Maharashtra

Ahmednagar

CC/17/277

Sunil Dhondibhau Lonkar - Complainant(s)

Versus

1. Director, Malpani Udyog Samuh, Sangamner - Opp.Party(s)

08 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/17/277
( Date of Filing : 04 Oct 2017 )
 
1. Sunil Dhondibhau Lonkar
A/p Lonimavla Tq. Parner
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Director, Malpani Udyog Samuh, Sangamner
Sangamner, Tq. Sangamner
Ahmednagar
Maharashtra
2. 2. Director, Bajaj Auto Ltd.
Akurdi, Pune 35
Ahmednagar
Maharashtra
3. 3. Sai Motors Service Station
Bajaj Showroom, Parner Supa Road
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:
 Adv.Sagar Padir, Advocate for the Opp. Party 0
Dated : 08 Mar 2021
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०८/०३/२०२१

 (द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

__________________________________________________________

१.   तक्रारदार हे मु.पो. लोणीमावळा, ता.पारनेर जि.अहमदनगर येथील रहिवासी असुन ते शेती काम करतात. त्‍यांनी दिनांक ०९-११-२०१५ रोजी सुपा येथील बजाज शोरूममधुन डिसकव्‍हर १२५ सी.सी. ची मोटार सायकल घेतली आहे. त्‍यांनी सदर वाहनाची किंमत रूपये ५८,०००/- सामनेवाले यांना दिले. सदर वाहनाचे अॅव्‍हरेज ५० ते ५५ पर्यंत मिळत होते. परंतु त्‍यानंतर अॅव्‍हरेज कमी झाले आहे, याबाबत तक्रार सामनेवाले यांच्‍याकडे केली. त्‍यांनी सर्व्‍हीसींग करण्‍यास सांगितले असता तक्रारदार यांनी सर्व्‍हीसींग केली. परंतु अॅव्‍हरेज मध्‍ये काही बदल झाला नाही. सदर वाहनाचे कंपनीने अॅव्‍हरेज ८६ कि.मी. प्रमाणे सांगितले होते, म्‍हणुन तक्रारदाराने सदरचे वाहन खरेदी केले. सदर वाहनाचे शोरूमला काम करून घेतल्‍यानंतरसुध्‍दा कंपनीने जाहीरातीमध्‍ये दर्शविल्‍याप्रमाणे अॅव्‍हरेज दिसत नव्‍हते. मालपाणी शोरूमला दिनांक १०-११-२०१७ रोजी पत्र पाठविले. नंतर दिनांक २१-०८-२०१७ रोजी पारनेर येथील शोरूमला वाहन दाखवले त्‍यांनी पुन्‍हा अॅव्‍हरेज काढले व ५० ते ५५ च्‍या दरम्‍यान अॅव्‍हरेज निघाले. सदर वाहन २१५९० कि.मी. चालविण्‍यात आले, परंतु अॅव्‍हरेज कमी निघाल्‍यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले. वाहनाची सामनेवाले यांचे शोरूममध्‍ये योग्‍य ती सर्व्‍हीसींग करून मिळत नसल्‍याने त्‍याचे आर्थिक नुकसान झाले.  त्‍यामुळे तक्रारदाराने आयोगात तक्रार दाखल करून परिच्‍छदे क्रमांक ८  प्रमाणे मागणी केली.

 

