Maharashtra

Additional DCF, Pune

CC/13/48

श्रीमती मंगल रधुनाथ पवार - Complainant(s)

Versus

1. ओरीअंटल इंन्‍शुरन्‍स कंपनी मर्यादीत - Opp.Party(s)

अभयकुमार एन जाधव

22 Aug 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/13/48
 
1. श्रीमती मंगल रधुनाथ पवार
कोळविहारे ता. पुरंदर,जि.पुणे-412302
पुणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. 1. ओरीअंटल इंन्‍शुरन्‍स कंपनी मर्यादीत
प्‍लॉट नं.8 हिंदुस्‍थ्‍ा।न कॉलनी, अजनी चौक,वर्धा रोड,नागपूर-440015
नागपूर
महाराष्‍ट्र
2. 2. तालुका कृषी अधिकारी पुरंदर,
पुरंदर, सासवड ता. पुरंदर, जि. पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
3. 3.कबाल इंन्‍शुरन्‍स कं. मर्यादीत
101, करंदीकर हाउ़स, 3रा मजल, शिवाजीनगर,पुणे-411 005
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S.K. Pacharne MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदार                 -     अॅड.श्री. जाधव


 


जाबदार क्र. 1 तर्फे         -     अॅड.श्री. लोणकर

जाबदार क्र. 2             -     लेखी कैफियत दाखल

जाबदार क्र. 3             -     लेखी कैफियतदाखल

 


 

// निकालपत्र //


 

पारीत दिनांकः- 22/08/2013    


 

(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्‍यक्ष )


 

 


 

 


 

            तक्रारदारांनी विलंब माफीचा अर्ज दि. 21/2/2013 रोजी तक्रारीसोबत दाखल केला आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराच्‍या पतीचे दि. 25/4/2008 रोजी अपघाती निधन झाले. ते शेतकरी होते. त्‍यांनी दि. 06/12/2008 रोजी विम्‍याचा अर्ज जाबदार ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीकडे पाठविला. अदयापपर्यंत जाबदार ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी यांनी तो मंजूर केला नाही. तक्रारदार त्‍यांच्‍या विलंब माफीच्‍या अर्जामध्‍ये तक्रार दाखल करताना काहीसा उशीर झाला आहे. हा उशीर जाणून-बुजून किंवा मुद्दाम किंवा हेतुपुरस्‍सर केलेला नसून जाबदार ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी यांच्‍या चुकीच्‍या सेवेमुळे व मिळालेल्‍या चुकीच्‍या सल्‍ल्‍यामुळे झालेला आहे असे म्‍हणतात. तसेच विनंती कलमामध्‍ये (prayer clause) उशीर 2 वर्षे 9 महिने, 27 दिवस हा इतका उशीर माफ करावा असे म्‍हणतात.


 

 


 

2.          जाबदार ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीने यावर त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले. ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी तक्रारदाराची सर्व कथने खोटी आहेत असे म्‍हणतात. तक्रारदारास तक्रार दाखल करण्‍यास तक्रारदारास 2 वर्षे 9 महिने 27 दिवस हा विलंब झाला म्‍हणतात, त्‍यासाठी त्‍यांनी कुठलेही कारण दिलेले नाही.   ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या 24 (A) कलमा नुसार हा अर्ज खर्चासहित नामंजूर करावा. 


 

 


 

3.          जाबदार कृषि अधिकारी यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तालुका कृषि अधिकारी यांच्‍या रेकॉर्डवरुन तक्रारदाराचा क्‍लेम या कार्यालयाला प्राप्‍त न झाल्‍या कारणाने या दाव्‍याबद्दल काहीही सांगण्‍यास असमर्थ आहेत. 


 

4.          जाबदार कबाल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीने त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदार शेतक-याचा अपघाती मृत्‍यू दि.25/4/2008 रोजी झाला. त्‍यांचा क्‍लेम तहसिल पुरंदर कार्यालयामार्फत पुणे येथे दि.17/6/2008रोजी प्राप्‍त झाला. त्‍यानंतर कबाल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीने दि.16/7/2008, दि.18/8/2008, दि.22/9/2008, दि.23/10/2008 रोजीच्‍या पत्राद्वारे 6/क व फेरफार पत्रक मृत्‍यूपूर्वीचा इत्‍यादीची मागणी केली.  त्‍याची पूर्तता न झाल्‍यामुळे आहे त्‍या स्थितीत हा क्‍लेम ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीला दि. 06/12/2008 रोजी पाठविला असता ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीने दि.01/2/2010रोजी दावा नामंजूर केला व शेतक-याच्‍या वारसास कळविले आहे, ते पत्रसुध्‍दा त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यासोबत जोडलेले आहे.


 

 


 

5.          सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार आणि विलंब माफीचा अर्ज दि.21/2/2013 रोजी दाखल केल्‍याचे दिसून येते. विलंब माफीच्‍या अर्जामध्‍ये तक्रारदार त्‍यांच्‍या पतीचे दि.25/4/2008 रोजी अपघाती निधन झाल्‍याचे नमुद करतात. त्‍यानंतर त्‍यांनी दि. 06/12/2008 रोजीच जाबदार ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी यांचेकडे दावा अर्ज दाखल केल्‍याचे म्‍हणतात. परंतु अदयापही त्‍यांना कुठलेही मंजूरीचे पत्र आलेले नाही.  2 वर्षे 9 महिने 27 दिवस इतका विलंब झाल्‍याचे म्‍हणतात. वास्‍तविक त्‍यांनी जाबदार ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी यांचेकडे दि.6/12/2008 रोजी दावा दाखल केला.  तक्रारदारांनी कबाल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीकडून ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीस कागदपत्रे मिळाल्‍याबद्दलचा पाठपुरावा कधी केला त्‍या तारखा मांडावयास हव्‍या होत्‍या. असे न करता, अचानक 2 वर्षे 9 महिने 27 दिवसएवढया अवधीचा विलंब माफ करावा असे म्‍हणतात. त्‍याचे कुठलेही स्‍पष्‍टीकरण, समर्पक कारण व्‍यवस्थितरित्‍या स्‍पष्‍ट केले नाही. तसेच संपूर्ण तक्रार व विलंब माफीच्‍या अर्जामध्‍ये घटना घडल्‍याच्‍या कारणाचा (cause of action) दिनांक नमुद केला नाही.  कबाल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीचे क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र दाखल केले आहे. यावरुन ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीने दि. 1/2/2010 रोजीच त्‍यांचा दावा नामंजूर केल्‍याचे दिसून येते. परंतु याबद्दलचा उल्‍लेख ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीच्‍या लेखी जबाबामध्‍ये किंवा त्‍यांच्‍या अर्जावरील म्‍हणण्‍यामध्‍ये दिसून आला नाही. म्‍हणजे ओरीएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनीसुध्‍दा याबद्दल अनभिज्ञ आहे. तक्रारदारांनी त्‍यांचा विलंब माफीचा अर्ज योग्‍यरितीने, योग्‍य त्‍या कारणासहित स्‍पष्‍टीकरणासहित दिलेला नाही, झालेला विलंब हा स्‍पष्‍ट केलेला नाही, ग्राहक संरक्षण कायदा कलम, 24-A नुसार तक्रारदारांचा तक्रार अर्ज दोन वर्षांच्‍या आतील नाही, म्‍हणून मंच विलंब माफीचा अर्ज नामंजूर करते. त्‍याचसोबत तक्रार अर्जही नामंजूर करण्‍यात येत आहे. 


 

वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.       


 

                               // आदेश //


 

 


 

1     तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज क्र. एम्.ए./13/10 नामंजूर


 

       करण्‍यात येत आहे. त्‍याचसोबत तक्रार अर्ज क्र.एपीडीएफ/13/48


 

       ही नामंजूर करण्‍यात येत आहे. 


 

 


 

2      खर्चाबद्दल काही आदेश नाहीत.


 

 


 

3.       निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S.K. Pacharne]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.