निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 25/04/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/05/2012
तक्रार निकाल दिनांकः- 17/06/2013
कालावधी 01 वर्ष. 01 महिने. 14 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
1 श्रीमती परमेशी भ्र.गोवर्धन गुजर. अर्जदार
वय 19 वर्षे. धंदा.घरकाम. अड.बी.एम.चिलवंत.
रा.बाजुदा ता.आशिंदा.जि.भिलवाडा.
2 पेमाजी पिता बिरन गुजर.
वय 50 वर्षे.धंदा मजुरी.
रा.सदर.
3 सौ.गिता भ्र.पेमाजी गुजर.
वय 45 वर्षे.धंदा घरकाम.
रा.सदर.
विरुध्द
1 अधिक्षक अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित परभणी. अड.एस.एच.बोबडे.
2 दुय्यम अभियंता.
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादीत ग्रामीण-1
उपविभाग मानवत.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदाराची तक्रार अशी आहे की, अर्जदार क्रमांक 1 यांचे पती करंट लागुन मयत झाल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडून 5,00,000/- रुपये नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळावी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार क्रमांक 1 ही मयत गोवर्धन पेमाजी गुजर यांची पत्नी आहे. अर्जदार क्रमाक 2 त्यांचे वडील आहेत व अर्जदार क्रमांक 3 ही मयत गोवर्धन यांची आई आहे अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार यांच्याकडून मौजे रुढी ता.मानवत जिल्हा परभणी येथील श्री. अंबादास ग्यानबा होंडे यांनी मीटर क्रमांक 7610300440 हे घेतलेले आहे. तसेच अंबादास व पांडुरंग व ग्यानबा होंडे हे एकत्र राहतात व वरील विद्युत मीटर हे घर वापरासाठी घेतले होते, अशा प्रकारे अंबादास व पांडुरंग हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत व ते दर महिन्याला येणारे बिल भरतात सदरचे घर हे गावा लगत शेतात आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, पांडुरंग व अंबादास हे एकत्र सदर घरात राहतात व सदर घर जास्त रुमचे असल्याने त्यापैकी एक रुम ही गोवर्धन गुजर, लोभीलाल गुजर, हिरालाल गुजर, इश्वर गुजर, अंबादास गुजर यांनी 10 वर्षापूर्वी प्रमाणे पासून दर वर्षी किरायाणे घेतलेली होती सदर लोक हे दर वर्षी राजस्थान येथून विहिरी फोडण्याचे काम करण्यासाठी रुढी येथे येत असत व किरायाणे राहत असत. प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी गोवर्धन पेमाजी गुजर, अंबालाल गुजर, सोभीलाल गुजर, व इतर यांनी सदर रुम 500/- प्रति महिना व 70/- रुपये लाईट बिल प्रमाणे अंबादास ग्यानबा होंडे यांचा एक रुम किरायाणे घेतला होता, अशा प्रकारे गोवर्धन पेमाजी गुजर हा गैरअर्जदाराचा ग्राहक होता व गैरअर्जदाराचे विज बिल देवुन वापर करत होता. कारण किरायाणे घेतलेल्या रुमला वरील मिटर क्रमांक 7610300440 वरुन विज पुरवठा केलेला होता अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 11/02/2012 रोजी पांडुरंग होंडे यांच्या विहिरीचे काम संपवुन वरील रुममध्ये गोवर्धन व लोभीलाल, अंबालाल हिरालाल, इश्वर असे 5 जन सांयकाळी 7 वाजता आले त्यापैकी गोवर्धन यांने त्यांचे मोबाईल चार्ज करण्यासाठी लाईटच्या बोर्डाजवळ गेले व त्या दरम्यान तेथे कुलर चालू होते सदर कुलरवर गोवर्धन हात ठेवुन मोबाईल चार्जची पीन बोर्डावर लावीत असतांना अचानक विजेचा अतिरिक्त पुरवठा आला व त्यामुळे गोवर्धन याना विजेचा मोठा धक्का लागुन शॉक बसला त्या वेळेस त्याच्या जवळ असलेले इतर सहकारी यांनी सदरचे वायर तोडून गोवर्धन यास प्रथम मानवत व नंतर सरकारी दवाखाना परभणी येथे शरीक केले, परंतु परभणी येथील डॉक्टरांनी गोवर्धन मृत्यू झाला असे कळविले, त्यानंतर मयत गोवर्धन सोबतचे लोभीलाल यांनी मानवत पोलिस स्टेशनला माहिती दिली व पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन सर्व एफ.आय.आर. ज्याचा क्रमांक 7/12 आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला व इतर लोकांचे जबाब घेतले, ज्यावेळी गोवर्धन मयत झाला त्याच दिवशी गावातील इतर 7-8 लोकांना शेख युनूस शेख हुसेन, नामा गायकवाड, जमाल खान करीम खान पठाण, नामदेव निर्वळ, यांना शॉक लागला व ते जखमी झाले अशा प्रकारे त्या दिवशी गैरअर्जदार कंपनीचे अचानक जास्तीचा विज पुरवठा झाला व गावातील सर्व घरामध्ये विज प्रवाह उतरला व लोक जखमी झाले व मयताचे घर मालक अंबादास यालाही शॉक लागला व सदरचा विद्युत पुरवठा घटना दिवशी गैरअर्जदार कंपनीस नियंत्रीत झाले नाही,पण घटने नंतर मात्र सिंगल फेज डि.पी.वरुन विज पुरवठा बंद करण्यात आला व डि.पी.मधील न्युट्रल वायर तुटलेले होते त्यावेळी अधून – मधून जास्तीचा विज पुरवठा होत होता यासंबंधी गावातील संबंधीत सरपंच व लोकानी गैरअर्जदार कंपनीकडे तक्रार दाखल केली होती, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, मयत गोवर्धन यांच्या घरामध्ये दिलेले विद्युत पुरवठा दिलेल्या मिटरवरुन व संबंधीत डि.पी. वरुन सतत बिघाड होत होता व यापूर्वीही जास्तीचा विज पुरवठा होवुन गावातील लोकांना शॉक लागला होता त्या वेळेस गावातील लोकांनी गैरअर्जदारास तक्रार करुन देखील गैरअर्जदाराने जाणून बुजून दुर्लक्ष केले म्हणून दिनांक 11/02/2012 ची वाईट घटना घडली व एवढया मोठया प्रमाणात लोक जखमी झाले जर गैरअर्जदार कंपनीने सदरचा नादुरुस्त डि.पी. दुरुस्त केला असता तर सदरच्या दिवशी घटना घडली नसती. गोवर्धन यांचे मृत्यूस गैरअर्जदारच जबाबदार आहेत म्हणून गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई पोटी रु. 5,00,000/- मिळणे आवश्यक आहे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, मयत गोवर्धन हे महिना 5,000/- कमवित होता व ते सर्व पैसे अर्जदारावर खर्च करीत होता म्हणून गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदारास 5,00,000/- नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, मयत गोवर्धन गुजर हा गैरर्जदार यांचे विज बिल भरत होता व अंबादास पांडुरंग यांच्या किरायाणे राहत होता. म्हणून ते गैरअर्जदार यांचे ग्राहक असल्याने सदरची नुकसान भरपाई दिनांक 16/04/2012 रोजी गैरअर्जदारास केली असता गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला म्हणून अर्ज दाखल करण्याचे कारण घडले व अर्जदाराने मचांस विनंती केली की, सदरचे तक्रार अर्ज मान्य करुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडून अर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना 5,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि. क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 5 वर 21 कागदपत्रांच्या यादीसह 21 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये नि.क्रमांक 5/1 वर लोभीलाल गुजर यांचा जबाब, नि.क्रमांक 5/2 वर युनूस शेख एम.एल.सी. पत्र, नि.क्रमांक 5/3 युनूसचे जबाब, नि.क्रमांक 5/4 वर मरणोत्तर पंचनामा, नि.क्रमांक 5/5 वर सामान्य रुग्णालयाचे एम.एल.सी.पत्र, नि.क्रमांक 5/6 वर घटनास्थळ पंचनामा, नि.क्रमांक 5/7 वर पी.एम.रिपोर्ट, नि.क्रमांक 5/8 वर उपअभियंता मानवत यांना पाठविलेले पत्र, नि.क्रमांक 5/9 वर पोलिस अधिक्षक परभणी यांना पाठविलेले पत्र, नि.क्रमांक 5/10 वर पोलिस निरीक्षक मानवत यांना पाठविलेले विज वितरण कंपनीचे पत्र, नि.क्रमांक 5/11 वर ग्राहकांची यादी, नि.क्रमांक 5/12 वर अंबादास होंडे यांचे नावे असलेले लाईट बिल, नि.क्रमांक 5/13 वर अंबादास होंडे यांचे तपास टिपण, नि.क्रमांक 5/14 वर पांडुरंग होंडे यांचे टिपण, नि.क्रमांक 5/15 वर नामा जानकीराम गायकवाड यांचे तपास टिपण, नि.क्रमांक 5/16 वर जमाल पठाण यांचे तपास टिपण, नि.क्रमांक 5/17 वर यादवराव निर्वळ यांचे तपास टिपण, नि.क्रमांक 5/18 वर नामदेव बाबुराव निर्वळ यांचे तपास टिपण, नि.क्रमांक 5/19 वर अंबालाल गुजर यांचे तपास टिपण, नि.क्रमांक 5/20 वर इश्वर गुजर यांचे तपास टिपण, व नि.क्रमांक 5/21 वर प्रभू गुजर यांचे तपास टिपणे इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना तक्रार अर्जावर त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, नि.क्रमांक 8 वर आपले लेखी जबाब सादर केले, गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही नुकसान भरपाईसाठी आहे जी कायदेशिर दृष्टीने ग्राहक मंचाच्या कक्षेत येत नाही व त्यामुळे सदरची तक्रार ही चालवणे योग्य नाही व म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की,अर्जदाराचे पती त्याच्या राहत्या खोलीत शॉक लागुन मरण पावले यात गैरअर्जदार कंपनीची कोठलीही त्रुटीची सेवा जबाबदार नाही या उलट मयत गोवर्धन गुजर हा आमचा विद्युत ग्राहक नाही व त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे विद्युत कनेक्शन नाही व मयत हा अनाधिकृत विज वापरत होता त्याने अंबादास होंडे यांच्या घरामधून कंपनीच्या विना परवानगीने वायर घेवुन विज वापर करीत होता व तसेच ते वायर ठीक ठिकाणी जोडलेले व उघडी आढळून आले त्यामुळे सदरील व्यक्तिस शॉक बसला व त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे मयत झाला त्यास गैरअर्जदार हे जबाबदार नाही.जेथे ही घटना घडली तेथे विद्युत वाहीनीची तार तुटलेली किवा पोल तुटलेला दिसला नाही, तसेच डि.पी.मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड आढळून आला नाही गैरअर्जदार यास जबाबदार नाही, व तसेच गैरर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराने घरमालक अंबादास होंडे यांस पार्टी केले नाही.तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी खास न्यायालय आहेत. त्यामुळे सदरची तक्रार ग्राहक मंचाच्या कक्षेत येत नाही त्यासाठी प्रथम वाद मुद्दा म्हणून प्रस्तुतची तक्रार फेटाळावी व तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार कंपनीने अंबादास होंडे यांना विज मिटर दिले आहे अंबादास होंडे आमचे विद्युत ग्राहक आहेत आणि प्रस्तुतच्या तक्रारीत त्यांचा काही संबंध नाही व तसेच अर्जदाराने स्वतः मान्य केले आहे की, गैरअर्जदाराच्या ग्राहकाकडे तो किरायाणे राहतो व मासिक 70/- रुपये लाईट बिल मालकास देतो वास्तविक लाईट देण्याचे काम हे गैरअर्जदार कंपनीच करते व इतरांना विज विकण्याचा अधिकार नाही व ते विज विकतात हे कायद्याच्या विरुध्द आहे व तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदर ट्रान्सफार्मर मध्ये विद्युत पुरवठा कमी जास्त झाल्यास व्होलटेज नियंत्रण ठेवण्यासाठी खास किटकॅट फ्युज बसविलेले असतात आणि विद्युत प्रवाह अनियंत्रित झाल्यास उडून आपोआपच विद्युत पुरवठा खंडीत होतो,आणि प्रस्तुतच्या तक्रारीत मयत व्यक्तिला चालू कुलरचा शॉक लागला होता, कुलर घरगुती अटम आहे आणि गैरअर्जदारास घरगुती गोष्टींचा संबंध नाही व तसेच त्यांचे हे म्हणणे आहे की, ट्रान्सफार्मर बद्दल कोणाचीही तक्रार नव्हती म्हणून गैरअर्जदार नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदारानी आपल्या लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 9 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे नि.क्रमांक 10 वर गैरअर्जदारानी एकुण 9 कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 10 /1 वर असीस्टंट इंजिनियर घोडगे यांचा जबाब, 10/2 वर लाईनमन निर्वळ यांचा जबाब, 10/3 वर अनेक्सर-8, 10/4 वर अनेक्सर फॉर्म, 10/5 वर कच्चा नकाशा शेख युनूस याने विद्युत कनेक्शन घेतले त्याचा, 10/6 शेख युनूस यांचा जबाब, 10/7 वर अनेक्सर फॉर्म गोवर्धन गुजर, 10/8 वर कच्चा नकाशा विद्युत मिटर व कनेक्शन गोवर्धन गुजर यांनी घेतला त्याचा, 10/9 असीस्टंट इंजिनियर घोडगे यांचा जबाब इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय व अर्जदारास
1 सदरची तक्रार मंचासमोर दाखल करण्याचा अधिकार आहे काय ? नाही.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदाराने बिल नि.क्रमांक 5/12 वर अंबादास ग्यानबा होंडे यांचे विज बील दाखल केलेले आहे. ज्याचा मिटर क्रमांक 7610300440 असा आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, तीचे पती अंबादास ग्यानबा होंडे यांच्या घरी किरायाणे राहात होता,व म्हणून अर्जदाराचे पती गैरअर्जदाराचे ग्राहक होते हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अंबादास होमळे यांच्या घरी किरायाणे होता, याबद्दल पुरावा वा घरमालकाचे शपथपत्र दाखल केलेले नाही, तसेच अर्जदाराने तिचे मयत पतीने सदरील मिटरवरुन विद्युत कनेक्शनसाठी महिना 70/- रुपये अंबादासला देत होता या बद्दल कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. त्यामुळे हे सिध्द होत नाही की, अर्जदाराचे पती हे गैरअर्जदाराचे ग्राहक होते, अर्जदाराचे हे म्हणणे की, तीचा पती गोवर्धन हा दिनांक 11/02/2012 रोजी मोबाईल चार्ज करण्यासाठी सॉकिटमध्ये पीन लावण्यास गेला असतांना त्याचा एक हात कुलरवर ठेवलेला होता व त्याच वेळेस सॉकिटमध्ये जास्तीचा विद्युत प्रवाह उतरल्याने अर्जदाराच्या पतीस जोराचा धक्का लागला व त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली व नंतर दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/4 वर, 5/5 वरील व 5/7 पोस्टमार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते, परंतु त्याच वेळे दरम्यान सदरच्या विवादीत डि.पी.वरुन गावामध्ये अनेक जनांच्या घरात जास्तीचा विद्युत प्रवाह झाला ही बाब अर्जदाराने सिध्द केलेली नाही व त्याबद्दल कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही तसेच अर्जदाराने त्याचे पती अंबादास होंडे यांना सदरच्या विद्युत वापरा बाबत मासिक पैसे देत होते ही बाब मंचासमोर सिध्द करु शकलेला नाही, त्याबाबत अर्जदाराचे घरमालक यांचा याबाबत शपथपत्र देखील नाही. वा अधिकारपत्र देखील केलेले नाही, त्यामुळे अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक होता हे सिध्द केले नाही, त्यामुळे सदरचा अर्जदार विद्यमान मंचासमोर ग्राहक होत नसल्यामुळे सदरची केस मंचासमोर चालवण्याचा अधिकार नाही. तसेच अर्जदाराचे म्हणणे की, डि.पी.वरुन जास्तीचा विज प्रवाह मिटर मध्ये उतरल्यामुळे व तेथून सॉकिटमध्ये उतरल्यामुळे अर्जदाराचे पती मोबाईलची पीन सॉकेटमध्ये लावीत असतांना जबरदस्त शॉक लागुन त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली व पूढे त्याचे मृत्यू झाले व म्हणून त्यासाठी गैरअर्जदार हे जबाबदार आहेत हे अर्जदाराचे म्हणणे त्याने इतर कोठल्याही पुराव्याव्दारे सिध्द केलेले नाही व मंचास ते योग्य वाटत नाही.त्याचे कारण असे की, अंबादास होंडे यांनी देखील त्याच वेळेस टि.व्ही.ला हात लावला असता शॉक बसला होता असे त्यांचे जबानीत सांगीतलेले आहे. जर विजेचा अतिरिक्त प्रवाह अंबादास यांच्या मिटरमध्ये उतरला होता, असे गृहीतधरले तर अंबादास होंडे यांना मयत गोवर्धन गुजर यांच्या पेक्षा जास्तीचा शॉक लागला असता कारण तेथून पुढे वायरने विज कनेक्शन हे गोवर्धन गुजर यांच्या रुममध्ये नेलेली होती असे न घडता गोवर्धन गुजर यांना जबरदस्त शॉक बसला व त्याचे दुर्देवी मृत्यू झालेले आहे. यावरुन असे दिसते की, डि.पी.वरुन जास्तीचा विज प्रवाह आला नसून मयत गोवर्धन हाच काही तरी विजेच्या दुरुस्तीचे काम करीत असतांना त्यांच्या निष्काळजीपणामुळे सदरची दुर्देवी घटना घडलेली दिसते ही बाब नि.क्रमांक 10/1 वर दाखल केलेल्या राहुल पांडुरंग घोडगे यांच्या जबाबावरुन दिसते. राहुल घोडगे यांनी असे म्हंटले आहे की,सदरच्या दुर्देवी घटने नंतर त्याने घटनास्थळी जावून पाहणी केली असता अंबादास ग्यानबा होंडे यांच्या घरातून ज्या वायरने गोवर्धन यांच्या रुममध्ये विज नेलेली होती ती वायर ठिक ठिकाणी उघडी होती व जोड दिलेली होती यामध्ये म.रा.वि.वि.कंपनीची विद्युत वाहिणीचे तार वा पोल तुटलेले आढळून आलेले नाही तसेच कोणत्याही प्रकारची बिघाड रोहित्रामध्ये आढळून आलेली नाही,म्हणून गैरअर्जदाराचे म्हणणे की, मयत व्यक्तिस जो शॉक बसलेला आहे तो त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे लागलेला आहे यामध्ये म.रा.वि.वि.कंपनीची कोणत्याही प्रकारची चुक नाही हे म्हणणे मंचास योग्य वाटते. मंच येथे नमुद करु इच्छीते की, ज्या-ज्या लोकांनी आपली जबानी दिलेली आहेत,त्या मंचासमोर दाखल झालेले आहेत.परंतु त्यापैकी कोठल्याही एका व्यक्तिने मंचासमोर स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले नाही,म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान
भरपाई देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिलेली नाही.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष