Maharashtra

Ahmednagar

CC/18/18

Alka Suresh Tanpure - Complainant(s)

Versus

1. Shrinath Multi-state Urban Co-Op, Credit Soc. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Khakal

16 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/18/17
( Date of Filing : 19 Jan 2018 )
 
1. Bansi Vithoba Vandekar
At Salevadgoan, Post. Ambhora, Tal. Ashti
Beed
Maharashtra
2. 2. Subhardrabai Bansi Vandhekar
At Salewadgoan, Post Ambhora, Tal. Ashti
Beed
Maharashtra
3. 3. Ushabai Popat Vandhekar
At Salewadgoan, Post Ambhora, Tal. Ashti
Beed
Maharashtra
4. 4. Mandabai Babasaheb Vandhekar
At Salewadgoan, Post Ambhora, Tal. Ashti
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Shrinath Multi-state Urban Co-Op, Credit Soc. Ltd.
Head office -Shrinath Complex, Phase 1, Pipeline road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. 2. Popatrao Eknath Shevale
A/P Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
3. 3. Dilip Bhalchandra Madgulkar
Pipeline Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
4. 4. Gajanan Nivrutti Dongre
at Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
5. 5. Shankarrao Rambhau Dhumal
R/o Dhumalmatha Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
6. 6. Babasaheb Eknath Ambedkar
at Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
7. 7. Ramdas Ranba Gite
Gite Mangal karyalay, Dangat mala, Navnagapur, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
8. 8. Dattatray Manohar Gite
A/P Ughadmala, Gite Vasti Wadgoangupta, Tal. Nagar
Ahmednagar
Maharashtra
9. 9. Nanda Baban Dongare
A/P Malwadi Wadgoangupta, Tal. Nagar
Ahmednagar
Maharashtra
10. 10. Chandrabhan Bhagwat Kale
A/p Dehere, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
11. 11. Babasaheb Ramchandra Karande
A/p Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
12. 12. Namdev Vitthal Kale
A/p Dehere, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
13. 13. Gopal Krushnaji Kalamkar
A/P Bolhegoan, Tal Nagar
Ahmednagar
Maharashtra
14. 14. Rajendra Madanlal Daga
A/P Pathardi, Tal. Pathardi
Ahmednagar
Maharashtra
15. 15. Ashok kanoji Meghdamber
A/p ,Opp. Kedgoan Church, Kedgoan Tal. Nagar
Ahmednagar
Maharashtra
16. 16. Dattatray Rambhau Waghmare
R/O Babhulgoan, Tal. Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/18/18
( Date of Filing : 24 Jan 2018 )
 
1. Alka Suresh Tanpure
R/at Tanpure Niwas, Maliwada, Chinchodi, Pa. Tal. Nagar
Beed
Maharashtra
2. .
.
3. .
.
4. .
.
...........Complainant(s)
Versus
1. 1. Shrinath Multi-state Urban Co-Op, Credit Soc. Ltd.
Head office -Shrinath Complex, Phase 1, Pipeline road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. 2. Popatrao Eknath Shevale
A/P Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
3. 3. Dilip Bhalchandra Madgulkar
Pipeline Road, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
4. 4. Gajanan Nivrutti Dongre
at Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
5. 5. Shankarrao Rambhau Dhumal
R/o Dhumalmatha Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
6. 6. Babasaheb Eknath Ambedkar
at Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
7. 7. Ramdas Ranba Gite
Gite Mangal karyalay, Dangat mala, Navnagapur, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
8. 8. Dattatray Manohar Gite
A/P Ughadmala, Gite Vasti Wadgoangupta, Tal. Nagar
Ahmednagar
Maharashtra
9. 9. Nanda Baban Dongare
A/P Malwadi Wadgoangupta, Tal. Nagar
Ahmednagar
Maharashtra
10. 10. Chandrabhan Bhagwat Kale
A/p Dehere, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
11. 11. Babasaheb Ramchandra Karande
A/p Wadgoangupta, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
12. 12. Namdev Vitthal Kale
A/p Dehere, Tal. nagar
Ahmednagar
Maharashtra
13. 13. Gopal Krushnaji Kalamkar
A/P Bolhegoan, Tal Nagar
Ahmednagar
Maharashtra
14. 14. Rajendra Madanlal Daga
A/P Pathardi, Tal. Pathardi
Ahmednagar
Maharashtra
15. 15. Ashok kanoji Meghdamber
A/p ,Opp. Kedgoan Church, Kedgoan Tal. Nagar
Ahmednagar
Maharashtra
16. 16. Dattatray Rambhau Waghmare
R/O Babhulgoan, Tal. Rahuri,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Padir & Khakal, Advocate
For the Opp. Party: Bhavar & Gund Patil, Advocate
Dated : 16 Feb 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.    तक्रारदार क्र.1 ते 4  यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांचे विरुध्‍द दाखल केली आहे.

