Maharashtra

Dhule

CC/09/797

Anita Suresh Sharma, Adarsh Nagar, Shirpur Dhule - Complainant(s)

Versus

1. SDEC Subdivision Engineer Telecom Bharat Sanchar Shirpur 2. MJS So General Manager of Telecom Dhu - Opp.Party(s)

N. B. Sharma

28 Jan 2014

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/09/797
 
1. Anita Suresh Sharma, Adarsh Nagar, Shirpur Dhule
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. 1. SDEC Subdivision Engineer Telecom Bharat Sanchar Shirpur 2. MJS So General Manager of Telecom Dhule 3. Chief General Manager Maharashtra Dursanchar Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.


 

 


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक –   ७९७/२००९


 

                                 तक्रार दाखल दिनांक – १५/१२/२००९


 

                                 तक्रार निकाली दिनांक – २८/०१/२०१४


 

 


 

१) श्रीमती अनिता सुरेश शर्मा


 

  उ.व.३५ धंदा-घरकाम


 

२) जतीन बाप सुरेश शर्मा


 

   उ.व.६ वर्ष धंदा-अज्ञान


 

३) श्रीमती शंकुतलाबाई बंन्‍सीलाल शर्मा


 

   उ.व.५५ धंदा-घरकाम


 

   सर्व रा.आदर्श नगर, प्‍लॉट नंबर २७


 

   शिरपूर ता.शिरपूर जि.धुळे


 

   (तक्रारदार नं.१ स्‍वतः करीता व नं.२


 

    ची अ.पा.क.आई म्‍हणून)                       ................ तक्रारदार      


 

 


 

          विरुध्‍द


 

 


 

१) म.एस.डी.ई.सो.


 

 (सब डिव्‍हीजन इंजिनिअर ऑफ टेलीकॉम)


 

   भारत संचार निगम लि.शिरपूर


 

२) म.जे.एम.सो. (जनरल मॅनेजर ऑफ टेलीकॉम्‍)


 

   भारत संचार निगम लि.


 

   धुळे विभाग मोहाडी ता.जि. धुळे


 

३) म.चिफ जनरल मॅनेजर सो.


 

   महाराष्‍ट्र दुरसंचार परीमंडल


 

   ए-विंग, ४ था मजला, प्रशासकीय भवन


 

   जुहू रोड, सांताक्रुझ, (पश्चिम)


 

   मुंबई ४०० ०५४


 

 


 

४) म.सहाय्यक अभियंता सो.


 

    महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत विरतण कं.


 

    उपविभाग-१ शिरपूर जि.धुळे


 

५) म.कार्यकारी अभियंता सो.


 

    म.रा.वि.वि. कंपनी दोंडाईचा


 

    ता.शिंदखेडा जि.धुळे


 

६) व्‍यवस्‍थापकीय संचालक सो.


 

    म.रा.विद्युत वितरण कंपनी मुंबई विभाग


 

७) म.जिल्‍हाधिकारी सो.


 

    जिल्‍हाधिकारी कार्यालय,


 

    धुळे, प्रशासकीय बिल्‍डींग धुळे                     ........... सामनेवाला


 

 


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)  


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.एन.बी. शर्मा)


 

(सामनेवाला नं.१ ते ३ तर्फे – अॅड.श्री.एस.एम. देशमुख)


 

(सामनेवाला नं.४ ते ६ तर्फे – अॅड.श्री.एस.एम. शिंपी)


 

 (सामनेवाला नं.७ तर्फे – एकतर्फा)


 

 


 

निकालपत्र


 


 (दवाराः मा.सदस्‍या – सौ.एस.एस. जैन)


 

 


 

सामनेवाला यांच्‍या निष्‍काळजीपणा व बेजबाबदारपणाच्‍या कार्यामुळे तक्रारदार यांचे पतीच्‍या मृत्‍युस कारणीभूत ठरल्‍याने सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाईची मागणी करण्‍याकरिता तक्रारदारने प्रस्‍तुत तकार या मंचात दाखल केली आहे.


 

१.   तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार नं.१ व ३ हया सासु-सुना असून तक्रारदार नं.२ हा तक्रारदार नं.१ यांचा मुलगा आहे. त्‍यांचे एकत्रीत कुटुंब आहे.


