Maharashtra

Additional DCF, Pune

CC/08/331

Suhas Balkrishna Bhandare - Complainant(s)

Versus

1. Sanchalak,Kamal Narsing Home& Sancheti Kritical Care Center - Opp.Party(s)

09 Dec 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/08/331
 
1. Suhas Balkrishna Bhandare
"Shalini" 12,Senadatta Peth,
Pune-411 030
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Sanchalak,Kamal Narsing Home& Sancheti Kritical Care Center
Market Yard Road,Gultekadi
Pune-37
Maharashtra
2. 2. Dr. S.Y. Kulkarni,Arthopadic Sergion
Market Yard Road,Gultekde,
Pune-411 037
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Pranali Sawant PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, पुणे


 

                                                मा. अध्‍यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत


 

                                                मा. सदस्‍या : श्रीमती. सुजाता पाटणकर


 

************************************************************


 

                        ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक: एपीडीएफ/331/2008


 

                                    तक्रार अर्ज दाखल दिनांक: 20/10/2006


 

                                    तक्रार निकाल दिनांक    : 09/12/2011


 

 


 

 


 

श्री. सुहास बाळकृष्‍ण भंडारे,                      )


 

शालिनी 12 सेनादत्‍त पेठ,                       )


 

पुणे 411 030.                              )...तक्रारदार


 

             


 

 विरुध्‍द



 

1.संचालक, कमल नर्सिंग होम व                 )


 

 संचेती क्रिटीकल केअर सेंटर                   )


 

                                           )


 

2.डॉ. एस्.वाय्. कुलकर्णी ऑर्थोपेडिक              )


 

 सर्जन, मार्केटयार्ड रोड, गुलटेकडी,               )


 

 पुणे – 411037.                            )... जाबदार


 

************************************************************


 

                  तक्रारदार           :- स्‍वत:


 

                  जाबदार क्र.1        :- एकतर्फा


 

                  जाबदार      क्र.2        :- अॅड. परळीकर


 

************************************************************


 

द्वारा :-मा. अध्‍यक्षा, श्रीमती. प्रणाली सावंत



 

// निकालपत्र //


 

 


 

(1)         प्रस्‍तूतचे प्रकरण सन 2006 मध्‍ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच येथे दाखल केला होता तेव्‍हा त्‍यास पीडीएफ/531/2006 असा नोंदणीकृत क्रमांक देण्‍यात आला होता. मा.राज्‍य आयोग, मुंबई यांचे आदेशान्‍वये सदरचे प्रकरण अतिरिक्‍त पुणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच येथे वर्ग केल्‍यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/331/2008 असा नोंदविण्‍यात आला आहे.


 

     


 

 


 

(2)          प्रस्‍तूत प्रकरणातील जाबदार डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या वैद्यकीय सेवेत निष्‍काळजीपणा केल्‍यामुळे झालेल्‍या त्रासाची नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की,


 

 


 

(3)          तक्रारदार श्री. सुहास भंडारे यांनी जाबदार क्र. 2 डॉ.एस्.वाय्.कुलकर्णी (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे “डॉक्‍टर” असा केला जाईल) यांच्‍या मालकीच्‍या जाबदार क्र. 1 कमल नर्सिंग होम या दवाखान्‍यातून शस्‍त्रक्रिया करुन घेतली होती. दि.13/11/2004 रोजी तक्रारदारांच्‍या हिप फ्रॅक्‍चरच्‍या शस्‍त्रक्रियेसाठी त्‍यांना ऑपरेशन थिएटरमध्‍ये नेले असता भूलतज्ञ डॉ. शहा यांनी सलाईनमधून चुकीचे इंजेक्शन दिल्‍यामुळे तक्रारदारांचा रक्‍तदाब व हृदयाचे ठोके वाढले व त्‍यामुळे शस्‍त्रक्रिया रद्द करुन तक्रारदारांना आय्.सी.सी.यु. मध्‍ये दाखल करावे लागले. यानंतर दि.15/11/2004 रोजी तक्रारदारांची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. ही शस्‍त्रक्रिया करताना डॉक्‍टरांनी फ्रॅक्‍चर जोडण्‍यासाठी हलक्‍या दर्जाचे इम्‍प्‍लान्‍ट व स्‍क्रू वापरले तसेच शस्‍त्रक्रियेच्‍या दरम्‍यान एक महत्‍वाचा स्‍क्रू बसविण्‍याचा राहिल्‍यामुळे फ्रॅक्‍चर नीट जुळले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. फ्रॅक्‍चर नीट न जुळल्‍यामुळे आपल्‍याला 15 महिन्‍यांपेक्षा अधिक काळ अतोनात वेदना व मनस्‍ताप सहन करावा लागला असे तक्रारदारांनी नमुद केले आहे. डॉक्‍टरांनी केलेली शस्‍त्रक्रिया नीट न झाल्‍यामुळे तक्रारदारांनी 15 महिन्‍यानंतर सह्याद्री हॉस्पिटल येथील डॉ.सुश्रूत बडवे यांचेकडून पुन्‍हा शस्‍त्रक्रिया करुन घेतली. डॉक्‍टरांच्‍या निष्‍काळजीपणामुळे आपल्‍याला 15 महिने जो त्रास सहन करावा लागला त्‍याची नुकसानभरपाई म्‍हणून प्रतिमहा रु.20,000/- प्रमाणे एकूण रक्‍कम रु.3,00,000/- मात्र आपल्‍याला मंजूर करण्‍यात यावे अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्‍या पृष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व जाबदार क्र. 1 नर्सिंग होम व सह्याद्री हॉस्पिटलमधील कागदपत्रे तसेच College Of Engineering, Pune यांच्‍या डिपार्टमेंट ऑफ मेटॅलॉर्जिकल इंजिनियरींग यांचे प्रमाणपत्र मंचापुढे दाखल केले आहे.


