Maharashtra

Solapur

CC/11/12

1.Sunil Dagadu zunajakar 2. savita sunil zunajakar 3. urmiloa rajendra savane 4. shradha sunil zunjakar - Complainant(s)

Versus

1. Yashvant kisan shinde chairman 2. vyankatesh shivaji patil3. popat dabaru gunjal 4. dinkar krusha - Opp.Party(s)

P.P.kulkarni

10 May 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/11/12
1. 1.Sunil Dagadu zunajakar 2. savita sunil zunajakar 3. urmiloa rajendra savane 4. shradha sunil zunjakarDevicha mal Karamala Tal.karamalaSolapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. 1. Yashvant kisan shinde chairman 2. vyankatesh shivaji patil3. popat dabaru gunjal 4. dinkar krushana more 5. babasaheb soudagar avatade 6. babu bhavanji gunjal 6. shirang sanbhu more7 and S.M.Shankarrao mohite patil nagari shakari patsanstha barloni Tal. MadhaSolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :P.P.kulkarni, Advocate for Complainant

Dated : 10 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

                                                                 तक्रार दाखल दिनांक :  24/01/2011.  

                                                                तक्रार आदेश दिनांक : 10/05/2011.   

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 12/2011.

 

1. श्री. सुनिल दगडू झुंजकर, वय 43 वर्षे, व्‍यवसाय : नोकरी.

2. सौ. सविता सुनिल झुंजकर, वय सज्ञान, व्‍यवसाय : घरकाम.

3. श्रीमती उर्मिला राजेंद्र सवणे, वय सज्ञान, व्‍यवसाय : घरकाम.

4. कु. श्रध्‍दा सुनिल झुंजकर, वय सज्ञान, व्‍यवसाय : घरकाम,

   सर्व रा. म.रा.वि. मंडळ वसाहत, देवीचा माळ,

   करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.                          तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 13/2011.

 

श्री. सुधीर नारायण हांडे, वय 37 वर्षे, व्‍यवसाय : नोकरी,

रा. मु.पो. वरकुटे, ता. करमाळा, जि. सोलापूर.                      तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 14/2011.

 

1. सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई, वय 73 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम.

2. श्री. गजानन शंकर प्रभुदेसाई, वय 77 वर्षे,

   व्‍यवसाय : सेवानिवृत्‍त, दोघे रा. सुगम, महेंद्र नगर, करमाळा,

   ता. करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.                       तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 15/2011.

 

1. श्रीमती पार्वती नारायण शिंदे, वय 60 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम.

2. श्री. हेमंत नारायण शिंदे, वय 40 वर्षे, व्‍यवसाय : नोकरी.

3. सौ. ललिता हेमंत शिंदे, वय 35 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम.

4. सौ. सिमा भारत रासकर, वय 30 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम.

5. सौ. जयश्री सुरेश बनकर, वय 32 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम.

6. सौ. मनिषा सुनिल बनकर, वय 34 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम,

   सर्व रा. महेंद्र नगर, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.         तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था

   मर्या., बारलोणी, (शाखा : करमाळा), ता. माढा, जि. सोलापूर.       विरुध्‍द पक्ष

 

2. यशवंत किसन शिंदे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. (चेअरमन,

   स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी.)

3. व्‍यंकटेश (नाना) शिवाजी पाटील, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : व्‍यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

4. पोपट डबरु गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍हाईस चेअरमन,

   (स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्‍था मर्यादीत,

   बारलोणी.) रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

5. श्री. दिनकर कृष्‍णा मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

6. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे,  वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                         

7. श्री. बाबू भवानजी गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

8. श्री. श्रीरंग संभू मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

9. श्री. सौदागर श्रीपती चव्‍हाण, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

10. श्री. रामलिंग बाबू ठोबरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.   

11. सौ. अहिल्‍यादेवी सदाशिव हनवते, वय सज्ञान, व्‍यवसाय : घरकाम,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

12. मॅनेजर, स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्‍था मर्यादीत,

    बारलोणी, शाखा : करमाळा, बार्शी, ता. करमाळा, जि. सोलापूर.

13. प्रशासक मंडळ, स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्‍था

   मर्यादीत, बारलोणी, शाखा : करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.      विरुध्‍द पक्ष

 

       गणपुर्ती  :-   सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                  सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

          तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  पी.पी. कुलकर्णी

          विरुध्‍द पक्ष गैरहजर / एकतर्फा

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     प्रस्‍तुत चारही तक्रारीमध्‍ये उपस्थित विवादाचे स्‍वरुप, उदभवलेले प्रश्‍न, विरुध्‍द पक्ष इ. मध्‍ये एकसाम्‍य असल्‍यामुळे त्‍यांचा एकत्रित निर्णय देण्‍यात येत आहे.

2.    प्रस्‍तुत तक्रारींमध्‍ये उपस्थित ग्राहक विवाद थोडक्‍यात असा आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केली असून त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

ग्राहक तक्रार क्र. 12/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदार / तक्रारदारांचे नांव

ठेव रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

सुनिल दगडू झुंजकर

20,000

0023452

19/7/08

19/8/2009

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

2,10,000

008651

21/8/08

21/9/2009

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

20,000

0002785

7/4/04

8/10/2009

दामदुप्‍पट

सविता सुनिल झुंजकर

20,000

0002786

7/4/04

8/10/2009

दामदुप्‍पट

सुनिल दगडू झुंजकर

60,000

008667

27/10/08

13 महिने कालावधी

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

1,20,000

008672

4/11/08

4/12/2009

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

80,000

008673

4/11/08

4/12/2009

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

20,000

010192

17/1/06

17/1/2012

दामदुप्‍पट

सुनिल दगडू झुंजकर

18,000

000417

12/8/03

12/8/2013

16.5 टक्‍के

श्रध्‍दा सुनिल झुंजकर

10,000

000357

30/8/03

30/8/2018

16.5 टक्‍के

उर्मिला राजेंद्र सवणे

30,000

004530

14/6/04

15/12/2009

दामदुप्‍पट

उर्मिला राजेंद्र सवणे

20,000

004531

14/6/04

15/12/2009

दामदुप्‍पट

उर्मिला राजेंद्र सवणे

30,000

010628

14/10/06

14/10/2012

दामदुप्‍पट

उर्मिला राजेंद्र सवणे

30,000

010629

14/10/06

14/10/2012

दामदुप्‍पट

सुनिल दगडू झुंजकर

23,092

बचत खाते नं.8

--

2/5/2009

--

 

ग्राहक तक्रार क्र. 13/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदार / तक्रारदारांचे नांव

ठेव रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

सुधीर नारायण हांडे

26,277

0026174

25/11/08

25/12/2009

14 टक्‍के

सुधीर नारायण हांडे

15,000

004958

13/11/04

14/5/2010

दामदुप्‍पट

 

ग्राहक तक्रार क्र. 14/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदार / तक्रारदारांचे नांव

ठेव रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई

56,500

027772

15/3/08

23/4/2009

14 टक्‍के

सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई

50,000

0026133

13/10/08

13/11/2009

14 टक्‍के

सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई

50,000

0026134

13/10/08

13/11/2009

14 टक्‍के

सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई

55,060

बचत खाते

--

19/3/2010

--

 

ग्राहक तक्रार क्र. 15/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदार / तक्रारदारांचे नांव

ठेव रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

सौ. जयश्री सुरेश बनकर

10,000

0002412

13/12/03

14/6/2009

दामदुप्‍पट

मनिषा सुनिल बनकर

29,900

007667

29/12/06

29/12/2012

दामदुप्‍पट

सौ. जयश्री सुरेश बनकर

5,000

0004995

27/12/04

28/6/2010

दामदुप्‍पट

सौ. जयश्री सुरेश बनकर

16,800

0007664

15/12/06

15/12/2012

दामदुप्‍पट

हेमंत नारायण शिंदे

20,000

0002408

13/12/03

14/6/2009

दामदुप्‍पट

मनिषा सुनिल बनकर

21,250

004964

20/11/04

21/5/2010

दामदुप्‍पट

सौ. सीमा भारत रासकर

10,000

0002415

13/12/03

14/6/2009

दामदुप्‍पट

सौ. ललिता हेमंत शिंदे

20,000

0002409

13/12/03

14/6/2009

दामदुप्‍पट

सौ. पार्वतीबाई नारायण शिंदे

18,000

बचत खाते नं.667

--

9/10/2009

--

 

3.    तक्रारदार यांनी मुदत ठेव, मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव, दामपुप्‍पट ठेव व बचत खात्‍याद्वारे वरीलप्रमाणे नमूद रक्‍कम पतसंस्‍थेमध्‍ये गुंतवणूक केलेली आहे. तकारदार यांना कौटुंबिक कारणास्‍तव, वैद्यकीय औषधोपचारासाठी व इतर कारणास्‍तव ठेव रकमेची आवश्‍यकता होती. त्‍यांनी ठेव रकमेची मागणी केली असता, ठेव रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज देण्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी टाळाटाळ केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी अनुक्रमे प्रत्‍येकी रु.10,000/- व रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 13 यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

5.    तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

            मुद्दे                              उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                             होय.

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?           होय.

3. काय आदेश ?                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष सहकार महर्षी शकंरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये मुदत ठेव, मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव, दामपुप्‍पट ठेव व बचत खात्‍याद्वारे रक्‍कम गुंतविल्‍याचे रेकॉर्डवर दाखल पावत्‍यांवरुन निदर्शनास येते. ठेवीच्‍या मुदतपुर्तीनंतर व मुदतपूर्व तक्रारदार यांनी व्‍याजासह ठेव रकमेची मागणी केली असता, विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत असल्‍याची त्‍यांची प्रमुख तक्रार आहे.

