Maharashtra

Additional DCF, Pune

CC/10/68

Shri Jitendra Chandrakant Wadgaonkar - Complainant(s)

Versus

1. Action Construction New Delhi - Opp.Party(s)

30 Aug 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/10/68
 
1. Shri Jitendra Chandrakant Wadgaonkar
Pune
Pune
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. Action Construction New Delhi
New Delhi
Delhi
Delhi
2. 2.Efficient sales
Pimpri
Pune
Maharashtra
3. 3. I CI CI Lombard Insurance Co
Pimpri
Pune
Maharashtra
4. 4.Senchurian Bank of Panjab
Pune
Pune
Maharashtra
5. 2.Eifishient Krian Service & Services.
2, Mandorea Niwas,S no 103,Plot no 146,Neharu Nagar, Pimpri, Pune.
6. 3.ICICI Lombard Insurance Company Ltd.
Saurabh Hall, 26-219,Sasoon Road, Pune.
7. 4.Senturion Bank Of Panjab Pune.
H D F C Bank, Shankarshet Road, Pune.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S.K. Pacharne MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 निकाल

                        पारीत दिनांकः- 30/08/2013

                    (द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्‍यक्ष

(1)         तक्रारदारांची रोहन क्रेन सर्व्हिसेस या नावाने फर्म असून  या फर्म मार्फत क्रेनच्‍या सहाय्याने ग्राहकाच्‍या मागणी नुसार कामे केली जातात.  जाबदेणार क्र. 1 ही क्रेन तयार करणारी कंपनी आहे.  जाबदेणार क्र.  2 हे या कंपनीचे अधिकृत विक्रेता आहेत.  तक्रारदारंनी सन 2007 मध्‍ये जाबदेणार क्र. 1 या कंपनीची जाबदेणार क्र. 2 यांच्‍याकडून  हायड्रॉलिक क्रेन विकत घेतली.  ही घेण्‍यासाठी तक्रारदारांनी सेंच्‍युरीयन बँकेकडून अर्थसहाय्य घेतले होते.  या क्रेनसाठी आसीआयसीआय लोंबार्ड या कंपनीची पॉलिसी घेतली होती.  दि 20/2/2008 रोजी या क्रेनच्‍या सहाय्याने मौजे आळंदी, ता खेड या ठिकाणी काम चालू असताना अचानक क्रेनचे स्‍पेअर पार्टस् निकामी झाले व त्‍यामध्‍ये क्रेनचे अतोनात नुकसान झाले. नुकसान झाल्‍याचे तक्रारदारांनी जाबदेणार क्र.  1 ते 4 यांना कळविले.  जाबदेणार क्र 2 यांनी या क्रेनच्‍या दुरुस्‍तीसाठी रु 1,44,058/- इतका दुरुस्‍तीचा खर्च येईल असे सांगितले. त्‍यानुसार तक्रारदारांनी इन्‍शुरन्‍स कंपनीकडे क्‍लेम फॉर्म भरला. जरी एवढा खर्च सांगितला तरी प्रत्‍यक्षात क्रेनच्‍या दुरुस्‍तीचा खर्च त्‍यांना जास्‍त आला आहे.  इन्‍शुरन्‍स कंपनीने त्‍यांना क्‍लेमची रक्‍कम जास्‍तीची दयावी लागू नाही म्‍हणून खोटा रिपोर्ट तयार करुन सदर क्रेन मध्‍ये मेकॅनिकल दोष असल्‍याचे सांगितले.

तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 1 ते 4 यांना दिनांक 12/1/2010 रोजी नेाटिस पाठविली.  त्‍यानंतर मंचात तक्रार दाखल केली.

      तक्रारदाराचा संपूर्ण चरितार्थ या क्रेनच्‍या व्‍यवसायावर अवलंबून आहे. क्रेन नादुरुस्‍त असल्‍यामुळे, तीन ते चार महिन्‍यापासून नुकसान होत आहे.  ही नुकसानभरपाई दर महा 60 ते 70 हजार असे धरुन रु तीन ते चार लाख नुकसान झाल्‍याचे म्‍हणतात.  अपघातामुळे झालेल्‍या नुकसानी बद्दल रु 2 लाख लागतात. व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे तक्रारदारास बँकेचे हप्‍ते भरणे शक्‍य झाले नाही.

