Maharashtra

Ahmednagar

CC/17/305

Smt. Jabin Imran Shaikh - Complainant(s)

Versus

1. HDFC Standard Life Insuarance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv Kunde

27 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/305
( Date of Filing : 06 Nov 2017 )
 
1. Smt. Jabin Imran Shaikh
A/P Gokul Nagari, Govindpura, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. HDFC Standard Life Insuarance Co. Ltd.
Corporate And Registered Office, Lodha Exales, 13th floor, Apolo mills Compound, N. M. Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400011
Mumbai
Maharashtra
2. 2.Manager, Claims Review Comity
HDFC Standard Life Insuarance Co. Ltd., 5th floor, I. L. and F. C. Financial Centre, Plot No. C 22, G Block, Bandre Kurla Complex, Bandre West, Mumbai 400051
Mumbai
Maharashtra
3. 3. Manager, HDFC Life Insurance Co. Ltd.
Nagar Manmad Road, Mark Building, Savedi, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Adv Kunde, Advocate
For the Opp. Party: Adv.anand Chanodiya, Advocate
Dated : 27 Feb 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २७/०२/२०२०

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)


१.   तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ नुसार सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, तक्रारदाराचे पती मयत इम्रान इब्राहिम शेख यांनी सामनेवाले क्र.१ यांच्‍याकडुन एल.आय.सी. पॉलिसी दिनांक १८-१२-२०१५ रोजी घेतली. पॉलिसीचा प्रिमीयम रक्‍कम रूपये ५०,०००/- भरला. पॉलिसीचा हप्‍ता दिनांक ०९-११-२०१५ रोजी सामनेवाले कंपनीने स्विकारून पॉलिसी क्‍लाऐंट आय.डी. नं. ९४९७८९९९ असा दिला. सदरील पॉलिसीनुसार मॅच्‍युरीटीनंतर रक्‍कम रूपये ३,२४,२२१/- अशी मॅच्‍युरीटी रक्‍कम होती व डेथ अॅश्‍युअर्ड रक्‍कम रूपये ४,८३,०९०/- अशी होती. यानुसार तक्रारदाराचे पती व एच.डी.एफ.सी.चे दरम्‍यान ग्राहक विक्रेता असा नातेसंबंध निर्माण झाला होता व आहे. सामनेवाले क्र.१ व २ कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार नोंदणीकृत जीवन विमा कंपनी असुन सामनेवाले क्र.२ ही क्‍लेम रिव्हयु कमिटी आहे. तक्रारदाराचे पतीची दिनांक ०२-०२-२०१५ पासुन सर्व पॅथॅलॉजीकल तपासणी करून औषधोपचार करून दरम्‍यानचे काळात तक्रारदार नॅमको कॅन्‍सर हॉस्‍पीटल येथे अॅडमीट झाले होते वया ट्रिटमेंटच्‍या काळात दिनांक १३-१०-२०१६ रोजी तक्रारदाराचे पती कार्डीओ रेस्‍पीरेटरी अरेस्‍ट या आजाराने मयत झाले. तक्रारदार हिने तिच्‍या पतीचा मृत्‍यु झालेबद्दल सामनेवालेचे अहमदनगर येथील कार्यालयात सुचना दिली. तसेच विमा दाव्‍यासंबंधी कागदपत्र व मेडीकल पेपर्स सामनेवाले यांच्‍या कार्यालयामध्‍ये डेथ क्‍लेम पॉलिसीनुसार दिनांक ०६-०७-२०१७ रोजी दाखल केले. सामनेवाले यांच्‍या कार्यालयाने तक्रारदार हिस रक्‍कम रूपये ४८,३०९/- एच.डी.एफ.सी. चे खाते असलेल्‍या बॅंकेमध्‍ये पाठवून दिले. तक्रारदाराचे मयत पती हे विमा कंपनीचे ग्राहक होते व आहेत. तक्रारदाराचे पती मयत झाल्‍यामुळे तक्रारदार ही मयताची कायदेशीर वारस आहे. तक्रारदाराचे मयत पती यांनी स्‍वतःसाठी व कुटुंबियांसाठी भविष्‍यामध्‍ये सुख, समृध्‍दी, आधार व इतर गोष्‍टीसाठी समृध्‍द पॉलिसीची निवड केली होती. तक्रारदार हे तरूण होते व त्‍यांना अचानक आचार उद्भवला आणि त्‍यात ते मयत झाले. मृत्‍युपुर्वी तक्रारदाराचे पतीस कुठलाही आजार नव्‍हता. तक्रारदाराचे पतीच्‍या मृत्‍युनंतर सामनेवाले यांच्‍या कार्यालयाकडे तक्रारदार हिने एजंट मार्फत डेथ क्‍लेम पाठविला. परंतु सदरचा क्‍लेम देणे लागु नये म्‍हणुन सामनेवालेंनी रद्द केला आहे. सामनेवाले व त्‍यांचे एजंट यांनी पॉलिसी घेईपर्यंत सर्व आश्‍वासने दिलेली होती व आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस क्‍लेम मिळण्‍यास कोणत्‍याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, अशी हमी सामनेवालेने तक्रारदारास दिली होती व आहे व ही बाब त्‍यांचेवर कायदेशीर बंधनकारक आहे. परंतु सामनेवाले यांनी चुकीचे कारण दाखवुन क्‍लेम रद्द केला आहे व रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हिचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे व शारीरिक त्रास झाला आहे. म्‍हणून तक्रारदार हिने सदर तक्रार मंचात दाखल केली आहे.

