Maharashtra

Solapur

CC/11/16

Pavarti Narayan Shinde @ others - Complainant(s)

Versus

1. Avinash L. Mahagaonkar2. Vishal V. Ladage 3. Narandra G. Kale 4. Rajandra K. Kothari 5. Mrudula A - Opp.Party(s)

Kulkarni

10 May 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/11/16
1. Pavarti Narayan Shinde @ others Mahendranagar Karamala SolapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. 1. Avinash L. Mahagaonkar2. Vishal V. Ladage 3. Narandra G. Kale 4. Rajandra K. Kothari 5. Mrudula A. Talekar 6. Rameshvar D. Londhe 7. Navanath K. Atakar 8. Popet D. Hanavate 9. Kakasaheab A. patil @M. J. Phule Gramin Bigarsheti Co patsantha Barloni Tal. MadhaSolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :Kulkarni, Advocate for Complainant

Dated : 10 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

                                                                 तक्रार दाखल दिनांक :  24/01/2011.  

                                                                तक्रार आदेश दिनांक : 10/05/2011.   

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 16/2011.

 

1. श्रीमती पार्वती नारायण शिंदे, वय 60 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम.

2. सौ. जयश्री सुरेश बनकर, वय 32 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम,

   दोघे रा. महेंद्र नगर, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर.         तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. महात्‍मा ज्‍योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या.,

   बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

2. श्री. अविनाश लक्ष्‍मण महागांवकर, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. मु.पो. 4/28, विद्यानगर क्र.2, सिव्‍हील हॉस्पिटलमागे,

   पाथरुट चौक, सोलापूर 3, जि. सोलापूर.

3. श्री. विशाल विलास लडगे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   मु.पो. वडशिंगे, ता. माढा, जि. सोलापूर.

4. श्री. नरेंद्र गोविंद काळे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. न्‍यू संतोष नगर, विजापूर रोड, सोलापूर.

5. श्री. राजेंद्र कांतीलाल कोठारी, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर.

6. सौ. मृदुला औदुंबर तळेकर, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

7. श्री. रामेश्‍वर ज्ञानदेव लोंढे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. चौधरी प्‍लॉट, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी-413208, ता. माढा, जि. सोलापूर.

8. श्री. नवनाथ काशिनाथ आतकर, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. जिजामाता नगर, टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.

9. श्री. पोपट बनाजी हनवते, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

   रा. भांडुरे वस्‍ती, कुर्डुवाडी-413208, ता. माढा, जि. सोलापूर.

10. श्री. काकासाहेब अप्‍पासाहेब पाटील, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. बार‍लोणी 413252, ता.माढा, जि. सोलापूर. 

11. श्री. संजय सुब्राव राऊत, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. मानेगांव, ता.माढा, जि. सोलापूर.

12. श्री. विष्‍णू नरसू अनंतकवळस, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. कुर्डु 413 208, ता. माढा, जि. सोलापूर.                 विरुध्‍द पक्ष

13. श्री. जावेद दस्‍तगीर अतार, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. भगवंत कॉम्‍प्‍लेक्‍स, राज मोबाईल शॉपी, बार्शी, जि. सोलापूर.

14. सौ. स्मिता धनंजय शहाणे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. मंगळवार पेठ, क्‍लासिक ऑफसेट, माढा, ता. जि. सोलापूर.

15. श्री. संजय संभाजी कुटे, वय सज्ञान, व्‍यवसाय : व्‍यापार,

    रा. मु.पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर.

16. प्रशासक मंडळ, महात्‍मा ज्‍योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह.

