Maharashtra

Jalna

CC/122/2013

Chandrakalabai Kautikrao Dhavle - Complainant(s)

Versus

1) Tahsildar Bhokardan - Opp.Party(s)

R.V.Jadhav

03 Jun 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/122/2013
 
1. Chandrakalabai Kautikrao Dhavle
R/o Thigalkheda ,Tq.Bhokardan
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1) Tahsildar Bhokardan
2. 2) ICICI LOMBARD GENARAL INSURANCE CO.LTD
2 Floor,Alknanda Comlex near BABA Petrol Pump Aurangabad
Aurangabad
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. REKHA KAPDIYA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(घोषित दि. 03.06.2014 व्‍दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्‍यक्ष)

 

प्रस्‍तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार या थिगळखेडा ता.भोकरदन जि.जालना येथील रहिवासी आहेत. त्‍यांचे पती कौतीकराव यादवराव ढवळे हे व्‍यवसायाने शेतकरी होते. त्‍यांची गट नंबर 149 व 199 मौजे थिगळखेडा येथे शेत जमीन होती. दिनांक 08.07.2005 रोजी सकाळी 11.00 वाजता शेतात काम करत असतांना त्‍यांचे शेजारील शेतकरी शेषराव ढवळे यांचेशी लिंबाची फांदी तोडल्‍या वरुन त्‍यांचे अचानक भांडण झाले आणि शेषराव ढवळे यांनी कौतिकराव कुन्‍हाडीने खुन केला. आरोपी विरुध्‍द गुन्‍हा नोंदणी क्रमांक 39/2005 अन्‍वये भारतीय दंड विधान कलम 302 नुसार पोलीस स्‍टेशन हसनाबाद येथे गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. घटनास्‍थळ पंचनामा व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा करण्‍यात आला. त्‍यानंतर कौतीकराव यांचे शवविच्‍छेदन करण्‍यात आले.

महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांसाठी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना जाहीर केलेली आहे. त्‍या अंतर्गत तक्रारदारांनी तहसीलदार भोकरदन यांच्‍याकडे आवश्‍यक कागदपत्रासह विमा प्रस्‍ताव दाखल केला आहे. सदरील प्रस्‍ताव गैरअर्जदारांकडे प्रलंबित आहे. कबाल  इन्‍शुरन्‍स  कंपनीच्‍या  गैरअर्जदारांकडे  प्रलंबित  असलेल्‍या प्रस्‍तावाच्‍या यादीमध्‍ये त्‍याचा  क्रमांक 103  वर क्‍लेम नंबर MUM/000/0916 असा आहे. गैरअर्जदारानी तक्रारदारांना दिनांक 09 सप्‍टेबर 2005 रोजी पत्र पाठवून 6 (क) उता-याची मागणी केली. त्‍यानुसार तक्रारदारांनी दिनांक 04.10.2005 रोजी गैरअर्जदारांना रजिस्‍टर पोष्‍टाने कागदपत्रे पाठविली आहेत. परंतू आज पर्यंत गैरअर्जदार कंपनीने तक्रारदारांचा दावा मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही. म्‍हणून तक्रारदार प्रार्थना करतात की, त्‍यांची  तक्रार  मंजूर  करण्‍यात  यावी  व  त्‍यांना  विमा  रक्‍कम  रुपये 1,00,000/- 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावेत.

तक्रारदारांने आपल्‍या तक्रारी सोबत गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे पत्र त्‍याची पूर्तता केल्‍याबाबत तक्रारदारांनी गैरअर्जदारांना लिहीलेले पत्र, थिगळखेडा येथील गट क्रमांक 149 व 199 या शेताचा 7/12 चा उतारा, गाव नमुना 6 (क) चा उतारा, फेरफार नक्‍कल, फिर्याद, घटनास्‍थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल इत्‍यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.

गैरअर्जदार क्रमांक 1 मंचाची नोटीस मिळूनही हजर झाले नाही. म्‍हणून तक्रार त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍यात आली.

गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्‍या लेखी जबाबानुसार तक्रारदारांचे पती शेतकरी होते ही गोष्‍ट त्‍यांना मान्‍य नाही. सदरील विमा योजनेचा कालावधी दिनांक 10.04.2005 ते 09.04.2006 असा होता. परंतू ही तक्रार 2013 मध्‍ये दाखल करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे ती मुदतबाहय म्‍हणून नामंजूर करण्‍यात यावी. कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी ही गैरअर्जदार क्रमांक 2 व महाराष्‍ट्र सरकार यांच्‍यातील करारात समाविष्‍ट नाही. तक्रारदाराने पाठविलेला विमा प्रस्‍ताव अपूर्ण होता म्‍हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी पत्राव्‍दारे त्‍यांच्‍याकडे कागदपत्रांची मागणी केली होती. त्‍यांना कागदपत्र मिळाले नाहीत म्‍हणून त्‍यांनी दावा बंद केला. प्रस्‍तुत तक्रार घटनेनंतर 7 ते 8 वर्षांनी दाखल केलेली आहे. म्‍हणून ती नाकारण्‍यात यावी. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्‍या लेखी जबाबा सोबत विमा कराराची प्रत व त्‍यांनी तक्रारदारांना लिहीलेले कागदपत्रांची मागणी करणारे पत्र दाखल केले आहे.

तक्रारदारांचे विव्‍दान वकील श्री.आर.व्‍ही.जाधव व गैरअर्जदारांचे विव्‍दान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्‍तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला. त्‍यावरुन खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात.

  1. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या क्‍लेम फॉर्म वरुन त्‍यांनी दिनांक 15.07.2005 रोजीच विमा प्रस्‍ताव तहसील कार्यालय भोकरदन यांचेकडे दिल्‍याचे दिसते. गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या दिनांक 09.09.2005 च्‍या पत्रात त्‍यांनी तक्रारदारांकडे 6 (क) चा उता-याची मागणी केलेली आहे.

  2. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना दिनांक‍ 04.10.2005 रोजी पाठविलेल्‍या रजिस्‍टर्ड पत्राच्‍या स्‍थळ प्रतीवरुन त्‍यांनी दिनांक 04.10.2005 रोजी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. ही गोष्‍ट स्‍पष्‍ट होते.   

  3. तक्रारदारांनी मंचा समोर दाखल केलेल्‍या कागदपत्रातील मौजे थिगळवाडी ता. भोकदन येथील गट क्रमांक 149 व 199 चा 7/12 चा उतारा, फेरफार नक्‍कल तसेच 6 (क) चा उतारा या कागदपत्रां वरुन मयत कौतिकराव ढवळे हे  शेतकरी होते व त्‍यांचे नांवे सन 2005 मध्‍ये शेत जमीन होती ही गोष्‍ट स्‍पष्‍ट होते.  

  4. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या फिर्याद, मयताचा शवविच्‍छेदन अहवाल, पंचनामा, मृत्‍यूचे प्रमाणपत्र या कागदपत्रां वरुन मयत कौतिकराव ढवळे यांचा दिनांक 08.07.2005 रोजी खुन झाला असे दिसते. महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकानुसार खुन झालेली व्‍यक्‍ती देखील शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्‍यास पात्र आहे.

मा.राष्‍ट्रीय आयोगाने महाराष्‍ट्र शासन विरुध्‍द आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी (तक्रार क्रमांक 27/2008) या तक्रारीतील अंतरीम आदेशात गैरअर्जदारांकडे प्रलंबित असलेल्‍या विमा दाव्‍या पैकी जे दावे मृत्‍यू नंतर सहा महिन्‍याच्‍या आत दाखल केले आहेत व ज्‍यात सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे असे दावे निकाली करावेत  असे आदेश दिलेले आहेत.

प्रस्‍तुतच्‍या तक्रारीतील घटनाक्रमाचा विचार करता मयत कौतिकराव यांचा मृत्‍यू दिनांक 08.07.2005 रोजी झाला व तक्रारदारांनी दिनांक 15.07.2005 रोजी विमा प्रस्‍ताव तहसीलदार भोकरदन यांच्‍याकडे दाखल केला होता. त्‍यानंतर दिनांक 04.10.2005 रोजी आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता ही केलेली होती.

मा.राष्‍ट्रीय आयोगाकडील तक्रार क्रमांक 27/2008 मधील प्रलंबित प्रस्‍तावात प्रस्‍तुत प्रस्‍ताव समाविष्‍ठ आहे. म्‍हणजेच तक्रारदारांनी विमा प्रस्‍ताव मुदतीत गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडे दाखल केला आहे. तसेच मयत कौतिकराव हे शेतकरी असून त्‍यांचा मृत्‍यू खुन झाल्‍यामुळे झालेला आहे या गोष्‍टी तक्रारदारांनी सिध्‍द केलेल्‍या आहेत असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारदार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्‍कम रुपये 1,00,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच विमा प्रस्‍ताव मुदतीत प्राप्‍त होवूनही अद्याप पर्यंत गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी वेळेवर प्रस्‍ताव निकाली केला नाही. ही गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्‍या सेवेतील कमतरता आहे. त्‍यामुळे तक्रारदार वरील रकमेवर व्‍याज मिळण्‍यास देखील पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

      म्‍हणून मंच खालील आदेश पारित करत आहे. 

 

आदेश

  1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी आदेश प्राप्‍ती पासून 60 दिवसांचे आत तक्रारदारांना विमा रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) अदा करावेत.
  3. गैरअर्जदार क्रमाक 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारांना वरील रकमेवर तक्रार दाखल दिवसा पासून तक्रारदारांना रक्‍कम मिळेपर्यंत 9 टक्‍के व्‍याज दाराने व्‍याज द्यावे.
  4. गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारांना प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्‍त) द्यावेत.
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. REKHA KAPDIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.