     तक्रारदार हिने तक्रारीत परिच्‍छेद क्रमांक १० मध्‍ये अशी मागणी केली आहे की, तक्रारदाराचा डेथ क्‍लेम अॅश्‍युरन्‍स रक्‍कम रूपये ४,३४,७८१/- व त्‍यावरील देय तारखेपासुन होणारे १२ टक्‍के प्रमाणे व्‍याज तक्रारदारास सामनेवालेकडुन देण्‍याचा हुकुम व्‍हावा, नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रूपये १०,०००/- व मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रूपये १०,००५/- मिळावी तसेच तक्रारदारास सामनेवालेने यांनी दुषित सेवा देऊन त्‍यांची फसवणूक केली म्‍हणुन रक्‍कम रूपये २०,०००/- अशी एकुण रक्‍कम रूपये ४०,०००/- सामनेवाले यांचेकडुन तक्रारदार यांना देण्‍याचा हुकूम व्‍हावा, सदर तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये ५,०००/- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना देण्‍याचा हुकुम व्‍हावा.

३.   तक्रारदार यांनी निशाणी ६ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण ९ कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये आर.पी.ए.डी. ची पोस्‍टाची पावती, अॅड.पी.बी. फुंदे यांची नोटीस, एच.डी.एफ.सी. यांनी पाठविलेले पत्र, प्रिमियम रिसीप्‍ट, साई हायटेक डायग्‍नोस्‍टीक सेंटरचा रिपोर्ट, आधार कार्ड, निशाणी १ अर्ज दाखल केलेला आहे.

४.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाले यांना मे. मंचामार्फत नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाले हजर होऊन निशाणी १४ वर खुलासा दाखल केलेला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील म्‍हणणे व मागणी कबुल नाही, असे म्‍हटले असुन तक्रारदार हिने खोटी व बनावट कथन रचुन सामनेवालेविरुध्‍द कोणतेही कागदपत्र न दाखल करता तक्रारीत रक्‍कम रूपये ४,८३,०९०/- ची मागणी केलेली आहे. सदरील रक्‍कम मिळण्‍यास तक्रारदार कश्‍या पात्र ठरतात, याबद्दल कुठल्‍याही प्रकारचे कागदोपत्री पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेले नाही. तसेच तक्रारदार हिने विमा पॉलिसी दिल्‍यानंतर नामको कॅन्‍सर हॉस्‍पीटल येथील वैद्यकीय कागदपत्रांचा उपयोग करून मे.मंचाचे लक्ष विचलीत करावयाचे आहे. मयत विमा धारक यास २० वर्षापासुन तंबाखु चघळण्‍याची सवय होती. त्‍यामुळे त्‍यास तोंडाचा कॅन्‍सर होऊन त्‍यात त्‍याचा मृत्‍यु झाला आहे. ही खरी वस्‍तुस्थिती तक्रारदार हिने लपवुन ठेवली आहे. याबाबत खालील तक्‍त्‍यात नमुद केलेप्रमाणे तक्रारदाराने वस्‍तुस्थिती लपविलेली आहे.

