Maharashtra

Ahmednagar

CC/18/138

Shri. Subhashchandra Bhalchandra Vaidya - Complainant(s)

Versus

1. Manager, United India Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Kale

17 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/18/138
( Date of Filing : 26 Apr 2018 )
 
1. Shri. Subhashchandra Bhalchandra Vaidya
R/O Loni Kurd, Tal. Rahata
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Manager, United India Insurance Co. Ltd.
Kisan Kranti Building, 2nd Floor, Market Yard, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. 2. Manager, United India Insurance Co. Ltd.
Jogeshwari Soc. Biulding, Market yard, Rahuri Branch, Rahuri, Tal. Rahuri
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv. Kale, Advocate
For the Opp. Party: Sujata Gundeja, Advocate
Dated : 17 Feb 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १७/०२/२०२०

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदाराने त्‍याची स्‍कोडा कंपनीची ऑक्‍टोव्हिया मॉडेल चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२ सीके ९०७१ हिचे करीता सामनेवालेकडुन विमा पॉलिसी क्रमांक १६२५०३/३१/१४/पी/ १०३५१४८२६ काढली होती. सदरील विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक १३-०८-२०१४ ते १२-०८-२०१५ पर्यंत होता. दिनांक ०६-०६-२०१५ रोजी सकाळी साधारणतः ६.३० वाजेच्‍या सुमारास वेल्‍हाळे फाट्याजवळुन जात असतांना एक पाण्‍याचा टॅंकर क्रमांक एम.एच.१७ के ५३४९ हे वाहन भरधाव वेगात आले आणि तक्रारदाराचे गाडीला जोरात धडक दिली व अपघात घडला. त्‍यावेळी सदरची वाहन हे तक्रारदाराचा भाऊ मिलींदकुमार वैद्य चालवित होता व सदर वाहनामध्‍ये कुटुंबातील इतर सदस्‍य देखील होते. अपघातामुळे तक्रारदाराची गाडी उभी असल्‍याने नंतर त्‍याचे वाहनाला इतर अज्ञात वाहनाने तक्रारदाराचे गाडीला पाठीमागुन धक्‍का दिला व निघुन गेला. सदरील अपघाताची खबर संगमनेर पोलीस स्‍टेशन येथे गुन्‍हा रजि.नं. II ३७/२०१५ अन्‍वये टॅंकर चालकाचे विरूध्‍द  गुन्‍हा दाखल झाला. तक्रारीत नमुद वाहनाचा अपघात घडल्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवालेंना अपघाताविषयी कळविले व कागदपत्रांची पुर्तता करून विमा मिळणेसाठी क्‍लेम नंबर १६२५०३३११५२ सी ०५०१८३००१ अन्‍वये क्‍लेम फॉर्म भरून जमा केला. सामनेवाले कंपनीने सर्व्‍हेक्षण करणेसाठी त्‍यांचा इन्‍शुरन्‍स  सर्व्‍हेअर, लॉस असेसर श्री. चेतन एस शेकटकर यांचेमार्फत गाडीच्‍या  झालेल्‍या  नुकसानीचा सर्व्‍हे केला.

३.   तक्रारदारास सदरील अपघातग्रस्‍त वाहनाची दुरूस्‍ती करण्‍यासाठी एकुण रक्‍कम रूपये ३,१०,७८५/- अक्षरी तीन लाख दहा हजार सातशे पंचाऐंशी रूपये इतका खर्च आला. त्‍या खर्चाची बिले तक्रारदाराने सामनेवाले इन्‍शुरन्‍स कंपनीकडे जमा केली. तक्रारदाराने सामनेवालेकडे नुकसान भरपाई मिळणेसाठी केलेला दाव्‍यानुसार सामनेवालेने तक्रारदाराचे गाडीच्‍या झालेल्‍या नुकसान भरपाईपोटी दिनांक १७-०२-२०१६ रोजी रक्‍कम रूपये ६०,०००/- व दिनांक ०९-०५-२०१६ रोजी रक्‍कम रूपये १०,०००/- असे एकुण रक्‍कम रूपये ७०,०००/- तक्रारदाराचे खाते असलेल्‍या स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया राहुरी येथे एनईफटी द्वारे जमा केले. परंतु तक्रारदाराच्‍या गाडी दुरूस्‍तीसाठी खर्च रक्‍कम रूपये ७०,०००/- पेक्षा जास्‍त  झालेला होता व आहे. तक्रारदाराने सामनेवाले इन्‍शुरन्‍स कंपनीकडे रक्‍कम रूपये ७०,०००/- वगळता इतर खर्चाची रक्‍कम रूपये २,४०,७८५/- ची मागणी केली असता विविध कारणे सांगुन सामनेवाले विमा कंपनीने रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. म्‍हणुन तक्रारदाराने सदरील तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

     तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवालेने तक्रारदाराचे वाहनाची नुकसानीची रक्‍कम रूपये २,४०,७८५/- व्‍याजासह तक्रारदाराला देण्‍याचा आदेश व्‍हावा व तक्रादाराला झालेल्‍या संपुर्ण खर्चापोटी व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रूपये २५,०००/- तसेच तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

४.   तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दस्‍तऐवज यादी निशाणी ६ सोबत एकूण १२ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये एफ.आय.आर. (सर्टीफाईड प्रत), फिर्याद पुरवणी जबाबसह (सर्टीफाईड प्रत), घटनास्‍थळ पंचनामा (सर्टीफाईड प्रत), तक्रारदाराच्‍या गाडी नुकसानीचा पंचनामा (सर्टीफाईड प्रत), तक्रारदाराच्‍या गाडीचे आर.सी. बुक, ड्रायव्हिंग लायसन्‍स, विमा पॉलिसी प्रत, तक्रारदाराच्‍या गाडीला झालेल्‍या खर्चाची बिले एकूण पाने-४ (सत्‍यप्रत), तक्रारदारास सामनेवालेने दिनांक १७-०२-२०१६ रोजी रक्‍कम रूपये ६०,०००/- दिल्‍याबाबतचे बॅंकेचे स्‍टेटमेंट (सर्टीफाईड प्रत), तक्रारदाराने वकिलांमार्फत सामनेवालेना दिलेल्‍या नोटीसीची स्‍थळप्रत, सामनेवाले यांना नोटीस मिळाल्‍याची पोहोचपावती अस्‍सलप्रत दाखल आहे.

५.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना मे. मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाले हे प्रकरणात हजर झाले व निशाणी १२ वर त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल केलेले आहे. सामनेवालेने लेखी उत्‍तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाले यांचेविरूध्‍द लावलेले आरोप खोटे असुन नाकबुल आहे. सामनेवालेने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराकडुन अपघाताविषयी माहिती मिळाल्‍यानंतर सामनेवाले कंपनीने अपघाताविषयी सर्व्‍हेअरची नियुक्‍ती केली. सर्व्‍हेअरने अपघाताविषयी तक्रारदाराचे वाहनाचे निरीक्षण केलेनंतर वाहनाच्‍या नुकसान रक्‍कम रूपये ६०,०००/- झालेले आहे, असे नमुद केले. तसेच गाडीच्‍या मागील बाजुचे नुकसानीचा विचार केला गेला नाही कारण त्‍याचा उल्‍लेख पोलिसांचे कागदपत्रामध्‍ये नव्‍हता. त्‍यानंतर तक्रारदाराने गाडीच्‍या मागील बाजुस होणा-या नुकसानीचा विचार केला गेला नाही याचेबद्दल फोटोग्राफ दिले. त्‍यानुसार सामनेवालेचे सर्व्‍हेअर यांनी पुन्‍हा पुनर्मुल्‍यांकन करून संपुर्ण एकुण रक्‍कम रूपये ७०,०००/- चे नुकसान झाले आहे, असा अहवाल दिला. असे एकूण एकुण रक्‍कम रूपये ७०,०००/- मंजुर करण्‍यात आले. या पुनर्मुल्‍यांकनवरून  तक्रारदारास संपुर्ण रक्‍कम दिली आहे व सदरील रक्‍कम ही तक्रारदाराने स्विकारलेली आहे. तक्रारदाराने दिनांक १७-०२-२०१६ रोजी सामनेवाले विमा कंपनीकडे रक्‍कम रूपये ७०,०००/- मिळावी यासाठी अर्ज केला होता. त्‍यानुसार रक्‍कम रूपये ७०,०००/- मंजुर करून ते तक्रारदारास देण्‍यात आलेले आहे. पुनर्मुल्‍यांकनानुसार तक्रारदारास रक्‍कम रूपये ७०,०००/- ची रक्‍कम दिलेली आहे व त्‍यास तक्रारदाराने संमती दिलेली असल्‍यामुळे आणि सदरची रक्‍कम रूपये ७०,०००/- ही तक्रारदारास प्राप्‍त झालेली आहे. त्‍यामुळे सदरची तक्रारीमधील मागणी सामनेवालेने पुर्ण केलेली असल्‍याने सदरील तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.

     सामनेवालेने  त्‍याचे म्‍हणणेसाठी निशाणी १३ ला शपथपत्र, नि.१४ ला दिनांक १२-१२-२०१५ रोजीचा सर्व्‍हे रिपोर्ट, तक्रारदाराने कंपनीला दिलेले दिनांक १७-१२-२०१६ रोजीचे पत्र, कंपनीचे पत्र दिनांक १७-०२-२०१६, तसेच दिनांक    ०३-०५-२०१६ चे सत्‍य प्रती दाखल केलेल्‍या आहेत. निशाणी १५ ला तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी १८ ला सर्व्‍हेअर श्री. चेतन सुधाकर शेकटकर यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच दिनांक २५-०४-२०१९ रोजी निशाणी १८ वर शपथपत्रासोबत सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. निशाणी १९ वर सामनेवालेने लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.

६.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्‍तऐवज, शपथपत्र, सामनेवालेने दाखल केलेली कैफीयत, त्‍यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, सर्व्‍हेअरचे शपथपत्र, सामनेवालेने दाखल केलेला लेखी युक्तिवाद तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद याचे अवलोकन केले असता मंचासमक्ष न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमांसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवालेने यांनी तक्रारदाराचे सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

नाही  

(३)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

७.  मुद्दा क्र. (१) :  तक्रारदाराने त्‍याची स्‍कोडा कंपनीची ऑक्‍टोव्हिया मॉडेल चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२ सीके ९०७१ हिचे करीता सामनेवालेकडुन विमा पॉलिसी क्रमांक १६२५०३/३१/१४/पी/ १०३५१४८२६ काढली होती. सदरील विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक १३-०८-२०१४ ते १२-०८-२०१५ पर्यंत होता. ही बाब उभयपक्षांना मान्‍य असुन तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (२) :    सामनेवालेने त्‍याच्‍या बचाव पक्षात अशी बाजु मांडलेली आहे की, तक्रारदाराचे अपघाताविषयी माहितीसाठी सर्व्‍हेअरची नियुक्‍ती केली. सर्व्‍हेअरने अपघाताविषयी तक्रारदाराचे वाहनाचे निरीक्षण केलेनंतर वाहनाचे नुकसान रक्‍कम रूपये ६०,०००/- झालेले होते. त्‍यानंतर तक्रारदाराने मागील बाजुस होणा-या नुकसानीचा विचार केला गेला नाही याचेबद्दल फोटोग्राफ दिले. त्‍यानंतर सामनेवालेतर्फे पुन्‍हा पुनर्मुल्‍यांकन करून संपुर्ण एकुण रक्‍कम रूपये ७०,०००/- चे नुकसान झाले आहे, याबाबत तपासणी अहवाल पाहुन एकुण रक्‍कम रूपये ७०,०००/- मंजुर करण्‍यात आले. पुनर्मुल्‍यांकनानुसार तक्रारदारास रक्‍कम रूपये ७०,०००/- ची रक्‍कम दिलेली आहे. त्‍यामुळे सदरची तक्रारीमधील मागणी सामनेवालेने पुर्ण केलेली असल्‍याने सदरील तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवालेने केली आहे.

     तक्रारदाराने या तक्रारीसोबत अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरूस्‍तीची बिले दाखल केलेली आहेत. परंतु अविनाश ऑटोमोबॉईल्‍स, फ्रेन्‍डस ऑटो केअर, श्रीराम मोटर्स ग्‍लॅस फिटींग यांचेकडे केलेल्‍या खर्चाबाबतचे तक्रारदारातर्फे त्‍यांचे शपथपत्र दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे तक्रारदाराचे तक्रारीत नमुद अपघातग्रस्‍त वाहन दुरूस्‍ती खर्चाबाबतची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही. तसेच तक्रारदाराने स्‍वतः सामनेवाले विमा कंपनीकडे दिनांक १७-०२-२०१६ रोजीचे निशाणी क्रमांक १४/२ सोबत दाखल केलेल्‍या अर्जावर रक्‍कम रूपये ७०,०००/- चा क्‍लेम मंजुर व्‍हावा याबाबत पत्र दिले होते, ही बाब सिध्‍द झालेली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने तक्रारीत केलेली मागणी मिळण्‍यास पात्र नाही. तसेच सामनेवालेंनी तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी दर्शविली नाही, असे मंचाचे मत आहे. सामनेवालेंनी तक्रारदाराला रक्‍कम रूपये ७०,०००/- दिलेली आहे, त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात त्रुटी दिलेली नाही, हे सिध्‍द होते. सामनेवाले विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांनीसुध्‍दा त्‍यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवालेने त्‍यांच्‍या युक्तिवादात तक्रारदाराने दिनांक १७-०२-२०१६ रोजी रक्‍कम रूपये ७०,०००/- ची रक्‍कम विमा दाव्‍याबाबत मिळावी, ही मागणी केली आहे व सदरील मागणी पुर्ण केलेली आहे, असे म्‍हटलेले आहे.  वरील सर्व विवेचनावरून सामनेवालेने तक्रारदारास द्यावयाच्‍या  सेवेत त्रुटी दिली नाही, हे सिध्‍द झालेले आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र.१ चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

९.  मुद्दा क्र. (३) :  मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

२.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी

 

४.  तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.