निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 03/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 09/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 03/07/2013
कालावधी 01 वर्ष. 04 महिने. 24 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
चिंतामणी पिता विश्वनाथराव दुधाटे. अर्जदार
वय 39 वर्षे. धंदा.शेती. अड.अरुण डी.खापरे.
रा.आरखेड.ता.पालम जि.परभणी.
विरुध्द
1 तहसीलदार साहेब पालम, तहसील कार्यालय, गैरअर्जदार.
पालम ता.पालम जि.परभणी.
2 तालुका कृषी अधिकारी पालम. स्वतः
ता.पालम जि.परभणी.
3 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन,एच,डी.एफ.सी.होम लोन.बिल्डींग
प्लॉट नं.7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर, सिडको, औरंगाबाद.
4 शाखा व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडीया.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.
570, रेक्टेफायर हाउस इंदोरीजिन,
इलेक्ट्रीक लि.नायगम क्रॉस रोड, नेकस्ट टू
रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट, वडाळा वेस्ट मुंबई
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा प्रलंबीत ठेवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार हा मौजे आरखेड ता.पालम जि.परभणी येथील रहिवाशी व शेतकरी आहे. व त्याचा मुलगा गट क्रमांक 77 मौजे आरखेड ता.पालम जि.परभणी येथील शेतीचा मालक होता अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, दिनांक 29/03/2008 रोजी त्याचा मुलगा बाळासाहेब उर्फ बालाजी पिता चिंतामणी दुधाटे हा टॅम्पो पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी होवुन यशोदा हॉस्पीटल नांदेड येथे उपचार चालू असतांना दिनांक 31/03/2008 रोजी मृत्यू पावला सदर घटनेची खबर पोलिस स्टेशन ताडकळस येथे दिली,सदर घटनेचा घटनास्थळ पंचनामा पोलिसांनी केला व साक्षीदारांचे जबाब घेतले तसेच यशोदा हॉस्पीटल येथे सदर बॉडीचा इनक्वेस्ट पंचनामा करण्यात आला आणि पोस्टमार्टेम हे सिव्हील हॉस्पीटल नांदेड येथे करण्यात आले.अर्जदाराच्या मुलाचा मृत्यू हा अपघाताने झालेला आहे.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे सर्व कागदपत्रांसहीत विमा दावा सादर केला, त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे मंजुरीस्तव सर्व कागदपत्रांसह तो दावा पाठविला त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वेळोवेळी चौकशी केली, त्यावेळी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास असे सांगीतले की, गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या त्रुटीची पुर्तता करावी व त्या प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे संपर्क साधून सर्व कागदपत्रांची पुर्तता गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे केली त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तो पुढील कार्यवाहीसाठी पाठविला नंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना विमा दाव्या बाबत विचारणा केली असता त्यांनी तुमचा दावा मंजुरीस्तव गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांच्याकडे सादर केलेला आहे, असे सांगीतले अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, आजपर्यंत गैरअर्जदारांनी अर्जदाराला विमा मंजुरी बद्दल काहीही कळविले नाही व म्हणून गैरअर्जदारांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, म्हणून अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन अर्जदारास गैरअर्जदाराकडून रु.1,00,000/- मिळावून द्यावे,तसेच मानसिकत्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्याचे आदेश करावे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 4 वर 13 कागदपत्रांच्या यादीसह 13 कागदपत्रे दाखल केलेली आहेत,ज्यामध्ये 4/1 वर जिल्हा कृषी अधिकारी यांचे पत्र, 4/2 वर गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे पत्र, 4/3 वर एफ.आय.आर.ची कॉपी, 4/4 वर घटनास्थळ पंचनामा, 4/5 वर इनक्वेस्ट पंचनामा, 4/6 वर पोस्टमार्टेम रिपोर्ट, 4/7 वर प्रतिज्ञापत्र, 4/8 वर मृत्यू नोंदणी रजिस्टर, 4/9 वर वयाचे प्रमाणपत्र, 4/10 वर बँकेचे पासबुक, 4/11 वर रेशनकार्ड, 4/12 वर 7/12, 4/13 वर फेरफार नोंदी इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी नि.क्रमांक 23 वर आपले म्हणणे दाखल केलेले आहे. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचा मुलगा बाळासाहेब दुधाटे याचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत त्रुटीचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाला व या कार्यालयाने विहित मार्गानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याकडे परत सादर केला, त्याच प्रमाणे सदर त्रुटीचा प्रस्ताव जिल्हा कृषी अधिकारी परभणीने दिनांक 27/04/2011 अन्वये कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस औरंगाबाद यांच्याकडे क्लेम मंजुरीसाठी पाठवला व अर्जदाराचे विमादावा आमच्या कार्यालयाकडे प्रलंबीत नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे असे म्हणणे आहे की, सदर त्रुटी प्रस्तावातील दुरुस्ती मध्ये पहिली खबर, घटनास्थळ पंचनामा, शपथपत्र, 7/12 उतारा, फेरफार नोंदी, मरणोत्तर पंचनामा, बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे सादर केलेली आहेत.म्हणून आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारे त्रुटीची सेवा दिलेली नाही,वा आम्हांस दोषी धरणे योग्य नाही असे लेखी जबाबात म्हंटले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 ने नि.क्रमांक 7 वर आपला लेखी जबाब दाखल केला आहे ज्यामध्ये त्याचे असे म्हणणे आहे की, सदरचा अर्जदाराचा प्रस्ताव हा अपु-या कागदपत्रामुळे प्रलंबीत राहिला आहे अर्जदाराने विमादावा दाखल करते वेळी तहसीलदाराने मृत्यू प्रमाणपत्र जारी केलेले ओरीजनल सर्टीफिकेट तसेच 6 क ओरीजनल, फेरफार ओरीजनल, 6 ड ओरीजनल, वयाचा पुरावा, एफ.आय.आर. ची अटॅस्टेड कॉपी इनक्वेस्ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे अर्जदाराने दाखल केलेली नव्हती व सदरच्या अपु-या कागदाबद्दल गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 23/06/2010 रोजी पत्रान्वये कळविले तरी देखील अर्जदाराने सदरचे कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 ने क्लेम क्लोज्ड असे म्हणून दिनांक 24/11/2010 रोजी कळविले म्हणून मंचास विनंती केली आहे की, रु. 2,000/- खर्च आकारुन सदरचा अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी मंचास विनंती केली आहे.
लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 ने नि.क्रमांक 8 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 4 वकिला मार्फत हजर होवुन नि.क्रमांक 19 वर आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे.त्यामध्ये त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरचा अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 4 चा ग्राहक नाही म्हणून सदरच्या मंचास तक्रार चालवण्याचा अधिकार नाही व खारीज करणे योग्य आहे.व तसेच गैरअर्जदार क्रमांक 4 चे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने वा मयताने गैरअर्जदाराकडे एकही रुपाया रक्कम देखील हप्त्यापोटी भरलेला नाही व ट्राय पार्टी अग्रीमेंट प्रमाणे शेतकरी इन्शुरंन्स कंपनी विरुध्द तक्रार दाखल करु शकत नाही व ती सदरची तक्रार चालू शकत नाही म्हणून खारीज होणे योग्य आहे.असे त्यांचे म्हणणे आहे तसेच गैरअर्जदार क्रमांक 4 चे असे म्हणणे आहे की, अर्जदारास 18/08/2008 रोजी व तसेच 10/11/2008, 20/03/2009 रोजी अपु-या कागदपत्रांची पुर्तता करा असे कळवुन देखील अर्जदाराने सदरची कागदपत्रे दाखल केलेली नसल्यामुळे गैरअर्जदाराने फाईल क्लोज म्हणून दिनांक 24/11/2010 रोजी विमा प्रस्ताव नाकारला,म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही त्यामुळे अर्जदाराची सदरची तक्रार खर्च आकारुन खारीज करावी अशी मंचास विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 4 ने नि.क्रमांक 20 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदारांनी अर्जदाराचा शेतकरी विमा अपघात दावा नाकारुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराचा मुलगा हा शेतकरी अपघात योजनेचा लाभार्थी होता हे त्याने नि.क्रमांक 4/12 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच अर्जदाराच्या मुलाचा मृत्यू दिनांक 31/03/2008 रोजी झाला हे नि.क्रमांक 4/8 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच अर्जदाराच्या मुलाचा मृत्यू हा दिनांक 29/03/2008 रोजी टॅम्पो पलटी होवुन झालेल्या अपघातामुळे झाला हे नि.क्रमांक 8/3, 8/4,8/6 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने त्याचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 या कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदाराचा विमादावा अपु-या कागदपत्रामुळे नाकारला ही बाब नि.क्रमांक 10 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच अर्जदाराने अपुरी कागदपत्रे ज्यामध्ये पहिली खबर, घटनास्थळ पंचनामा, शपथपत्र, मृत्यू नोंदणीपत्र, जन्म दिनांक, शिधापत्रक, 7/12 उतारा, फेरफार नोंद, मरणोत्तर पंचनामा, बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 कडे अर्जदाराने दाखल केले होते ही बाब नि.क्रमांक 23 वरुन सिध्द होते व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 ने सदरील आवश्यकती सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 3 कडे 27/04/2011 रोजी पाठविली होती,ही बाब देखील नि.क्रमांक 23 वरुन सिध्द होते यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने सर्व कागदपत्रांची पुर्तता गैरअर्जदार क्रमांक 3 कडे केली होती,म्हणून गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे.
तसेच गैरअर्जदारांनी क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राह्य धरता येणार नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही, मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने कागदपत्रे मुदतीत दाखल केली नाहीत हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमी प्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 4 याने अर्जदारास निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत
रु.1,00,000/- फक्त ( अक्षरी रु एकलाख फक्त) द्यावे.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष