Maharashtra

Jalgaon

CC/12/86

Bebitai Bhagwan Patil - Complainant(s)

Versus

1) Taluka krushi Adhikari, Bhadgaon 2) National insurance co ltd 3) Kabal insurance pvt ltd - Opp.Party(s)

S.T.Pawar

26 Nov 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/86
 
1. Bebitai Bhagwan Patil
R/o Mandali, ta Bhadgaon
Jalgaon
MS
...........Complainant(s)
Versus
1. 1) Taluka krushi Adhikari, Bhadgaon 2) National insurance co ltd 3) Kabal insurance pvt ltd
Saibaba Market, jalgaon
Jalgaon
MS
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vishwas D. Dhawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Poonam N.Malik MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 86/2012                     
                                    तक्रार दाखल करण्‍यात आल्‍याची तारीखः-09/04/2012.       
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 29/11/2013.
 
गं.भा.बेबीबाई भगवान पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.मांडकी, ता.भडगांव‍,जि.जळगांव.                     ..........     तक्रारदार.
 
            विरुध्‍द
1.     तालुका कृषी अधिकारी,
      तालुका कृषी कार्यालय, भडगांव,
      ता.भडगांव,जि.जळगांव.
2.    व्‍यवस्‍थापक,
      नॅशनल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि,
      साईबाबा मार्केट, केळकर मार्केट जवळ,बळीराम पेठ,
      जळगांव, ता.जि.जळगांव.
3.    व्‍यवस्‍थापक,
      कबाल इंन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट लि,
      4 अ, देहमंदीर सोसायटी, श्रीरंगनगर,
      माईलेले श्रवण विकास महाविद्यालयाजवळ,
पंपींग स्‍टेशन रोड, नाशिक.                   .........      विरुध्‍द पक्ष
                        कोरम- 
                        श्री.विश्‍वास दौ.ढवळे                    अध्‍यक्ष
                        श्रीमती पुनम नि.मलीक                 सदस्‍या.
                  तक्रारदार तर्फे श्री.सतीश तुकाराम पवार वकील.
विरुध्‍द पक्ष 1 व 3 तर्फे प्रतिनिधी.
विरुध्‍द पक्ष क्र.2 तर्फे श्री.विजयकुमार एस.काबरा वकील.
 
निकालपत्र
श्रीमती पुनम नि. मलीक, सदस्‍याः   शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमाधारक मृत्‍यु झाल्‍यानंतर त्‍याचा विमा क्‍लेम देण्‍याचे नाकारुन दिलेल्‍या सेवेतील त्रृटी दाखल प्रस्‍तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
            2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराचे  पती भगवान महादू पाटील यांचे दि.3/5/2007 रोजी अपघाती अपघाती निधन झाले. मयत भगवान महादु पाटील यांचे नावावर मौजे मांडकी, ता.भडगांव, जि.जळगांव येथे शेती होती व ते शेती वहीवाटदार होते.    शासन निर्णय क्र.एनएआयएस 1204/सी आर 166/11-अ दि.5 जानेवारी,2005 नुसार शेतक-याचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यास रु.1,00,000/- नुकसान भरपाई विरुध्‍द पक्षाने द्यावायाची आहे. तक्रारदार हिने योग्‍य त्‍या कागदपत्रांसह विमा रक्‍कम मागणीसाठी तालुका कृषी अधिकारी, भडगांव यांचेमार्फत फॉर्म भरुन पाठविला असता तसेच विरुध्‍द पक्षाचे मागणीनुसार कागदपत्र पुरविले असतांनाही विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्‍कम देण्‍याचे नाकारुन सदोष सेवा दिलेली आहे. सबब विमा क्‍लेमपोटी रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- तसेच मंजुर रक्‍कमेवर द.सा.द.शे.18 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळावे व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
            3.    सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्‍द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या. 
                        4.    विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी याकामी त्‍यांचे कार्यालयाकडे शासन निर्णय क्र.से.अ.वि.2009/प्र.क्र.268/11 ऐ.मंत्रालय,विस्‍तार,मुंबई-32 दि.4/12/2009 नुसार कृषी विभागाकडे शेतकरी जनता अपघात विमा योजना प्रकरण स्विकारणे, तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्‍याची जबाबदारी माहे डिसेंबर,2009 पासुन आलेली आहे व प्रस्‍तुत प्रकरणी भगवान महादु पाटील यांचे दि.3/5/2007 रोजी अपघाती निधन झालेले असल्‍याने सदरचे प्रकरण हे 2009 पुर्वीचे असल्‍याने याबाबत प्रस्‍तुतचे कार्यालय काहीएक माहिती पुरवु शकत नाही असे कळविले आहे.
            5.    विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.   तक्रारदाराची तक्रार त्‍यातील म्‍हणणे व मागणे पुर्णपणे खोटे, लबाडीचे असुन ते विरुध्‍द पक्षास मान्‍य नाही.   तक्रारदाराने तक्रार अर्जातील मजकुर पुराव्‍यासह शाबीत करावा.   तक्रारदाराचे पती भगवान महादू पाटील यांचा दि.3/5/2007 रोजी मृत्‍यु झाला तो अपघाती नसुन मयताने मृत्‍युपुर्वी मद्य प्राशन केलेले असल्‍याने तो पाण्‍यात बुडाला व मृत्‍यु झालेला आहे.   सबब सदरचा क्‍लेम हा कायदयाचे तरतुदीवर नसल्‍याने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा मध्‍ये बसत नाही त्‍यामुळे नामंजुर करण्‍यात आलेला आहे. तसेच तक्रारदाराने 5 वर्षाने क्‍लेम दाखल केलेला असल्‍याने त्‍यास मुदतीची बाधा येत असुन तो रद्य होण्‍यास पात्र आहे.   सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्य करण्‍यात यावा व विरुध्‍द पक्षाने ग्राहक सेवेत कसुर केले नसल्‍याचे ठरवुन मिळावे अशी विनंती विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी केलेली आहे.
            6.    विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक होऊ शकत नाहीत.   ज्‍या विमा कंपनीने राज्‍य शासनाकडुन विमा प्रिमियम स्विकारुन जोखीम स्विकारलेली आहे त्‍यांचेच तक्रारदार ग्राहक होऊ शकतात.    विरुध्‍द पक्ष हे केवळ मध्‍यस्‍थ व सल्‍लागार म्‍हणुन विनामोबदला काम करीत आहेत.   मयत भगवान महादु पाटील यांचा अपघात दि.3/5/2007 रोजी झाला, सदरील प्रस्‍ताव हा तहसिल कार्यालय,भडगांव मार्फत कबाल कार्यालयास दि.4/8/2007 रोजी प्राप्‍त झाला तो प्रस्‍ताव कबाल मार्फत नॅशनल इंन्‍शुरन्‍स कंपनी यांचेकडे दि.4/8/2007 रोजी पाठविला असता संबंधीत कंपनीने केलेल्‍या तपासणीअंती कै.भगवान महादू पाटील यांनी घरच्‍या त्रासामुळे आत्‍महत्‍या केल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे असे नमुद करुन दावा नामंजुर केलेला आहे व तसे वारसांना कळविलेले आहे.   वरील परिस्थितीचा विचार होऊन विरुध्‍द पक्षाची तक्रार अर्जातुन मुक्‍तता करण्‍यात यावी व याकामी विनाकारण सामील केल्‍याने खर्चादाखल तक्रारदाराकडुन रु.5,000/- मिळावेत अशी विनंती विरुध्‍द पक्ष क्र.3 यांनी केलेली आहे.      
            7.    तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी म्‍हणणे,  व तक्रारदाराचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
      मुद्ये                                             उत्‍तर.
1.     तक्रारदार हे विरुध्‍द पक्षांचे ग्राहक आहेत काय ?   होय.
2.    विरुध्‍द पक्षांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात त्रुटी केली
      आहे काय ? असल्‍यास कोणी ?          होय, विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी
3.    तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे        अंतीम आदेशानुसार
 
