Maharashtra

Ahmednagar

CC/17/334

1. Dattatray Ramdas Gaikwad - Complainant(s)

Versus

1. Manager, Union Quality Plastic Ltd. - Opp.Party(s)

Adv. Todmal

14 Nov 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/334
( Date of Filing : 06 Dec 2017 )
 
1. 1. Dattatray Ramdas Gaikwad
At Narayanwadi, Post Tamaswadi, Tal. Newasa
Ahmednagar
Maharashtra
2. Smt. Latabai Dattatray Gaikwad
At Narayanwadi, Post Tamaswadi, Tal. Newasa
Ahmednagar
Maharashtra
3. 3. Sandeep Dattatray Gaikwad
At Narayanwadi, Post Tamaswadi, Tal. Newasa
Ahmednagar
Maharashtra
4. 4. Ganesh Dattatray Gaikwad
At Narayanwadi, Post Tamaswadi, Tal. Newasa
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Manager, Union Quality Plastic Ltd.
Plot No. 204/205, G.I.D.C Industrial Estate, Umbergoan 396171,
Valsad
Gujrat
2. 2. Branch Manager, Union Quality Plastic Ltd.
W.I.C., Plot No. 42, 4th Floor, Kombatta Building, East Wing, M. Karve Road, Churchgate, Mumbai 400020
Mumbai
Maharashtra
3. 3. Prop. Shrikrishna Enterprises Shri Sachin Namdevrao Gonte
Opp. Sagar Hotel, Pipeline Road, Ahmendagar 414003
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv. Todmal, Advocate
For the Opp. Party: S. B. Karale Patil, Advocate
 S. C. Ithape, Advocate
Dated : 14 Nov 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १४/११/२०१९

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   सामनेवाले क्र.१ ही शेततळ्यासाठी आवश्‍यक असणा-या प्‍लॅस्टिकच्‍या  कागदाची उत्‍पादन करणारी कंपनी असुन सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचे महाराष्‍ट्र राज्‍याकरीताचे शाखा कार्यालय आहे. तर सामनेवाले क्र.३ हे अहमदनगर शहरातील व्‍यापारी/ सेवा पुरवठादार असुन सामनेवाले क्र.१ व २ यांनी विक्री केलेल्‍या  उत्‍पादनासंदर्भात शेतक-यांच्‍या तक्रारी आल्‍यास त्‍यांचे निवारण करणेकामी व त्‍यांना सेवा देणेकामी सामनेवाले क्र.१ व २ यांनी सामनेवाले क्र.३ यांची नेमणुक केली. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात चर्चा होऊन तक्रारदार क्र.१ यांचे शेतजमिनीमध्‍ये  सुमारे ३० आर क्षेत्रामध्‍ये शेतळ्याची खोदाई, मातीचे अस्‍तरीकरण, तारेचे कुंपन यासाठी रक्‍कम रूपये ५,४८,२४९/-, ५०० मायक्रॉन जाडीचा २६५० चौ.मीटर क्षेत्रफळाचे शेततळ्यासाठीच्‍या प्‍लॅस्टिकच्‍या कागदाची किंमत रक्‍कम रूपये २,०४,०५१/- आणि कागद अंथरून व चिकटुन देणे याची किंमत रक्‍कम रूपये ४७,७००/- अशी एकुण सर्व कामाची एकंदर रक्‍कम रूपये ८,००,०००/- इतकी ठरली. त्‍यानुसार तक्रारदाराने सामनेवाले यांना त्‍याचे दरम्‍यान ठरलेली कामाची किंमत वेळोवेळी रोख स्‍वरूपात अदा केली.  सदरील रक्‍कम मिळाल्‍यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांनी केवळ शेततळ्यासाठीच्‍या प्‍लॅस्टिकच्‍या कागदाची किंमत रक्‍कम रूपये २,०४,०५१/- आणि कागद अंथून व चिकटवुन देणे याची किंमत रक्‍कम रूपये ४७,७००/- अशी एकुण रक्‍कम रूपये २,५१,७५१/- ची बिले दिली.  तसेच सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यास शेततळ्याच्‍या कागदाची पाच वर्षे इतक्‍या कालावधीसाठीची लेखी हमी/ गॅरंटी दिलेली आहे. सामनेवालेंच्‍या सुचनेनुसार शेततळ्याचे काम मे, २०१५ चे महिन्‍यात पुर्ण केल्‍यानंतर तक्रारदारास दिलेल्‍या सुचनेनुसार तक्रारदाराने सदरील शेततळ्यामध्‍ये पाणी भरले. सदरी शेततळे पाण्‍याने भरल्‍यानंतर, त्‍यातील पाण्‍याचा वापर न करता तळ्यातील पाण्‍याची पातळी आपोआप ४ ते ६ फुटाने कमी झाल्‍याचे तक्रारदाराच्‍या निदर्शनास आले. त्‍यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍या कर्मचा-यांनी कागद दुरूस्‍त करून दिला. परंतु पुन्‍हा पाण्‍याची गळती होत असल्‍याने सामनेवाले यांच्‍याशी संपर्क साधल्‍यावर त्‍यांनी सामनेवाले क्र.३ यांना पाठविले.  सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदाराचे शेततळ्यामध्‍ये कागदाची दुरूस्‍ती करून देखील पाण्‍याची गळती थांबली नाही, त्‍यावेळी तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ व २ यांचेशी संपर्क साधुन शेततळ्याचा कागद बदलुन देण्‍याची मागणी केली. त्‍यावर सामनेवाले क्र.१ व २ यांनी वेगवेगळी कारण सांगुन तक्रारदारास शेततळ्याचा कागद बदलवुन देण्‍यास टाळाटाळ केली. याबाबत कृषी विभागाला कळविले असता त्‍यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांना कळवुन देखील सामनेवाले यांनी कागद बलवुन दिला नाही. अशा रितीने तक्रारदाराचे पिकांचे सुमारे १०,५०,०००/-, शेततळे तयार करण्‍याचा खर्च रक्‍कम रूपये ५,४८,२४९, प्‍लॅस्टिक कागदाची किंमत रक्‍कम रूपये २,०४,०५१/- आणि कागद अंथरून व चिकटुन देणे याची किंमत रक्‍कम रूपये ४७,७००/- असे एकुण रक्‍कम रूपये १८,५०,०००/- चे नुकसान झाले आहे. 

     तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी ५०० मायक्रॉन जाडीचा २६५० चौ.मीटर क्षेत्रफळाचा नविन शेततळ्याचा कागद तक्रारदारास विना मोबदला द्यावा, तक्रारदारास प्‍लॅस्‍टीक कागदाची किंमत रक्‍कम रूपये २,०४,०५१/-, सदरील कागदप अंथरून व चिकटुन देण्‍यासाठी अदा केलेली किंमत रूपये ४७,७००/- अशी एकुण रक्‍कम रूपये २,५१,७५१/- सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याकडुन मिळावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रूपये १,००,०००/- सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याकडुन मिळावे, पिकाच्‍या नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रूपये १०,५०,०००/- मिळावे, शेततळ्याची, खोदाई, मातीचे अस्‍तरीकरण, तारेचे कुंपन यासाठी रक्‍कम रूपये ५,४८,२४९ व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये २५,०००/- सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याकडुन मिळावा. 

३.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवालेंना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. सामनेवाले क्र.१ यांना नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा प्रकरणात हजर झाले नाही म्‍हणुन नि.क्र.१ वर सामनेवाले क्र.१ यांच्‍याविरूध्‍द प्रकरणात एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला. सामनेवाले क्र.२ यांनी नि.क्र.१३ वर त्‍यांची कैफीयत सादर केलेली आहे. सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार यांनी तक्रारीत सामनेवाले क्र.२ यांच्‍याविरूध्‍द लावलेले आरोप खरे नसुन सामनेवालेंना मान्‍य व कबुल नाही. सामनेवाले क्र.२ ने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.३ सचिन नामदेवराव गोंटे हे सामनेवाले क्र.२ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.१ कंपनीकडुन प्‍लॅस्‍टीक पेपर घेऊन ते शेतकरी यांना विक्री करण्‍यास तसेच सदरचा कागद शेतकरी यांच्‍या सुचनेनुसार त्‍यांच्‍या शेततळ्यामध्‍ये बसवुन देण्‍याचा व्‍यवसाय करतात. सदरचा कागद बसवतांना शेततळ्यात जर बारीक दगड असल्‍यास पेपरास छिद्र पडु शकतात. म्‍हणुन याबाबतची काळजी घेणे ही जबाबदारी ही संबंधीत शेतकरी याची असते व कंपनीच्‍यावतीने तसेच डिलर यांच्‍यावतीने शेतकरी यांना तश्‍याच प्रकारची सुचना देण्‍यात येतात. इतक्‍यात नव्‍हे  तर सदर सुचना तक्रारदाराला देण्‍यात आली होती. सदर कागद घाईगडबडीत टाकल्‍याने व शेतामध्‍ये बारीक दगड असल्‍याने सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो त्‍यात उत्‍पादक कंपनीची आणि डिलरची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदाराचे प्‍लॅस्‍टीक कपडा बारीक काळे छिद्र  पडल्‍याचे तक्रारीत नमुद करण्‍यात आले आहे. ही बारीक छिद्र बारीक दगडांमध्‍ये  झाले असले तरी त्‍यात कोणताही उत्‍पादीत दोष नाही. शेततलावात अनेक दिवस पाणीसाठा नसल्‍याने नैसर्गीक कारणाने सदरचा कागद खराब झाला असल्‍यास त्‍यास सामनेवाले हे मुळीच जबाबदार नाही. सदरील तक्रारदार याने कागद खराब झाल्‍याबाबत विहीत मुदतीत कंपनीस कळविलेले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही दुषीत सेवा दिलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्द करण्‍यात येऊन सामनेवाले यांना स्‍पेशल कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट रूपये १०,०००/- तक्रारदाराकडुन देण्‍यात यावे, अशी विनंती सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे.  

४.   सामनेवाले क्र.३ यांनी नि.क्र.१६ वर त्‍यांची कैफियत सादर केलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत सामनेवाले क्र.३ यांच्‍याविरूध्‍द लावलेले आरोप खरे नसुन सामनेवालेंना मान्‍य व कबुल नाही. सामनेवाले क्र.३ ने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांचेमार्फत शेततळ्याचे कागदाची उत्‍पादनाची प्रक्रिया पार पाडतांना सदरील उत्‍पादनाच्‍या प्रक्रियेमध्‍ये सामनेवाले क्र.३ यांचा प्रत्‍यक्ष अथवा अप्रत्‍यक्षरित्‍या कोणत्‍याही प्रकारे सहभाग नसतो व नाही. सामनेवाले क्र.३ यांनी कोणताही मोबदला स्विकारून तक्रारदार अथवा सामनेवाले क्र.१ व २ यांना कोणतीही सेवा पुरविलेली नाही. त्‍यामुळे सामनेवाले क्र.१ व २ आणि सामनेवाले क्र.३ यांचे दरम्‍यान कोणताही ग्राहक व विक्रेता अथवा ग्राहक व सेवा पुरवठादार असा कोणताही कायदेशीर नातेसंबंध कधीही प्रस्‍थापित झालेला नाही. शेततळ्याचा कागद अंथरूण चिकटविण्‍याचा खर्च संबंधात संपुर्ण रक्‍कम ही तक्रारदार याने सामनेवाले क्र.१ व २ यांना अदा केलेली आहे. त्‍यामुळे सदर तक्रारदाराच्‍या कोणतीही मागणीस अथवा तक्रारीस सामनेवाले क्र.३ हे जबाबदार नाहीत. म्‍हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.३ यांनी केली आहे.

          तक्रारदाराने दाखल तक्रार, दस्‍तऐवज सामनेवाले क्र.२ व ३ ने दाखल केलेली जबाब व उभयपक्षांची तोंडी युकितवाद मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

अ.क्र.

मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार क्र.१ ते ३ हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ?

होय

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

मुद्दा क्र.१ -    

५.     तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ ने उत्‍पादीत केलेले प्‍लॅस्‍टीक कागद सामनेवाले क्र.२ मार्फत शेत तलावकरीता घेतले होते, ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.६ दस्‍त क्र.६/१ व ६/२ वर दाखल देयकावरून सिध्‍द होते. तक्रारदाराने त्‍याकरीता सामनेवालेकडे रकमांची भरणा केली ही बाब उभयपक्षांना मान्‍य आहे. सबब तक्रारकर्ता हे सामनेवाले क्र.१ ते ३ यांचे ग्राहक आहेत, असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.   

मुद्दा क्र.२ –

६.   तक्रारदाराने नि.क्र.६ वर दाखल दस्‍त क्रमांक ६/१ व ६/२ याची पडताळणी करतांना असे दिसुन  आले  की,  सामनेवाले क्र.२  यांनी  तक्रारदाराला   शेत तलावाकरीता प्‍लॅस्‍टीकचे कागद विकलेले होते, तसेच ते बसविण्‍याकरीता ४७,७००/- रक्‍कम स्विकारली होती. सदर प्‍लॅस्‍टीक कागद सामनेवाले क्र.३ कडुन तक्रारदाराकडे लावण्‍यात आलेला होता. सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीत हे मान्‍य केलेले आहे की, सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो. शेततलावात अनेक दिवस पाणीसाठा नसल्‍याने नैसर्गीक कारणाने सदरचा कागद खराब झाला असल्‍यास त्‍यास सामनेवाले हे मुळीच जबाबदार नाही. सामनेवाले क्र.१ व २ यांनी प्‍लॅस्‍टीक कागद बसविण्‍याकरीता रक्‍कम स्विकारली म्‍हणुन त्‍यांची ही जबाबदारी ठरते की, सदर प्‍लॅस्‍टीक कागद बसविणेवेळी योग्‍य काळजी घ्‍यावी. सामनेवाले क्र.१ व २ यांची ही जबाबदारी आहे की, सदर प्‍लॅस्‍टीक कागद शेत तळ्यात योग्‍य पध्‍दतीने बसविणत यावे व त्‍याच्‍या जोड ठिकाणी प्‍लॅस्‍टीक कागदाचे कोणतेही नुकसान झाले नाही पाहिजे. तक्रारदाराला सामनेवाले क्र.१ व २ यांनी पुरविलेला प्‍लॅस्‍टीक कागद ५०० मायकॉनचा होता किंवा नाही तसेच सदर प्‍लॅस्‍टीक कागद निम्‍न दर्जाचा होता ही बाब तक्रारदाराने तज्ञ विशेषज्ञानाच्‍या अहवालाअभावी सिध्‍द करू शकले नाही. तसेच तक्रारदाराचे शेत तलावावर पशुपक्षी किंवा जंगली जनावरेमुळे सदर प्‍लॅस्‍टीक कागद खराब झाला किंवा दगडांमुळे झाला ही बाबही सामनेवाले क्र.२ यांनी तज्ञ विशेषज्ञानाच अहवलाअभावी सिध्‍द करू शकले नाही. सामनेवाले क्र.२ यांनी सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो, ही बाब कैफीयतीत मान्‍य केलेली असुन सदर प्‍लॅस्‍टीक कागद खराब झाला होता, ही बाब सिध्‍द झाली आहे. सामनेवाले क्र.२ व ३ यांनी सदर प्‍लॅस्‍टीक कागद बसविण्‍याकरीता रक्‍कम स्विकारली होती व सामनेवाले क्र.२ व ३ ने ती योग्‍यप्रमाणे शेत तलावामध्‍ये  बसविलेले नव्‍हते व त्‍यानंतर त्‍याची दुरूस्‍ती किंवा त्‍याची पडताळणी करीता सामनेवाले क्र.१ ते ३ यांना तक्रार प्राप्‍त होऊनसुध्‍दा दुर्लक्ष केले, ही बाब सामनेवाले क्र.१ ते ३ यांची तक्रारदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शविते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्र.३ -    

७.   सामनेवालेने दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाड्याची प्रत, त्‍यातील असलेले तथ्‍य सदर प्रकरणात लागु पडत नाही. तक्रारदाराने शेत तलावात पाणी गळुन गेले असल्‍याने त्‍याचे पिकोच नुकसान रूपये १०,५०,०००/- इतके झाले याबाबत तक्रारदाराने कोणताही दस्‍तऐवज पुरावा प्रकरणात सादर केललेा नाही, ही बाब ग्राह्य धरून तसेच मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरुन खालीलप्रामणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

अंतीम आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.   तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ ला प्‍लॅस्‍टीक कागद  बसविणेकरीता दिलेली रक्‍कम           रूपये ४७,७००/- सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराला परत करावी.

३.    तक्रारदाराला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रूपये २०,०००/-, तसेच               तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी व्‍यक्तिगत व                           संयुक्‍तरितीने द्यावे.

४.   वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी   आदेशाची प्रत                         मिळाल्‍यापासुन ३० दिवसाच्‍या  आत करावी.

५.   तक्रारदारला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करावी.

६.    आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.