2.    तक्रारदार क्र.1 ते 4 यांची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, तक्रारदार क्र.1 ते 4 हे वरील नमुद ठिकाणचे कायमचे रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे एकत्र कुटूंब असून तक्रारदार नं.1 व 2 हे पती पत्‍नी असून तक्रारदार नंबर 3 व 4 हे तक्रारदार क्र.1 व 2 यांच्‍या सुना आहेत. तक्रारदार यांचे कुटुंबाचा शेती हा मुख्‍य व्‍यवसाय असून त्‍यावर ते कुटूंबाचा उदर निर्वाह करीत आहेत. सामनेवाला नं.1 ही मल्‍टी स्‍टेट को ऑप.सोसायटीचा कायदा 2002 अन्‍वये स्‍थापन झालेली क्रेडीट सोसायटी असून तिचा कारभार मल्‍टी स्‍टेट को.ऑप सोसायटीचा कायदा 2002 व नियम तसेच संस्‍थेचे स्‍वतःचे पोट नियमानुसार चालतो. सामनेवाला नं.1 हिचा मुख्‍य व्‍यवसाय हा सभासदाकडून ठेवी स्विकारणे व सभासंदाना कर्ज पुरवठा करणे असा आहे. सामनेवाले नं.1 यांचे मुख्‍य कार्यालय वर नमूद पत्‍त्‍यावर आहे. व यापुर्वी पाईपलाईन रोड अहमदनगर येथे त्‍यांची शाखा होती व आहे. सामनेवाले नं.2 ते 16 हे संस्‍थेचे संचालक व पदाधिकारी आहेत.

3.  सामनेवाला यांनी वेगवेगळया जाहिराती, पॉंम्‍प्‍लेट वगैरेव्‍दारे आकर्षक जाहिराती करुन सामनेवाले यांच्‍या सोसायटीमध्‍ये नागरीकांनी संस्‍थेच्‍या मुदत ठेव स्‍वरुपात तसेच सेव्‍हींग्‍ज खात्‍यात रक्‍कम ठेवल्‍यास सदर रकमेवर आकर्षक व्‍याज देण्‍याचे, ठेवी सुरक्षीत राहातील असे आमिष दाखविले होते, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेवर विश्‍वास ठेवून तक्रारदार यांची कौटुंबिक गरज भागविण्‍यासाठी व भविष्‍यातील तरतुद, उदरनिर्वाह व उपजिविकेसाठी आर्थिक बचत करुन ती रक्‍कम संस्‍थेत तक्रारदारांच्‍या नांवे खालील प्रमाणे ठेवली आहे.

अ.क्र.   

नांव 

खाते नंबर/मुदत ठेव पावती क्र.  

ठेव रक्‍कम    

ठेव ठेवलेची तारीख

रक्‍कम परत देणेची तारीख

1.

बन्‍सी विठोबा वांढेकर

534/13835

1,00,000/-

29.11.13

29.5.14

2.

बन्‍सी विठोबा वांढेकर

916/20814

1,00,000/-

10.7.14

6.1.15

3.

बन्‍सी विठोबा वांढेकर

915/20813

1,00,000/-

10.7.14

6.1.15

4.

बन्‍सी विठोबा वांढेकर

139/1396340

1,13,116/-

20.5.13

20.5.14

5.