Document

Date

Noting

Progress Notes by Dr.Abhijit

03.02.2015

P/H/O chronic Tobacco Chewer since Last 20 years

History Sheet by Dr.Nitin

04.02.2015

K/C/O HTN on regular Medication since 10-12 Years

Maya Superspecially Clinic – Prescription by Dr. Shrikant Khare

16.03.2015

C/o Bleeding of Lesion

  • Received 2 cycle of Chemo in Pune.
  • K/C/O HT on medication.

Maya Superspecially Clinic – Prescription by Dr. Shrikant Khare

26.03.2015

Received Chemo on 14-03-2015

Progress Notes by Dr.B. Khaladkar

 

  • Tobacco Chewer
  • Thismus x 3 Years
  • H/o Ulcer Rt. BM

Since April 2014.

  • Mass at Rt. Buccal

Mucosa since 2 ½ Months

  • Biopsy done and increased Squamous Cell Carcinoma

     त्‍यानंतर फॉर्म ‘बी’ प्रमाणे सर्व तपासणी करून डॉक्‍टर दर्शन डी. करमाळकर यांनी १ ते १.५ वर्षापासून विमा धारक आजारी होता आणि त्‍याचा मृत्‍यु तोंडाच्‍या कॅन्‍सरमुळे झाल्‍याबद्दल परिशिष्‍ट ५ ला कागदपत्र जोडले आहेत. त्‍याचप्रमाणे परिशिष्‍ट ६ ला विमाधारक यांनी हॉस्‍पीटलमधुन स्‍वतः त्‍या आजारावर डिस्‍चार्ज घेतला होता. याबाबतचे कागदपत्र तक्रारीत जोडले आहे. तक्रारदार हिने खरी वस्‍तुस्थिती लपवीलेली आहे. तक्रारीतील विमाधारकाचा मृत्‍यु  हा तोंडाच्‍या कॅन्‍सरमुळे झालेला असुन मुळात विमाधारक यास विमा पॉलिसी घेणे पुर्वीचा आजार (Pre Existing disease) असल्‍याबद्दल या कागदपत्रावरून दिसुन येते व तो पुर्वीचा आजार लपविल्‍यामुळे (Supression of material facts)  तक्रारदाराचा विमा दावा रद्द करून विमाधारक यांनी भरलेला प्रिमीयम परत पाठवुन त्‍याची पॉलिसी योग्‍यरित्‍या रद्द केलेली आहे. सामनेवाले यांनी विमा प्रिमीयमची रक्‍कम रूपये ४८,३०९/- ही तक्रारदार हिस परत केलेली आहे. IRDA चे नियम व त्‍यांनी दिलेले मार्गदर्शक तत्‍वाप्रमाणे सदरील कंपनी ही विविध प्रकारच्‍या विमा पॉलिसींची योजना राबविली जाते व IRDA चे नियम हे दोन्‍ही पक्षकारांवर बंधनकारक असतात. इन्‍शुरन्‍स अॅक्‍ट २०१५ कलम  ४५ (अ) च्‍या तरतुदीनुसार विमाधारकाचा दावा रद्द केलेला आहे. या सामनेवालेने कुठल्‍याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही.  तसेच तक्रारदार हिचा विमा दावा योग्‍यरित्‍या नाकारलेला आहे, असे सामनेवालेने नमुद केलेले आहे. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या खुलाश्‍यासोबत निशाणी १५ सोबत एकुण ७ कागदपत्र दाखल केलेले आहे. त्‍यामध्‍ये परिशिष्‍ट ३ - वैद्यकीय तपासणीचे कागदपत्र, परिशिष्‍ट ४ – इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट, परिशिष्‍ट ५ – क्‍लेम फॉर्म ‘बी’, परिशिष्‍ट ६ – डिक्‍लेरेशन बाय लाईफ इन्‍शुरन्‍स, परिशिष्‍ट – ७ नामंजुरीचे पत्र दाखल केले आहे. निशाणी १७ ला तक्रारदार हिने पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी १८ ला सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्‍यातर्फे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. त्‍याचप्रमाणे निशाणी १९ ला सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. निशाणी २१ ला तक्रारदार हिने लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. निशाणी २२ ला सामनेवाले यांनी मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे दाखल केले आहे.