            इन्‍शुरन्‍स कंपनीने तांत्रिक स्‍वरुपाचा बिघाड झाला असल्‍यामुळे क्रेनमध्‍ये निर्माण झालेला दोष हा तांत्रिक स्‍वरुपाचा बिघाड असल्‍याने तो पॉलिसीमध्‍ये बसत नाही असे मोघमपणे पत्राद्धारे कळविले.  इन्‍शुरन्‍स कंपनीने त्‍यांना अटी व शर्ती कळविल्‍या नाहीत.  त्‍यामुळे जाबदेणार क्र. 1 ते 4 यांच्‍या विरुध्‍द प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.

      तक्रारदार जाबदेणार क्र 1 ते 3  यांच्‍याकडून  तक्रारदारास सेवा देण्‍यास निष्‍काळजीपणा व टाळाटाळ केली म्‍हणून झालेल्‍या मानसिक, आर्थिक त्रासापोटी     6 लाख व त्‍यावर 15 टक्‍के व्‍याजदराने ही रक्‍कम दयावी. रु 10,000 तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.

 

      तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.

(2)         जाबदेणार क्र 1 व 2 साठी लेखी जबाब दाखल केला. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी तक्रारीमध्‍ये मंचापासून खरी माहिती दडवून ठेवली आहे. जाबदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी ही क्रेन 2007 रोजी घेतली व दोन वर्षांच्‍या आत मंचात तक्रार दाखल केली नाही. म्‍हणून मुदतबाहय आहे.  तक्रारदारांनी क्रेन व्‍यावसायिक कारणासाठी खरेदी केली होती.  त्‍याचा वापर सुध्‍दा व्‍यावसायिक कारणासाठी करीत होते.  म्‍हणून या कोर्टात ही तक्रार चालू शकत नाही.  तक्रारदारांची रोहन क्रेन सर्व्हिसेस ही एक प्रोप्रायटर फर्म असून त्‍यांच्‍याकडे एकापेक्षा जास्‍त क्रेन व्‍यावसायासाठी आहेत.  तक्रारदारास क्रेन विषयी कुठलीही तात्रिक माहिती नाही. कारण तक्रारदारांनी क्रेन चालवण्‍यासाठी क्‍वालिफाईड ऑपरेटर ठेवला आहे.  यावरुन स्‍वत:च्‍या उदरनिर्वाहासाठी क्रेन घेतली नव्‍हती हे सिध्‍द होत असून, म्‍हणून ते ग्राहक होत नाहीत.  दिनांक 20/2/2008 रोजी  मौजे आळंदी येथे काम चालू असताना त्‍यांच्‍या क्रेनचे स्‍पेअर पार्टस् निकामी झाले. त्‍यानंतर तक्रारदारांनी या जाबदेणार यांना कळविले हे जाबदेणार मान्‍य करतात.  जाबदेणार यांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी तक्रारदारास चांगल्‍या स्थितीतील क्रेन विकली होती.  त्‍यामध्‍ये कुठलाही उत्‍पादकीय दोष नव्‍हता. तक्रारदार हे नियमितपणे त्‍यांच्‍याकडे क्रेनच्‍या चेकींगसाठी आणि सर्व्हिसींगसाठी येत होते. दिनांक 5/3/2007, 19/4/2007, 4/6/2007, 5/6/2007 या तारखांना त्‍यांनी सर्व्हिसींगसाठी क्रेन आणली होती.  या रिपोर्ट वरुन क्रेनची स्थिती व्‍यवस्थित असल्‍याचे दिसून येते.  तक्रारदार क्रेन घेऊन जाताना जॉब कार्डवर त्‍यांनी समाधानी असल्‍याचे सही केली होती.  त्‍यामुळे क्रेनमध्‍ये कुठलाही तांत्रिक दोष किंवा उत्‍पादकीय दोष असल्‍याचा प्रश्‍नच येत नाही.  तक्रारदाराचा उदरनिर्वाह क्रेनवर अवलंबून आहे हे म्‍हणणे चुकीचे आहे.  कारण तक्रारदार हे क्रेन ऑपरेटींग बिझनेस तसेच इतरांना क्रेन सर्व्‍हीसेस देण्‍याचा व्‍यावसाय करतात.  त्‍यामुळे ही क्रेन नादुरुस्‍त असल्‍यामुळे त्‍यांचे तीन चार महिने नुकसान झाले हे म्‍हणणे चुकीचे आहे. क्रेनच्‍या परचेस ऑर्डर मध्‍ये क्रेन बद्दलचा कुठलाही वाद निर्माण झाल्‍यास त्‍याचे कार्यक्षेत्र फरीदाबाद दिल्‍ली असे  नमूद केले आहे.  त्‍यामुळे या मंचास कार्यक्षेत्र नाही असे म्‍हणतात. वरील सर्व कारणावरुन तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करावी असे म्‍हणतात.

