Maharashtra

Additional DCF, Pune

cc/10/129

Mr. Ayaz M. Khan - Complainant(s)

Versus

1. General Moters India Pvt Ltd - Opp.Party(s)

N . K. Gole

10 Apr 2013

ORDER

 
Complaint Case No. cc/10/129
 
1. Mr. Ayaz M. Khan
Plot no 61 -B , Puna Collage Hsg Society, Wadgaon Sheri Pune
...........Complainant(s)
Versus
1. 1. General Moters India Pvt Ltd
Talegaon Tq-Maval, Dt- Pune
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारांतर्फे            -     अॅड.श्री. गोळे  


 


जाबदार क्र. 1 व 3 तर्फे    -     अॅड.श्री. ठाकूर

जाबदार क्र. 2            -    एकतर्फा

 


 

 


 

// निकाल //


 

 


 

पारीत दिनांकः-10/04/2013    


 

(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्‍यक्ष )


 

 


 

 


 

          तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांचेकडून शेवरोलेट स्‍पार्क 1.0 बेस पीएस मॉडेल ही कार दि. 14/11/2008 रोजी खरेदी केली. जाबदेणार क्र. 1 हे शेवरोलेट स्‍पार्क कारचे उत्‍पादक असून जाबदेणार क्र. 3 हे एरिया मॅनेजर आहेत. तक्रारदारांचे असे म्‍हणणे आहे की, कार खरेदी केल्‍यानंतर प्रवास करतेवेळेस त्‍यांना असे आढळून आले की, कार इग्निशीनच्‍या वेळेस इंजिनमधून क्रॅकींगचा आवाज येत होता म्‍हणून तक्रारदारांनी दि. 15/12/2008 रोजी जाबदेणार क्र. 2 यांचेकडे याबद्दलची तक्रार केली. त्‍यावर जाबदेणार क्र.2 यांनी कारच्‍या पहिल्‍या सर्व्‍हीसींगच्‍या वेळेस एकूण 758 किलोमीटरचे रनिंग झाल्‍यानंतर कारमधील तक्रारींचे निवारण करुन देऊ असे तक्रारदारास आश्‍वासन दिले. तक्रारदारांनी या कारचे सर्व्हिसींग दि.16/12/2009 रोजी केले व कारच्‍या इग्निशीनच्‍या वेळेस क्रॅकींगचा आवाज होत असल्‍याबद्दल सांगितले. सर्व्हिसींग झाल्‍यानंतर ती कार जाबदेणारांनी तक्रारदारास परत केली. पुन्‍हा तसाच क्रॅकिंगचा आवाज ऐकू येत होता म्‍हणजेच जाबदेणारांनी त्‍या दोषाचे निवारण केलेच नाही. म्‍हणून तक्रारदारांनी पुन्‍हा जाबदेणार क्र. 2 यांना याबद्दल विचारले असता, आवाज आपोआप कमी होईल असे त्‍यांनी सांगितले. प्रथमत: हा आवाज वेगळा येत होता परंतु त्‍यानंतर केव्‍हाही वाहन चालू असताना असा आवाज येत होता. जाबदेणार क्र. 2 यांना याबद्दल पुन्‍हा विचारणा केली असता, दुस-या सर्व्हिसींगपर्यंत थांबावे असा सल्‍ला दिला आणि तरीही त्‍यामध्‍ये दोष राहिला तर जाबदेणार क्र. 1 यांचेकडे कार पाठवून देऊ अशी हमी दिली. कार चालविताना तक्रारदारास या आवाजामुळे नेहमीच धास्‍ती वाटायची त्‍यामुळे त्‍यांचे कुटुंबीय कारमध्‍ये बसत नव्‍हते आणि कार कमी वापरात येत होती. दुस-या सर्व्हिसींगच्‍या वेळेस म्‍हणजेच दि.11/5/2009 रोजी जाबदेणार क्र. 2 यांनी कारचा हा आवाज स्‍टेअरींग पंपमध्‍ये बिघाड असल्‍यामुळे वॉरंटीमध्‍ये ते बदलून मिळेल असे सांगितले म्‍हणून स्‍टेअरींग पंप वॉरंटीमध्‍ये बदलून दिले. हा पंप बदलून दिला तरी कारच्‍या क्रॅकिंगचा आवाज येतच होता. ब्रेक्‍स नंतर स्‍टेअरींग पंप हा फार महत्‍वाचा भाग असतो. स्‍टेअरींगमध्‍ये बिघाड झाल्‍यास मोठा अपघात होऊ शकतो असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे. दि.11/5/2009 रोजी तक्रारदारांनी जाबदारांना दुस-या सर्व्हिसींगसाठी कार परत केली. परंतु दि. 1/7/2009 रोजी पुन्‍हा क्रॅकिंगचा आवाज मोठया प्रमाणावर येऊ लागला. म्‍हणून तक्रारदारांनी कार पुन्‍हा जाबदार क्र. 2 यांचेकडे ठेवून घेतल्‍यानंतर ती परत केली मात्र त्‍यात तोच दोष कायम राहिला. त्‍यानंतर तक्रारदारांनी ही कार दुरुस्‍तीसाठी दि.9/11/2009 रोजी, दि.16/11/2009 रोजी, दि.9/12/2009, दि.11/1/2010 रोजी आवाजाचे निवारण करण्‍यासाठी दिली. प्रत्‍येक वेळेस आवाजाचा दोष निवारण झाला असे सांगितले होते. परंतु जाबदेणार हे दोष निवारण करण्‍यास असमर्थ ठरले, दोष तसाच कायम राहिला. तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांना official complaint दि.1/6/2009, दि. 16/7/2009 रोजी व तिस-यांदा Complaint प्रेसीडेंट व मॅनेजींग डायरेक्‍टर यांना दि.8/8/2009, दि.6/10/2009 रोजी परत एकदा दिली. कार दुरुस्‍तीला ठेवून देऊनही दोष मात्र तसाच राहिला. जाबदेणार क्र. 1 यांच्‍या वतीने जाबदेणार क्र 3 एरिया मॅनेजर श्री. रवी हांडे यांनी सुध्‍दा सदरील कारमधून येणा-या आवाजाची पडताळणी केली आणि जाबदेणार यांच्‍या डिलरच्‍या गॅरेजवर दि.11/1/2010 रोजी दुरुस्‍तीसाठी नेऊन ती कार दि.16/1/2010 रोजी परत दिली. तरीही त्‍या कारमधून क्रॅकिंगचा आवाज येतच राहिला, दोष तसाच राहिला. प्रत्‍येकवेळी कार दुरुस्‍तीसाठी नेल्‍यामुळे कार दुरुस्‍तीच्‍या वेळेस डिलर यांनी त्‍यांच्‍या कारमधील बहुतेक पार्टस काढले. या प्रत्‍येक वेळेस कार दुरुस्‍त झाली, ताबा घेतेवेळेस तक्रारदारास त्‍यांच्‍या कारच्‍या डिक्‍कीमध्‍ये पार्टस व्‍यवस्थित बसविले नाहीत असे निदर्शनास आले. सदरील पार्टस पहिल्‍यांदाच व्‍यवस्थित बसविणे आवश्‍यक असतानाही सदरील पार्टस व्‍यवस्थित बसविण्‍यासाठी तक्रारदारांना प्रत्‍येक वेळेस ही कार डिलरकडे नेणे भाग पडत होते. कार तक्रारदारांच्‍या घरातून डिलरकडे घेऊन जाण्‍यासाठी व आणण्‍यासाठी, कारच्‍या टेस्‍टींगसाठी सदरील कार जास्‍त अंतरावर घेऊन जाण्‍यासाठी तक्रारदारास पेट्रोलचा वापर करावा लागत होता. स्‍टेअरींग पंपच्‍या दुरुस्‍तीसाठी डिलर किंवा सदरील स्‍टेअरींग डाव्‍या व उजव्‍या बाजूस फिरवल्‍याने कारचे पुढील टायर कमकुवत झाले, त्‍याची भरपाई दिली नाही. कारची खूपवेळा दुरुस्‍ती झाल्‍याने फॅक्‍टरी सेटींग सुध्‍दा पूर्णपणे अस्‍ताव्‍यस्‍त झाले. फॅक्‍टरीमध्‍ये कार ठेवण्‍याच्‍या जागी कारचे इंजिन आणि कारचे पार्टस हे मेकॅनिकली व्‍यवस्थित मशिनरीद्वारे बसविले असतात. जाबदेणारांनी गॅरेजमध्‍ये सदरील इंजिनाचे पार्टस व्‍यवस्थितपणे बसविले नाहीत व माणसांकरवी सदरील पार्टस् बसविण्‍यात आले. त्‍यामुळे कारचे मुळ फिटींग पूर्णपणे बदलले गेले. कारच्‍या उत्‍पादनामध्‍येच दोष असूनसुध्‍दा कंपनीच्‍या तज्ञांना देखील कारच्‍या दोषाचे निवारण करता आले नाही म्‍हणून तक्रारदार कार बदलून मागतात. काहीवेळा जाबदेणार यांनी कारचा ताबा देताना कारवर ओरखडे दिसले. कारमध्‍ये उत्‍पादकीय दोष असताना जाबदेणारांनी ही दोषयुक्‍त कार तक्रारदारास विकली असल्‍यामुळे आणि एक वर्ष सदरील दोषाचे निवारण केले नाही म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून इंधनाचा खर्च, टायरचा खर्च, ओरखडे, अंतर्गत मॅट हरविल्‍याचा खर्च, टेपरेकॉर्डचे झालेले नुकसान, एसी डक्‍ट मधील अॅन्‍टेनाचा तुकडा, सिट कव्‍हर्सचे नुकसान, मागील टायरचे पंक्‍चर, कारचे पार्टस खूपवेळा काढल्‍यामुळे कारचे मुळ स्‍वरुपातील झालेला बदल, इंटरनेट व फोन कॉल चार्जेस. दुरुस्‍तीसाठी कार वेळोवेळी दिल्‍यामुळे सार्वजनिक वाहन वापरावे लागले. स्‍टेअरींग पंपमध्‍ये दोष असल्‍यामुळे 50 ते 60 किलोमीटर तासी वेगाने कार चालू न शकल्‍यामुळे खर्ची झालेला काळ आणि वेळ, मानसिक त्रास, दुस-याची कार अनेकवेळा मागवावी लागली, दोषयुक्‍त कारमुळे हायवेवर वेगाने कार चालवून प्राण गमविण्‍याची सतत शक्‍यता व भिती इ. कारणांसाठी तक्रारदार जाबदेणारांकडून एकूण रक्‍कम रु. 14,68,900/- 18 टक्‍के व्‍याजदराने व्‍याज, खर्च तसेच कार बदलून मागतात. 


