(मंचाचे निर्णयान्वये, सौ.मोहिनी ज.भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 25 जुन 2009)
अर्जदाराने, सदरची तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये, गैरअर्जदाराचे विरुध्द दाखल केलेली आहे. अर्जदार श्री राजाराम परसरामजी शर्मा यांनी, केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय थोडक्यात असा की,
1. अर्जदार हे, गडचिरोली येथील रहिवाशी असून, किराणा दुकान व शेतीचे काम करतात. अर्जदार यांनी, आपल्या मालकीची बजाज बॉक्सर क्र.एम एच -33-7403 ही गाडी दि. 30/10/2008 रोजी दुरुस्ती व सर्व्हीसींग करीता, गैरअर्जदार क्र. 1 वैनगंगा बजाज मोटर्स अॅन्ड सर्व्हीस सेंटर यांचेकडे दिली होती. गैरअर्जदार यांनी, गाडीला रुपये 3675/- इतका खर्च येईल व गाडी तीन दिवसांनी मिळेल, असे सांगीतले.
... 2 ... ग्रा.त.क्र. 2/2009.
त्याप्रमाणे, अर्जदार यांनी, दिनांक 2/11/2008 ला अॅडव्हांस रुपये 2,000/- दिले. त्यामुळे, दिनांक 6/11/2008 ला उर्वरीत रक्कम घेवून गाडी देण्याचे, गैरअर्जदार यांनी, मान्य केले.
2. अर्जदार हे, दि. 6/11/2008 ला शोरुम मध्ये गेले, तेंव्हा, गैरअर्जदार यांनी, गाडी दि. 7/11/2008 ला देतो असे सांगितले. अर्जदार हे, परत दि. 7/11/08 ला गेले तेंव्हा सुध्दा गाडी दिली नाही. त्यामुळे, अर्जदार हे वारंवार गाडीची मागणी करीत होते. त्यानंतर, दि. 9/11/08 ला गाडी दुरुस्त करुन दिली.
3. अर्जदार यांनी, गाडी आणल्यानंतर दूसरे दिवशी म्हणजे दि. 10/11/08 रोजी शेतीवर गेले असता, परत येतांना गाडी बंद पडली. तेंव्हा, अर्जदार हे गाडी घेवून पुन्हा शोरुमला गेले व तेथील संचालकाकडे तक्रार केली. तेंव्हा गैरअर्जदार क्र. 1 यांनी आमचा मेकॅनीक नोकरी सोडून गेल्यामुळे, गाडी दुरुस्त करुन देण्यास नकार दिला.
त्यामुळे, अर्जदार यांनी, गाडी शोरुममध्ये ठेवून, सदर प्रकरणाचे निराकरण करुन देण्याकरीता गैरअर्जदा नं. 2 कडे लेखी कळविले. परंतु, गैरअर्जदार क्र. 2 यांनी सुध्दा याकडे लक्ष दिले नाही.
4. अर्जदार यांना आपल्या शेतीकडे लक्ष देता आले नाही. त्यामुळेच, अर्जदाराला यावर्षीचे आपले शेतीचे उत्पन्नापासून वंचित राहावे लागले. याकरीता, गैरअर्जदार क्र. 1 व 2 हेच जबाबदार आहे.
अर्जदार हे खालीलप्रमाणे मागणी करतात की,
(1) दुरुस्तीकरीता आलेला एकुण खर्च रुपये 3,675/-
(2) शेतीच्या नुकसानीची एकुण रक्कम रुपये 70,000/-
(3) शारीरीक, मानसीक ञासाबद्दलची रक्कम रुपये 5,000/-
(4) वाहतूकीचा खर्च रुपये 500/-
(5) स्टेशनरी व पोस्टेज खर्च रुपये 1,000/-
(6) दुकान व्यवसाचे नुकसान रुपये 15,000/-
----------------------------
एकुण रुपये : 95,175/-
अर्जदार एकुण रुपये 95,175/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडून व्याजासह मिळण्याची विनंती करतात.
5. गैरअर्जदार क्र. 1 व 2 आपल्या लेखी बयाणात निशाणी क्र. 7 वर म्हणतात की, अर्जदार यांची गाडी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून घेतलेली नाही. परंतु, सदर गाडी ही कंपनीची असल्यामुळे गैरअर्जदार यांनी गाडी दुरुस्तीसाठी घेतली.
... 3 ... ग्रा.त.क्र. 2/2009.
गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना दि. 6/11/08 रोजी गाडी दुरुस्त करुन दिली, त्यानंतर अर्जदार यांनी गाडी दि. 10/11/08 पर्यंत वापरली, परंतु गाडी दि. 10/11/08 रोजी नादुरुस्त झाली. त्यामुळे, अर्जदार यांनी गाडी शोरुममध्ये आणली. मेकॅनीक नसल्यामुळे गाडी दुरुस्त झाली नाही. नविन मेकॅनिक आल्यावर गाडी खोलण्यात आली. त्यातील 6 करंट कॉईल, स्टार्टींग कॉईल व सी डी आय हे भाग नविन लावावे म्हणजे गाडी सुरु होईल असे अर्जदाराला सांगितले. परंतु, अर्जदार हे नविन सामान गाडीत टाकण्यास तयार नाहीत. नविन सामान लावल्याशिवाय गाडी दुरुस्त होत नाही, असे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे.
6. गैरअर्जदार क्र. 2 यांचा सदर तक्रारीशी काहीही संबंध नाही. गाडीची वॉरंटीही निघून गेली होती, तरीही अर्जदार यांचा नोटीस गैरअर्जदार क्र. 2 यांना प्राप्त झाल्यावर, त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना अर्जदाराची गाडी दुरुस्त करुन देण्यास कळविले होते. अर्जदारांची गाडी खराब होण्यामागे अर्जदार स्वतः दोषी असून, अर्जदाराने गैरअर्जदार यांना विनाकारण ञास देवून, न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे, ती खारीज करावी असे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे.
// कारणे व निष्कर्ष //
अर्जदार, गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपञे, शपथपञे, पुरावा व अर्जदार यांचा तोंडी युक्तीवाद यावरुन असे दिेसून येते की,
7. अर्जदार यांची बजाज बॉक्सर क्र. एम एच 33-7403 ही गाडी दि.30/10/08 रोजी दुरुस्ती व सर्व्हीसींगकरीता अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचकडे टाकली होती. अर्जदार यांच्या गाडीची वॉरंटी संपलेली होती, परंतु गाडीच्या कंपनीचीच शोरुम असल्यामुळे, अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र. 1 कडेच गाडी दुरुस्तीसाठी टाकली होती.
8. गैरअर्जदार यांनी गाडीला रुपये 3,675/- इतका खर्च येईल व गाडी तीन दिवसांत मिळेल असे सांगितल्यावरही, गाडी देण्यास उशिर केला व अर्जदार यांना वारंवार शोरुम मध्ये चौकशीसाठी जावे लागले, यावरुन गैरअर्जदार क्र. 1 हा अर्जदार यांना गाडी दुरुसत करुन देण्यास टाळाटाळ करीत होते, असे दिसून येते.
9. अर्जदार यांची गाडी दि. 9/11/08 रोजी दुरुस्त करुन दिल्यावर लगेच दि. 10/11/08 रोजी गाडी अर्जदार शेतीवरुन परत येत असतांना खराब झाली. यानंतर, अर्जदार यांना, गैरअर्जदार यांनी, नविन सामान टाकल्याशिवाय गाडी दुरुस्त होणार नाही असे सांगितले. आधीच रुपये 3,675/- चे सामान टाकलेले असल्यामुळे, अर्जदार हे नविन सामान टाकायला तयार नव्हते. अर्जदार यांनी गाडी दुरुस्तीकरीता नविन सामान
... 4 ... ग्रा.त.क्र. 2/2009.
1-2 दिवसांपूर्वी टाकल्यानंतर, सामान खराब झाल्यामुळे, पुन्हा सामान टाकणे व खर्च करणे, न्यायमंचास संयुक्तीक वाटत नाही.
10. अर्जदार यांनी, दाखल केलेल्या कागदपञात अ-4 नुसार इंजिन रिपेरींगचे काम केलेले दाखविले आहे. त्यात ईलेक्ट्रॉनीक्स पार्टसचा वापर आणि कोणते इेलेक्ट्रॉनिक्स पार्ट वापरलेत, याबद्दल खुलासा केलेला नाही. त्यामुळे, ईलेक्टॉनिक्स वस्तुंची गॅरंटी नसते, असे गैरअर्जदार यांचे म्हणणे बरोबर वाटत नाही, असे या न्यायमयंचाचे मत आहे.
11. गैरअर्जदार क्र. 2 ने, अर्जदारास कोणत्या प्रकारची सेवा देण्यात ञुटी केली, याबद्दलचा खुलासा केलेला नाही, तसेच पुरावा जोडलेला नाही. त्यामुळे, त्याचे विरोधात कोणताही आदेश करणे न्यायोचित होणार नाही.
12. अर्जदार यांची गाडी ही गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे शोरुममध्येच आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी पैसे घेवून अर्जदार यांची गाडी दि. 7/11/08 ला दुरुस्त करुन दिली होती. त्यामुळे, गैरअर्जदार क्र. 1 यांनीच, अर्जदार यांची गाडी चालु स्थितीत, कोणतीही रक्कम न घेता, दुरुस्त करुन द्यावी, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे.
13. अर्जदार यांनी, मागणी करतांना शेतीच्या नुकसानभरपाई बद्दल व दुकान व्यवसायाचे नुकसानीबाबत मागणी केलेली आहे. परंतु, त्याबद्दल अर्जदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे, त्याबद्दल कोणतीही नुकसानभरपाई देणे, न्यायमंचास योग्य वाटत नाही.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र. 1 यांनी, अर्जदार यांना त्यांची गाडी ही विनामुल्य दुरुस्त
करुन चालू स्थितीत, अर्जदारास, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 15
दिवसांचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र. 1 यांनी, अर्जदारास, मानसिक व शारीरीक ञासाबद्दल रुपये
2,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र. 2 यांचे विरोधात कोणताही ओदश नाही.
... 5 ... ग्रा.त.क्र. 2/2009.
(5) आदेशाची प्रत, उभयतांना देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :– 25/06/2009.