            जाबदेणार क्र 1 व 2 यांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत.

(3)         जाबदेणार क्र 3 यांना नोटीस पाठविली असता, नोटीस मिळूनही ते मंचामध्ये अनुपस्थित राहिले म्हणून मंचाने दिनांक 27/12/2011 रोजी त्यांच्याविरुद्ध एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत केला.

(4)         जाबदेणार क्र 4 यांनी तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी त्‍यांच्‍याकडून क्रेन खरेदी करण्‍यासाठी रु. 7,36000/- अर्थ सहाय्य घेतले होते.  त्‍याचे हप्‍ते रु 18,900/- प्रती महिना  एकुण 48 हप्‍ते होते. परंतु तक्रारदार हप्‍ते वेळेवर भरत नव्‍हते. ते बँकेचे थकबाकीदार होते.  उर्वरित 32 हप्‍त्‍यापैकी फक्‍त 16 हप्‍ते भरलेले आहेत.  उर्वरित रु. 4,03,374 ही रक्‍कम त्‍यांच्‍याकडे थकबाकी म्‍हणून आहे.  तक्रारदाराच्‍या क्रेनला दिनांक 20/2/2008 रोजी  क्रेनचे पार्टस् नादुरुस्‍त झाले त्‍या बद्यलची कुठलीही माहिती नाही.  वरील सर्व कारणा वरुन तक्रारदार किंवा इन्‍शुरन्‍स कंपनी कडून थकबाकी रक्‍कम रु 4,03,374/- मागतात. त्‍यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठ्यर्थ शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केले आहेत.

      तक्रारदारानी दिनांक 17/2/2011 रोजी शपथपत्राद्धारे जाबदेणार क्र 4 सेंच्‍युरियन बँक ऑफ पंजाब याचे एचडीएफसी बँकेमध्‍ये विलीनीकरण झाले असे नमूद केले आहे.  त्‍यानुसार त्‍यांना नोटिस पाठविण्‍यात आली, ते वकिला मार्फत मंचात हजर झाले.

(5)         सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्राची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी 2007 मध्‍ये हायड्रॉलिक क्रेन जाबदेणार क्र 2 यांच्‍याकडून खरेदी केली होती.  ती दिनांक 20/02/2008 रोजी त्‍यातील पार्टस् निकामी झाले म्‍हणून  झालेल्‍या नुकसानभरपाईसाठी  मंचात तक्रार दाखल केली. 

      तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत दिनांक 20/02/2008 रोजी पार्टस् निकामी  झाले म्‍हणतात, तिथेच अपघात झाल्‍यामुळे पार्टस्  निकामी  झाले असे लिहीलेले खोडून टाकलेले दिसते.   जर अपघात झाल्‍यामुळे  पार्टस् किंवा एकूणच क्रेन निकामी  झाली  असे लिहीले तर तो उत्‍पादकिय दोष  म्‍हणता येणार नाही असे वाटून तक्रारदारानी अपघाताचे वाक्‍य खोडून टाकलेले दिसून येते. तक्रारदारांनी तक्रार दाखल करण्‍यापूर्वी जाबदेणार  यांना नोटीस पाठविल्‍याचे  त्‍यांनीच दाखल केलेल्‍या  कागदपत्रांवरुन दिसून येते.  त्‍या नोटीसीमध्‍ये  तक्रारदार, दिनांक 20/08/2008 रोजी क्रेनला अपघात झाल्‍याचे म्‍हणतात.   म्‍हणजेच  दिनांक ----  रोजी क्रेनला काम करीत असताना  अपघात झाला व त्‍यामुळे त्‍याचे पार्टस्  निकामी  झाले.  यावरुन त्‍यात उत्‍पादकिय दोष  नाही हे सिध्‍द होते.  उत्‍पादकिय दोष असल्‍याबद्दल तक्रारदारांनी कुठल्‍याही तज्ञांचा पुरावा  दाखल केला नाही.   जर तसे दाखल केले असते तर कदाचित,  इन्‍शूरन्‍स कंपनी त्‍यांना दिलेल्‍या क्‍लेमची रक्‍कम परत मागितली असती,  कारण तक्रारदारांनी अपघात झाल्‍यानंतर  इन्‍शुरन्‍स कंपनी जाबदेणार क्र 3 यांच्‍याकडे क्‍लेम दाखल केला होता.  सर्व्‍हे झाल्‍यानंतर इन्‍शूरन्‍स कंपनीनी अहवालानुसार रक्‍कम त्‍यांना अदा केली.  परंतु  तक्रारदार त्‍यात असमाधानी असल्‍यामुळे तक्रारदारांनी उत्‍पादकास पार्टी करुन ही तक्रार दाखल केल्‍याचे दिसून येते व तो उत्‍पादकिय दोष म्‍हणतात. परंतु अशी तक्रार दाखल करताना तक्रारदार इन्‍शुरन्‍स कंपनीलाही पक्षकार केलेले आहे.  इन्‍शुरन्‍स कंपनी हजर झालेली नाही. यावरुन, तक्रारदार हे क्रेनला अपघात झाला म्‍हणून  इन्‍शूरन्‍स कंपनीकडून क्‍लेमची रक्‍कम मागतात/ घेतली पण आहे.  तसेच,  क्रेनमध्‍ये उत्‍पादकिय दोष आहे म्‍हणून त्‍यांचरूाकडूनही नुकसानभरपाई मागतात.  कुठल्‍याही एका मुद्यास ते धरुन  ठेवत नाहीत.  म्‍हणजेच, त्‍यांना दोघांकडूनही चुकीच्‍या पध्‍दतीने रक्‍कम हवी  आहे.  यावरुन तक्रारदारांनी ही खोटी  तक्रार दाखल केल्‍याचे सिध्‍द होते.

      मंचापासून अपघात झाल्‍याचे दडवून ठेवले, इन्‍शूरन्‍स कंपनीची रक्‍कम  मिळालेली आहे. नाहकरित्‍या उत्‍पादन कंपनीस  व इन्‍शूरन्‍स कंपनीस, बँकेस पक्षकार करुन मंचात यावयास  लावले म्‍हणून मंच ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 26  नुसार  ठरविते व तक्रारदारास असा आदेश देते की, त्‍यांनी सर्व जाबदेणार क्र 1 ते 4 यांना प्रत्‍येकी रु 5,000/- दयावेत.

      वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत  करते.

                          //  आदेश  //

(1)               तक्रारदारांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 26 प्रमाणे ठरविण्‍यात येते.

(2)   तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 1 ते 4 यांना प्रत्‍येकी रु 5,000/- आदेशाची प्रत मिळाल्‍याच्‍या तारखे पासून चार आठवडयात दयावेत.

(3)      निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.

 

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S.K. Pacharne]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.