 

7.    तक्रारदार यांनी पतसंस्‍थेच्‍या संचालकांची यादी रेकॉर्डवर दाखल केली असून त्‍याप्रमाणे त्‍यांना तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष सहकार महर्षी शकंरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये मुदत ठेव, मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव, दामपुप्‍पट ठेव व बचत खात्‍याद्वारे रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीच्‍या मुदतपुर्तीनंतर व मुदतपूर्व वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍यात आलेली नाही. ठेवीदारांच्‍या मागणीनुसार ठेवीची रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल न केल्‍यामुळे त्‍यांना तक्रारदार यांची तक्रार मान्‍य आहे, या अनुमानास आम्‍ही येत आहोत. तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे ठेव पावतीची रक्‍कम व्‍याजासह मिळविण्‍यास तक्रारदार हक्‍कदार ठरतात. बचत खाते, लखपती ठेव व दामदुप्‍पट ठेव मुदतपूर्व व मुदत पूर्ण झाल्‍यानंतर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज देणे उचित ठरते.

 

 

 

8.    विरुध्‍द पक्ष क्र.12 हे पतसंस्‍थेचे मॅनेजर आहेत. ठेव रक्‍कम परत करण्‍याची त्‍यांची वैयक्तिक जबाबदारी सिध्‍द झाल्‍याशिवाय त्‍यांना तक्रारदार यांची ठेव रक्‍कम परत करण्‍याविषयी जबाबदार धरता येणार नाही.

 

9.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 व 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

ग्राहक तक्रार क्र. 12/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदार/

तक्रारदारांचे नांव

पावती क्रमांक

देय ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

सुनिल दगडू झुंजकर

0023452

20,000

19/7/08

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

008651

2,10,000

21/8/08

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

0002785

40,000

8/10/09

12 टक्‍के

सविता सुनिल झुंजकर

0002786

40,000

8/10/09

12 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

008667

60,000

27/10/08

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

008672

1,20,000

4/11/08

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

008673

80,000

4/11/08

15 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

010192

20,000

17/1/06

12 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

000417

18,000

12/8/03

12 टक्‍के

श्रध्‍दा सुनिल झुंजकर

000357

10,000

30/8/03

12 टक्‍के

उर्मिला राजेंद्र सवणे

004530

60,000

15/12/09

12 टक्‍के

उर्मिला राजेंद्र सवणे

004531

40,000

15/12/09

12 टक्‍के

उर्मिला राजेंद्र सवणे

010628

30,000

14/10/06

12 टक्‍के

उर्मिला राजेंद्र सवणे

010629

30,000

14/10/06

12 टक्‍के

सुनिल दगडू झुंजकर

बचत खाते नं.8

23,092

2/5/2009

12 टक्‍के

 

ग्राहक तक्रार क्र. 13/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदार/

तक्रारदारांचे नांव

पावती क्रमांक

देय ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

सुधीर नारायण हांडे

0026174

26,277

25/11/08

14 टक्‍के

सुधीर नारायण हांडे

004958

30,000

14/5/2010

12 टक्‍के

 

ग्राहक तक्रार क्र. 14/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदार/

तक्रारदारांचे नांव

पावती क्रमांक

देय ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई

027772

56,500

15/3/08

14 टक्‍के

सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई

0026133

50,000

13/10/08

14 टक्‍के

सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई

0026134

50,000

13/10/08

14 टक्‍के

सौ. मधुमती गजानन प्रभुदेसाई

बचत खाते

55,060

19/3/2010

12 टक्‍के

 

ग्राहक तक्रार क्र. 15/2011 मध्‍ये :-

 

ठेवीदार/

तक्रारदारांचे नांव

पावती क्रमांक

देय ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

सौ. जयश्री सुरेश बनकर

0002412

20,000

14/6/2009

12 टक्‍के

मनिषा सुनिल बनकर

007667

29,900

29/12/06

12 टक्‍के

सौ. जयश्री सुरेश बनकर

0004995

10,000

28/6/2010

12 टक्‍के

सौ. जयश्री सुरेश बनकर

0007664

16,800

15/12/06

12 टक्‍के

हेमंत नारायण शिंदे

0002408

40,000

14/6/2009

12 टक्‍के

मनिषा सुनिल बनकर

004964

42,500

21/5/2010

12 टक्‍के

सौ. सीमा भारत रासकर

0002415

20,000

14/6/2009

12 टक्‍के

सौ. ललिता हेमंत शिंदे

0002409

40,000

14/6/2009

12 टक्‍के

सौ. पार्वतीबाई नारायण शिंदे

बचत खाते नं.667

18,000

9/10/2009

12 टक्‍के

 

2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 व 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार  यांना तक्रार खर्चापोटी प्रत्‍येकी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

 

(सौ. संजीवनी एस. शहा)                                (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                          ----00----

 (संविक/स्‍व/9511)

 

 

 

 

 

 

 

 

 


[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT