(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे,अध्यक्ष)
1. अर्जदाराने, सदरची तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये गैरअर्जदाराचे विरुध्द दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे.
... 2 ... ग्रा.त.क्र. 6/2009.
2. अर्जदार हा बी.पी.एल. धारक असून, गैरअर्जदारांकडून विज पुरवठा घेतला असल्यामुळे तो गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराचा महिन्याचा वापर 10 ते 15 युनिट पर्यंत असून, बी.पी.एल. दरानुसार 3/- रुपये सर्वीस चार्जेस व विज आकार 40 पैसे युनिट प्रमाणे आकारायला पाहिजे, परंतु गैरअर्जदार यांनी 1 जानेवारी 2009 ला बी.पी.एल. दरानुसार दिले नाही. अर्जदारास इंदिरा आवास मिळाले तेंव्हा पासून म्हणजे दिनांक 23/5/07 पासून बी.पी.एल. दराने विज बिल आले. गैरअर्जदाराकडे, 1 जानेवारी 2009 चे बिल दुरुस्त करुन मिळण्यास ऑफीसला गेलो असता, बिल दुरुस्त करुन देण्यास लिपिक तयार होते, परंतु श्री कांबळे साहेब बिलावर सही करण्यास तयार झाले नाही, त्यामुळे वरिष्ठ कार्यालयास तक्रार करावी लागली. वरिष्ठ कार्यालयानेही तक्रारीचे निराकरण केले नाही, त्यामुळे अर्जदारास सदर तक्रार दाखल करणे भाग पडले. अर्जदाराने, तक्रारीत बी.पी.एल. दरानुसार विद्युत बिल दुरुस्त करुन देण्यात यावा, जाण्या-येण्याचा खर्च रुपये 500/-, मानसिक ञासापोटी रुपये 5,000/-, तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
3. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारांस नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन निशाणी 5 नुसार आपले म्हणणे सादर केले आहे.
4. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, सुधाकर खंडारे हे बी.पी.एल. कार्ड धारक आहे. परंतु, त्याचा विद्युत भार 0.2 KW (200 W) होतो. सदर ग्राहकाला बी.पी.एल. दरानुसार बिल देता येत नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी कमी आलेले बिल हे बिलिंगच्या चुकीच्या प्रोग्राममुळे आले असल्याचे समजवून सांगण्यात आले, तरी अर्जदाराने ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे.
5. तक्रारीचा नोटीस प्राप्त झाल्यानंतर, ग्राहकाचा विद्युत भार तपासण्याकरीता दिनांक 21/4/2009 ला त्याचे घरी जाऊन चौकशी केली असता, खंडारे यांचा वापर 410 वॅट असल्याचे निदर्शनास आले, तसा स्थळ निरिक्षण अहवाल बनवून श्री खंडारे यांची स्वाक्षरी घेण्यात आली.
6. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे परिपञक 80 चे अनुच्छेद क्र. 4 नुसार बी.पी.एल. दराने विज बिलाचे निर्धारण करण्याकरीता संलग्न 0.10 KW पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि त्याचा वार्षीक वापर 360 युनिट पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. श्री खंडारे यांचा विज भार 0.41 KW असल्यामुळे बी.पी.एल. दराने विज बिल मिळण्यासाठी तक्रार दाखल करणे म्हणजे न्यायमंचाची व विज वितरण कंपनीची दिशाभूल करणे होय. अर्जदाराची तक्रार खोटी असल्याचा आरोपाखाली तक्रार खारीज करुन दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. अर्जदाराचा जोडभार 410 वॅट असल्यामुळे महिन्याला कमीत-कमी 30 युनिट वापर असावयास पाहिजे, परंतु त्याचा बिल 10-15 युनिट होतो, त्यामुळे त्याचा मिटर हळू फिरत असल्याची शंका येतो.
... 3 ... ग्रा.त.क्र. 6/2009.
अर्जदारास जुन 2007 पासून कमी आलेल्या बिलाची शहानिशा करुन देण्यात येईल व बरोबर दिलेले बिल भरण्याचे निर्देश खंडारे यांना देण्यात यावे. गैरअर्जदाराने आपले लेखी उत्तरासोबत स्थळ निरिक्षण रिपोर्ट, सी.पी.एल. ची प्रत आणि कमर्शियल सर्कुलर नं. 80 ची प्रत दाखल केली आहे.
7. अर्जदारास रिजाईंडर दाखल करण्याची संधी देण्यात आली. परंतु, त्यांनी रिजांईंडर दाखल केले नाही. तसेच, गैरअर्जदारांना सुध्दा रिजाईंडर दाखल केले नाही. त्याबद्दल, निशाणी 1 वर आदेश पारीत करण्यात आले. अर्जदाराचा युक्तीवाद ऐकुण घेण्यात आला. गैरअर्जदाराला संधी देऊनही युक्तीवाद केला नाही. त्यामुळे, उपलब्ध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर निकाली काढण्यात यावी, असा आदेश निशाणी 1 वर पारीत करुन, निकालाकरीता ठेवण्यात आले.
8. अर्जदाराने, दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे आणि गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या दस्ताऐवज, आणि अर्जदाराने केलेल्या युक्तीवादावरुन, खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे : उत्तर
(1) गैरअर्जदाराने, अर्जदारास सेवा देण्यात तृटी केली : होय.
आहे काय ?
(2) अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे काय ? : होय.
(3) या तक्रारीचा निकाल काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
// कारण मिमांसा //
मुद्दा क्रमांक 1 व 2 :-
9. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असल्याबाबत वाद नाही. तसेच, अर्जदार हे बी.पी.एल. कार्ड धारक असल्याबाबत वाद नाही. गैरअर्जदाराने, 1 जानेवारी 2009 ला दिलेला बिल हा बी.पी.एल. च्या दरापेक्षा जास्त विज दर लावून दिला असल्यामुळे, अर्जदाराने वाद उपस्थित करुन, गैरअर्जदाराचे कार्यालयात जावून तक्रार केली. गैरअर्जदाराचा लिपिक बिल दुरुस्त करुन देण्यास तयार असतांना, श्री कांबळे साहेब यांनी बिलावर सही करण्यास नकार दिला. अर्जदाराने, दाखल केलेले दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता निशाणी 3 अ-3 वर देयक दिनांक 29/4/08 च्या बिलाची झेरॉक्स दाखल केली आहे. त्या बिलावर मागील 10 महिण्याचे रिडिंग नमुद आहे. तसेच, अ-4, अ-5 या बिलावरही मागील रिडिंग नमुद असून, सदर बिल हे 2 महिन्याचे म्हणून देण्यात आले असल्याचे दिसून येते. सदर रिडिंगवरुन अर्जदाराचा 2 महिन्याचा वापर अल्प असल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराने लेखी बयाणासोबत
... 4 ... ग्रा.त.क्र. 6/2009.
सी.पी.एल. ची प्रत दाखल केली आहे त्याचे अवलोकन केले असता, प्रत्येक महिन्याच्या बिलात डिसेंबर-06 पासुन डिसेंबर-08 पर्यंतच्या नोंदी असून, मिटर स्थिती (Meter Status) नार्मल असून, प्रत्येक वेळी मिटरचे चालु व मागील वाचन हे बदलेले असून त्या वाचना नुसार, वापर युनिटचे बिल अर्जदारास देण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे, गैरअर्जदाराचे लेखी बयाणानुसार अर्जदाराचा मिटर संथ गतीने फिरते, हे म्हणणे संयुक्तीक नाही.
10. गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणात असाही मुद्दा उपस्थित केला की, बिलिंग चुकीच्या प्रोग्राममुळे कमी बिल दाखवून बिल देण्यात आले. परंतु, दाखल दस्ताऐवजावरुन अर्जदाराचा प्रत्यक्ष वापरच डिसेंबर-06 पासून 19 युनिट, 34 युनिट, 24 युनिट, 27 युनिट, 31 युनिट अशा पध्दतीचे असून मिटर वाचन उपलब्ध आहे. त्यामुळे, बिलिंगच्या चुकीच्या प्रोग्राममुळे बिल कमी देण्यात आले, हे गैरअर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही.
11. गैरअर्जदाराने, रिजाईंडर म्हणून शपथपञ दाखल केले नाही. परंतु, लेखी बयाण शपथपञावर असल्यामुळे, त्यातील म्हणणे विचारात घेणे उचित होईल. गैरअर्जदारांना, मंचाचा नोटीस गेल्यानंतर, अर्जदाराचे घरी जावून स्थळ निरीक्षण अहवाल दिनांक 21/4/2009 ला केला असता, अर्जदाराचे घरी 3 बल्ब, 1 टयुब, 1 सी.एफ.एल., 1 नाईट लॅम्प, 1 टी.व्ही., 1 पंखा, विद्युत भार वापर असून, 410 वॅटस् चा अधीभार 410 जोडभार दाखविलेला आहे. एकुण 3 खोल्या असल्याची श्री ए.बी.गभणे, कनिष्ठ अभियंता यांनी आपले रिपोर्ट मध्ये नमुद केले आहे. अर्जदाराने निशाणी 6 नुसार, गैरअर्जदारांनी दिनांक 23/5/07 ला स्थळ निरीक्षण करुन त्या अहवालाची प्रत दाखल केली आहे. सदर अहवाला वर ही श्री गभणे, ज्यु. इंजीनियर यांची सही आहे. तसेच, निरिक्षक नेमचंद्र महतो यांची सही आहे. या अहवालाचे अवलोकन केले असता, 2 बल्ब 80 वॅटस् ऐवढा वापर असल्याचे नमुद आहे, अशास्थितीत गैरअर्जदाराने दाखल केलेला स्थळ निरिक्षण अहवाल आणि गैरअर्जदाराचे कर्मचा-यांने स्थळ निरिक्षण करुन त्याची प्रत अर्जदारास दिल्यानंतर अर्जदाराने दाखल केली आहे. या दोनही अहवालात विसंगती असून गैरअर्जदार यांचे कर्मचा-यांनी हूकमीपणाचा (Arbitrary) व्यवहार केले असल्याचे, दोन्ही अहवालावरुन दिसून येते. दिनांक 21/4/2009 च्या अहवालात 3 खोल्या असल्याचे नमुद केले आहे. जेंव्हा की, इंदिरा आवास योजने अंतर्गत एकाच हॉलमध्ये किचनचा पार्ट तयार करुन शासनाने दिला आहे. अशास्थितीत, अर्जदाराच्या घरी 3 खोल्या असून, त्या 3 खोल्यात 3 बल्ब, 1 टयुब, 1 सी.एफ.एल. बल्ब लागलेले आहे, असा अहवाल दिला आहे, तो अहवाल योग्य पध्दतीने करण्यात आला आहे, असे दिेसून येत नाही, त्यामुळे सदर अहवाल उपलब्ध रेकॉर्डवरुन ग्राह्य धरण्यास पाञ नाही. अर्जदाराने, निशाणी 6 वर गैरअर्जदारांकडून प्राप्त झालेला अहवाल दाखल केले आहे, तो अहवाल संयुक्तीक असून उपलब्ध सी.पी.एल. नुसार तारतम्यात असल्याचे दिसून येते. अशास्थितीत, गैरअर्जदार यांनी, अर्जदाराचा विज वापर हा जास्त असल्याचे दर्शवून
... 5 ... ग्रा.त.क्र. 6/2009.
बी.पी.एल. दराचे व्यतीरिक्त बिल दिले, ही गैरअर्जदाराचे सेवेतील न्युनता असून, अनुचीत व्यापार पध्दत आहे, असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे.
12. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात असाही मुद्दा उपस्थित केला आहे की, ज्या ग्राहकाचा वार्षीक वापर 360 युनिट पेक्षा जास्त असेल त्याला बी.पी.एल. दराप्रमाणे बिलाची आकारणी करता येत नाही. याबाबत, कमर्शियल सर्कुलर नं. 80 दिनांक 10 जुन 2008 मधील अनुच्छेद-4 चा उल्लेख केला आहे. सदर परिपञकाचे अवलोकन केले असता, ज्या ग्राहकाचा विज वापर 360 युनिट मागील वर्षात झालेला असेल तर त्याचे पुढील आकारणी बी.पी.एल. दरानुसार करता येणार नाही, किंवा ज्या ग्राहकाचा मंजुर भार हा 0.1 KW असेल त्याला बी.पी.एल. दर लागू होत नाही. सदर परिपञकात दिलेल्या बाबी नुसार, अर्जदार हा बी.पी.एल. दरानुसारच, विज बिल मिळण्यास पाञ आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या मुळ बिलानुसार मंजुर भार 0.10 KW, संलग्न भार 0.10 KW असून LT-1 डोमॅस्टीक असे नमुद आहे. यावरुनही अर्जदाराचा मंजुर अधीभार हा कमी असून, विज वापरही सी.पी.एल. नुसार 180 ते 200 युनीट आहे, म्हणजेच वार्षीक 360 युनिट पेक्षा कमी आहे. त्यामुळे, अर्जदार मुळ बिलाचे पाठीमागे दिलेल्या घरघुती LT-1 बी.पी.एल. दरानुसार बिल मिळण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे ठाम मत असल्यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ असल्याने, मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 :-
13. वरिल मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.
(2) गैरअर्जदाराने जानेवारी-09 पासून अर्जदाराचे विद्युत बिल बी.पी.एल.
दरानुसार दुरुस्त करुन द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तीकरित्या किंवा संयुक्तीकरित्या,
अर्जदारास झालेल्या मानसीक, शारीरीक ञासापोटी रुपये 500/- आणि
तक्रारी खर्चापोटी रुपये 300/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30
दिवसांचे आंत द्यावे.
... 6 ... ग्रा.त.क्र. 6/2009.
(4) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :–22/07/2009.