Maharashtra

Jalna

CC/137/2011

Subhash Ramrao Tambe - Complainant(s)

Versus

1) Tahsildar, Tahsil karyalaya - Opp.Party(s)

Pramod C.Mayure

23 Nov 2011

ORDER

 
CC NO. 137 Of 2011
 
1. Subhash Ramrao Tambe
R/o.Akola,Tq.Badnapur.
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1) Tahsildar, Tahsil karyalaya
Badnapur
Jalna
Maharashtra
2. 2) ICICI Lombard insurance co.Ltd.
Near Baba Petrol Pump,Adalat Road,Aurangabad.
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Mr. D. S. Deshmukh PRESIDENT
 HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 HONABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(घोषित दि. 23.11.2011 व्‍दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
      तक्रारदाराने तक्रार दाखल करण्‍यासाठी झालेला विलंब माफ करावा अशी मागणी या अर्जाद्वारे केली आहे.
      तक्रारदाराचे म्‍हणणे असे आहे की, महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांचा दिनांक 10.01.2005 ते 09.04.2006 या कालावधीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीच्‍या कालावधीमध्‍येच दिनांक 20.05.2005 रोजी तो स्‍वत: शेतामध्‍ये औत हाकत असतांना त्‍याच्‍या औताची कोंडकी दांडीतून सटकली व त्‍याच्‍या डाव्‍या डोळयावर कोंडकीचा मार लागल्‍याने त्‍याचा डावा डोळा कायमस्‍वरुपी निकामी झाला. तो शेतकरी असल्‍यामुळे त्‍याने शेतकरी अपघात विमा पॉलीसीनुसार नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला होता. परंतू विमा कंपनीने दिनांक 02.03.2006 रोजी त्‍याचा विमा दावा नामंजुर केला. विमा कंपनीने त्‍याबाबत दिलेले पत्र इंग्रजीमध्‍ये असल्‍यामुळे त्‍यास पत्रातील मजकुर कळाला नाही. म्‍हणून त्‍याने ते पत्र तसेच ठेवून दिले. त्‍यानंतर ऑगष्‍ट 2011 मध्‍ये त्‍यास योजनेची माहिती देणा-या नातेवाईकांनी त्‍याच्‍याकडे विमा दाव्‍याबाबत विचारणा केली असता त्‍याने नातेवाईकास विमा कंपनीचे पत्र दाखविले त्‍यावेळी त्‍यांनी त्‍याचा विमा प्रस्‍ताव विमा कंपनीने मुदतीत दाखल न केल्‍याच्‍या कारणावरुन नाकारल्‍याचे सांगितले. विमा कंपनीने विमा दावा नाकारतांना दिलेले कारण चुकीचे असुन त्‍यास योजनेची माहिती नव्‍हती आणि माहिती मिळाल्‍यानंतर कागदपत्र जमा करण्‍यासाठी काही कालावधी लागला आणि त्‍यास विमा कंपनीचे इंग्रजी भाषेतील पत्र न कळाल्‍याने त्‍यास प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यासाठी तिन वर्षाचा विलंब झाला. तक्रार दाखल करण्‍यासाठी झालेला विलंब जाणिपुर्वक केलेला नसुन तो माहिती अभावी झालेला आहे. म्‍हणून विलंब माफ करावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
तक्रारदाराचा विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 02.03.2006 रोजी फेटाळलेला आहे. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळण्‍याबाबत दिलेले पत्र नि.    इंग्रजी भाषेतील असले तरी तक्रारदार अशिक्षित नसल्‍यामुळे त्‍यास पत्रातील मजकुर समजू शकत होता. थोडयावेळासाठी असे जरी गृहीत धरले की, तक्रारदारास इंग्रजी भाषा समजत नाही  तरी त्‍यास पत्रामधील मजकुर इंग्रजी जाणणा-या व्‍यक्‍तीकडून समजून घेता आला असता. परंतू तक्रारदाराने त्‍याबाबत काहीही हलचाल केली नाही आणि त्‍याने तिन वर्ष विलंबाने ही तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करत असतांना त्‍याने माहिती अभावी तक्रार वेळेच्‍या आत दाखल करु शकला नाही असे विलंबाबाबतचे कारण दिले आहे. तक्रारदाराने दिलेले सदर कारण संयुक्तिक नाही आणि तक्रार दाखल करण्‍यासाठी झालेला विलंब माफ करण्‍यास योग्‍य नाही.
तक्रारदाराने अज्ञानामुळे झालेला विलंब माफ करावा अशा प्रकारचे आदेश मा. राज्‍य आयोग यांनी प्रथम अपील क्रमांक ए/09/183 मध्‍ये पारीत केल्‍याचा संदर्भ देवून मा. राज्‍य आयोग यांच्‍या सदर आदेशाच्‍या अनुषंगाने त्‍यास झालेला विलंब माफ करावा अशी विनंती केली आहे. परंतू मा. राज्‍य आयोग यांच्‍या आदेशातील तत्‍वाच्‍या अनुषंगाने विचार केला तरी तक्रारदारास झालेल्‍या विलंबाचा कालावधी लक्षात घेतला तर तक्रारदारास मा. राज्‍य आयोग यांच्‍या उपरोक्‍त आदेशाचा लाभ देणे योग्‍य ठरत नाही. तक्रारदाराला जर पाच ते सहा महिन्‍याचा विलंब झाला असता तर मा. राज्‍य आयोग यांच्‍या उपरोक्‍त निवाडयानुसार तक्रारदारास तक्रार दाखल करण्‍यासाठी झालेला विलंब माफ करणे योग्‍य ठरले असते. परंतू तक्रारदाराला तब्‍बल तिन वर्षापेक्षा अधिक विलंब झालेला आहे आणि हा विलंब माफ करणे कोणत्‍याही परिस्थितीत योग्‍य ठरणार नाही.
म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आदेश
 
  1. तक्रारदाराचा विलंब माफीचा प्रस्‍तुत अर्ज नामंजुर करण्‍यात येतो आणि तक्रारदाराची तक्रार मुदतबाह्य असल्‍यामुळे सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.
  2. तक्रारदारास आदेश कळविण्‍यात यावा.         
 
 
[HONORABLE Mr. D. S. Deshmukh]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER
 
[HONABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.