Maharashtra

Raigad

cc/14/88

. गौरांग गिरिषभाई दवे, - Complainant(s)

Versus

1. मे. साई होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, व इतर 1 - Opp.Party(s)

31 Jan 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM RAIGAD - ALIBAG
COLLECTOR OFFICE BUILDING, SECOND FLOOR, NEAR HIRAKOTH TALAV
TAL. ALIBAG, DIST. RAIGAD
 
Complaint Case No. cc/14/88
 
1. . गौरांग गिरिषभाई दवे,
रा. रुम नं. 1304, आइरीस बिल्डींग, केसर गार्डन सी.एच.एस.लि., सेक्टर 20, खारघर, 410210.
...........Complainant(s)
Versus
1. 1. मे. साई होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, व इतर 1
पनवेल रायगड
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Umesh V. Jawalikar PRESIDENT
 HON'BLE MR. Rameshbabu B. Cilivery MEMBER
 HON'BLE MRS. Smt. Ulka A. Pawaskar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.

 

                                      तक्रार क्रमांक 88/2014

तक्रार दाखल दि. 24/09/2014

                                                न्‍यायनिर्णय दि.31/01/2015   

 

श्री. गौरांग गिरिषभाई दवे,

रा. रुम नं. 1304, आइरीस बिल्डींग,

केसर गार्डन सी.एच.एस.लि., सेक्टर 20,

खारघर, 410210.                                          .....  तक्रारदार.

 

विरुध्‍द

 

1. मे. साई होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स,

   शॉप नं. 22, ए / 1, नीलकंठ दर्शन,

   प्लॉट नं. 125, मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे,

   नाडकर्णी हॉस्पिटल जवळ, पनवेल, जि. रायगड.

 

2. श्री. अनंत सदाशिव शिंदे, प्रोप्रायटर,

   मे. साई होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स,

   शॉप नं. 22, ए / 1, नीलकंठ दर्शन,

   प्लॉट नं. 125, मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे,

   नाडकर्णी हॉस्पिटल जवळ, पनवेल, जि. रायगड               .... सामनेवाले क्र. 1 व 2

 

 

                     समक्ष - मा. श्री. उमेश वि. जावळीकर, अध्‍यक्ष.

                            मा. श्रीमती उल्का अं. पावसकर, सदस्या

                            मा. श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी, सदस्य

 

              उपस्‍थ‍िती – तक्रारदार तर्फे अॅड. आर. एस. जगताप.

                        सामनेवाले विरुध्‍द एकतर्फा आदेश

 

 

 

- न्यायनिर्णय -

द्वारा- मा.अध्‍यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर

 

1.          सामनेवाले यांनी तक्रारदारांस सदनिकेचा नोंदणीकृत करारानामा न करुन व विहीत मुदतीत ताबा न देऊन सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे. 

 

2.          सामनेवाले क्र. 1 ही प्रोप्रायटरी फर्म असून सामनेवाले क्र. 2 हे त्याचे प्रोप्रायटर असून त्यांचा साई होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नांवाने सर्व्हे / गट नं. 71/3, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथे गृहप्रकल्प आहे. तक्रारदार हे भाडेतत्त्वावर रहात असल्याने त्यांनी माहे एप्रिल 2012 मध्ये स्वत:च्या मालकी हक्काचे घर खरेदी करण्याच्या हेतूने त्यांनी मे. स्वप्ननगरी बिल्डर्स यांच्याकडून एक निवासी खोली खरेदी करुन त्यांना रक्कम रु. 5,00,000/- अदा केले होते.  परंतु मे. स्वप्ननगरी बिल्डर्स हे मार्च 2013 पर्यंत त्यांचा गृहप्रकल्प पूर्ण करु न शकल्यामुळे व तक्रारदारांना घराची आवश्यकता असल्याने त्यांनी त्याच परिसरात दुस-या घरासाठी शोध घेतला असता त्यांना वर नमूद सामनेवाले क्र. 1 व 2 हे  “साई होम ”, या नांवाने सर्व्हे नं. 71,‍ हिस्सा नं. 3, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथे गृहप्रकल्प सुरु करीत असल्याचे कळले. त्यामुळे एप्रिल 2013 मध्ये त्यांनी सामनेवाले क्र. 1 व 2 यांच्याशी संपर्क साधला व सामनेवाले क्र. 1 व 2 बांधीत असलेल्या गृहप्रकल्पामध्ये 250 चौ.फूट क्षेत्रफळाची सदनिका एकूण रक्‍कम रु. 5,00,000/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा करारनामा दि. 25/07/13 रोजी रु. 100/- च्या स्टँप पेपरवर केला आहे.  सदर करारनाम्‍याप्रमाणे सामनेवाले क्र. 1 व 2 हे तक्रारदारांना डिसेंबर 2013 मध्ये सदनिकेचा ताबा देणार होते.  त्याप्रमाणे तक्रारदार  यांनी सामनेवाले क्र. 1 व 2 यांना धनादेशाद्वारे रक्कम रु. 2,02,000/- दिलेले आहेत. तसेच तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 व 2 यांना रक्कम रु. 2,50,000/- अदा केल्यास ते तक्रारदारांना सदनिकेची उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी गृहकर्ज मिळवून देण्यास सहाय्य करतील व मा. उपनिबंधक कार्यालयात नोंदणीकृत करारनामा करुन देतील असे अभिवचन सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दिले होते.  अशाप्रकारे तक्रारदारांकडून एकूण रक्‍कम रु. 2,02,000/- प्राप्त होऊनही सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी  तक्रारदारांनी वेळोवेळी सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा व ताबा देण्‍याची  विनंती करुन देखील तक्रारदारांस सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा न करुन व ताबा न देऊन सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे. 

 

3.          तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्‍यानंतर मंचाने सामनेवाले क्र. 1 व 2  यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्‍याचे निर्देश दिले.   परंतु मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही सामनेवाले क्र. 1 व 2  मंचासमक्ष हजर न राहिल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द  एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.

 

4.          तक्रारदारांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व त्‍यांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.

 

मुद्दा क्रमांक   1     -     सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्‍ति‍क व संयुक्‍ति‍करित्‍या   

                        तक्रारदारास कराराप्रमाणे सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा न नोंदवून     

                        देऊन  व ताबा न  देऊन सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याची  

                        बाब तक्रारदार सिध्‍द करतात काय ॽ

उत्‍तर              -     होय.

 

मुद्दा क्रमांक   2     -     सामनेवाले क्र. 1 व 2 हे वैयक्‍ति‍क व संयुक्‍ति‍करित्‍या  तक्रारदारांस

                        नुकसानभरपाई देण्‍यास पात्र आहेत काय ॽ

उत्‍तर              -     होय.

 

मुद्दा क्रमांक   3     -     आदेश ॽ

उत्‍तर              -     तक्रार अंशतः मान्‍य.

 

कारणमीमांसा -

5. मुद्दा क्रमांक  1  -                   सामनेवाले क्र. 1 व 2  यांनी तक्रारदारासोबत दि. 25/07/13 रोजी केलेल्‍या करारनाम्‍यामध्‍ये सदनिका विक्री व्‍यवहारापोटी एकूण रक्‍कम रु. 2,02,000/- स्विकारल्‍याबाबत कागदोपत्री पुरावा दाखल आहे.  त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी सदनिका विक्री करार नोंदणीकृत करण्‍यासाठी मोफा कायद्यातील तरतूदीनुसार कोणतीही उपाययोजना न केल्‍याने तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 व 2 यांस दि. 25/03/14, दि. 29/04/14, दि. 12/05/14 व दि. 31/07/14 रोजी नोटीसा पाठवून सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत करावा व ताबा देण्‍याविषयी विनंती करुन देखील सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना कोणतेही प्रतिउत्‍तर दिले नाही.  सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराकडून सदनिका व्‍यवहाराची रक्‍कम स्विकारल्‍यानंतर पावत्या अदा केल्या आहेत.  त्‍याप्रमाणे सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी अनोंदणीकृत  करारनाम्‍यातील अटी व शर्तींप्रमाणे सदनिका व्‍यवहाराची कायदेशीर पूर्तता करण्‍यासाठी तक्रारदारांस कोणताही पत्रव्‍यवहार केला नाही.  सामनेवाले क्र. 1 व 2  तक्रारदाराकडून उर्वरित रक्‍कम मागणी करणारे पत्रही पाठविलेले नाही.  तसेच तक्रारदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील त्‍याबाबत सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी  योग्‍य ती कार्यवाही केल्‍याचे पुरावे कागदोपत्री दाखल नाहीत.   सबब, सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास सदनिका व्‍यवहाराबाबत सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याची बाब कागदोपत्री पुराव्‍यावरुन सिध्‍द होते.  सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

6. मुद्दा क्रमांक  2  -                  सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांकडून  सदनिकेची अंशतः रक्‍कम स्विकारुन सदनिकेचा ताबा विहीत मुदतीत न देऊन तक्रारदाराचे आर्थिक नुकसान होईल असे कृत्‍य केले आहे.  सामनेवाले क्र. 1 व 2 तक्रारदाराकडून स्विकारलेली रक्‍कम स्‍वतःच्‍या वैयक्तिक फायद्यासाठी वापरुन तक्रारदाराचे आर्थिक नुकसान केले आहे.  तक्रारदारांनी सदनिकेचा करार नोंदणीकृत करण्‍यासाठी व ताबा देण्यासाठी सामनेवाले क्र. 1 व 2 यांना लेखी सूचना देऊनही सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी त्‍याबाबत कोणतीही कार्यवाही न करुन तक्रारदारास मानसिक त्रास हाईल असे कृत्‍य केले आहे.  ही बाब  सिध्‍द होते.   सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

7.    उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

-:  अंतिम आदेश :-

1.    तक्रार क्र. 88/2014 अंशत:  मंजूर करण्यात येते.

2.    सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना कराराप्रमाणे सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा न करुन देऊन व सदनिकेचा ताबा विहीत मुदतीत न देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.

3.    सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना “साई होम”, सर्व्हे नं. 71,‍ हिस्सा नं. 3, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथील 250 चौ.फूट क्षेत्रफळाच्‍या सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा या आदेशप्राप्‍ती  दिनांकापासून 30 दिवसांत करुन द्यावा.

4.    तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 1 व 2 यांना “साई होम”, सर्व्हे नं. 71,‍ हिस्सा नं. 3, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथील 250 चौ.फूट क्षेत्रफळाच्‍या सदनिकेची करारनाम्‍याप्रमाणे उर्वरित रक्कम वर नमूद क्र. 3 मधील बाबीची पूर्तता सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे  केल्‍यानंतर 30  दिवसांत अदा करावी.

5.    सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना “साई होम”, सर्व्हे नं. 71,‍ हिस्सा नं. 3, मौजे चिपळे, ता. पनवेल, जि. रायगड येथील 250 चौ.फूट क्षेत्रफळाच्‍या सदनिकेचा कायदेशीर ताबा सर्व सोयी सुविधांसह या आदेशप्राप्‍ती  दिनांकापासून 60 दिवसांत द्यावा.

 

6.    सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 3 व 4 मधील आदेशाचे पालन विहित मुदतीत करणे शक्‍य नसल्‍यास, सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना सदनिका विक्री व्‍यवहारापोटी अदा केलेली रक्‍कम रु. 2,02,000/-/- (रु. दोन लाख दोन हजार मात्र) दि. 29/11/2013 पासून दि. 31/01/2015 पर्यंत द.सा.द.शे. 6% व्‍याजासह या आदेशप्राप्‍ती  दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.

7.    सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 6 मधील आदेशाचे पालन विहित मुदतीत करणे शक्‍य नसल्‍यास त्‍यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे रक्‍कम रु. 2,02,000/- (रु. दोन लाख दोन हजार मात्र) तक्रारदारांना अदा करेपर्यंत दि. 29/11/2013 पासून द.सा.द.शे. 9% व्‍याजासह अदा करावी.

8.    सामनेवाले क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना तक्रार खर्च, मानसिक त्रास व शारिरिक त्रासापोटी एकत्रित रक्‍कम रु. 1,00,000/- (रु. एक लाख मात्र) या आदेशप्राप्‍ती  दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.

9.    न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.

 

ठिकाण- रायगड-अलिबाग.

दिनांक – 31/01/2015.

 

 

   (रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्‍का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)

         सदस्‍य               सदस्‍या            अध्‍यक्ष

          रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Umesh V. Jawalikar]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Rameshbabu B. Cilivery]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Smt. Ulka A. Pawaskar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.