२.   सामनेवाले यांनी प्रकरणात हजर होऊन लेखी कैफीयत दाखल केली. लेखी कैफीयतीमध्‍ये सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वाहन विकल्‍याचे मान्‍य केले आहे. वाहनाचा अॅव्‍हरेज हा कमी जास्‍त होणेसाठी वाहनाची वेळोवेळी सर्व्‍हीसींग करणे, वाहनाचा रखरखाव व तो चालविणाराचे सवयीवर अवलंबून असते. या सर्व कारणांमुळे अॅव्‍हरेज वेगळे होऊ शकते. तसेच सदरचे अॅव्‍हरेज हे कमी आहे, यासाठी कुठलाही सक्षम पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. पुढे त्‍यांनी असे नमुद केले की, एम.आर.टी.पी. कमीशन यांच्‍या समोरील कायनेटीक इंजिनिअरींग केसमध्‍ये या सारखाच मुद्दा निकाली काढला असुन त्‍यामध्‍ये पेट्रोलीयम कॉन्‍झरवेशन असोसिएशन यांनी नमुद केले आहे की, वाहनाचा जाहीरातीमध्‍ये दिलेल्‍या अॅव्‍हरेज मध्‍ये ३० टक्‍के  फरक रस्‍त्‍याची परिस्थिती व इतर परिस्थितीमुळे फरक पडु शकतो. तक्रारदाराने त्‍याचे तक्रारीचे पुष्‍ठयर्थ कोणताही सक्षम पुरावा दिलेला नाही. तज्ञाचा अहवाल सुध्‍दा  दाखल केला नाही. तक्रारदाराची सदरची तक्रार ही खोट्या स्‍वरूपाची दाखल केली आहे व ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी आयोगाला विनंती केली आहे.

 

३.   तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, सामनेवालेची लेखी कैफीयत व लेखी कैफीयतीला तक्रारदाराने दिलेले प्रतिउत्‍तर, तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र त्‍यांचे वकील एस.जी. पादीर यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही   सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

 

अ.क्र.

  मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवाले यांनी अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ?

होय

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

 

विवेचन

४.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन त्‍यांचे स्‍वतःचे व्‍यवसायकरीता दिनांक ०९-११-२०१५ रोजी सुपा येथील बजाज शोरूममधुन डिसकव्‍हर १२५ सी.सी. ची मोटार सायकल रक्‍कम रूपये ५८,०००/- ला खरेदी केली. ही बाब सामनेवाले यांना लेखी कैफीयतीमध्‍ये व तोंडी युक्तिवादात मान्‍य केली आहे. यावरून स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत. म्‍हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

५.  मुद्दा क्र. (२) :   तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन दिनांक ०९-११-२०१५ रोजी सामनेवाले क्रमांक २ यांचे शोरूममधुन रक्‍कम रूपये ५८,०००/- देऊन डिसकव्‍हर १२५ सी.सी. ची मोटार सायकल खरेदी केली. ती खरेदी केल्‍यानंतर तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले की, सदरचे वाहन हे ५० ते ५५ पर्यंत अॅव्‍हरेज देत होते. त्‍यामुळे त्‍यांनी शोरूममध्‍ये त्‍या वाहनाची सर्व्‍हीसींग केली. तीन सर्व्‍हीसींग केल्‍यानंतरही अॅव्‍हरेज काही मिळाला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक १ यांना याबाबत पत्रही पाठविले. सदरचे पत्र प्रकरणात दस्‍त क्रमांक ३/१ प्रमाणे दाखल आहे. तक्रारदाराने पुढे असे कथन केले की, सामनेवाले यांनी तक्रारदाराने वाहन खरेदी केली त्‍यावेळी त्‍या वाहनाचे अॅव्‍हरेज हे ८६ पर्यंत राहील, असे जाहीरात केली. हे स्‍पष्‍ट करणेकरीता तक्रारदाराने ती जाहीरात प्रकरणात दाखल केली आहे. सदरील जाहीरातीचे अवलोकन केले असता त्‍यावर 82.40 kmpl हे नमुद आहे. यावरून ही बाब स्‍पष्‍ट होते  की, सामनेवाले यांनी सदरचे वाहनाचे अॅव्‍हरेज हे ८२.४ असेल, असे भा‍सविले होते.  तक्रारदाराने त्‍याचे वाहनाचे अॅव्‍हरेज हे २१५९० कि.मी. वाहन फिरल्‍यानंतर ५० ते ५५ होते. सदरचे कथनाला सामनेवाले यांनी त्‍यांचे लेखी कैफीयतीमध्‍ये असा बचाव घेतला की, वाहनाचे अॅव्‍हरेज कमी होणेसाठी वाहन वेळोवेळी चालु बंद करणे, वेळोवेळी सर्व्‍हीसींग करणे, वाहनाचा रखरखाव व तो चालविणाराचे सवयीवर अवलंबून असते. तसेच त्‍यांनी असेही कथन केले की, जाहीरातीमध्‍ये नमुद केलेला अॅव्‍हरेजमध्‍ये ३० टक्‍के फरक रस्‍त्‍याची परिस्थिती व इतर परिस्थितीमुळे पडु शकतो, यासाठी सामनेवाले यांना जबाबदार ठरवता येणार नाही किंवा सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली, असे म्‍हणता येणार नाही.  परंतु जाहीरातीमध्‍ये सदरहु बाबी नमुद नाहीत. त्‍यामुळे जाहीरातीमध्‍ये नमुद केलेल्‍या वाहनाचा अॅव्‍हरेज प्रत्‍येक परिस्थितीमध्‍ये मिळेल असे समजुन तक्रारदाराने वाहन खरेदी केले होते. सामनेवाले यांनी ही बाब मान्‍य आहे की, जाहीरातीमध्‍ये नमुद केलेले अॅव्‍हरेज हे जास्‍त होते व सदरहु वाहनाला कमी अॅव्‍हरेज मिळत होते. अशा प्रकारे सामनेवाले यांनी खोट्या स्‍वरूपाची जाहीरात करून तक्रारदाराची फसवणुक केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारदाराने त्‍याचे वाहनामध्‍ये उत्‍पादीत दोष आहे, अशी तक्रार केलेली नाही. त्‍यामुळे सामनेवाले यांचा बचाव की तक्रारदाराने तज्ञाचा अहवाल दाखल करणे गरजेचे होते, तो ग्राह्य धरता येणार नाही. सदरचे वाहनाकरीता 82.40 kmpl अॅव्‍हरेज मिळेल असे जाहीरातीमध्‍ये दर्शविण्‍यात आले. मात्र तक्रारदाराला सदरचे वाहनाचे 50-55 kmpl  एवढे अॅव्‍हरेज मिळत होते. तक्रारदाराने वाहनाची सर्व्‍हीसींग केल्‍यानंतरसुध्‍दा कमी अॅव्‍हरेज मिळत होते व सामनेवाले यांनी वाहनाची खोटी जाहीरात देऊन तक्रारदाराची फसवणुक केली आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे, ही बाब स्‍पष्‍ट होते. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

६.  मुद्दा क्र. (३) :  तक्रारदाराने तक्रारीमध्‍ये अशी मागणी केली की, नवीन वाहन त्‍याला देण्‍यात यावे किंवा त्‍या वाहनाची रक्‍कम व्‍याजासह त्‍याला परत मिळावी. परंतु सदरहु वाहनामध्‍ये बिघाड होता किंवा त्‍यात उत्‍पादकीय दोष होता, ही तक्रारदाराची तक्रार नाही व वाहनात दोष असलेबाबतचा पुरावा दाखल नाही. त्‍यामुळे सदरची मागणी मान्‍य करता येणार नाही. सामनेवालेने खोटी जाहीरात केली ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्‍या  दस्‍तऐवजांवरून सिध्‍द होते. तक्रारदाराला सामनेवाले यांनी खोट्या स्‍वरूपाची जाहीरात करून वाहन विकले त्‍यामुळे त्‍याला मानसीक, शारीरिक व आर्थिक त्रास झाला याबाबत काही रक्‍कम देणे न्‍यायाचे ठरेल, असे आयोगाचे मत आहे. म्‍हणुन मुद्दा क्रमांक ३ चे उत्‍तरार्थ हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

अंतीम आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.  सामनेवाले यांनी तक्रारदाराला व शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार मात्र) व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रूपये ५,०००/-द्यावे. 

३.  वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी. वरील रक्‍कम मुदतीत न दिल्‍यास तक्रारदार हा सदरहु रकमेवर द.सा.द.शे. ९% प्रमाणे रक्‍कम अदा होईपर्यंत सदरहु व्‍याज मिळण्‍यास पात्र राहील.  

४.  आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

५.  सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.