८-०५-२०१५ रोजी उत्‍तर दिलेले आहे. यावरून ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार ‍हिने सामनेवाले यांच्‍याकडे रकमेची मागणी केली. तक्रारदाराने पुढे कथन केले की सामनेवाले यांच्‍याकडे रकमेची मागणी केली असता त्‍यांनी रक्‍कम दिली नाही. त्‍यामुळे त्‍यांनी उपनिबंधक सहकारी संस्‍था संगमनेर यांच्‍याकडे तक्रार केली व त्‍यानुसार सहकारी संस्‍था, संगमनेर यांनी सामनेवाले यांना दि. १३-१०-२०१६ रोजी पत्र दिलेल आहे. मात्र तक्रारदार यांना सामनेवाले  यांनी रक्‍कम दिली नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीमध्‍ये असे कथन केलेले आहे की त्‍यांचे बचत खाते क्र.५७ मधील रक्‍कम रूपये १,००,१३८/- जमा आहे व त्‍यावर ४ टक्‍के व्‍याज ठरले होते. सदरची रक्‍कमसुध्‍दा सामनेवाले यांनी तक्रारदार हिला दिली नाही.  अशाप्रकारे मुदत ठेवीची रक्‍क्‍म रूपये २,५०,०००/- या रकमेच्‍या दोन पावत्‍या व बचत खाते क्र.५७ मध्‍ये शिल्‍लक असलेली रक्‍कम तक्रारदार हिला सामनेवाले यांनी दिलेली नाही. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयतीमध्‍ये असा बचाव घेतला की, पतसंस्‍थेचे चेअरमन अंजली मुळे यांनी सन २०११ मध्‍ये बरेच कर्ज वाटप केले व त्‍यानंतर राजीनामा दिला. त्‍यांनी राजीनामा दिल्‍यानंतर सामनेवाले क्र.२ हे पतसंस्‍थेचा कार्यभार पाहत होते. त्‍यांनी कर्जदारांविरूध्‍द नोटीस पाठवून थकबाकीच्‍या रकमेची मागणी केली व तक्रारदाराची रक्‍कम ही पतसंस्‍थेत रक्‍कम जमा झाल्‍यानंतर देण्‍यात येईल, असे लेखी कैफीयतीमध्‍ये कथन केले. परंतु तक्रारदाराला तिची रक्‍कम प्राप्‍त झाली नाही.  म्‍हणून मंचात तक्रार दाखल केली. तक्रारदार हिने मुदतपुर्ती नंतर जमा असलेल्‍या रकमेची मागणी अनेकदा करूनही त्‍यांनी दिली नाही, ही बाब दाखल कागदपत्रांवरून स्‍पष्‍ट होते. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार  हिला सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे. तसेच तक्रारदार हिची रक्‍कम ही सन २०११ पासून सामनेवाले यांच्‍या पतसंस्‍थेमध्‍ये जमा आहे व त्‍यावर जमा होणारे व्‍याज तक्रारदार हिला सन २०१३ पर्यंत प्राप्‍त झालेले आहे, असे तक्रारीत कथन आहे व ही बाब सामनेवाले यांनी मान्‍य केली आहे. परंतु वरील रक्‍कम ही तक्रारदार हिला प्राप्‍त झाली नाही. तक्रारीतील दाखल कागदपत्र व सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफीयीमध्‍ये रक्‍कम देण्‍याचे मान्‍य केले आहे. यावरून तक्रारदाराला मुदत ठेवीची रक्‍कम व बचत खातेमधील रक्‍कम रूपये १,००,१३८/-  प्राप्‍त झाली नाही याबाबत बचत खात्‍याचे व दाखल दस्‍ताचे अवलोकन केले असता रक्‍कम रूपये १,००,१३८/- ही रककम शिल्‍लक असल्‍याचे निदर्शनास येते. यावरूनही ही बाब स्‍पष्‍ट होते की, समनेवालेंकडे तक्रादार हिची रक्‍कम जमा आहे. सदरची रक्‍कम देण्‍यास सामनेवाले हे जबाबदार आहे. ही रक्‍कम तक्रारदार हि‍ला मुदतपुर्तीनंतरही दिली नाही. सदरची रक्‍कम तक्रारदार हिला देणे सामनेवालेवर बंधनकारक आहे. ती रक्‍कम न देऊन सामनेवाले यांनी निश्‍चीतच सेवा देण्‍यात कसूर केला आहे. तक्रारदार ही तिची जमा असेलेली रक्‍कम मिळण्‍यास  पात्र ठरते या निष्‍कर्षापर्यंत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

          तक्रारदार हिला सदरची रक्‍कम मिळाली नाही. त्‍यासाठी तिने सामनेवाले यांच्‍याशी पत्रव्‍यवहार केला व मागणी केली. परंतु त्‍यांनी टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदार हिला निश्‍चीतच मानसीक व शारीरिक त्रास तसेच आर्थिक त्रास सहन करवा लागला.  त्‍यामुळे सदरच्‍या नुकसानीपोटी काही रक्‍कम देणे न्‍यायोचीत ठरेल, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

७. मुद्दा क्र. (४) :  मुद्दा क्र.१,२ व ३ यांच्‍या विवेचनावरून आम्‍ही    खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.   

 

आदेश

 

१.  तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२.  सामनेवाले क्र.१ व १२ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्र.९७ मधील रक्‍कम रूपये २,५०,०००/- (अक्षरी रूपये दोन लाख पन्‍नास हजार मात्र)  दिनांक ०६-०९-२०१२ पासून द.सा.द.शे. ११.५ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

३.  सामनेवाले क्र.१ व १२ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्र.९५ मधील रक्‍कम रूपये २,५०,०००/- (अक्षरी रूपये दोन लाख पन्‍नास हजार मात्र)  दिनांक ०६-०९-२०१२ पासून द.सा.द.शे. ११.५ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

४.  सामनेवाले क्र.१ व १२ यांनी तक्रारदाराला बचत खाते क्र.५७ मधील रक्‍कम रूपये १,००,१३८/- (अक्षरी रूपये एक लाख एकशे अडोतीस मात्र)  दिनांक २९-०१-२०१४ पासून द.सा.द.शे. ४ % व्‍याजासह रक्‍कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी.  

 

५.  सामनेवाले यांनी तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार), व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ४,०००/- (अक्षरी चार हजार) द्यावा.

 

६.  वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत  मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

७.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

८. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.