 

 


 

     तक्रारदार यांचे इमारतीत स्‍वतःचे मालकीचे दुकानात त्‍यांचे एस.टी.डी. व पी.सी.ओ. आहे. सदरील एस.टी.डी. (नं.२५९२६२) चे कनेक्‍शन तक्रारदार नं.१ यांचे दिर राकेश शर्मा यांच्‍या नावे असून ते यांनी भारत संचार निगम यांच्‍या कडून सन २००४ मध्‍ये घेतलेले आहे. सदरील कनेक्‍शन दि.१६/०२/२००९ ला परत जमा करून दिले आहे.


 

 


 

२.   तक्रारदार यांचे घराजवळ म.रा.वि.वि.कं. चे विद्युत रोहीत्र (डी.पी.) बसविलेले असून, त्‍यांच्‍या लघुदाबाच्‍या व उच्‍चदाबाच्‍या विद्युत वाहक तारा तक्रारदार यांच्‍या घरासमोरून गेलेल्‍या आहेत. तसेच एस.टी.डी. फोनचे कनेक्‍शन घरासमोरील रस्‍त्‍याच्‍या पलीकडे असलेल्‍या टेलीफोन खांबावरून देण्‍यात आले होते. सदर कनेक्‍शन वर्दळीच्‍या रस्‍त्‍याच्‍या पलीकडून रस्‍ता क्रॉस करून दिलेला असल्‍याने, सदरील टेलिफोन वायर ही वेळोवेळी तुटून एस.टी.डी. फोन बंद पडत असे.


 

 


 

३.   तक्रारदार यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की दि.२९/०१२/२००८ रोजी रात्री सुमारे ११.१५ ते ११.४५ ला एस.टी.डी. फोनची वायर ही म.रा.वि.वि. कंपनीच्‍या लघुदाब वीज वाहक तारांच्‍या संपर्कात आलेने वायर जळत असल्‍याचा वास आलेने तक्रारदार नं.१ व त्‍यांचे पती पाहण्‍यासाठी बाहेर आले असता, त्‍या ठिकाणच्‍या टेलिफोन वायरच्‍या संपर्कात आल्‍याने धक्‍का बसून त्‍या फेकल्‍या गेल्‍या व त्‍यांचे पती सुरेश शर्मा यांनाही वीजेचा धक्‍का बसला व मयत झाले. सदरील घटनेची नोंद शिरपूर पो.स्‍टे.ला. मृत्‍यु रजिस्‍टर नं.९९/०९ अन्‍वये नोंद करण्‍यात आली होती.


 

 


 

४.   तक्रारदार नं.१ यांचे दीरांनी दि.१८/०१/२००९ रोजी अपघातासाठी जबाबदार असलेले सामनेवाला नं.१ ते ६ यांचे विरूध्‍द शिरपूर पो.स्‍टे. ला तक्रारी अर्ज दिला. त्‍यावेळी पोलीसांनी तपास करून सामनेवाला यांचे तज्ञांचा अहवाल मागविला.   त्‍यानुसार विद्युत निरीक्षक यांनी दि.२१/०४/२००९ रोजी अहवाल दिला. सदर अहवालानुसार भारत संचार निगम लि. हे जबाबदार असल्‍याने राकेश शर्मा यांनी शिरपूर पो.स्‍टे.ला भारत संचार निगम यांचे विरूध्‍द तक्रारी अर्ज दिला. सदर अर्जावरून दि.०१/०५/२००९ रोजी गु.र. नं.८०/०९ अन्‍वये भा.द.वि. कलम ३०४-अ, ३३७ प्रमाणे गुन्‍हा दाखल करून शिरपूर दिवाणी न्‍यायालयात आर.सी.सी.नं.३७१/०९ या अन्‍वये दोषारोप पत्र दाखल असून केस प्रलंबित आहे.


 

 


 

५.  मयत सुरेश शर्मा हे ३५ वर्षांचे होते. सिव्‍हील इंजिनिअर असल्‍याने ते वर्षाला रू.२,३०,०००/- रू. उत्‍पन्‍न मिळवित असत. त्‍यांचे अकाली निधनामुळे खुप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.


 

 


 

६. शेवटी तक्रारदार यांनी सामनेवाला नं.१ ते ६ यांचेकडून संयुक्‍तीकरित्‍या नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रू.२०,००,०००/- (रूपये वीस लाख) मिळावे सदर रकमेवर १८% दराने प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपावेतो व्‍याज मिळावे. तसेच सदरील अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.


 

 


 

७.   तक्रारदार यांनी आपले म्‍हणण्‍याचे पृष्‍टयार्थ नि.५ सोबत नि.५/१ वर टेलिफोन कनेक्‍शन बिल, नि.५/२ वर कनेक्‍शन परत जमा केल्‍याचे पत्र, नि.५/३ वर शिरपूर पो.स्‍टे. चे पत्र, नि.५/४ वर पोलिस अहवाल, नि.५/५ वर पंचनामा, नि.५/६ वर शवविच्‍छेदन अहवाल, नि.५/७ वर विद्युत निरीक्षक यांचा अहवाल, नि.५/८ वर चार्टशिटची नक्‍कल, नि.५/९ वर नोटीस, नि.५/१० वर पोच पावती, नि.५/११ व नि.५/१२ वर सामनेवाला यांचे नोटीस उत्‍तर, नि.५/१३ वर कंत्राटदार प्रमाणपत्र, नि.५/१४ वर आयकर विवरण, नि.५/१५ वर महाप्रबंधक, दूरसंचार यांचे पत्र, नि.५/१६ वर राकेश शर्मा यांचा अर्ज, नि.५/१७ व नि.५/१९ वर तक्रारी अर्जाच्‍या प्रती व पोच पावत्‍या, नि.५/२० वर वरीष्‍ठ कोर्टाचा न्‍याय निवाडा तसेच नि.२५ सोबत नि.२५/१ वर घटनास्‍थळाचे फोटो, नि.२५/२ व नि.२५/५ वर आर्थिक नुकसानी बाबत केलेले पत्रव्‍यवहार, नि.३७ वर वरीष्‍ठ कोर्टाचे न्‍यायनिवाडे व घटनास्‍थळ पंचनामा, नि.४३ व नि.४३/१ राजपत्राची प्रत, नि.४३/२ वर रेशन कार्डची प्रत, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.


 

 


 

८.        सामनेवाला नं.४ ते ६ यांनी नि.११ वर लेखी म्‍हणणे दाखल केले असून त्‍यात त्‍यांनी सदरची तक्रार खरी व कायदेशीर नाही. अर्जदाराची विनंती विद्युत कायद्याच्‍या तरतुदींविरूध्‍द अशी आहे. या कारणास्‍तव अर्ज टेनेबल नाही. तक्रारदार यांचे पती किंवा तक्रारदार हे घटनेच्‍या वेळी सामनेवाला यांचे ग्राहक नव्‍हते म्‍हणून सदरची तक्रार ही या मे.कोर्टात चालू शकत नाही. वायरला वास येत असतांना देखील हात लावला.   यासाठी तक्रारदार व त्‍यांचे पती स्‍वतःच जबाबदार आहेत. शिरपूर पोलिसांनी चौकशी अंती भारत संचार निगम यांना घटनेसाठी दोषी धरले आहे. त्‍यानुसार गुन्‍हाही शिरपूर कोर्टात दाखल असून प्रलंबित आहे. त्‍यामुळे वीज कंपनी व त्‍यांचे अधिकारी हे निष्‍काळजी किंवा दोषी आहे हे चुकीचे व खोटे आहे. लघुदाबांच्‍या तारांच्‍या बाबतीत आवश्‍यक त्‍या उपाययोजना केल्‍यावरच सदर लाईन/ तारा खेचल्‍या आहेत. तसेच तारांच्‍या देखरेखी विषयी तक्रारदारशिवाय इतर कोणाचीही तक्रार नाही. तक्रारदारची तक्रार दिवाणी कोर्टाच्‍या अधिकारांत येणारी आहे असे नमूद केले आहे. 


 

 


 

९.   सामनेवाला यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, एसटीडी फोनची वायर वीज तारांच्‍या संपर्कात आली यावरून दूर संचार निगम यांच्‍याकडून वायरीमध्‍ये फॉल्‍ट होता, त्‍या उघडया होत्‍या आणि त्‍यातील पितळी तार बाहेर होत्‍या या सर्व गोष्‍टींसाठी दुरसंचार निगम हेच जबाबदार आहे. त्‍यांचे निष्‍काळजीपणामुळे सदरची घटना घडली आहे. शेवटी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना नाहक खर्चात टाकले म्‍हणून त्‍यांचेकडून रू.२०,०००/- कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट मिळावी. तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द व्‍हावी अशी मागणी केली आहे.


 

 


 

१०. सामनेवाला नं.४ ते ६ यांनी आपले म्‍हणण्‍याचे पृष्‍टया‍र्थ नि.१२ वर    श्री.हेमंत चौरे, सहाय्यक अभियंता, शिरपुर यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.


 

 


 

११.   सामनेवाला नं.१ ते ३ यांनी आपले लेखी म्‍हणणे नि.१६ वर दाखल केले असून त्‍यात त्‍यांनी अर्जदार हे सामनेवाला नं.१ ते ३ यांचे ग्राहक नव्‍हते व नाही. त्‍यामुळे कायद्याने सदरचा अर्ज चालविणे या कोर्टास ज्‍युरीडिक्‍शन नाही. अर्जदारांना नुकसानभरपाई देण्‍याची कुठलीही जबाबदारी येत नाही. सिव्‍हील अपील क्र.७६८७/०४ जनरल मॅनेजर टेलिकॉम विरूध्‍द एम.क्रिएशन व इतर या निकालात म्‍हटल्‍याप्रमाणे इंडियन टेलीग्राफ अॅक्‍टचे कलम ७ ब प्रमाणे टेलिफोन तक्रारीच्‍या संदर्भातील दावे हाताळणे, तक्रार अर्जाची चौकशी करण्‍याचे कामी ग्राहक मंचास अधिकार नाही. अर्जदार यांनी एस.टी.डी. चे कनेक्‍शन सन २००४ साली घेतले ही बाब देखील अर्जदारने पुराव्‍यासहीत साबीत करावी. कोणतेही टेलिफोन कनेक्‍शन कधीही विद्युत वाहकतारांच्‍या सान्‍नीध्‍यातून अथवा वायरींच्‍या जवळून कधीच देण्‍यात येत नाही. त्‍यामुळे हया बाबतचे अर्जदारांचे कथन सर्वस्‍वी खोटे, बेकायदेशीर आहे असे नमूद केले आहे.


 

 


 

१२. सामनेवाला यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, अर्जदार यांनी केलेल्‍या नुकसान भरपाईचे विवरणाबाबत कोणताही कायदेशीर पुरावा, कागदपत्र, कुठेही नमूद केलेले नाही. टेलीफोन कनेक्‍शनची वायर लघुदाब, विद्युतप्रवाहाच्‍या संपर्कात आलेली नव्‍हती व नाही. त्‍यामुळे अशा टेलिफोन वायर मधून विद्युत प्रवाह वाहण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही. शिरपूर पो.स्‍टे. गु.र.नं. ८०/०९ मध्‍ये सामनेवाला यांचे विरूध्‍द मे. कोर्टात चार्जशीट पाठविले असले तरी सदर केस प्रलंबित असल्‍याने गुन्‍हा शाबीत झाला असा होत नाही, त्‍यामुळे या घटनेबाबत जबाबदार धरून नुकसानभरपाई मागणे अत्‍यंत चुकीचे आहे. सदर घटना दि.२९/०१२/२००८ रोजी घडलेली असतांना हया घटनेची फिर्याद अर्जदारांनी तब्‍बल तीन दिवसांनी शिरपूर पो.स्‍टे. ला नोंदविलेली आहे.  दूरध्‍वनी केबल्‍स मध्‍ये केवळ ४८ व्‍होल्‍टचा डी.सी. करंट असतो, फक्‍त त्‍यामुळे वायरचा धक्‍का/ शॉक लागल्‍यास शरीराला फक्‍त चुरचुरल्‍या सारखे होते. त्‍यायोगे शॉक लागून जखमा अथवा मरण संभवणे कदापीही शक्‍य नाही. सदरचे कामी दिवाणी कोर्टास ज्‍युरिडिक्‍शन आहे. शेवटी अर्जदारांनी सदरची केस या कोर्टात टेनेबल नसतांना सामनेवाला नं.१ ते ३ यांना नाहक खर्चात व त्रासात टाकले म्‍हणून अर्जदार कडून प्रत्‍येकी रू.१०,०००/- कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट मिळावी. तक्रार अर्जाचा खर्च रू.१०,०००/- मिळावा. तसेच तक्रारदार यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे.


 

 


 

१३. सामनेवाला नं.१ ते ३ यांनी आपले म्‍हणण्‍याचे पृष्‍टयार्थ नि.१५ वर श्री.सुरेश शिवलाल पाटील यांचे शपथपत्र, नि.३९ वर वरिष्‍ठ कोर्टाचे न्‍यायनिवाडे दाखल कलेले आहे.


 

 


 

     तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला नं.१ ते ३ व ४ ते ६ यांचे खुलासे, दाखल कागदपत्रे पाहता व युक्तिवाद ऐकल्‍यानंतर आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.


 

 


 

              मुद्दे                                   निष्‍कर्ष


 

१.     तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक  


 

आहेत काय ?                                            नाही


 

२.    आदेश काय ?                                  खालीलप्रमाणे


 

 


 

विवेचन


 

 


 

१४. मुद्दा क्र.१-  सामनेवाला क्र.१ ते ६ यांनी आपल्‍या खुलाशात व युक्तिवादात तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक होवू शकत नाही, असे नमूद केले आहे. या बाबत तक्रारदार यांचे असे म्‍हणणे आहे की, ते सामनेवाला यांचे ग्राहक आहे. या कथनाचे समर्थनार्थ तक्रारदार हे मा.‍वरिष्‍ठ न्‍यायालयांच्‍या खालील नमूद न्‍यायनिवाडयांचा आधार घेत आहेत.


 

 


 

1)        Lakhbirsingh V/s Aman Arora Telecom (D.C.D.R.) (Ferozepur) C.C.No.180/09.


 

2)       Skypak Couriers Ltd. V/s Tata Chemicals Ltd. (S.C.) AIR 2000.


 

3)       M/s Fair air Engineers Pvt. Ltd. & Other V/s N.K. Modi (S.C.) 533 AIR 1997.


 

4)       Karnataka Electricity Board V/s. Smt. Sharawa & Others 2002 (3) CPJ 312.


 

5)       Manager Telephone Nigam Ltd. V/s Dr.Vinod V. Karkare 1991 (II) CPJ 655


 

6)       Haryana Institute of  Fine Arts V/s. Rajesh Mani Kaushik & Others 2008 (N.C.D.R.C.) (New Delhi)


 

7)       Parmila Devi & Ors. V/s. Dakshini Haryana Bijli Vitran Nigam Ltd. 2008 (IV) CPJ 332.


 

     आम्‍ही वरील न्‍यायनिवाडयांचे बारकाईने अवलोकन केले आहे. वरील न्‍यायनिवाडे व प्रस्‍तुत तक्रारीतील विषय यात तफावत असल्‍याने ते या कामी लागु होणार नाहीत, असे आम्‍हांस वाटते.


 

 


 

 


 

१५. सामनेवाला हे आपले कथनाचे समर्थनार्थ खालीलनमूद  वरीष्‍ठ न्‍यायालयांच्‍या न्‍यायनिवाडयांचा आधार घेत आहेत.


 

 


 

 


 

1)             Union of India & Ors. V/s. Ramesh Kumar (N.C.D.R.C.) (New Delhi) 1995 STPL (CL) 46.


 

2)             General Manager Madras Telephones & Ors. V/s. R.Kannan (N.C.D.R.C.) (New Delhi) 1993 STPl (CL) 545.