    पतसंस्‍था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                     विरुध्‍द पक्ष

 

                        कोरम          :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                     सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  पी.पी. कुलकर्णी

                   विरुध्‍द पक्ष गैरहजर / एकतर्फा

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये उपस्थित ग्राहक विवाद थोडक्‍यात असा आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केली असून त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

ठेवीदार / तक्रारदारांचे नांव

ठेव रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

पार्वती नारायण शिंदे

3,745

031160

20/2/07

20/3/2009

12 टक्‍के

पार्वती नारायण शिंदे

25,000

001720

11/8/07

11/7/2011

12 टक्‍के

जयश्री सुरेश बनकर

28,200

008412

4/9/06

4/6/2013

दामदुप्‍पट

जयश्री सुरेश बनकर

15,650

008411

31/7/06

31/4/2013

दामदुप्‍पट

पार्वती ना. शिंदे

10,000

बचत खाते क्र.341

--

25/3/2010

--

नारायण केरु शिंदे

9,750

आवर्तक ठेव खाते क्र.128

--

11/7/2011

--

 

2.    तक्रारदार यांनी मुदत ठेव, मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव, दामपुप्‍पट ठेव व बचत खात्‍याद्वारे वरीलप्रमाणे नमूद रक्‍कम पतसंस्‍थेमध्‍ये गुंतवणूक केलेली आहे. तकारदार यांना कौटुंबिक कारणास्‍तव, वैद्यकीय औषधोपचारासाठी व इतर कारणास्‍तव ठेव रकमेची आवश्‍यकता होती. त्‍यांनी ठेव रकमेची मागणी केली असता, ठेव रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज देण्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी टाळाटाळ केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी अनुक्रमे प्रत्‍येकी रु.10,000/- व रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

4.    तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                              उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                             होय.

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?           होय.

3. काय आदेश ?                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

5.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष महात्‍मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये मुदत ठेव, मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव, दामपुप्‍पट ठेव व बचत खात्‍याद्वारे रक्‍कम गुंतविल्‍याचे रेकॉर्डवर दाखल पावत्‍यांवरुन निदर्शनास येते. ठेवीच्‍या मुदतपुर्तीनंतर व मुदतपूर्व तक्रारदार यांनी व्‍याजासह ठेव रकमेची मागणी केली असता, विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रक्‍कम परत करण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत असल्‍याची त्‍यांची प्रमुख तक्रार आहे.

 

6.    तक्रारदार यांनी पतसंस्‍थेच्‍या संचालकांची यादी रेकॉर्डवर दाखल केली असून त्‍याप्रमाणे त्‍यांना तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष महात्‍मा जोतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्‍था मर्या., बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये मुदत ठेव, मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव, दामपुप्‍पट ठेव व बचत खात्‍याद्वारे रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीच्‍या मुदतपुर्तीनंतर व मुदतपूर्व वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍यात आलेली नाही. ठेवीदारांच्‍या मागणीनुसार ठेवीची रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल न केल्‍यामुळे त्‍यांना तक्रारदार यांची तक्रार मान्‍य आहे, या अनुमानास आम्‍ही येत आहोत. तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे ठेव पावतीची रक्‍कम व्‍याजासह मिळविण्‍यास तक्रारदार हक्‍कदार ठरतात. बचत खाते, मासिक व्‍याज प्राप्‍ती ठेव व दामदुप्‍पट ठेव मुदतपूर्व मागणी केल्‍यामुळे त्‍यावर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज देणे उचित ठरते.

 

 

 

7.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

 

ठेवीदार/

तक्रारदारांचे नांव

पावती क्रमांक

देय ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

पार्वती नारायण शिंदे

031160

3,745

20/2/07

12 टक्‍के

पार्वती नारायण शिंदे

001720

25,000

11/8/07

12 टक्‍के

जयश्री सुरेश बनकर

008412

28,200

4/9/06

12 टक्‍के

जयश्री सुरेश बनकर

008411

15,650

31/7/06

12 टक्‍के

पार्वती ना. शिंदे

बचत खाते क्र.341

10,000

25/3/2010

12 टक्‍के

पार्वती नारायण शिंदे

आवर्तक ठेव खाते क्र.128

9,750

11/9/2008

12 टक्‍के

 

2. विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार  यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

 

(सौ. संजीवनी एस. शहा)                                (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                          ----00----

 (संविक/स्‍व/9511)

 

 

 


[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT