जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 200/2010. तक्रार दाखल दिनांक : 22/04/2010. तक्रार आदेश दिनांक : 20/01/2011. श्री. गणेश कल्याण पवार, वय 32 वर्षे, रा. मु.पो. वडशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. श्री. अविनाश राजेंद्र पवार, चेअरमन, श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर. 2. श्री. दशरथ वसंत मगर, मॅनेजर, श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर. 3. श्री. हनुमंत लहू पवार, सचिव, श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर. 4. श्री. मारुती शंभू कदम. 5. श्री. गजानन ज्योतिराम घाडगे. 6. श्री. आजिनाथ शंकर मस्तूद. 7. श्री. बालाजी दौलत डिकुळे. 8. श्री. शाहुराव नारायण साबळे. 9. श्री. सोमनाथ धोंडिबा बोराडे. 10. श्री. महादेव शिवदास फरतडे. 11. श्री. लहू भगवान आवटे. 12. सौ. अनिता हनुमंत पवार. 13. सौ. अंजली विष्णू लेंडे. क्र.4 ते 13 सर्व संचालक मंडळ, श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एम.ए. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र. 13 यांचेतर्फे अभियोक्ता : एस.व्ही. न्हावकर विरुध्द पक्ष क्र. 4, 6 व 10 यांचेतर्फे अभियोक्ता : सी.आर. पाटील विरुध्द पक्ष क्र. 7 यांचेतर्फे अभियोक्ता : डी.पी. बागल आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर या पतसंस्थेमध्ये दि.15/5/2008 रोजी रु.1,00,000/- तेरा महिने मुदतीकरिता द.सा.द.शे. 13 टक्के व्याज दराने गुंतवणूक केले आहेत. तसेच दि.18/6/2008 रोजी रु.20,000/- तेरा महिने मुदतीकरिता द.सा.द.शे. 13 टक्के व्याज दराने गुंतवणूक केले आहेत. दोन्ही ठेवीची मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांना रकमेची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात आलेली आहे. त्यांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था, करमाळा यांच्याकडे अर्ज देऊनही कार्यवाही झाली नाही. तक्रारदार यांना आईच्या वैद्यकीय उपचाराकरिता ठेव रकमेची नितांत आवश्यकता आहे. विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम न दिल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन ठेव रक्कम व्याजासह परत मिळावी, अशी त्यांनी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.4, 6 व 10 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर या पतसंस्थेच्या स्थापनेविषयी त्यांना काहीही माहिती नाही आणि ते सदर पतसंस्थेचे सभासद किंवा संचालक नाहीत. तक्रारदार यांनी संचालक मंडळाची नांवे असल्याची दाखल केलेली कागदपत्रे बनावट आहेत आणि पतसंस्थेच्या व्यवहारास ते जबाबदार नाहीत. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केलेली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.13 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या पतसंस्थेच्या संचालक नव्हत्या व नाहीत. त्या पतसंस्थेमध्ये कॅशिअर पदावर कार्यरत होत्या आणि त्यांच्या दि.1/6/2008 ते 31/12/2008 कार्य कालावधीतील त्यांना वेतन मिळालेले नाही. त्यांना विनाकारण पक्षकार करण्यात आलेले आहे. तक्रारदार व त्यांच्यामध्ये 'ग्राहक व सेवा पुरवठा करणारे' असे नाते संबंध नाहीत. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे. 4. उर्वरीत विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्यात आले. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर या पतसंस्थेमध्ये मुदत ठेव पावती क्र.89 व 95 अन्वये अनुक्रमे रु.1,00,000/- व रु.20,000/- रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते. तसेच ठेवीकरिता द.सा.द.शे. 13 टक्के व्याज दर असून ठेव पावतची मुदत पूर्ण झालेली आहे. तक्रारदार यांनी मुदतीनंतर ठेवीची मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी त्यांची प्रमुख तक्रार आहे. 7. विरुध्द पक्ष क्र.4, 6, 10 व 13 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन ते श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर या पतसंस्थेचे संचालक नसल्याचे नमूद केलेले आहे. सहायक निबंधक, सहकारी संस्था, करमाळा यांनी श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर या पतसंस्थेची नोंदणीवेळी प्रवर्तक/संचालकांची नांवे असलेली यादी रेकॉर्डवर दाखल आहे. त्यामध्ये विरुध्द पक्ष क्र.4, 6, 10 व 13 यांची नांवे समाविष्ठ आहेत. त्यामुळे ते पतसंस्थेचे संचालक नव्हते, हे त्यांचे म्हणणे ग्राह्य धरता येणार नाही. 8. तक्रारदार यांनी श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर या पतसंस्थेमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम परत करण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. 9. वरील सर्व विवेचनावरुन विरुध्द पक्ष श्री. गणराज ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., केम, ता. करमाळा, जि. सोलापूर व त्यांच्या संचालक मंडळाने तक्रारदार यांची ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार ठेव रक्कम व्याजासह मिळविण्यास पात्र आहेत, या मतास आम्ही आलो आहोत. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. ठेवीचा तपशील | पावती क्रमांक | ठेव रक्कम (रुपयामध्ये) | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | मुदत ठेव पावती | 89 | 1,00,000 | 15/5/2008 | 13 टक्के | मुदत ठेव पावती | 95 | 20,000 | 18/6/2008 | 13 टक्के |
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. वरील आदेशाची पूर्तता विरुध्द पक्ष क्र.1 ते 13 यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/20111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |