जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 111/2011.
(मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :177/2010)
आदेश दिनांक : 28/02/2013.
श्री. महेश गजानन माने, वय 32 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. पाटील प्लॉट, शिवाजी नगर, बार्शी, जि. सोलापूर. फिर्यादी
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी.
(यांचे समन्स/नोटीस विरुध्द पक्ष क्र.2 यांचेवर बजावावे.)
2. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
खंडेलवाल बिल्डींग, एस.टी. स्टॅन्डसमोर, बार्शी,
ता. बार्शी, जि. सोलापूर.
3. सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
उपविभाग बार्शी (ग्रामीण), ता. बार्शी, जि. सोलापूर. सामनेवाला
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
आदेश
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. आज रोजी विरुध्द पक्ष यांचे विधिज्ञ मंचासमोर हजर आहेत. विरुध्द पक्षातर्फे मंचामध्ये दि.9/8/2012 रोजी रु.1,35,010/- भरणा केल्याचे व मंचाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचा अर्ज सादर करण्यात आला. सहायक लेखाधिकारी यांनी त्याप्रमाणे रक्कम जमा असल्याचा अहवाल सादर केला आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे संपूर्ण रक्कम भरणा केलेली असल्यामुळे प्रस्तुत अंमलबजावणी अर्ज निकाली काढण्यात आला. विरुध्द पक्ष यांनी सादर केलेला अर्ज या आदेशाचा एक भाग आहे. विरुध्द पक्ष यांचे विरुध्द वॉरंट काढण्यात आले होते. परंतु संपूर्ण आदेशाची पूर्तता पूर्ण झालेली असल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहे. तशी समज विरुध्द पक्ष यांना द्यावी. सदर दरखास्तीमध्ये कोणतेही तथ्य राहिलेले नसल्यामुळे निकाल काढण्यात आली.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/28213)