५.   तक्रारदाराची दाखल तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद, सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्‍हणणे त्‍यांनी दाखल केलेले पुराव्‍याचे शपथपत्र व सामनेवाले यांचे वकिलांनी दाखल केलेला युक्तिवाद व सामनेवालेने दाखल केलेले कागदपत्र याचे बारकाईन अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवालेंनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिली आहे

काय ?

होय

(३)

तक्रारदार ही सामनेवाले यांचेकडुन नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचे खर्चाची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

अंशतः होय

(४)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

६.  मुद्दा क्र. (१) :  तक्रारदार हिचे मयत पती इम्रान इब्राहिम शेख यांनी सामनेवाले यांच्‍याकडुन एच.डी.एफ.सी. लाईफ संपूर्ण समृध्‍दी प्‍लस ही पॉलिसी क्रमांक १८०४५६८६ घेतली होती, ही बाब उभयपक्षांना मान्‍य आहे. तक्रारदार ही तिचे मयत पती इम्रान इब्राहिम शेख यांची वारस असल्‍यामुळे व ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २ (१) (ड) प्रमाणे लाभार्थी असल्‍याने ती सामनेवालेची ग्राहक आहे, असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

७.  मुद्दा क्र. (२)  -  विमा कालावधीत तक्रारदार हिचे पतीला हॉस्‍पीटलमध्‍ये  अॅडमीट करून उपचार करण्‍यात आले, ही बाब विवादीत नाही. तक्रारदारातर्फे त्‍यांच्‍या लेखी युक्तिवादात असे कथन आहे की, तक्रारदारचे पतीने सामनेवालेकडुन संपूर्ण समृध्‍दी प्‍लस ही पॉलिसी क्‍लयाएंट आय.डी.नं. ९४९७८९९९ नुसार घेतली होती. त्‍यानुसार तक्रारदार हिचे मयत पती यांची डेट ऑफ रिस्‍क ही दिनांक ०९-११-२०१५ पासुन सुरू झाली. तक्रारदार हिचे पतीचा क्‍लेम रद्द करण्‍यास कुठलेही रास्‍त व संयुक्‍त कारण घडले नसुन सामनेवाले यांनी पॉलिसी घेईपर्यंत सर्व आश्‍वासने तक्रारदारास दिलेली होती व आहे. त्‍यानंतर सामनेवाले यांना तक्रारदार हिस डेथ क्‍लेम मिळणेबाबत कुठल्‍याही प्रकारची अडचण होऊ देणार नाही, असे सांगितले. तक्रारदार हिचे पतीचा डेथ क्‍लेम रद्द करण्‍यास संयुक्तिक कारण घडले नाही. तक्रारदाराचे मयत पती इम्रान इब्राहिम शेख यास अचानक आजार उद्भवला त्‍यामुळे नॅमको हॉस्‍पीटल येथे अॅडमिट झाले होत व ट्रिटमेंटच्‍या काळात दिनांक १३-१०-२०१६ रोजी कार्डीओ रेस्‍पीरेटरी अरेस्‍ट या आजराने मयत झाले. तक्रारदार यांच्‍या मयत पतीचा डेथ क्‍लेम पॉलिसीची रक्‍कम सामनेवाले यांनी नाकारून सेवा देण्‍यात कमतरता केली आहे. याबाबत सामनेवाले यांच्‍यातर्फे लेखी युक्तिवाद असा आहे की, सामनेवाले यांनी विमा दावा तपासुन अहवालानुसार योग्‍यरित्‍या विमा दावा नाकारला आहे. तसेच सामनेवाले कंपनीने त्‍यांच्‍या तज्ञ डॉक्‍टरांकडुन विमा दावा तपासणी करून सदर तपासणीत मयत विमा धारक यास तंबाखु चघळण्‍याची सवय होती. तपासणी अहवालात Tobacco Chewer, Thismus x 3 yeras, H/o Ulcer Rt. BM since April 2014, Mass at Rt. Buccal Mucosa since 2 ½  Months, Biopsy done and increased Squamous Cell Carcinoma असे नमुद आहे. या कारणामुळे तोंडाच्‍या कारणामुळे विमा धारकाचा मृत्‍यु झालेला आहे व त्‍या संदर्भात तपासणी अहवाल सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यासोबत दाखल केलेले आहे. अहवालात नमुद सर्व वैद्यकीय कागदपत्रांवरून तक्रारदाराचे पतीवर तोंडाच्‍या कॅन्‍सर संदर्भात उपचार करण्‍यात आलेले असुन सदरचा त्रास पॉलिसी घेण्‍यापुर्वीपासुन असल्‍याचे स्‍पष्‍ट होते व पुर्वीचा आजार (Pre Existing disease) पॉलिसीच्‍या क्‍लॉजनुसार (Supression of material facts) मंचापासुन सत्‍य परिस्थिती लपवुन ठेवली आहे. त्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व नियमानुसार सामनेवाले यांना रक्‍कम रूपये ४८,३०९/- चा प्रिमीयम दिनांक ०६-०७-२०१७ रोजी एच.डी.एफ.सी.चे बॅंक खात्‍यामध्‍ये एन.ई.एफ.टी.द्वारे पाठविलेला आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार तक्रारदार हिचा विमा दावा योग्‍यरित्‍या नाकारला आहे. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या  लेखी युक्तिवादात नमुद करून परिच्‍छेद ६ (अ) (ब) मध्‍ये मा.वरिष्‍ठ  न्‍यायालयांचे विविध न्‍यायनिवाड्यांचा उहापोह केला आहे. तसेच सामनेवाले यांनी निशाणी २२ सोबत मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे दाखल केलेल आहे.