सुभद्राबाई बन्‍सी वांढेकर

455/11756

1,00,000/-

28.10.13

28.10.14

6.

उषाबाई पोपट वांढेकर

3178/48634

50,000/-

17.2.17

17.2.18

7.

मंडाबाई बाबासाहेब वांढेकर

656/14657

50,000/-

24.1.14

24.1.15

     अशा प्रकारे तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी वर नमुद केलेल्‍या ठेव पावतीव्‍दारे सामनेवाला नं.1 संस्‍थेकडे मुदत ठेवीने सदरील रकमेची 11 व 12 टक्‍के व्‍याज दराने गुंतवणुक केलेली आहे. सामनेवाला यांनी मुदत पुर्तीनंतर मुदत ठेवीची रक्‍कम व त्‍यावर नियमाप्रमाणे होणारे व्‍याज तक्रारदारांना परत करण्‍याचे सामनेवाले यांचेवर कायदेशीर व नैतिक बंधन होते व आहे. तक्रारदार क्र.1 ते 4 यांना पैशाची अत्‍यंत आवश्‍यकता असल्‍याने त्‍यांनी सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्‍कम न देता उडवा-उडवीची उत्‍तरे दिली तक्रारदारांनी वेळोवेळी सामनेवाला यांना कार्यालयात भेटून रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही. व रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. म्‍हणून तक्रारदारांनी वरील नमुद मुदत ठेवीमध्‍ये गुंतविलेल्‍या रकमा व्‍याजासह मिळणेसाठी सदरील मंचात तक्रार दाखल करुन परिच्‍छेद (11) प्रमाणे रकमेची मागणी केली.

4.    तक्रारदार क्र.1 ते 4 यांची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले नं.1 ते 16 यांना नोटीसा पाठविण्‍याचा आदेश पारीत झाले. सामनेवाला नं.1 ते 16 यांना मंचातर्फे नोटीसा पाठविण्‍यात आल्‍या. सामनेवाला नं.2 ते 13 हे वकीलामार्फत प्रकरणात हजर झाले परंतू त्‍यांनी त्‍यांची कैफियत सादर केली नाही. सबब सामनेवाला नं.2 ते 13 यांचे विरुध्‍द निशाणी 1 वर विना कैफियत प्रकरण चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

5.    सामनेवाला नं.1 यांना पाठविलेली नोटीस निशाणी 8 वर पोष्‍टाचा Unclaimed असा शेरा मारुन परत आली आहे. सामनेवाला नं.14 यांना नोटीस प्राप्‍त झाली परंतू ते प्रकरणात हजर झाले नाही. तसेच सामनेवाला नं.15 यांना पाठविलेली नोटीस Not Claimed  असा पोष्‍टाचा शेरा मारुन परत आली. आणि सामनेवाला नं.16 यांना नोटीस मिळूनही ते प्रकरणात हजर झाले नाही. सबब सामनेवाला नं.1, 14 ते 16 यांचे विरुध्‍द निशाणी 1 वर विना कैफियत प्रकरण चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

6.    तक्रारदार क्र.1 ते 4 यांची तक्रार, प्रतिज्ञापत्र व सोबत जोडलेली कागदपत्र तसेच तक्रारदार यांचा लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. व प्रस्‍तूत निकालाचे न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित  होतात. व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.

मुद्देः

  उत्‍तर

(1)सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा देण्‍यात त्रुटी

केली आहे काय ?

:होय

(2)तक्रारदार क्र.1 ते 4 हे सामनेवाले क्र.1 ते 16 यांच्‍याकडून मुदत ठेवीच्‍या रक्‍कमा आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत काय.?

: होय

 

(3) आदेश काय ?

:अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारण मिमांसा

7.    मुद्दा क्र.12’:-  तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी सामनेवाले संस्‍थेच्‍या श्रीनाथ मल्‍टी-स्‍टेट अर्बन को.ऑपरेटीव्‍ही क्रेडीट सोसायटी लि., श्रीनाथ कॉम्‍प्‍लेक्‍स, फेज 1, पाईपलाईन रोड, अहमदनगर शाखेत खालील नमूद केल्‍याप्रमाणे रकमा गुंतविल्‍या आहेत.

अ.क्र.   

नांव 

खाते नंबर/मुदत ठेव पावती क्र.  

ठेव रक्‍कम    

ठेव ठेवलेची तारीख

रक्‍कम परत देणेची तारीख

1.

बन्‍सी विठोबा वांढेकर

534/13835

1,00,000/-

29.11.13

29.5.14

2.

बन्‍सी विठोबा वांढेकर

916/20814

1,00,000/-

10.7.14

6.1.15

3.

बन्‍सी विठोबा वांढेकर

915/20813

1,00,000/-

10.7.14

6.1.15

4.

बन्‍सी विठोबा वांढेकर

139/1396340

1,13,116/-

20.5.13

20.5.14

5.

सुभद्राबाई बन्‍सी वांढेकर

455/11756

1,00,000/-

28.10.13

28.10.14

6.

उषाबाई पोपट वांढेकर

 

50,000/-

17.2.17

17.2.18

7.

मंडाबाई बाबासाहेब वांढेकर

 

50,000/-

24.1.14

24.1.15

     वरील नमुद पावत्‍यावरील रकमा या 11 व 12 टक्‍के व्‍याजदराने सहा महिने व एक वर्ष मुदतीसाठी ठेव योजनेत ठेवले. याप्रमाणे तक्रारदार क्र.1 ते 4 यांचे ठेव पावतींचा तपशील नि.नं.1 परिच्‍छेद 3 मध्‍ये दिलेला आहे. सदरहु मुदत ठेव पावत्‍या नि.नं.6/1 ते 6/7 वर झेरॉक्‍स प्रतित दाखल आहेत. याप्रमाणे सामनेवालेने पावतीवर दर्शविल्‍याप्रमाणे व्‍याजही देण्‍याचे बंधन घालून घेतले आहे.                          

8.    तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी सामनेवालेंकडे मुदत ठेवीत रक्‍कम गुंतविली व त्‍यामुळे तक्रारदार क्र.1 ते 4 हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सामनेवाले नं.2 ते 13 हे वकीलामार्फत प्रकरणात हजर झाले, परंतू त्‍यांनी कैफियत दाखल केली नाही. व त्‍यांनी तक्रारदारांचे म्‍हणणे खोडून काढण्‍याची संधी गमावली.

9.    सामनेवाला नं.1, 14 ते 16 यांना पाठविलेल्‍या नोटीसा पोष्‍टाचा शेरा मारुन परत आल्‍या. सबब सामनेवाला नं.1, 14 ते 16 हे प्रकरणात हजर राहून त्‍यांची बाजू मांडली नाही. सबब सामनेवाला क्र.1 ते 16 यांना तक्रारदारांनी तक्रारीत सामनेवाला यांचे विरुध्‍द केलेले कथन सामनेवाला यांना मान्‍य आहेत असे  हे मंच ग्राहय धरीत आहे.

10.   तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी आपल्‍या कथनाचे पुष्‍टयर्थ सबळ कागदोपत्री पुरावा या मंचात दाखल केला आहे. सामनेवाले सोसायटीकडे मुदत ठेवीच्‍या रकमेची व्‍याजासह मागणी करुनही सामनेवालेंनी त्‍याची दखल घेतली नाही व रक्‍कमा अद्यापही अदा केल्‍या नाहीत. वास्‍तवीक सदर मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपल्‍यावर व तक्रारदारांनी मागणी केल्‍यावर सदर रक्‍कमा पावतीवर नमुद असलेल्‍या व्‍याजासह तक्रारदारांना देणे सामनेवाले यांचेवर बंधनकारक व गरजेचे होते. परंतु त्‍यांनी ती रक्‍कम न दिल्‍यामुळे तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले. सबब तक्रारदार क्र.1 ते 4 हे मुदत ठेवीच्‍या रकमा व्‍याजासह मिळण्‍यास पात्र असून ते मिळण्‍याकामी सामनेवाले यांनी सेवा देण्‍यात निश्चितच त्रुटी केली आहे.

