Maharashtra

Jalna

CC/50/2013

Ram Sakru Chavan - Complainant(s)

Versus

1) The Br.Manager,Chola mandlam ms General Insurance co. - Opp.Party(s)

P.M.Parihar

25 Mar 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/50/2013
 
1. Ram Sakru Chavan
Ambhoda kadam,Tq.Mantha
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1) The Br.Manager,Chola mandlam ms General Insurance co.
Cts.No.14536,3rd floor,Oberoi Towersm,civil Lines Opp.Govt.Milk Dairy,Jalna Road,Aurangabad.-431001
Aurangabad
Maharashtra
2. 2) Chaola mandalam,Ms.Genral Insurance co.,
Cts No.14536 3rd floorn Oberoi towers,Civil Lines,Opp.Govt.Milk Dairy,Jalna Road,Aurangabad.-431001
Aurangabad
Maharashtra.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:P.M.Parihar, Advocate
For the Opp. Party:
Adv.J.C.Badve
 
ORDER

(घोषित दि. 25.03.2014 व्‍दारा श्रीमती माधुरी विश्‍वरुपे, सदस्‍या)

 

तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, महींद्रा बोलोरो एसएलएक्‍स स्‍टार गाडी क्रमांक एम.एच.21 अेअे 5777 रत्‍नप्रभा मोटर्स यांचेकडून विकत घेतली. तक्रारदारांनी महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा फायनान्‍स कंपनी यांचेकडून सदर गाडी घेण्‍याकरीता कर्ज घेतले. तसेच गैरअर्जदार यांचेकडून कव्‍हर नोट 8163470 अन्‍वये दिनांक 26.11.2010 ते 25.11.2011 या कालावधीकरीता गाडीची विमा पॉलीसी घेतली. दूदैवाने दिनांक 02.08.2011 रोजी सदर गाडीचा औरंगाबाद ते जालना रोडवर चिकलठाण्‍या जवळ अपघात होवून नुकसान झाले. संबंधित पोलीस स्‍टेशनला अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर जीप ड्रायव्‍हारच्‍या विरुध्‍द गुन्‍हा नोंदविला. गैरअर्जदार विमा कंपनीला अपघाता बाबत माहिती दिल्‍यानंतर सर्व्‍हेअर शेख यांची नियुक्‍ती केली. सर्व्‍हेअर यांनी गाडीच्‍या दुरुस्‍ती बाबत तपासणी केली व तक्रारदारांचा विमा दावा प्रोसेसमध्‍ये असल्‍यामुळे गाडी दुरुस्‍ती करण्‍या बाबत सांगितले. तक्रारदारांनी रत्‍नप्रभा मोटर्स कडून गाडीची दुरुस्‍ती केली व रक्‍कम रुपये 59,381/- बिल दिले.

 

तक्रारदारांनी अपघाता विषयीची माहिती विलंबाने दिल्‍यामुळे गैरअर्जदार विमा रक्‍कम देण्‍याबाबत टाळाटाळ करत आहे.

 

गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारांना विमा लाभ रक्‍कम अद्याप पर्यंत दिली नाही. सदर अपघाताची माहिती विलंबाने कळाल्‍याचे कारणास्‍तव गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना विमा रक्‍कम देण्‍याचे नाकारले. तक्रारदारांनी सदर गाडीवाहन कर्जाव्‍दारे घेतली असुन कर्जाचे हप्‍ते भरणे अशक्‍य झाले आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.

 

गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांच्‍या गाडीची विमा पॉलीसी मान्‍य आहे. सदर अपघात विमा कालावधीत झालेला आहे. परंतू तक्रारदारांनी सदर गाडीचे अपघातात नुकसान झाल्‍याची बाब सिध्‍द करणे आवश्‍यक आहे. तसेच गैरअर्जदार यांनी अपघाताची माहिती विलंबाने दिल्‍यामुळे विमा प्रस्‍ताव योग्‍य कारणास्‍तव नाकारला आहे असे नमूद केले आहे. गैरअर्जदार यांचे सर्व्‍हेअर यांनी गाडीची तपासणी करुन रुपये 18,806/- एवढी गाडी नुकसानीची रक्‍कम निश्चित केली आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीवर रुपये 18,806/- एवढी रक्‍कम देण्‍याची जबाबदारी आहे.

 

तक्रारदारांची तक्रार, गैरअर्जदार यांचे लेखी निवेदन यांचा सखोल अभ्‍यास केला. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे विद्वान वकील श्री. जे.सी.बडवे यांचा युक्‍तीवाद ऐकला.

 

  1. तक्रारदारांची महिंद्रा बोलेरो गाडीची विमा पॉलीसी गैरअर्जदार विमा कंपनीकडून घेतल्‍याची तसेच अपघात विमा कालावधीत झाल्‍याची बाब गैरअर्जदार यांना मान्‍य आहे.

     

  2. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार अपघातामध्‍ये गाडीचे नुकसान झाले असून तक्रारदारांनी गाडी दुरुस्‍तीचे बील रुपये 59,381/- एवढया रकमेचे रत्‍नप्रभा मोटर्स यांना दिले.

 

  1. गैरअर्जदार यांच्‍या म्‍हण्‍यानुसार सर्वेअर अहवालानुसार सदर अपघातात गाडी नुकसानीची रक्‍कम रुपये 18,806/- रक्‍कम निश्चित केलेली असल्‍यामुळे फक्‍त रुपये 18,806/- एवढीच रक्‍कम देण्‍याची गैरअर्जदार विमा कंपनीवर जबाबदारी आहे. सर्वेअर रिपोर्ट न्‍याय मंचात दाखल केला आहे.

 

  1. तक्रारदारांनी सदर गाडीची दुरुस्‍तीचे रक्‍कम रुपये 59,381/- चे बील दाखल केले आहे. परंतू सदर दुरुस्‍ती अपघातात झालेल्‍या नुकसानी बाबतचे असल्‍याबाबत पुराव्‍यानिशी सिध्‍द केले नाही. त्‍यामुळे तक्रारदारांना सर्वेअर अहवालानुसार रक्‍कम रुपये 18,806/- देणे योग्‍य आहे असे न्‍याय मंचाचे मत आहे.

 

  1. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव प्रलंबित ठेवून गाडी नुकसानीची रक्‍कम वेळेवर अदा न केल्‍यामुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्‍यामुळे तक्रारदारांना गैरअर्जदार यांनी तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- देणे न्‍यायोचित होईल असे न्‍याय मंचाचे मत आहे.  

    सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.

 

आदेश

 

  1. गैरअर्जदार यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारांना गाडी नुकसानीची रक्‍कम रुपये 18,806/- (अक्षरी रुपये अठरा हजार आठशे सहा फक्‍त) आदेश प्राप्‍ती पासून  30 दिवसात द्यावे.
  2. गैरअर्जदार यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्‍त) आदेश प्राप्‍ती पासून 30 दिवसात द्यावे.
  3. वरील आदेश क्रमांक 1 व 2 मधील रकमा विहीत मुदतीत अदा न केल्‍यास 9 टक्‍के व्‍याज दरासहीत द्याव्‍यात.
  4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3)  प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच अर्जदाराला परत करावेत.
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER
 
[HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.