Maharashtra

Jalna

CC/58/2013

Arunabai Kailas Ekhande - Complainant(s)

Versus

1) Tahasildar - Opp.Party(s)

R.V.Jadhav

16 Nov 2013

ORDER

 
CC NO. 58 Of 2013
 
1. Arunabai Kailas Ekhande
R/o Nagewadi,Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1) Tahasildar
Jalna
Jalna
Maharashtra
2. 2) ICICI Lombard General Insurance Co.Ltd.
II Flr. Alaknanda Complex, Near Baba Petrol Pump, Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(घोषित दि. 16.11.2013 द्वारा श्रीमती. नीलिमा संत, अध्‍यक्ष)
तक्रारदारांचे पती श्री. राजेंद्र कैलास एखंडे हे शेतकरी असून दिनांक 15.11.2005 रोजी सकाळी 9 वाजता मोटार सायकलवर शेतीच्‍या कामाकरिता जात असता अज्ञात वाहनाने धडक दिल्‍यामूळे झालेल्‍या अपघातात गंभीर जखमी झाले. धूत हॉस्‍पीटल, औरंगाबाद येथे उपचारा दरम्‍यान दिनांक 16.11.2005 रोजी तक्रारदारांचे पती मृत्‍यू पावले. संबंधित घटनेची माहीती पोलीसांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी अज्ञात वाहनाच्‍या ड्रायव्‍हर विरुध्‍द गुन्‍हा नोंदवला, घटनास्‍थळ पंचनामा व इन्‍वेस्‍ट पंचनामा केला. मयताचे प्रेत पोस्‍ट मार्टमसाठी घाटी हॉस्‍पीटल औरंगाबाद येथे पाठवले.
तक्रारदारांनी पतीच्‍या मृत्‍यूनंतर विहीत मूदतीत व आवश्‍यक कागदपत्रासहीत शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव गैरअर्जदार 1 तहसीलदार जालना यांचेकडे दाखल केला. गैरअर्जदार 1 यांनी गैरअर्जदार 2 आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी यांचेकडे पाठवला. महाराष्‍ट्र शासनाने गैरअर्जदार यांचे विरुध्‍द तक्रार क्रमांक 27/2008 शेतक-यांच्‍या प्रलंबित प्रस्‍तावा बाबत राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांचेकडे दाखल केली होती. राष्‍ट्रीय आयोगाने सदर तक्रारीत इन्‍शुरन्‍स कंपनीने ज्‍या शेतक-यांचे प्रस्‍ताव परिपूर्ण आहेत त्‍यांना आदेश झाल्‍यानंतर 6 महिन्‍यात नुकसान भरपाईची रक्‍कम अदा करावी असे आदेश निर्गमीत केले आहेत. परंतू अद्याप पर्यंत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्‍कम अदा केली नाही. गैरअर्जदार इन्‍शुरन्‍स कंपनीने सदर तक्रारीत प्रलंबित प्रस्‍तावाची यादी दाखल केलेली असुन तक्रारदारांचे नाव सदर यादीत क्रमांक 40 MUM/000/3775 Date 16.11.2005 -4005/000/3568 पॉलीसी कालावधी दिनांक 10.04.2005 ते 09.04.2006 येथे आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचा प्रस्‍ताव परिपूर्ण असूनही नुकसान भरपाईची रक्‍कम अद्याप पर्यंत दिली नाही. अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 यांना नोटीस मिळूनही गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला. गैरअर्जदार 2 यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांच्‍या विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 10.04.2005 ते 09.04.2006 असा असून सदर तक्रार सन 2013 मध्‍ये मुदतबाह्य दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 06.08.2005 रोजीच्‍या पत्रान्‍वये आवश्‍यक कागदपत्रांची मागणी केली परंतू तक्रारदारांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्‍यानूसार त्‍यांचे नाव अ.क्रं. 40 येथे असल्‍याबाबत नमूद केले आहे. सदर यादी कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीने दाखल केलेली असुन गैरअर्जदार 2 यांचा करार फक्‍त महाराष्‍ट्र शासन यांचे बरोबर झालेला आहे. तक्रारदारांची तक्रार मुदतबाह्य असल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी.  
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्‍ही.जाधव व गैरअर्जदार 2 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्‍तीवाद ऐकला दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला. त्‍यावरुन खालील मुद्दे स्‍पष्‍ट होतात.
  1. तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचे पती श्री.राजेंद्र उर्फ कैलास पंढरीनाथ एखंडे हे शेतकरी असून त्‍यांचा अपघाती मृत्‍यू दिनांक 16.11.2005 रोजी झालेला आहे ही गोष्‍ट स्‍पष्‍ट होते.
  2. कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीने महाराष्‍ट्रातील शेतक-यांच्‍या प्रलंबित दाव्‍याची यादी राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली यांचेकडे दाखल केली आहे. सदर यादीची प्रत तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणात दाखल केली असुन अ.क्रं. 47-MUM/000 3775येथे तक्रारदारांच्‍या पतीचे नाव नमूद असल्‍याचे दिसून येते.
  3. तक्रारदारांच्‍या पतीचे नाव परिपूर्ण प्रस्‍तावाच्‍या यादीमध्‍ये असूनही गैरअर्जदार 2 यांनी नुकसान भरपाईची रक्‍कम अदा केली नाही.
  4. युक्‍तीवादा दरम्‍यान श्री.जाधव यांनी मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या तक्रार क्रमांक 27/2008 (महाराष्‍ट्र शासनवि.आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी) मधील अंतरिम आदेशाची प्रत दाखल केली. ज्‍यात मा.राष्‍ट्रीय आयोगाने गैरअर्जदार क्रमांक 2 आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी यांना त्‍यांचेकडे प्रलंबित असलेल्‍या विमा दाव्‍यापैकी जे दावे मृत्‍यू नंतर 6 महिन्‍याच्‍या आत दाखल केले आहेत व ज्‍या दाव्‍यात सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे असे दावे निकाली करावे व तक्रारदारांना व्‍याजासह विमा रक्‍कम द्यावी असा अंतरिम आदेश दिलेला आहे. याच तक्रारीत कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीने देय असलेल्‍या विमा प्रस्‍तावांची जिल्‍हा निहाय यादी दाखल केलेली आहे. या यादीत जालना जिल्‍हयातील दाव्‍यांमध्‍ये प्रस्‍तुत कैलास एखंडे यांच्‍या मृत्‍यूबाबतच्‍या विमा प्रस्‍तावाचा उल्‍लेख आहे.
  5. प्रस्‍तुतच्‍या तक्रारीतील घटनाक्रमाचा विचार करता राजेंद्र उर्फ कैलास याचा मृत्‍यू दिनांक 16.11.2005 रोजी अपघाताने झाला. तक्रारदारांनी दिनांक 12.02.2006 रोजी प्रस्‍ताव तहसीलदार जालना यांचेकडे पाठवला. दिनांक 23.05.2006 रोजी त्‍यांनी गैरअर्जदार यांचेकडे प्रस्‍तावा बाबत विचारणा करणारे पत्र देखील पाठवले. यावरुन विमा प्रस्‍ताव मुदतीत गैरअर्जदार यांचेकडे दाखल झाला होता ही गोष्‍ट स्‍पष्‍ट होते.  
  6. तक्रारदाराने प्रस्‍तुतची तक्रार जरी अपघाता नंतर सहा वर्षांनी दाखल केलेली असली तरी त्‍यांचा विमा प्रस्‍ताव अद्यापही प्रलंबित आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या तक्रारीस कारण चालूच आहे. म्‍हणून तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार म्‍हणतात की, त्‍यांनी तक्रारदारांचा दावा बंद केला. परंतू तक्रारदारांना त्‍यांनी याबाबत कळविले असल्‍याचा कोणताही पुरावा मंचा समोर नाही. उपरोक्‍त निकालात म्‍हटल्‍याप्रमाणे गैरअर्जदार आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी यांचे कडील जालना जिल्‍हयातील देय प्रस्‍तावांमध्‍ये कैलास एखंडे यांच्‍या मृत्‍यूबाबतचा तक्रारदारांचा प्रस्‍तावही प्रलंबित आहे. त्‍यामुळे मा.राष्‍ट्रीय आयोगाने अंतरिम आदेशात म्‍हटल्‍याप्रमाणे तक्रारदार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्‍कम रुपये 1,00,000/- मिळण्‍यास पात्र आहे. तसेच विमा प्रस्‍ताव वेळेत प्राप्‍त होवूनही अद्यापपर्यंत तो निकाली केला नाही ही गैरअर्जदार क्रमांक 2 यांची सेवेतील कमतरता आहे. त्‍यामुळे तक्रारदार वरील रकमेवर व्‍याज मिळण्‍यासही पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारदारांना रुपये 1,00,000/- ऐवढी रक्‍कम वरील (महाराष्‍ट्र शासनवि. आय. सी. आय. सी. आय. लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी) यातील आदेशाच्‍या तारखेपासून म्‍हणजे दिनांक 20.05.2008 पासून 9 टक्‍के व्‍याज दरा सहीत देणे न्‍यायोचित ठरेल असे मंचाला वाटते. 
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे. 
 
आदेश   
 
  1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्‍यात येत आहे. 
  2. गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनी यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी आदेश प्राप्‍ती पासून साठ दिवसांचे आत तक्रारदारास शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावेत.
  3. गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदाराला वरील रकमेवर दिनांक 20.05.2008 पासून तक्रारदाराला रक्‍कम मिळे पर्यंत 9 टक्‍के व्‍याज दाराने व्‍याज द्यावे.
  4. खर्चा बाबत आदेश नाही.  
 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.