Maharashtra

Ahmednagar

MA/19/34

गणेश पंढरीनाथ आंधळे - Complainant(s)

Versus

1. मा.व्यवस्थापक, कोटक महिद्रा लाईफ इन्शुरंस कंपनी लि. - Opp.Party(s)

सानप

21 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/19/34
( Date of Filing : 07 Sep 2019 )
In
Complaint Case No. CC/19/302
 
1. गणेश पंढरीनाथ आंधळे
रा. गोळेगांव ता. शेवगांव जि. अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. 1. मा.व्यवस्थापक, कोटक महिद्रा लाईफ इन्शुरंस कंपनी लि.
माऊली संकूल पहिला मजला झोपडी कॅटीन सावेडी शाखा-अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2. मा.व्यवस्थापक, कोटक महिद्रा लाईफ इन्शुरंस कंपनी लि.
नागापुर, एमआयडीसी शाखा-अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:सानप, Advocate
For the Respondent:
Dated : 21 Jan 2020
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावरील आदेश

निकाल दिनांक – २१/०१/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.  तक्रारदारातर्फे सामनेवाले यांनी बेकायदेशीर कर्जाची रक्‍कम वसुल करू नये व त्‍यांच्‍या ताब्‍यात असलेले ट्रॅक्‍टर क्रमांक एमएच-१६ बीवाय-९११७ हे ओढुन नेण्‍यात येऊ नये, असा आदेश मिळण्‍याचा अर्ज सादर केला आहे. सदर अर्जात तक्रारदाराने असे नमुद केले आहे की, तक्रारदाराचे वडीलांनी सामनेवाले क्र.२ यांच्‍याकडुन वर नमुद ट्रॅक्‍टरकरीता कर्ज घेतले होते व ते दिनांक ०२-०३-२०१९ रोजी मयत झाले. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदाराला कर्जाची मागणी करतांना असे निदर्शनास आले की, सामनेवालेने कर्ज देतेवेळी कर्जदाराचा विमा दावा स्विकारणे आवश्‍यक होते. कर्जदाराचे नावाने विमा न घेता तक्रारदाराचा विमा काढण्‍यात आलेला होता व त्‍यामुळे तक्रारदाराला वारंवार त्रास देत आहे व वादातील ट्रॅक्‍टर ओढुन नेणार असल्‍यामुळे सदर तक्रार निकाली होईपर्यंत वादातील ट्रॅक्‍टर सामनेवाले यांनी ओढुन घेऊन जाऊ नये व तक्रारदाराकडुन बेकायदेशीरपणे कर्जाची रक्‍कम वसुल करून नये, असा हुकुम मनाईचा अर्ज सादर करण्‍यात आला आहे.

२.  सामनेवालेने सदर अर्जावर जबाब दाखल केला आहे, त्‍यावर सामनेवालेने सदर अर्जावर आक्षेप घेतला आहे. सामनेवालेने जबाबात असे नमुद केले आहे की, तक्रारदाराने सामनेवालेकडे स्‍वतः अंडरटेकींग देऊन विनंती केलेली होती की, कर्जदाराचे नावे विमा पॉलिसी उतरू नये व कर्जाचे संबधी असलेली पॉलिसी तक्रारदाराचे नावाने काढण्‍यात यावी. याबाबत दिनांक २४-१२-२०१९ रोजी तक्रारदाराची अंडरटेकींगची प्रतही दाखल केलेली आहे. उभय पक्षांचा सदर अर्जावर तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला.  पुर्ण तक्रारीची पडताळणी करतांना सदर तक्रारीत तक्रारदार किंवा सामनेवाले यांची कर्जाचे संदर्भात झालेल्‍या  कराराची प्रत दाखल करण्‍यात आलेली नाही. तक्रारदाराचे तक्रारीप्रमाणे वादातील ट्रॅक्‍टरकरीता सामनेवालेकडुन कर्ज घेतेवेळी केलेले अंडरटेकींगमध्‍ये असे दिसुन येते की, तक्रारदाराने हा Co-Borrower म्‍हणजे सह-कर्जदार आहे. नियमाप्रमाणे घेतलेले कर्ज, कर्ज परत करणेबाबत सह-कर्जदार त्‍याची जबाबदारी नाकारू शकत नाही. तसेच त्‍यावेळी सामनेवाले कंपनीने कर्ज वसुलीकरीता कोणतीही बेकायदेशीर पध्‍दत वापरु शकत नाही, असे मंचाचे मत आहे. सदर तक्रारीत सामनेवालेने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे किंवा नाही हा निर्णय घेणेसाठी पुराव्‍याची आवश्‍यकता आहे. तसेच तक्रारदार हा सह-कर्जदार असल्‍याने व सामनेवाले किंवा तक्रारदाराने कर्ज करारनामा दाखल केलेअभावी खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.    

आ दे श

१. तक्रारदाराकडुन सामनेवाले क्रमांक २ यांनी माननीय सर्वोच्‍च  न्‍यायालय यांनी दिलेल्‍या तसेच रिझर्व्‍ह बॅंक ऑफ इंडिया यांनी  दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे बेकायदेशीर रितीने उर्वरीत कर्जाची रक्‍कम वसुल करून नये.

२. सदर आदेश तक्रार निकाली होईपर्यंत कायम राहील. 

३. तक्रारदाराने सदर किरकोळ अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.

४. आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.