 

3)             Softspec Software Pvt. Ltd. V/s. Digital Equipment (India) Ltd. & Ors. (N.C.D.R.C.) (New Delhi) 2001 STPL (CL) 112.


 

4)             Mahanagar Telephone Nigam Ltd. V/s. Girvarlal (N.C.D.R.C.) (New Delhi) 2010 STPL (CL) 2219.


 

5)             Divisional Engineer (Admn. & Planning) office of Telecom Dist. Manager Sonepat & Ors. V/s. Kaushalya Devi. (NCDRC) (New Delhi) 2007 STPL (CL) 1468.


 

6)             Dr. Vijayanand Kisan Mahajan V/s. Telecom District Manager & Ors. C.C. No.138/2002 (D.C.D.R.) (Dhule).


 

    


 

 


 

आम्‍ही वरील न्‍यायनिवाडयांचे बारकाईने अवलोकन केले आहे.वरील न्‍यायनिवाडयात पुढीलप्रमाणे तत्‍व विषद आहे.


 

 


 

          According to National Commission a Franchise hold who is maintaining and running a STD/ PCO does not fall under definition of a Consumer as per C.P.A.


 

 


 

१६. याबाबत आम्‍ही मंचाच्‍या वतीने पुढील वरिष्‍ठ न्‍यायालयांच्‍या न्‍यायनिवाडयांचा आधार घेत आहोत.


 

 


 

 


 

1)    IV (2013) CPJ 328 (NC) Balbir Singh V/s. Punjab Urban Development Authority (Puda) & Anr.यामध्‍ये पुढीलप्रमाणे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे.


 

 


 

     Sec.2(1) (d)] 21(b) – Consumer-Allotment of booth- Commercial booth allotted to Petitioner – Now here stated  in complaint that booth was taken by petitioner for earning his livelihood by means of self-employment- Complainant not Consumer


 

 


 

 


 

2)    III (2007) CPJ 315 (N.C.) Divisional Engineer Tel. V/s Kaushalya Devi  यामध्‍ये पुढीलप्रमाणे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे.


 

 


 

 


 

       Sec.2 (1)(d), 21(b) – Consumer - Agreement to run PCO - Complainant only licenses under said agreement – Authorised to Collect Call charges- Complaint not maintainable under C.P. Act- Complainant not consumer.


 

 


 

 


 

3)    I (2007) CPJ 95 (Haryana State Consumer Disputes Redressal Commission, Panchkula) Telecom District (General Manager), Hisar vs. Usha Garg यामध्‍ये पुढीलप्रमाणे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे.


 

 


 

 


 

              Sec.2(1)(d) – Consumer – Telephone – Franchise/licence to run PCO – Complainant being licence holder for running PCO on behalf of O.P., was entitled to receive proportionate commission on entire bill amount – Such franchise holder not consumer vis-à-vis Telecom Department.


 

 


 

 


 

१७. तसेच तक्रारदारने नि.५/१ वर दाखल केलेले टेलिफोन बिल पाहता त्‍यावर राकेश बन्‍सीलाल सुतार याचे ग्राहक म्‍हणून नाव नमूद आहे. यावरून राकेश सुतार याचे नावाने सदर PCO चे कनेक्‍शन होते हे दिसून येते व ते कामी तक्रारदार नाही.  राकेश शर्मा यांचा मयत भाऊ सुरेश शर्मा यांच्‍या पत्‍नी श्रीमती अनिता सुरेश शर्मा हया सदर तक्रार अर्जात तक्रारदार आहेत. त्‍यामुळे श्रीमती अनिता शर्मा हया कामी तक्रारदार होवू शकत नाही असे आम्‍हांस वाटते. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत.  


 

 


 

१८. मुद्दा क्र.२- वरील सर्व विवेचनावरून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.


 

 


 

 


 

आ दे श


 

 


 

१.     तक्रारदारयांचीतक्रार निकाली काढण्‍यात येत आहे.  


 

 


 

२.    खर्चाबाबत काहीही आदेश नाही.


 

 


 

धुळे.


 

दि.२८/०१/२०१४.


 

 


 

             (श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)                                                                        सदस्‍य           सदस्‍या         अध्‍यक्षा                        


 

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.