11.   श्रीनाथ मल्‍टी-स्‍टेट अर्बन को.ऑपरेटीव्‍ही क्रेडीट सोसायटी लि., श्रीनाथ कॉम्‍प्‍लेक्‍स, फेज 1, पाईपलाईन रोड, अहमदनगर सोसायटीचे सामनेवाला नं.1 ही संस्‍था आहे, सामनेवाला नं.2 ते 16 हे संस्‍थेचे संचालक व पदाधिकारी आहेत. सबब तक्रारदार क्र.1 ते 4 यांना मुदत ठेवीच्‍या रकमा व्‍याजासह परत करण्‍यास सामनेवाले नं.1 ते 16 हे वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरीत्‍या जबाबदार असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब वरील मुदत ठेवीमध्‍ये दर्शविलेल्‍या रकमा व्‍याजासह होणारी रक्‍कम तक्रारदार क्र.1 ते 4 यांना देण्‍याचा आदेश करणे न्‍यायोचित होईल.

12.   तक्रारदार क्र.1 ते 4 यांनी ठेव रकमेची मागणी करुनही ती न मिळाल्‍याने त्‍यांना निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब त्‍यापोटी व या तक्रार अर्जाचे खर्चापोटी काही रक्‍कम तक्रारदार क्र.1 ते 4 यांना मंजूर करणे न्‍यायसंगत होईल. म्‍हणुन मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

13.   मुद्दा क्र.3:-सबब मुद्दा क्र. ‘1’ व ‘2’ चे अनुषंगाने खालील आदेश पारित करण्‍यात येत आहे.  

:- आदेश -:

1.    तक्रारदार क्र.1 ते 4 यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.                    

2.    सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.1 याचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.13865(नि.नं.6/1) नुसार ठेव दि.29/11/2013 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.29/11/2013 पासून द.सा.द.शे.11 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.1 यांना अदा करावी.

3.    सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.1 याचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.20814(नि.नं.6/2) नुसार ठेव दि.10/07/2014 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.10/07/2014 पासून द.सा.द.शे.11 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.1 यांना अदा करावी.

4.    सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.1 याचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.20813(नि.नं.6/3) नुसार ठेव दि.10/07/2014 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.10/07/2014 पासून द.सा.द.शे.11 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.1 यांना अदा करावी.

5.    सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.1 याचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.6340(नि.नं.6/4) नुसार ठेव दि.20/05/2013 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.20/05/2013 पासून द.सा.द.शे.12 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.1 यांना अदा करावी.

6.    सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.2 याचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.11756(नि.नं.6/5) नुसार ठेव दि.28/10/2013 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.28/10/2013 पासून द.सा.द.शे.12 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.2 यांना अदा करावी.

7.    सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.3 याचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.48634(नि.नं.6/6) नुसार ठेव दि.17/02/2017 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.17/02/2017 पासून द.सा.द.शे.12 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.3 यांना अदा करावी.

8.    सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.4 याचे नांवे असलेली मुदत ठेव पावती क्र.14657(नि.नं.6/7) नुसार ठेव दि.24/01/2014 रोजी ठेवलेली रक्‍कम (ठेवीदाराने ठेव रकमेवर व्‍याज घेतले असल्‍यास व्‍याजाची रक्‍कम वजा जाता) व त्‍यावर मुदत ठेव दि.24/01/2014 पासून द.सा.द.शे.12 टक्‍के प्रमाणे संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो होणारे व्‍याजासह तक्रारदार क्र.4 यांना अदा करावी.

9.    सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.1 ते 4 यांना झालेल्‍या आर्थिक,शारीरीक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्‍कम रु.10,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दहा हजार मात्र) व या अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये पाच हजार मात्र) द्यावेत व त्‍यांनी या अर्जाचा खर्च स्‍वतः सोसावा.

10. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाले नं.1 ते 16 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तीकरित्‍या या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

11.   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना मोफत देण्‍यात यावी.

12.   या प्रकरणाची “ब” व “क” फाईल तक्रारदार क्र.1 ते 4 यांना परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.