 

 


 

(4)         जाबदार क्र.1 कमल नर्सिंग होम यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी  होऊनसुध्‍दा ते मंचापुढे हजर न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश निशाणी 1 वर करण्‍यात आला. 


 

 


 

(5)                   जाबदार क्र.2 डॉक्‍टरांवरती मंचाच्‍या नोटीसीची बजावणी झाल्‍यानंतर त्‍यांनी विधिज्ञांमार्फत आपले म्‍हणणे मंचापुढे दाखल केले. आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये डॉक्‍टरांनी तक्रारदारांवरती शस्‍त्रक्रिया केल्‍याबाबतची वस्‍तूस्थिती जरी मान्‍य केली असली तरीही त्‍यांनी तक्रारदारांच्‍या वैद्यकीय निष्‍काळजीपणाबाबतच्‍या सर्व तक्रारी अमान्‍य केल्‍या आहेत. डॉक्‍टरांच्‍या हलगर्जीपणामुळे तक्रारदारांना दुस-यांदा शस्‍त्रक्रिया करुन घ्‍यावी लागली ही वस्‍तुस्थिती डॉक्‍टरांनी नाकारलेली आहे. ताबडतोब शस्‍त्रक्रिया जर केली नाही तर पाय वाचविणे शक्‍य होणार नाही असे डॉक्‍टर बडवे यांनी आपल्‍याला सांगितले हे तक्रारदारांचे निवेदन डॉक्‍टरांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेले असून अशाप्रकारचे काहीही उदगार आपण तक्रारदारांकडे काढलेले नाहीत असे डॉक्‍टर बडवे यांचे लेखी निवेदन डॉक्‍टरांनी मंचापुढे हजर केले आहे. तक्रारदारांनी जे प्रमाणपत्र हजर केलेले आहे त्‍याच्‍यामध्‍ये गजानन भंडारे नावाच्‍या व्‍यक्तिने सॅम्‍पल दिले असा तसेच डॉ. सुशांत बडवे यांच्‍या कागदपत्रांचा संदर्भ घेतल्‍याचा उल्‍लेख आढळतो.   याप्रकरणातील तक्रारदारांचे नाव सुहास भंडारे असून डॉ. सुश्रूत बडवे यांनी शस्‍त्रक्रिया केलेली आहे याचा विचार करता वापरलेल्‍या मटेरियलबदृल दिलेले प्रमाणपत्र पुराव्‍याच्‍या कामी वाचता येणार नाही असे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे. Orthotext बुकमध्‍ये अशाप्रकारे इम्‍प्‍लान्‍ट अयशस्‍वी होण्‍यासाठी मटेरियल fatigue तसेच कुबडया वापरण्‍याच्‍या डॉक्‍टरांच्‍या सुचना रुग्‍णाने न पाळणे अशा बाबी कारणीभूत ठरतात असा उल्‍लेख आढळतो असे डॉक्‍टरांनी नमुद केले आहे. तक्रारदारांसाठी वापरलेले इन्‍प्‍लान्‍टमध्‍ये उत्‍पादन दोष होता व ते कमी दर्जाचे होते याचा विचार करीता, या उत्‍पादन दोषासाठी डॉक्‍टरांना जबाबदार धरणे अयोग्‍य ठरते असे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे. तक्रारदारांवरती शस्‍त्रक्रिया करताना आपण त्‍यांचे संमतीपत्र घेतलेले असून अशाप्रकारची गुंतागुंत भविष्‍यात होऊ शकते याची आपण त्‍यांना कल्‍पना दिली होती याचा विचार करता तक्रारदारांना आपलेविरुध्‍द तक्रार करण्‍याचा अधिकार नाही असे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे. याप्रकरणातील सर्व वस्‍तुस्थितीचे अवलोकन केले असता आपण तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही ही बाब सिध्‍द होत असल्‍यामुळे सदरहू खोटा व खोडसाळ अर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी डॉक्‍टरांनी विनंती केली आहे. डॉक्‍टरांनी म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयर्थ शपथपत्र व‍ निशाणी 23 अन्‍वये एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत.



 

(6)         प्रस्‍तूत प्रकरणातील डॉक्‍टरांचे म्‍हणणे दाखल झाल्‍यानंतर तक्रारदारांनी निशाणी 25/1 अन्‍वये आपले पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व निशाणी 25/2 ते 25/7 अन्‍वये पुराव्‍याचे कागदपत्र मंचापुढे दाखल केले. यानंतर नेमलेल्‍या तारखेला तक्रारदार व डॉक्‍टरांचा स्‍वत:चा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्‍यात आले. 


 

 


 

(7)        प्रस्‍तूत प्रकरणातील तक्रार अर्ज, म्‍हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षकारांचा युक्तिवाद यांचा साकल्‍याने विचार करता, खालील मुददे (points for consideration) मंचाच्‍या विचारार्थ उपस्थित होतात.


 

     


 

मुद्दा क्र.1 :- डॉक्‍टरांनी वैद्यकीय निष्‍काळजीपणा केला  


 

ही बाब सिध्‍द होते का ?                                      ...    होय


 

 


 

मुद्दा क्र.2 :-  तक्रार अर्ज मंजूर होण्‍यास पात्र आहे का ?        ...    होय  


 

 


 

मुद्दा क्र.3 :-  काय आदेश ? कोणाविरुध्‍द ?             ...    अंतिम आदेशाप्रमाणे


 

विवेचन :-


 

 


 

मुद्दाक्र. 1 :-   प्रस्‍तूत प्रकरणातील डॉक्‍टरांच्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन केले असता त्‍यांनी तक्रारदारांवर दि.१५/११/२००४ रोजी शस्‍त्रक्रिया केली होती व दि.२४/११/२००४ रोजी तक्रारदारांना डिसचार्ज देण्‍यात आला होता, ही वस्‍तुस्थिती त्‍यांना मान्‍य असल्‍याचे लक्षात येते. तक्रारदारांच्‍या तक्रार अर्जावरुन त्‍यांच्‍या दोन तक्रारी असल्‍याचे लक्षात येते. 


 

 


 

1.         डॉक्‍टरांकडे शस्‍त्रक्रिया करताना भूलतज्ञांनी चुकीचे इंजेक्‍शन दिल्‍यामुळे आपला रक्‍तदाब व हृदयाचे ठोके वाढले व त्‍यामुळे आपल्‍याला अति‍दक्षता विभागामध्‍ये दाखल करावे लागले. यानंतर दोन दिवसांनी आपल्‍यावरती शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे. तक्रारदारांच्‍या तक्रार अर्जातील उर्वरित निवेदन व त्‍यांच्‍यातर्फे दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी यासंदर्भात तक्रार जरी केली असली तरी यासंदर्भात आवश्‍यक व सबळ पुरावा त्‍यांनी मंचापुढे दाखल केलेला नाही. सबब तक्रारदारांच्‍या या तक्रारीबाबत कोणताही निष्‍कर्ष काढण्‍यात आलेला नाही. 


 

 


 

2.         डॉक्‍टरांनी आपल्‍या हिप फ्रॅक्‍चरच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या वेळेस जे इम्‍प्‍लान्‍ट मटेरियल व स्‍क्रू वापरले ते हलक्‍या दर्जाचे वापरले व एक स्‍क्रू त्‍यांचेकडून बसविण्‍याचा राहून गेला म्‍हणून आपले फ्रॅक्‍चर नीट जुळले नाही अशी तक्रारदारांची दुसरी तक्रार असल्‍याचे लक्षात येते. हे फ्रॅक्‍चर नीट न जुळल्‍यामुळे आपल्‍याला 15 महिने त्रास सहन करावा लागला व यानंतर अन्‍य हॉस्पिटलमध्‍ये दुस-यांदा केलेली शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाली व आपले दुखणे थांबले असे तक्रारदारांनी नमुद केले आहे. तक्रारदारांची ही तक्रार डॉक्‍टरांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेली आहे. दाखल पुराव्‍याच्‍या आधारे तक्रारदारांची दुसरी तक्रार योग्‍य तक्रार आहे अथवा डॉक्‍टरांचा बचावाचा मुद्दा समर्थनीय ठरतो याबाबत मंचाचे विवेचन पुढीलप्रमाणे :-


