जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 98/2011.
(मूळ ग्राहक तक्रार क्रमांक : 595/2009)
आदेश दिनांक : 30/03/2012.
कु. राजेश्वरी रामन्जनुलू कमटम, रा. गणेश नगर,
विजापूर रोड, सोलापूर. फिर्यादी
विरुध्द
1. मॅनेजर एक्सप्लोरा डिझाईन स्कूल, मल्टीमिडिया करिअर्स,
बी/3-4, एशिएटीक ट्रेड सेंटर, नवरंगपुरा, जैन देरसारजवळ,
नवरंगपुरा, अहमदाबाद – 380 009 व इतर 1. सामनेवाला
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
आदेश
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. सदर दरखास्त मंचासमोर सादर केल्यापासून तक्रारदार/फिर्यादी यांनी आजतागायत कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदार हे नेमल्या तारखेस गैरहजर असल्याने सदर दरखास्त तक्रारदार/फिर्यादी यांना चालविण्यामध्ये स्वारस्य / रस नाही, हे स्पष्ट होत असल्याने आहे त्या स्टेजवरुन दरखास्त काढून टाकण्यात आली आहे.
2. यदाकदाचित तक्रारदार / फिर्यादी यांना फलश्रुतीची आवश्यकता व गरज आहे, असे वाटल्यास नवीन दरखास्त / फिर्याद दाखल करण्यास संधी देण्यात आली आहे.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/30312)