     सामनेवाले यांच्‍या वरील युक्तिवादास सदरील मंच सहमत नाही. कारण तक्रारदाराचे पतीवर उपचार करण्‍यात आले त्‍या आधारे तक्रारदाराचे पतीला पुर्वीचा आजार (Pre Existing disease) होता, असा निष्‍कर्ष काढला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार हिचा विमा दावा तपासणी करून तपासणी अहवाल त्‍यांनी दाखल केला. परंतु तपासणी अहवाल तज्ञाचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले नाही.  तसेच त्‍यांची साक्ष घेतली नाही. त्‍याचप्रमाणे सामनेवाले यांनी त्‍या बाबत सबळ पुरावा व पुरेसा पुरावा दाखल केलेला नाही. 

     विमाधारक हा पॉलिसी घेणेचेपुर्वी अत्‍यंत गंभीर आजाराने ग्रस्‍त होता, असा बचाव सामनेवाले यांनी घेतला आहे. परंतु ही बाब सबळ पुराव्‍यानिशी सिध्‍द करण्‍याची जबाबदारी सामनेवाले यांची आहे. त्‍यामुळे तोंडाचा कर्करोगामुळे विमा पॉलिसीधारकाचे निधन झालेबाबत सामनेवाले हे सबळ व पुरेसा पुराव्‍यानिशी सिध्‍द करू शकले नाही. तक्रारदार हिने तक्रारीसोबत दाखल केलेले शपथपत्र, पुराव्‍याचे शपथपत्र तसेच लेखी युक्तिवादात दिनांक १३-१०-२०१६ रोजी तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू कार्डीओ रेस्‍पीरेटरी अरेस्‍ट ने झाला आहे, या बाबत नमुद केले आहे. सामनेवालेने दाखल केलेले कागदपत्र निशाणी १५/२ यातील नाशिक महानगर पालीका यांनी जारी केलेले मयत विमाधारकाचे मृत्‍यु बाबत वैद्यकीय प्रमाणपत्रात मृत्‍युचे कारण कार्डीओ रेस्‍पीरेटरी अरेस्‍ट, असे नमुद आहे. या कागदपत्रांवरून तक्रारदार यांचे विमा धारक मयत पती इम्रान इब्राहिम शेख यांचा मृत्‍यु कार्डीओ रेस्‍पीरेटरी अरेस्‍ट ने झाला, असे दिसत आहे. या संदर्भात मे. मंच मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांचा Sulbha Prakash Motegaonkar Anr Ors. Vs. Life Insurance Corporation of India – Dt.05-10-2015 या न्‍यायनिवाडाचा आधार घेत असुन यामध्‍ये पुढील मुद्दा नमुद केलेला आहे.

     ‘  .. We are of the opinion that the National Commission was in eror in denying to the appellants the insurance claim and accepting the repudiation of the claim by the respondent. The death of the insured due to ischaemic heart disease and myocardial infarction had nothing to do with his lumber spondilitis with PID with sciatica.  In our considered opinion, since the alleged concealment was not of such a nature as would disentitle the deceased from getting his life insured, the repudiation of the claim was incorrect and not justified.

       Accordingly, we set aside the order passed by the National Commission and allow the appeal.  The respondent will accept the claim made by the appellants within a period of four weeks from today and make the due payment.’   

     या मुद्यानुसार सदरचा न्‍यायनिवाडा हा या तक्रारीस लागु होतो, असे मंचाचे मत आहे. विमा दावा चुकीच्‍या कारणाने नाकारला गेला आहे व कथीत आजार लपवला आहे, हे सिध्‍द झालेले नाही व या कारणावरून तक्रारदार ही विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास अपात्र ठरत नाही. त्‍यामुळे विमा दावा नाकारणे हे चुकीचे असुन तो नाकारणे योग्‍य नाही, असा निष्‍कर्ष काढुन मेहरबान नामदार राष्‍ट्रीय आयोग, न्‍यु दिल्‍ली यांचेकडे रद्द झालेले आपील मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी मंजुर केले केले व ४ महिन्‍याचे आत अपीलन्‍टला विमा दाव्‍याची रक्‍कम अदा करावी, असे मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे. सदरील न्‍यायनिवाडा लागु होत आहे. तक्रारदार हिचा विमा दावा चुकीचे कारणाने रद्द केला व विमा प्रिमीयमची रक्‍कम रूपये ४८,३०९/- तक्रारदार हिस परत पाठ‍वुन दिली, ही सामनेवालेने तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (३)  -  तक्रारदार हिने तिच्‍या विनंती कलमामध्‍ये डेथ क्‍लेम अॅश्‍युरन्‍स रक्‍कम रूपये ४,३४,७८१/- मिळणेची मागणी केली आहे, परंतु डेथ क्‍लेम बाबतची किती रक्‍कम देय आहे, याबाबत कुठलाही पुरावा तक्रारदार हिने दाखल केलेला नाही. सामनेवाले यांनी दाखल केलेला विमा दावा नामंजुरीचे पत्र ०६-०७-२०१७ चे आहे तसेच क्‍लेम प्रपोजल फॉर्ममध्‍ये सम अॅश्‍युयर्ड रक्‍कम रूपये ३,२४,२२१/- अशी नमुद आहे. त्‍यामुळे सदरची रक्‍कम व्‍याजासह तक्रारदारास देणे उचीत ठरेल. तसेच तक्रारदार हिस झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल त्‍याचप्रमाणे तक्रार अर्जाचे खर्चापोटी काही अंशी रक्‍कम देणे उचित ठरेल, हे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक ३ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.   

९.   सामनेवाले यांनी सदर प्रकरणात मा.‍ वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे दाखल केले असुन, ते खालीलप्रमाणे आहे.

  1. Maharashtra State Consumer Dispues Redressal Commission, Circit Bench At Aurangabad  - Dt.13-05-2014

 Smt. Sunanda Dhananjay Lahoti Vs. The Metlfie India Insurance.

  1. Supreme Court of India  - Dt.10-07-2009

Satwant Kaur Sandhu Vs. New India Assurance Company Ltd.

  1.  Supreme Court of India – Dt.21-08-1996

United India Insurance Co.Ltd. Vs. M.K.J. Corporation

  1.  Supreme Court of India – Dt.20-11-2007

P.C. Chacko And Another Vs. Chairman, Life Insurance

  वरील न्‍यायनिवाड्यांमधील तथ्‍ये व सदर तक्रारीतील तथ्‍य वेगळे असुन सदर प्रकरणात लागु पडत नाही, हे मंचाचे मत आहे.  

१०.  मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

   आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

२. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारदार हिस सम अॅश्‍युअर्ड विमा दाव्‍याची रक्‍कम रूपये ३,२४,२२१/- (तीन लाख चोवीस हजार दोनशे एकवीस मात्र) व त्‍यावर दिनांक ०६-०९-२०१७ पासून संपुर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

३.  सामनेवाले यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) द्यावा.

४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.  

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.