 

(i)                तक्रारदारांच्‍या तक्रारीच्‍या अनुषंगे डॉक्‍टरांच्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या वेळेस जे इम्‍प्‍लान्‍ट मटेरियल व स्‍क्रू वापरले ते हलक्‍या दर्जाचे होते मात्र या दर्जासाठी उत्‍पादक कंपनी जबाबदार असल्‍यामुळे त्‍यासाठी आपल्‍याला जबाबदार धरण्‍यात येऊ नये असे त्‍यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील परिच्‍छेद क्र. ८ मध्‍ये नमुद केलेले आढळते. तक्रारदारांवरती झालेल्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या वेळेस बसविलेले स्‍क्रू मोडण्‍यासाठी काही विशिष्‍ठ कारणे असतात त्‍याचा Orthotext पुस्‍तकामध्‍ये उल्‍लेख आढळतो असेही डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील परिच्‍छेद क्र. ७ मध्‍ये नमुद केलेले आढळते. डॉक्‍टरांच्‍या बचावाच्‍या मुद्दयाच्‍या अनुषंगे त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याचे संपूर्ण अवलोकन केले असता आपण तक्रारदारांना दिलेल्‍या सुचना त्‍यांनी पाळल्‍या नाहीत किंवा तक्रारदारांना सांगूनही त्‍यांनी कुबडयाचा वापर केला नाही असे त्‍यांचे म्‍हणणे नाही ही बाब लक्षात येते. Orthotext पुस्‍तकामध्‍ये अशाप्रकारे स्‍क्रू तुटण्‍याची कितीही कारणे नमुद असली तरीसुध्‍दा ही कारणे तक्रारदारांच्‍या बाबतीत लागू होतात असे डॉक्‍टरांचे स्‍वत:चे म्‍हणणे नसताना केवळ पुस्‍तकामधील उल्‍लेखाच्‍या आधारे त्‍यांना यासंदर्भातील आपली जबाबदारी नाकारता येणार नाही असे मंचाचे मत आहे.  


 

(ii)              ज्‍या कंपनीचे इम्‍प्‍लान्‍ट होते त्‍यांनी त्‍यांचा उत्‍पादनाचा दर्जा हलका ठेवला यासाठी आपल्‍याला जबाबदार धरणे योग्‍य नाही असेही डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे. मात्र तक्रारदारांवरती शस्‍त्रक्रिया करुन इम्‍प्‍लान्‍ट बसविताना नेमक्‍या कोणत्‍या कंपनीचे व कोणत्‍या दर्जाचे मटेरियल वापरण्‍याचे आहे हा निर्णय संपूर्णत: डॉक्‍टरांनी स्‍वत: घेतला होता. डॉक्‍टर हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ असल्‍यामुळे त्‍यांनी घेतलेल्‍या या निर्णयाबाबत तक्रारदारांना काही कल्‍पना असण्‍याचे किंवा या निर्णय प्रक्रियेमध्‍ये तक्रारदारांचा सहभाग असण्‍याचे कारण नाही. एखाद्या व्‍यक्तिच्‍या शरीरामध्‍ये जे मटेरियल वापरले जाणार आहे त्‍याचा दर्जा अत्‍यंत उच्‍च आहे याची खात्री डॉक्‍टरांनी स्‍वत: करणे हे त्‍यांचे कर्तव्‍य होते. तक्रारदारांना   College   Of  Engineering,  Pune  यांच्‍या


 

 


 

DEPARTMENT OF METALLURGICAL ENGINEERING च्‍या Professor & Head Department यांनी डॉक्‍टरांनी वापरलेले मटेरियल मनुष्‍याच्‍या शरीरामध्‍ये वापरण्‍यास अयोग्‍य असून ते आय्.एस्.ओ. च्‍या दर्जाशी मिळतेजुळते नाही असे प्रमाणपत्र दिलेले आहे.   आपल्‍या या प्रमाणपत्राच्‍या पृष्‍टयर्थ श्री. जोशी यांनी प्रतिज्ञापत्रसुध्‍दा दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रामध्‍ये      With this affidavit I have attached Photo copies of world standard properties for type 316L Stainless steel for medical implants. Which will indicate the material used was not as per standard” उल्‍लेख असून अशाप्रकारे इम्‍प्‍लान्‍ट मटेरियल वापरताना नेमका कोणता दर्जा आवश्‍यक असून त्‍याचे काही लिटरेचर श्री. जोशी यांनी मंचापुढे हजर केले आहेत. डॉक्‍टरांनी तक्रारदारांच्‍या   शरीरात   बसविलेले  इम्‍प्‍लान्‍ट या दर्जा प्रमाणे नव्‍हते असा  स्‍पष्‍ट   उल्‍लेख डॉ.जोशी यांच्‍या प्रतिज्ञापत्रामध्‍ये आढळतो. डॉ. जोशी यांचे   प्रमाणपत्र,   त्‍यांचे   प्रतिज्ञापत्र व  त्‍यांनी   हजर   केलेल्‍या   कागदपत्रांच्‍या   पार्श्‍वभूमीवर   यासंदर्भात


 

डॉक्‍टरांनी सादर केलेल्‍या पुराव्‍यांचे अवलोकन केले असता हे मटेरियल मानवी शरीरामध्‍ये वापरण्‍यासाठी योग्‍य दर्जाचे आहे असे कोणतेही प्रमाणपत्र त्‍यांनी हजर केलेले आढळत नाही. तक्रारादारांच्‍या शरीरामध्‍ये कोणते इम्‍प्‍लान्‍ट बसविण्‍यात यावे याचा निर्णय संपूर्णत: डॉक्‍टरांनी स्‍वत: घेतलेला असल्‍यामुळे व हाच निर्णय चुकीचा असल्‍यामुळे आता डॉक्‍टरांना उत्‍पादक कंपनीकडे अंगुली निर्देश करुन त्‍यांना स्‍वत:ची जबाबदारी टाळता येणार नाही असे मंचाचे मत आहे. मानवी शरीरामध्‍ये इम्‍प्‍लान्‍ट मटेरियल वापरताना अति उच्‍च कोटीची दक्षता  (highest degree of precaution) डॉक्‍टरांनी घेणे अपेक्षित होते. मात्र त्‍यांनी अशाप्रकारची  दक्षता या प्रकरणामध्‍ये घेतलेली नाही ही बाब सिध्‍द होते. 


 

 


 

(iii)            डॉक्‍टरांच्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन केले असता, आपण इम्‍प्‍लान्‍ट मटेरियल चांगल्‍या दर्जाचा वापरला मात्र तक्रारदारांच्‍या निष्‍काळजीपणामुळे अथवा डॉक्‍टरांच्‍या सुचना न पाळल्‍यामुळे स्‍क्रू पडला असे त्‍यांचे म्‍हणणे नाही ही बाब लक्षात येते. किंबहुना म्‍हणण्‍यातील परिच्‍छेद क्र. 8 मध्‍ये हे मटेरियल हलक्‍या दर्जाचे असल्‍याची बाब डॉक्‍टरांनी मान्‍य केलेली आहे. अशा परिस्थितीत डॉक्‍टरांना हलक्‍या दर्जाचे मटेरियल वापरल्‍यामुळे झालेल्‍या गुंतागुंतीची जबाबदारी टाळता येणार नाही असे मंचाचे मत आहे. आपण तक्रारदारांकडून संमतीपत्रक भरुन घेतले होते व त्‍यामुळे आपण या सर्व बाबींची कल्‍पना दिली होती असे डॉक्‍टरांनी नमुद केले आहे मात्र एखादी शस्‍त्रक्रिया करण्‍यासाठी व त्‍यानंतर होऊ शकणा-या गुंतागुं‍तीची रुग्‍णाला शस्‍त्रक्रिया करण्‍यापूर्वी कल्‍पना देऊन त्‍यासाठी त्‍यांची संमती घेतली म्‍हणजे शस्‍त्रक्रियेच्‍या दरम्‍यान डॉक्‍टरांनी केलेल्‍या वैद्यकीय निष्‍काळजीपणासाठी डॉक्‍टरांना जबाबदार धरता येणार नाही असा त्‍याचा अर्थ नाही. संमतीपत्राच्‍या आधारे कोणत्‍याही डॉक्‍टरांना आपला वैद्यकीय निष्‍काळजीपणा नाकारता येणार नाही असे मंचाचे मत आहे. 


 

 


 

(iv)   डॉक्‍टरांनी तक्रारदारांची शस्‍त्रक्रिया दि.15/11/2004 रोजी केली व त्‍यांना डिसचार्ज दि.24/11/2004 रोजी मिळाला. तक्रारदार सह्याद्री हॉस्पिटलमध्‍ये दि. 8/3/2006 रोजी दुस-या ऑपरेशनसाठी अॅडमिट झाले त्‍यादरम्‍यानच्‍या 15 महिन्‍यांच्‍या कालावधीमध्‍ये तक्रारदारांना सातत्‍याने दुखण्‍याचा त्रास होत होता. अशाप्रकारे शरीराच्‍या आतमध्‍ये बसविलेले इम्‍प्‍लान्‍ट मटेरियल जरी योग्‍य दर्जाचे असले तरीही एवढया कमी मुदतीमध्‍ये स्‍क्रू पडण्‍यासारखी घटना कशी काय घडू शकते याचे कोणतेही समाधानकारक स्‍पष्‍टीकरण डॉक्‍टरांकडून आलेले नाही.


 

 


 

(v)    डॉ. बडवे यांचेकडे जेव्‍हा आपण गेलो तेव्‍हा त्‍यांनी शस्‍त्रक्रिया त्‍वरित करावी लागेल अन्‍यथा आतमध्‍ये सेप्‍टीक होऊ शकेल व त्‍यानंतर पाय वाचविणे कठीण होईल असे आपल्‍याला सांगण्‍यात आले असे तक्रारदारांनी दि.10/7/2006 रोजी डॉक्‍टरांना पाठविलेल्‍या पत्रामध्‍ये उल्‍लेख केला आहे. पत्रातील या उलेखाच्‍या आधारे तक्रारदारांनी डॉ. बडवे यांनी एक पत्र पाठवून याबाबत स्‍पष्‍टीकरण मागितले असता अशाप्रकारचे काहीही उद्गार आपण कधी काढले नाही असे डॉ. बडवे यांनी जाबदार डॉक्‍टरांना लिहून दिलेले आहे.  डॉ. बडवे यांना जाबदार डॉक्‍टरांनी लिहीलेले पत्र व डॉ. बडवे यांचे उत्‍तर डॉक्‍टरांनी मंचापुढे हजर केलेले आहे. डॉ. बडवे यांना जाबदार डॉक्‍टरांनी जे पत्र पाठविलेले आहे त्‍यामध्‍ये दि.9/3/2005 नंतर तक्रारदार आपल्‍याकडे कधीही आलेले नाही असे नमुद केले आहे. डॉक्‍टरांच्‍या पत्रातील या मजकूराला तक्रारदारांनी तीव्र आक्ष्‍ोप घेतला असून ते डॉक्‍टरांकडे दि.1/4/2005, दि.17/6/2005, दि.20/6/2005 व दि.3/3/2006 रोजी गेले होते हे सिध्‍द करण्‍यासाठी या तारखांना त्‍यांना डॉक्‍टरांनी दिलेल्‍या प्रिस्‍क्रीप्‍शनच्‍या प्रती निशाणी 25 अन्‍वये मंचापुढे हजर केलेल्‍या आहेत. या प्रिस्‍क्रीप्‍शनचे अवलोकन केले असता तक्रारदार खरोखरच दि.9/3/2005 नंतर एकूण 4 वेळा जाबदार डॉक्‍टरांकडे गेले होते ही बाब सिध्‍द होते. तक्रारदारांनी हजर केलेल्‍या या प्रिस्‍क्रीप्‍शनवरुन दोन गोष्‍टी सिध्‍द होतात एक म्‍हणजे डॉ. बडवे यांना लिहीलेल्‍या पत्रामध्‍ये दि.9/3/2005 नंतर तक्रारदार आपल्‍याकडे कधीही आलेले नाहीत ही संपूर्णत: खोटी विधाने डॉक्‍टरांनी आपल्‍या पत्रामध्‍ये केली होती. दुसरे म्‍हणजे तक्रारदार जेव्‍हा डॉक्‍टरांकडे या चार तारखांना भेटायला गेले तेव्‍हा हलक्‍या दर्जाच्‍या इम्‍प्‍लान्‍ट मटेरियलमुळे तक्रारदारांना होणा-या त्रासासाठी डॉक्‍टरांनी केवळ औषधोपचार करण्‍यापलिकडे काहीही केले नाही.


 

(vi)       प्रस्‍तूत प्रकरणातील तक्रारदारांनी इम्‍प्‍लान्‍ट मटेरियल कमी दर्जाचे असल्‍याचा तज्ञाचा        अहवाल याकामी दाखल केला आहे. या अहवालात सॅम्‍पल ओनरचे नाव गजानन एस्. भंडारे असे नमुद केलेले आहे तर तक्रारदारांचे नाव सुहास भंडारे आहे तसेच डॉक्‍टरांचे नाव सुश्रूत बडवे प्रत्‍यक्षात असे असताना या अहवालामध्‍ये डॉक्‍टरांचा उल्‍लेख सुशांत बडवे असा आढळतो असा एक आक्षेप डॉक्‍टरांनी घेतला आहे. डॉक्‍टरांच्‍या या आक्षेपाच्‍या अनुषंगे तक्रारदारांकडे चौकशी केली असता गजानन भंडारे हे त्‍यांच्‍या मुलाचे नाव आहे व तो सँपल घेऊन गेला होता अशी पुरशिस त्‍यांच्‍या मुलाच्‍या ड्रायव्हिंग लायसन्‍सच्‍या प्रतीसह त्‍यांनी मंचापुढे हजर केली. तक्रारदारांचे नाव पाहता त्‍यांचा मुलगा हे सॅम्‍पल घेऊन गेलेले असल्‍यामुळे त्‍यांच्‍या मुलाचे नाव या अहवालामध्‍ये नमुद करण्‍यात आले आहे. तसेच डॉक्‍टरांचे नावही केवळ टंकलेखनाची चुक आहे ही बाब दाखल कागदपत्रांवरुन लक्षात येत असल्‍यामुळे केवळ एका टंकलेखनाच्‍या चुकीच्‍या आधारे तक्रारदारांतर्फे दाखल झालेला हा पुरावा अमान्‍य करणे अयोग्‍य व बेकायदेशीर ठरेल असे मंचाचे मत आहे. विशेषत: या तज्ञांच्‍या अहवालाच्‍या पृष्‍टयर्थ तक्रारदारांनी संबंधित तज्ञांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे याचा विचार करता, असे करणे तक्रारदारांवर अन्‍यायकारक ठरेल असे मंचाचे मत आहे, सबब डॉक्‍टरांचे हे आक्षेपाचे मुद्दे अमान्‍य करण्‍यात येत आहेत.  


 

 


 

(vi)             तक्रारदारांनी निशाणी 25/5 अन्‍वये सह्याद्री हॉस्पिटलची जी डिसचार्ज    समरी हजर केलेली आहे त्‍या डिसचार्ज समरीचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये Diagnosis असे नमुद करुन त्‍यापुढे “Non union # ITNF -~ broken previous implant INP left hip” असा उल्‍लेख आढळतो. त्‍यांच्‍याच डिसचार्ज समरीतील क्लिनीकल समरीमध्‍ये तक्रारदारांचे लेफट हिप अजूनही दुखत आहे तसेच आताचे इम्‍प्‍लान्‍ट काढून टाकण्‍यात येत आहे तसेच फायब्रोसिस दिसले असा उल्‍लेख आढळतो. तक्रारदारांच्‍या शरीरामधील स्‍क्रू तुटला होता तसेच वाकला होता असाही त्‍यामध्‍ये उल्‍लेख आढळतो. सह्याद्री हॉस्पिटलच्‍या डिसचार्ज समरीवरुन डॉक्‍टरांनी केलेल्‍या ऑपरेशननंतर तक्रारदारांचे फ्रॅक्‍चर नीट जुळलेले नव्‍हते ही वस्‍तुस्थिती लक्षात येते. अर्थातच तक्रारदार ऑपरेशननंतर 4 ते 5 वेळा जाबदार डॉक्‍टरांकडे दुखण्‍याची तक्रार घेऊन गेले तेव्‍हा ही वस्‍तुस्थिती डॉक्‍टरांच्‍या स्‍वत:च्‍या सुध्‍दा लक्षात येणे शक्‍य होते. मात्र अशाप्रकारचा कोणताही निष्‍कर्ष डॉक्‍टरांनी तक्रारदारांना दिलेल्‍या प्र‍िस्क्रिप्‍शनमध्‍ये नमुद केलेला आढळून येत नाही. एकूण या प्रकरणातील वर नमुद सर्व वस्‍तुस्थितीचे एकत्रित अवलोकन केले असता डॉक्‍टरांनी कमी प्रतीच्‍या / हलक्‍या दर्जाचे इम्‍प्‍लान्‍ट मटेरियल तक्रारदारांवरती शस्‍त्रक्रियेच्‍या दरम्‍यान वापरले तसेच त्‍यानंतर तक्रारदार डॉक्‍टरांकडे दुखण्‍याची तक्रार घेऊन गेले तेव्‍हासुध्‍दा तक्रारदारांचे फ्रॅक्‍चर जुळले नाही असे निदान केले नाही ही बाब सिध्‍द होते. अर्थातच डॉक्‍टरांची वर नमुद कृती त्‍यांचा वैद्यकीय निष्‍काळजीणा सिध्‍द करते, असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. सबब त्‍याप्रमाणे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे. 


 

 


 

मुद्दा क्र. 2 :- डॉक्‍टरांच्‍या वैद्यकीय निष्‍काळजीपणामुळे आपल्‍याला सतत 15 महिने दुखत राहिले व यानंतर दुसरी शस्‍त्रक्रिया करुन घ्‍यावी लागली या वस्‍तुस्थितीचा विचार करता, आपल्‍याला दरमहा रु.20,000/- याप्रमणे रक्‍कम रु.3,00,000/- नुकसानभरपाई देण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांचे जाबदार डॉक्‍टरांकडे जेव्‍हा शस्‍त्रक्रिया केली तेव्‍हा त्‍यांचे वय 66 वर्षे होते. दि.24/11/2004 रोजी डॉक्‍टरांकडून डिसचार्ज मिळाल्‍यानंतर सह्याद्री हॉस्पिटलमध्‍ये दि.8/3/2006 रोजी त्‍यांची शस्‍त्रक्रिया होईपर्यंत तक्रारदारांना सातत्‍याने दुखत होते अशी त्‍यांची तक्रार आहे. डॉक्‍टरांच्‍या सदोष सेवेमुळे तक्रारदारांना या वयामध्‍ये शारीरिक त्रास सहन करावा लागला तसेच डॉक्‍टरांनी केलेली शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी ठरली म्‍हणून त्‍यांना पुन्‍हा शस्‍त्रक्रिया करुन घ्‍यावी लागली या वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी मागणी केल्‍याप्रमाणे त्‍यांना रु.3,00,000/- एवढी नुकसानभरपाई मंजूर करणे योग्‍य व न्‍याय्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब त्‍याप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.      


 

           वर नमुद विवेचनावरुन सदरहू तक्रार अर्ज मंजूर होण्‍यास पात्र ठरतो ही बाब सिध्‍द होते. सबब त्‍याप्रमाणे मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे.


 

 


 

मुद्दा क्र. 3 :-      प्रस्‍तूत प्रकरणातील तक्रारदारांनी कमल नर्सिंग होम या हॉस्पिटलला जाबदार क्र. 1 म्‍हणून जरी सामील केले असले तरी हॉस्पिटलमधील सेवासुविधांबाबत त्‍यांची तक्रार नसून जाबदार क्र. 2 डॉक्‍टर कुलकर्णी यांच्‍या वैयक्तिक सदोष सेवेबाबत तक्रार आहे याचा विचार करता अंतिम आदेश फक्‍त जाबदार क्र. 2 डॉक्‍टर यांचेविरुध्‍द करण्‍यात आलेला आहे. उपरोक्‍त मुद्दयांमध्‍ये नमुद निष्‍कर्ष व विवेचनाच्‍या आधारे प्रस्‍तूत प्रकरणात पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेत.


 

                  // आदेश //


 

     


 

(1)   तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

(2)     यातील डॉक्‍टरांनी तक्रारदारांना नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.3,00,000/- (रक्‍कम रु. तीन लाख मात्र) निकालपत्राची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आत अदा करावेत अन्‍यथा त्‍यांना या रकमेवर निकाल तारखेपासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 12%  दराने व्‍याजही दयावे लागेल.


 

 


 

(3)     यातील डॉक्‍टर यांनी सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.3,000/- (रक्‍कम रु. तीन हजार मात्र) निकालापत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत तक्रारदारांना अदा करावेत.



 

 (4)          वर   नमूद     आदेशांची   अंमलबजावणी जाबदारांनी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.


 

 


 

(5)     निकालपत्राच्‍या प्रती दोन्‍ही पक्षकारांना  नि:शुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.


 

 


 

 


 

                       


 

(श्रीमती. सुजाता पाटणकर)                    (श्रीमती. प्रणाली सावंत)                            


 

    सदस्‍या                                                    अध्‍यक्षा


 

         अतिरिक्‍त पुणे जिल्‍हा मंच, पुणे            अतिरिक्‍त पुणे जिल्‍हा मंच, पुणे 


 

 


 

 


 

पुणे.


 

 


 

दिनांक 09/12/2011    


 

   


 

 
 
 
[ Smt. Pranali Sawant]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.