      8.    मुद्या क्र. 1 - तक्रारदार हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक होतात काय, याबाबत तक्रारदाराने तक्रार अर्जातुन ती मयत भगवान महादु पाटील यांची पत्‍नी असल्‍याचे कथन केलेले असुन नि.क्र.3 लगत दाखल वारस दाखल्‍याचे अवलोकन करता मयत भगवान महादु पाटील यास पत्‍नी बेबाबाई भगवान पाटील वारस असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.     यास्‍तव तक्रारदाराचे पती हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक होते व ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्‍या कलम 2(1)(ब)(v) च्‍या तरतुदीनुसार मयत ग्राहकाचे वारस म्‍हणुन तक्रारदार हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक ठरतात.   यास्‍तव मुद्या क्र.1 चा निष्‍कर्ष आम्‍ही होकारार्थी देत आहोत.
            9.    मुद्या क्र. 2 - विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी याकामी हजर होऊन त्‍यांचे कार्यालयाकडे शासन निर्णय क्र.से.अ.वि.2009/प्र.क्र.268/11 ऐ.मंत्रालय,विस्‍तार,मुंबई-32 दि.4/12/2009 नुसार कृषी विभागाकडे शेतकरी जनता अपघात विमा योजना प्रकरण स्विकारणे, तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्‍याची जबाबदारी माहे डिसेंबर,2009 पासुन आलेली आहे व प्रस्‍तुत प्रकरणी भगवान महादु पाटील यांचे दि.3/5/2007 रोजी अपघाती निधन झालेले असल्‍याने सदरचे प्रकरण हे 2009 पुर्वीचे असल्‍याने याबाबत प्रस्‍तुतचे कार्यालय काहीएक माहिती पुरवु शकत नाही असे लेखी म्‍हणण्‍यातुन कळविलेले आहे.   तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांनी त्‍यांची याकामी केवळ मध्‍यस्‍थ म्‍हणुन भुमिका असुन ते विनामोबदला मध्‍यस्‍थ व सल्‍लागार म्‍हणुन काम करीत आहेत तसेच मयताचा विमा क्‍लेम संबंधीत विमा कंपनीने तपासणी अंती मयत घरच्‍या त्रासापाई आत्‍महत्‍या केल्‍याने नाकारला आहे असे कथन केले आहे.   तसेच याकामी विरुध्‍द पक्ष क्र.2 विमा कंपनीने हजर होऊन तक्रारदाराचे पती भगवान महादू पाटील यांचा दि.3/5/2007 रोजी मृत्‍यु झाला तो अपघाती नसुन मयताने मृत्‍युपुर्वी मद्य प्राशन केलेले असल्‍याने तो पाण्‍यात बुडाला व मृत्‍यु झालेला आहे.   सबब सदरचा क्‍लेम हा कायदयाचे तरतुदीवर नसल्‍याने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा मध्‍ये बसत नाही त्‍यामुळे नामंजुर करण्‍यात आलेला आहे असे लेखी म्‍हणण्‍यातुन प्रतिपादन केलेले आहे.  
            10.   तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत नि.क्र.3 लगत अकस्‍मात मृत्‍युची खबर, घटनास्‍थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, ड पत्रक नोंद, वारस दाखला, खाते उतारा, शव परिक्षेचा पोलीस अर्ज, मरणोत्‍तर पंचनामा इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहे. त्‍यात प्रामुख्‍याने घटनास्‍थळ पंचनाम्‍यावरुन मयत हा म्‍हशींना पाणी पाजण्‍यासाठी नदीचे पाण्‍यात घेऊन गेला असता त्‍याचा कमरेचा रुमाल अचानक सुटून वाहत जातांना सदर रुमाल घेण्‍यासाठी मयत गेला असता जास्‍त खोलवर पाण्‍यात मयत हा पडुन पाण्‍यात बुडून मेला असे नमुद असुन त्‍यावर पंच व साक्षीदारांच्‍या सहया आहेत.   तसेच पोलीस यंत्रणेकडुन दिलेल्‍या रिपोर्ट मध्‍येही मयत हा पाण्‍यात पडून बुडून मरण पावला आहे असे नमुद केले आहे.    विरुध्‍द पक्ष क्र. 2 विमा कंपनीने याकामी राज्‍य सरकारकडुन प्रिमियम रक्‍कम स्विकारुन राज्‍यातील शेतक-यांचा विमा उतरवला असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.   विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी त्‍यांचेकडे तक्रारदाराचा दाखल असलेला क्‍लेम तक्रारदाराचे पती भगवान पाटील यांनी घरच्‍या त्रासामुळे आत्‍महत्‍या केल्‍याचे कारणावरुन नाकारल्‍याचे विरुध्‍द पक्ष क्र.2 विमा कंपनीचे दि.20/03/2009 रोजीचे पत्रावरुन स्‍पष्‍ट होते तथापी मयत भगवान पाटील यांना घरचा कोणता त्रास होता याबाबत काहीएक उहापोह केलेला नाही अगर लेखी म्‍हणण्‍यासोबत त्‍यापुष्‍ठयर्थ कागदोपत्री पुरावेही दिलेले नाहीत.   याउलट विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी लेखी म्‍हणण्‍यातुन तक्रारदाराचे पती भगवान महादू पाटील यांचा दि.3/5/2007 रोजी जो मृत्‍यु झाला तो अपघाती नसुन मयताने अपघातापुर्वी मद्य प्राशन केलेले असल्‍याने तो पाण्‍यात बुडाला व मृत्‍यु झाला असे नमुद केले आहे.   यावरुन विरुध्‍द पक्ष क्र. 2 विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारतांना प्रस्‍तुत तक्रारीकामी व्‍यक्‍त केलेली दोन परस्‍पर भिन्‍न मते 1) घरच्‍या त्रासामुळे आत्‍महत्‍या, 2) अपघातापुर्वी मद्य प्राशन केल्‍याने पाण्‍यात बुडाला व मृत्‍यु झाला., ही परस्‍पर मत भिन्‍नता पाहता विरुध्‍द पक्ष क्र. 2 विमा कंपनीने केवळ तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारण्‍याचे हेतुने कोणत्‍याही कागदोपत्री पुराव्‍याची शहानिशा न करता तसेच संबंधीत प्रकरणी सखोल तपास न करता तक्रारदारा सारख्‍या खेडयात राहणा-या विधवा महीलेचा विमा क्‍लेम देण्‍याचे नाकारुन सेवेत अक्षम्‍य दिरंगाई व सेवा त्रृटी केल्‍याचे निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.   सामनेवाला क्र. 1 व 3 यांची प्रस्‍तृत प्रकरणात मर्यादीत व केवळ फॉरर्वडींग एजन्‍सी म्‍हणुन भुमिका असल्‍यामुळे त्‍यांनी सेवेत कमतरता केली असे म्‍हणता येणार नाही.   यास्‍तव मुद्दा क्र. 2 चा निष्‍कर्ष आम्‍ही सामनेवाला क्र. 2 च्‍या पुरता होकारार्थी देत आहोत.     
            11.    मुद्या क्र. 3 - तक्रारदाराने याकामी तक्रार अर्जातुन विमा रक्‍कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अशी एकुण रक्‍कम रु.1,25,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह मिळावेत व तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च मिळावा अशी विनंती केलेली आहे.   विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रृटी केलेली आहे.    परिणामी शासन निर्णयाप्रमाणे रु.1,00,000/- विमा रक्‍कम मिळण्‍यास तक्रारदार पात्र ठरतात.   कोणतेही संयुक्‍तीक कारणाशिवाय विमा दावा नाकारल्‍यामुळे रक्‍कम रु.1,00,000/- वर विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी विमा क्‍लेम नाकारल्‍याची दि.20/03/2009 पासुन द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे.   तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मागणी केली आहे तथापी आमचे मते तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळणेस आमचे मते पात्र आहेत. सबब वरिल विवेचनावरुन आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.                   
आ दे श
1.     तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्‍यात येतो.
2.    विरुध्‍द पक्ष नॅशनल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्‍कम रु.1,00,000/-(अक्षरी रक्‍कम रु.एक लाख मात्र) विमा क्‍लेम नाकारल्‍याची  दि.20/03/2009 पासुन द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजासह या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3.    विरुध्‍द पक्ष नॅशनल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासा दाखल रु.15,000/- (अक्षरी रक्‍कम रु.पंधरा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
  गा 
दिनांकः-  29/11/2013. 
                        ( श्रीमती पुनम नि.मलीक )        (श्री.विश्‍वास दौ.ढवळे )
                             सदस्‍या                           अध्‍यक्ष
               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,जळगांव.
 
 
[HON'ABLE MR. Vishwas D. Dhawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Poonam N.Malik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.