 

            तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत आणि वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकाल दाखल केले आहेत.


 

 


 

2.          जाबदेणार क्र. 2 यांची नोटीस “Refused” या पोस्‍टाच्‍या शे-यासहित परत आली आहे. म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द दि.18/12/2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला.                                                                         


 

 


 

 


 

3.    जाबदेणार क्र. 1 व 3 यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्‍या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांनी त्‍यांचा लेखी जबाब मुळ तक्रारीवर आणि एक्‍सपर्ट एव्हिडन्‍सच्‍या अहवालावर दिलेला आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तो अहवाल तक्रारदाराच्‍या तक्रारीस उपयुक्‍त ठरत नाही. तक्रारदारांच्‍या कारमधून क्रॅकिंगचा आवाज येत होता, तो आवाज कार स्‍टार्ट करतेवेळेस येत होता. जाबदेणारांच्‍या संपूर्ण लेखी जबाबामध्‍ये कार कोल्‍ड कंडिशनमध्‍ये असताना आवाज येत होता आणि हॉट कंडिशनमध्‍ये असताना आवाज येत नव्‍हता असे जाबदेणारांचे म्‍हणणे आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, ऑईल हे ल्‍यूब्रीकंटचे काम करते, शॉक अॅबसॉर्बर हे क्लिनींग एजंट म्‍हणून काम करते. इंजिन स्‍टार्ट होतेवेळेस ऑईल इंजिनमधील पार्टसमध्‍ये मिसळत होते. इंजिनचा कोल्‍ड कंडिशनपेक्षा हॉट कंडिशनमध्‍ये आवाज कमी येत होता. हा आवाज हा नॉर्मल आवाज आहे हे जाबदेणारांचे म्‍हणणे आहे. ज्‍यावेळेस ते हॉट कंडिशनमध्‍ये होते त्‍यावेळेस कोल्‍ड कंडिशनपेक्षा कमी आवाज येत होता.    जाबदेणारांनी त्‍यांच्‍या पूर्ण लेखी जबाबामध्‍ये हीच हीच वाक्‍य वारंवार लिहील्‍याचे दिसून येत आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबामध्‍ये पॅरा एच मध्‍ये देखील उत्‍पादकीय दोष नाही, कार व्‍यवस्थितरित्‍या चालते, पळते, त्‍यास चार वर्षे झालेली आहेत, फक्‍त रुटीन मेंटेनन्‍स सर्व्‍हीसची आवश्‍यकता आहे. जर त्‍यामध्‍ये खरोखरच उत्‍पादकीय दोष असता तर तो दोष लागलीच दिसून आला असता, चार वर्षापर्यंत राहिला नसता. तक्रारदारांनी जो तज्ञाचा अहवाल दिलेला आहे त्‍यावर इन्‍स्‍ट्रूमेंट आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटमधील तज्ञाची सही असल्‍याचे दिसून येते. ऑटोमोबाईल इं‍जिनिअर आणि टेक्‍नॉलॉजी तज्ञाचा त्‍यांनी पुरावा आणलेला नाही.    


 

 


 

            वरील कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी असे जाबदेणरांचे म्‍हणणे आहे. 


 

 


 

            जाबदेणारांनी शपथपत्र, वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडे दाखल केलेले आहेत. 


 

 


 

 


 

4.          दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांची तक्रार ही कारमधील आवाजाबद्दलची आहे. त्‍यांच्‍या कारमध्‍ये कार स्‍टार्ट करतेवेळेस क्रॅकिंगचा आवाज येत होता आणि तो वाढत गेला असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. त्‍यासाठी त्‍यांनी जाबदेणार क्र. 2 यांचेकडे अनेकवेळा कार दुरुस्‍तीसाठी आणली होती परंतु जाबदेणारांनी त्‍यातील दोष न काढताच ती तक्रारदारास परत केली. यावर जाबदेणारांचे असे म्‍हणणे आहे की, कार कोल्‍ड कंडीशनमध्‍ये असताना हॉट कंडिशनपेक्षा जास्‍त आवाज येतो, हे ते मान्‍य करतात म्‍हणजेच जाबदेणार हे क्रॅकिंग साऊंड कारमधून येतो हे मान्‍य करतात. जाबदेणारांनी त्‍यांचा लेखी जबाब दिला आहे, त्‍यामध्‍ये त्‍यांना काय म्‍हणायचे आहे हे व्‍यवस्थितरित्‍या त्‍यांनी सांगितले नाही. वास्‍तविक पाहता, जाबदेणार क्र. 2 कारचे डिलर आहेत, कार तपासणीच्‍या वेळेस तज्ञ आले असता त्‍यांनी कारमध्‍ये कसा दोष नाही हे स्‍पष्‍टपणे आणि व्‍यवस्थितरित्‍या ते सांगू शकले असते. परंतु त्‍यांनी कुठलाही तज्ञाचा रिपोर्ट आणला नाही, स्‍वतंत्र इंजिनिअरचा रिपोर्ट आणला नाही. मात्र तक्रारदारांनी पद्मश्री डॉ. डी. वाय्. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अॅण्‍ड टेक्‍नॉलॉजी यांच्‍या संस्‍थेमधून त्‍यांच्‍या कारची पाहणी करुन घेऊन तपासणी करुन घेऊन त्‍याचा अहवाल दाखल केला. 


 

 


 


  1. In cold condition ignition, the supplementary noise was observed initially for about 8 seconds.


 

 


 


  1. In hot condition ignition, such noise was not observed.


 

 


 


  1. There is clear difference in these two noise levels of two starting conditions.


 

 


 


  1. In our opinion this supplementary sound in cold start condition is unusual for the vehicle, which may create problem in engine working in near future.


 

 


 

 


 

त्‍यांच्‍या अहवालामध्‍ये कारमधून आवाज येतो हे त्‍यांनी म्‍हंटलेले आहे आणि अशा आवाजामुळे कारच्‍या इंजिनला भविष्‍यामध्‍ये समस्‍या निर्माण होऊ शकते असाही त्‍यांनी निष्‍कर्ष काढलेला आहे म्‍हणजेच कारमध्‍ये आवाजाचा दोष कायम आहे हे स्‍पष्‍ट होते. कार दि. 14/11/2008 रोजी घेतली होती आणि तज्ञाचा रिपोर्ट दि.13/2/2012 रोजीचा आहे. असे असताना सुध्‍दा त्‍या कारमध्‍ये तसाच दोष कायम राहिला हे स्‍पष्‍ट होते. तज्ञाने एक ग्राफ सुध्‍दा सोबत दिला आहे त्‍यावरुन कार स्‍टार्ट करताना खूप मोठा आवाज येत होता आणि त्‍यानंतर आवाज कमी होत गेला असेही दिसून येते. तक्रारदारांच्‍या नव्‍या को-या कारमध्‍ये एका महिन्‍याच्‍या आतच आवाजाची समस्‍या निर्माण झाली आणि ती समस्‍या जाबदेणारांकडे कार ब-याच वेळा दुरुस्‍तीसाठी देऊनही समस्‍येचे जाबदेणारांनी निराकरण केले नाही, तो दोष कायम राहिला म्‍हणजे हा उत्‍पादकीय दोष आहे हे स्‍पष्‍ट होते.


 

 


 

 


 

5.          तक्रारदारांनी मा. सर्वोच्‍च न्‍यायालय तसेच मा. राज्‍य आयोगाचे निवाडे दाखल केले आहेत. 2006 (3) ALL MR (Journal) 19 Mr. Ashok Kesharlal Saraf (Deceased by L.Rs.)  V/s Tata Motors Ltd. & Anr., तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालय 2010 Law Suit (SC) 832 C.N. Anantharam V/s. Fiat India Ld.& Ors.


 

 


 

 


 

            मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने या दोन्‍ही केसमध्‍ये कारमध्‍ये आवाज (noise)  होत असल्‍याबद्दल आणि तो आवाज मॅन्‍यूफॅक्‍चरींग कंपनीने, त्‍यांच्‍या डिलरने दूर केला नाही म्‍हणून त्‍यांना कारचा रिफंड सर्व पार्टस कारच्‍या किंमतीसह 12 टक्‍के व्‍याजदराने करण्‍याचा आदेश दिला आहे. हे दोन्‍ही निवाडे प्रस्‍तुतच्‍या मंचास लागू होतात असे मंचाचे मत आहे. प्रस्‍तुतच्‍या तक्रारीतसुध्‍दा तक्रारदारांनी कार खरेदी केल्‍यापासून एक महिन्‍यानंतर जाबदेणारांकडे कारमध्‍ये क्रॅकिंगचा आवाज येतो म्‍हणून दिली आहे. जाबदेणारांनी एकावेळेस स्‍टेअरींग पंप वेगळे बसवून दिले. तरीसुध्‍दा आवाज येणे कमी झाला नाही, जाबदेणारांनी तो दोष काढून टाकावयास हवा होता. तो त्‍यांनी काढून टाकलेला नाही म्‍हणजेच कारमध्‍ये इनहेरंट डिफेक्‍टस् आहेत. तज्ञांनी सुध्‍दा या आवाजामुळे भविष्‍यात कारच्‍या इंजिनावर परिणाम होईल असे सांगितले. तसेच यामुळे कार अनेक पार्टस बदलून दुरुस्‍त करण्‍यात आली. त्‍यामुळे मुळ पार्टस त्‍याच्‍यामध्‍ये राहिले नाहीत. नवीन कारचा उपभोग घेता आला नाही. या सर्व कारणांवरुन आणि मा. सर्वोच्‍च न्‍यायालय, मा. राज्‍य आयोग, मुंबई यांच्‍या निवाडयावरुन मंच जाबदेणारांना असा आदेश देते की, त्‍यांनी तक्रारदाराची कार वॉरंटीसहीत बदलून दयावी. तक्रारदारांनी नुकसानभरपाई मागितली आहे त्‍याची एकूण बेरीज केली असता, ती रक्‍कम रु.14,68,900/- येत नाही असे जाबदेणारांचे म्‍हणणे आहे, ते बरोबर आहे. या नुकसानभरपाईसाठी तक्रारदारांनी वेगळा पुरावा दाखल केला नाही. परंतु निश्‍चीतच नवीन कार घेतल्‍यानंतर अर्ध्‍या वेळेस कार गॅरेजमध्‍येच पडून होती. त्‍या कारचा उपभोग तक्रारदारास घेता आला नाही. कार जेव्‍हा चालू होत होती त्‍यावेळेस कार चालवावयास भिती वाटत होती. अशाप्रकारे कारचा त्‍यांनी उपभोग घेतलेला नाही त्‍याची नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.1,000/- देण्‍याचे आदेश मंच पारीत करत आहे.                  


 

                 


 

            वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.       


 

                               // आदेश //


 

             


 

1.    तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.



 

2.    जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या


 

तक्रारदारांना  त्‍यांची कार वॉरंटीसहीत या   आदेशाची


 

प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आत बदलून दयावी.



 

3.                  जाबदेणार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या


 

तक्रारदारांना रक्कम रु. 5000/- नुकसान भरपाई तसेच


 

रक्कम रु. 1,000/- तक्रारीचा खर्च म्हणून या आदेशाची


 

प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी      


 

           


 

4.    निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात


 

            याव्यात.


 

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.